तुमच्यातला एक, सर्वसामान्य, कष्टकरी, भरपूर फिरणारा, खूप वाचणारा, चवीने खाणारा, शेयर मार्केट आणि आजूबाजूला घडणाऱ्या घटनांना थोडस वेगळ्या नजरेने पाहणारा आणि शब्दातून व्यक्त होणारा, अभिमानी हिंदू ~ सनातन
शनिवार, २५ फेब्रुवारी, २०२३
सनातन भाग ५ : विठ्ठल
शुक्रवार, २४ फेब्रुवारी, २०२३
सनातन भाग 4 भगवद्गीता
सनातन भाग चार.
लवजिहाद असेल की प्रेम प्रकरणे हे जातीबाह्य विवाह याचे मूळ कारण चित्रपट, आधुनिक जीवन किंवा पालकांचे दुर्लक्ष हे कारण आहेच शिवाय हिंदूंनी आपल्या घरात, घराबाहेर हिंदू संस्कृती, धर्मग्रंथ याचे अनुकरण बंद केल्याने आपला सनातन हिंदू धर्माची शिकवण मुलांमध्ये प्रवाहित होत नाही.समजा जर भगवद्गीतेसारखा प्राचीन पुरातन धार्मिक ग्रंथ याचा थोडा जरी हिंदूंनी घरात वाचला असता तर कदाचित मुलांची मानसिकता आज जशी आहे तशी राहिली नसती. दुसऱ्या पंथाची लोक कट्टर असण्याची आणि हिंदू तसे नसण्याचे कारण धर्मग्रंथांना घरात नसलेले स्थान हेच आहे. पटत नाही ना? मग पुढे वाचाच
भगवद्गीतेचा पहिला अध्याय अर्जुनविषादयोग म्हणजे युद्धाला सुरुवात होण्याआधी रणांगणात आपल्याच रक्ताचे भाऊ, आप्त, गुरू, नातेवाईक याच्याविरुद्ध युद्ध करण्याची वेळ आली त्यावेळी त्याचे हातपाय गळून पडले, अर्जुन भयभीत झाला, त्याला भयंकर दुःख झाले आणि पडलेले अनेक प्रश्न त्याने योगेश्वर श्रीकृष्णाना विचारू लागला. हेच प्रश्न भगवद्गीतामधील श्लोक, भगवद्गीता घरात शिकवली, बोलली गेली असती तर त्याचा परिणाम मुलांवर होऊन विवाह संस्था, धर्म जाती याचे महत्व मुलांना लहानपणीच कळले असते आणि मोठे झाल्यावर त्याचे अनुकरण ही
केले असते असा माझा तरी समज आहे. हा सगळेच नाही पण बहुतांश मुलांना लव जिहाद, धर्म किंवा जाती बाहेर प्रेम वा लग्न न करण्याचे कारण कळले असते अस मला वाटते. काही प्रगत झालेल्या, विकसित, पाश्चात्य देशाची संस्कृती, वैयक्तिक आयुष्य, खुलेपणाचा स्वीकार करणाऱ्यांना कुंपण वाटेल पण त्या वाटण्यापेक्षा धर्माने कसे वागावे, योग्य अयोग्य याची ओळख लहानपणीच झाली असती. म्हणूनच मी तुम्हा सर्वांना आवाहन करेल की आता तरी आपल्यात बदल घडवा, सजग व्हा कारण हिंदू म्हणून असलेली ही ओळखच माणसाला माणूस म्हणून जगण्यास मदत करते. दिवसातील अर्धा तास, एक एक श्लोक असे ध्येय ठेवले तरी घरातील अबालवृद्ध मध्ये अध्यात्मिक जागृती तुम्ही करू शकता त्यासाठी आता तुम्हाला कोण्या गुरुची गरज आहे असे नाही. हातातील हा मोबाईल ज्यावर तासनतास बिभस्य रील पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा एखादे भगवद्गीता अँप, youtube वरील भगवद्गीता विश्लेषण व्हिडीओ यातूनही ज्ञान घेता येऊ शकते. आता तुम्हाला वर दिलेले मुद्दे भगवद्गीतेत आहे हेच माहीत नसेल. मुळात आयुष्यात पडणारे कोणतेही प्रश्न याचे उत्तर गीतेत आहे असं साधू संत म्हणून गेलेत ते काही उगीच नाही. अर्जुनाला पडलेले प्रश्न श्रीकृष्णांना विचारात असताना त्याने उपस्थित केलेले हे प्रश्न आणि त्याची मीमांसा यासाठी आजचा हा थ्रेड. उदारणार्थ अध्याय एक श्लोक 38 ते 43 याची माझ्या बौद्धिक पातळीवर मीमांसा मी करतो आहे.ज्याची माहिती तुम्ही स्वतः स्वतंत्र पद्धतीने नक्की करा असंही मी सांगू इच्छितो. चला ह्या ब्लॉगमुळे गीतेचा पहिला अध्याय
अर्जुनविषादयोग आहे हे आज भरपूर लोकांना समजले असेल. जोडलेल्या स्क्रिन शॉट मधील हे श्लोक अर्थ असा आहे की अति लोभामुळे बुद्धी भ्रष्ट झालेल्याना कुळाचा (कुटुंब वा वंश) नाश होण्यामुळे निर्माण होणारे दोष व मित्राशी वैर केल्याचे पाप दिसत नसले तरी बुद्धी नितीमत्तेने वागणाऱ्या लोकांनी तरी लाभापासून दूर का राहू नये. कुळाचा नाश झाला तर परंपरागत कुळधर्म नष्ट होतो आणि कुळधर्म नष्ट झाला तर मोठ्या प्रमाणात पाप वाढण्यास मदत होते. पाप वाढल्याने कुळातील स्त्रिया बिघडतात. कुळात वर्णसंकर उत्पन्न होतो ( वर्णसंकर म्हणजे भिन्न जातीच्या स्त्री पुरुषाच्या जवळ आल्याने जन्मणारी व्यक्ती) वर्णसंकरामुळे कुळाचा नाश होतो, नरकात ढकलतो. वर्णसंस्कारामुळे परंपरागत जातीधर्म आणि कुळधर्म उधवस्थ होतात. एकदा का कुळधर्म नष्ट झाला तर अनिश्चित काळासाठी नरकात रहावं लागते.
असा शब्दशः अर्थ आहे. समजा भगवद्गीता घराघरात शिकवली गेली असती तर लहानपणीच पाल्याना कुळ म्हणजेच वंश, धर्म,जाती याची माहिती मिळाली असती ह्या माहितीच्या आधारे जगात घडणारे लव जिहाद सारख्या प्रकारात न अडकण्याचे शिक्षण लहानपणीच समजले असते तसे संस्कार त्याच्यावर झाले असते. मुलगा असो की मुलगी यांना जातीबाह्य विवाह चुकीचे असतात त्यामुळे दोष निर्माण होऊ शकतात हे बाल्यवयातच कळल्याने तरुणपणात प्रेम प्रकरणे, जाती बाहेर लग्न यासारखे प्रश्नच उद्भवले नसते का? पण हिंदूंनी चार पुस्तक शिकून धर्मग्रंथांना बाजूला सारले ज्यामुळे संस्कृती मुलापर्यत पोहचत नाही आणि जे व्हायला नको ती पावले मूल तरुणपणात घेतात. काहींना जे वाचतोय ते खटकेल, संकुचित वाटेल, चुकीच्या वाटतील पण ज्या पालकांच्या मुलीचे 40 तुकडे करून फ्रीज मध्ये ठेवले जातात किंवा मुलींना प्रेमाच्या खोट्या जाळ्यात अडकवून त्याचा उपभोग करून सोडून दिले जाते त्या पालकांना किंवा ज्यांनी असे प्रसंग जवळून घडलेले पाहिले त्यांना अर्जुनाने मांडलेले मुद्दे चुकीचे वाटतील का हो? भले आज आपण जाती व्यवस्था मानत नसलो, प्रगत पुढारलेले झालो असेल तरी जवळच्या व्यक्तीचे असे आंतरजातीय विवाह कपाळावर आठ्या निर्माण करतात की नाही. भले असे विवाह झाल्याने नरकात अनिश्चित काळासाठी अडकणार नाही पण आयुष्याचाच नरक झाला तर? माझा उद्देश गीतेतील श्लोक सांगून, जातीभेद, धर्म, आंतरजातीय विवाह, आजची जगण्याची पद्धत यावर बोट ठेवायचे नाहीच मुळी. कसे वागायचे हे ज्यांनी त्यांनी ठरवायचे आहे पण जर आपण आपल्या धर्मीक ग्रंथांना जवळ घेतले, त्याचा अभ्यास केला,घरात चर्चा केली तर नैतिकता, सभ्य असभ्य वर्तन, समाजात वावरण्याचे पद्धत यांचे सामान्य ज्ञान मुलाना देऊ शकू याची खात्री वाटते. प्रसंग बेतल्यावर त्याचे गांभीर्य समजण्यापेक्षा ते आधीच समजले तर वाईट कुठे आहे. जीवापाड प्रेम असणाऱ्या आपल्या जवळच्या लोकांचे भले व्हावे, आयुष्यभर त्यांनी सुखात रहावे यासाठीच झटत असतो ना आपण मग हा छोटासा बदल केवळ धार्मिक नाही तर कौटुंबिक स्वास्थ सुधारणा करेल अस मला वाटत. भगवद्गीतेचा मी काही खूप मोठा अभ्यासक नाही कदाचित छोट्या तोंडी मोठा घास घ्यावा तसा उपदेश द्यायचा मला काहीच अधिकार नाही पण समाजातील आजची परिस्थिती पाहता हिंदूंना जागृत करण्यासाठी, धर्माशी जोडण्यासाठी भगवद्गीता हा धार्मिक ग्रंथ खूप मोठे काम करू शकतो अस मला वाटले. गेल्या दोन तीन महिन्यांपासून मी स्वतः पहिलाच अध्याय समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. आपणच आपले धार्मिक ग्रंथांना जवळ करणार नाही तर कोण करणार. भले त्यातल्या सगळ्याच गोष्टी पटणार नाही पण काही तर पटतील. आज पाहिल्यानंदा लेखाचा शेवट कसा करायचा हे समजत नाही आहे. कित्येकदा लिहलेले खोडुन परत लिहले पण शेवट काही जमेना पण कुठं तरी थांबावे लागेल त्यामुळे हिंदूंनो भविष्यकाळातील धोके ओळखून सजग व्हा, संघटित व्हा ह्या माझ्या पेटंट डायलॉग मारून विश्रींती घेतो. पुढचा लेख येईपर्यत
।।ॐ नमोः नारायणाय नमः।।
।।ॐ नमोः भगवते वासुदेवाय नमः।।
।।ॐ नमः शिवाय।।
बुधवार, २२ फेब्रुवारी, २०२३
सनातन भाग 3 : श्री व्यंकटेेश्वरा बालाजी कथा
मंगळवार, २१ फेब्रुवारी, २०२३
सनातन भाग २
सनातन च्या दुसऱ्या भागात आपले सहर्ष स्वागत. आजचा हा भाग थोडासा किचकट विषय वाटेल पण सांगण्याचा मोह मला आवरता येत नाही आहे. जास्त काही मांडण्यापेक्षा लेखाला सुरुवात करूया.
गुरुवार, १६ फेब्रुवारी, २०२३
सनातन
#सनातन ह्या थ्रेडमध्ये आपले स्वागत.हिंदू सनातन धर्म नाही तर जगण्याची पद्धत आहे पण जसे एका नाण्याला दोन बाजू असतात तसे प्रांत, बोली भाषा आणि माणसाच्या स्वार्थाने वेगवेगळे पंथ तयार केले ज्याला ती लोक धर्म अस संबोधायला लागली. त्यांनी त्यांच्या पंथाला काही ना काही नाव दिले तसच आपल्याला हिंदू हे नाव मिळाले असावे. हिंदू नावाचा इतिहास म्हणजे सिंधू नदीच्या तीरावर वसलेले लोकांना पाश्चात्य देशातील लोक सिंधू अस म्हणत पण त्यांना सिंधू अस म्हणता येतच नव्हते किंवा त्याचा उच्चार सिंधू ऐवजी हिंदू असा व्हायचा आणि हिंदू हे नाव प्रचलित झाले अस काही इतिहासकार सांगतात
मुळात धर्म हा शब्द भगवद्गीतेत किंवा पौराणिक ग्रंथात खूप वेळा आलेला आहे असं तुमच्या चाणाक्ष बुद्धीने हेरले असणार हे नक्की पण महाभारत काळात कोणता दुसरा धर्म अस्तित्वात होता का हो? कोणी पाद्री, मौलाना होता का? तसा साधा उल्लेख तरी सापडतो का? नाही म्हणजे हिंदूंच्या देशात किंबहुना जगात केवळ हिंदूच होते पण कोणताही पंथ अस्तित्वात नसल्याने हिंदू धर्म अस नामकरणाची गरजच नव्हती कारण जगण्याची जी पद्धती होती ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला हस्तांतरित केली जायची आणि तीच पद्धत रूढ होत होत आजची सनातन हिंदू पद्धती निर्माण झाली. धर्म ह्या शब्दाचा अर्थ भगवद्गीतेत येतो ते माणसाचे कर्तव्य म्हणून ना की त्या व्यक्तीचा पंथ म्हणून. थोडस वेगळं वाटत असले तरी शांत डोकं ठेवून केल्यास मी व्यक्त केलेला हा विचार तुम्हाला थोडा का होईना योग्य वाटेल. महत्वाचे म्हणजे तुम्ही हा वाक्यप्रचार खूप वेळा ऐकला असाल आणि तो ही अर्धाच ऐकला असणार " अहिंसा परमो धर्म" पण श्लोकाचा उर्वरित भाग " धर्म हिंसा तथैव च" हा भाग काही महाभागांनी न शिकवल्यामुळे हिंदू म्हणून घेणाऱ्या लोकांचे बरेच नुकसान झाले. असो
“अहिंसा परमो धर्म: धर्म हिंसा तथैव च “ ह्या श्लोकात उल्लेख झालेला धर्म हा शब्द कोणता पंथाची माहिती देत असावा बर? मुळात आधी व्यक्त झालो त्याप्रमाणे जगात केवळ सनातन धर्म असल्याने धर्म ह्या शब्दाचा अर्थ पंथ असा घेणेच चुकीचे आहे. माणसाच्या स्वार्थी स्वभावाने माणसाचे विभागणी झाली त्यावेळी प्रत्येक गटाला धर्म अस संबोधले जाऊ लागले असावे अस माझं मत आहे. गूगलवर शोधलं तरी अस मत सापडणे अवघडच पण मनात आलेल्या ह्या भावना व्यक्त होण्यासाठीच मी हे माध्यम वापरत असतो आणि तेच पुन्हा आज मी करतोय ह्याचा मला आनंदच आहे. आता “अहिंसा परमो धर्म: धर्म हिंसा तथैव च “ ह्या श्लोकात धर्म ह्या शब्दाचा अर्थ कर्तव्य असा घेतल्यास श्लोकाचा अर्थ असा होतो की अहिंसा हे माणसाचे परम कर्तव्य आहे पण ह्या अहिंसा कर्तव्यावर कोणी आघात करणार असेल तर हिंसा करणे चुकीचे नाही. असो आजच्या काळात धर्म म्हणजे पंथ हे एक अधिक एक बरोबर दोन हे गणित जसे फिट्ट बसवले आहे तस धर्म ही संकल्पना इतरांच्या डोक्यात घुसवणे अवघड. #सनातन ह्या शब्दाचा मराठीत अर्थ पारंपरिक, पुरातन, वैश्विक असा होतो तर इंग्लिश मध्ये Eternal असा अर्थ होतो आपला सनातन धर्म इतका प्रगल्भ आहे की एखाद्याने चार वेद, अठरा पुराणे आणि कैक हजारो पुस्तके तोंडपाठ असणारा व्यक्ती स्वतःला पंडित समजत असला तरी त्याचे ज्ञान समुद्रातुन बादलीभर पाणी काढून घेणे इतकेच असेल म्हणजेच बुद्धीमंत माणूस जेव्हा ज्ञानसागरात उभा राहील तर त्याचे केवळ पायाचे तळवे ज्ञानसागरात भिजलेले असतील. माझ्या ब्लॉग किंवा ट्विटचा मूळ उद्देश अश्याच साध्या पण विसरत चाललेल्या किंवा ज्या गोष्टी आपण प्रथा परंपरा नावाखाली करतो त्याची पार्श्वभूमी, त्यामागची गोष्ट सांगता येईल अशा ठेवण्याचा मी प्रयत्न करत असतो. #सनातन हा क्रमशः प्रकारातील थ्रेड असणार आहे ज्याची सुरुवात आजच्या ह्या प्रश्नाने करतो. मुळात कोणत्याही गोष्टीची सुरुवात ही आद्यदेवता गणपतीचे स्मरण करून करायचे असते त्यामुळे आजचा प्रश्न देखील गणपतीबद्दलच आहे. गणपतीच्याच नावाने सुरुवात का करतात याची माहिती हवी असल्यास कमेटमध्ये व्यक्त व्हा म्हणजे ती ही गोष्ट ब्लॉग रूपात घेऊन तुमच्या समोर सादर करतो. आजचा साधा प्रश्न म्हणजे ज्यावेळी आपण गणपती देवाचा उद्घोष करतो त्यावेळी "गणपती बाप्पा मोरया" अस म्हणतो पण हे #मोरया म्हणजे नक्की काय हा प्रश्न कधी तुम्हाला पडलाय का? नाही पडला तर आज पडलाय अस समजा आणि सांगा बर हे मोरया म्हणजे काय आहे ते
अपेक्षेप्रमाणे कोणाचेही उत्तर आले नाही पण सनातन धर्म त्यातील गोष्टी यांची माहिती आजच्या धक्काधकीच्या आयुष्यात होण्यासाठी घेतलेला वसा टाकू नये या उक्तीप्रमाणे गणपती बाप्पा मोरया यातील मोरया हा शब्द कोठून आला हे मीच मांडतो.
चौदाव्या शतकात श्रीगणेश याचा एक भक्त होऊन गेले होते जे केवळ आणि केवळ गणपती ह्या देवतेला पूजत असायचे, आद्यदेवता अस समजायचे. आयुष्यभर त्यांनी श्रीगणेशाची भक्ती केली मोरगाव ह्या अष्टविनायक गणेशाने दिलेल्या दृष्टांताप्रमाणे त्यांनी मोरगाव सोडून गणेश भक्तीत लिन होण्यासाठी चिंचवड गावात आपले बस्तान बसवले.कऱ्हा नदीच्या पात्रात त्यांना तांदळा स्वरूपात श्रीगणेश भेटले आणि त्यांनी आयुष्यभर त्याची पूजा करत शेवटी संजीवनी समाधी घेतली अश्या परमोच्च भक्तांची दखल श्रीगणेशाने नाही तर समाजाने घेतली होती आणि त्याचे प्रतीक म्हणूनच आद्यदेवता श्रीगणेश बरोबर त्याचे नाव जोडले गेले त्या भक्ताचे नाव म्हणजे मोरया गोसावी. चिंचवड गावात असणारा मोरया गोसावी हे मंदिर श्रीगणेश आणि त्यांचा भक्त मोरया गोसावी याची समाधी यासाठी प्रसिद्ध आहे. भक्तांची भक्ती भक्ताला युगाच्या आतापर्यत आपल्या आराध्य देवतेच्या नावाबरोबर जोडून टाकते.
शुक्रवार, १० फेब्रुवारी, २०२३
शिवनेरी आणि महादेव कोळीचा उठाव
फेब्रुवारी महिना आला की तरुणाईला दोन सण खूप खुणावतात त्यातील महत्वाचा,प्रमुख सण म्हणजे #शिवजयंती
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मतारखेवरून वाद असले तरी महाराष्ट्र सरकारने 19 फेब्रुवारी ही निश्चित केलेल्या तारखेशिवाय मराठी पंचांगानुसार एप्रिल महिन्यातदेखील शिवजयंती देशभरात उत्साहाने साजरा केला जाणारा सण आहे. मुळात दररोज साजरा करावा असा हा शिवजयंतीचा सण केवळ दोन दिवस साजरा होणे खूपच कमी पण तरीही दोन्ही दिवशी महाराष्ट्रातील जनतेसोबत देशातील लोक शिवजयंती धुमधडाक्यात साजरी करतात. महाराष्ट्रात तर पोर बोलायला शिकले की छत्रपती शिवाजी महाराज की जय ही आरोळी द्यायलाच पहिले शिकते म्हंटले तर वावगे ठरणार नाही. महाराजांचा जन्म शिवनेरी ह्या किल्ल्यावर झाला होता. ह्याच किल्ल्याच्या एका कमी प्रसिद्ध पण महत्वाच्या घटनेकडे तुमचे लक्ष केंद्रित करण्यासाठीच हा थ्रेड.
छत्रपती शिवाजी महाराज हे जहागीरदार आणि आदिलशहाच्या सैन्यात असलेले मराठा सरदार शहाजी भोसले यांचे मुलगे, पुण्याची जहागिरदारी शहाजी भोसले यांनी पत्नी जिजाबाई आणि बालशिवाजीच्या यांच्या खांद्यावर देखरेखीची जवाबदारी दिली गेली होती. ह्याचकाळात पुणे जहागिरीत फिरताना शिवाजी महाराज आणि जिजाबाई यांनी मराठी जनतेची चाललेली गळेचीपी, हाल आणि सतत कोणत्या ना कोणत्या यवन सैनिकांच्या तडाख्यात होणारे हाल ह्यात जनता पिचून गेलेली पहिली होती. कधी आदिलशाही, कधी निजाम तर कधी मुघल तलवारीच्या जोरावर मराठी जनतेचे शोषण करत होते. लहानपणापासून शूर योद्धे, रामायण महाभारत याच्या गोष्टी ऐकत मोठे होणाऱ्या बालशिवाजीला आजूबाजूला चाललेल्या स्वैराचाराचा खूप राग येत असे म्हणूनच समविचारी सवंगड्याना सोबत घेत हिंदवी स्वराज्याची मुहुर्तमेढ उभी करण्याची शपथ रायरेश्वराच्या मंदिरात घेतली होती. तयार झालेल्या ह्याच संगठणाने गमती गमतीत पुणे जहागिरीमधील तोरणा राजगड, पुरंदर सारखे महत्वाचे किल्ले जिंकल्यामुळे त्यावही प्रसिद्धी केवळ शत्रूच्या दरबारात न होता महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात पसरू लागली होती. केवळ स्वराज्याच्या सीमा वाढवून त्यावर सत्ता न गाजवणाऱ्या शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व, त्याचे परस्त्रिय मातेसमान,गरिबांना मदत करणारा,शेतकऱ्याच्या शेतातील पात्याला हात न लावणारा, ज्वलंत हिंदुत्ववादी, देव देवता,मंदिर यांची काळजी घेणारा राजा अशी प्रसिद्धी सर्वदूर पसरत होती. हीच प्रसिद्धी, स्वतःचे राज्य यातून प्रेरित होऊन शिवनेरी किल्ल्यावर काही कोळी तरुणांनी यवनांचे अधिपत्य नाकारत स्वतःचा झेंडा उभा करण्याची प्रेरणा घेत धूळखात आणि यवनांचे दुर्लक्ष झालेल्या शिवनेरीवर स्वतःचे निशाण फडकवले.
कोण होते हे वीर?
जुन्नर शहराला पुराणिक तसेच ऐतिहासिक महत्व, ह्याच शहराच्या जवळ असलेला समृद्ध नाणेघाट जुन्नर शहराचे प्राबल्य सिद्ध करण्यास पुरेसे आहे. जुन्नर तालुक्यात सर्वात जास्त बौद्धकालीन गुहा देखील आहे. केवळ ऐतिहासिक नाही तर आर्थिकदृष्ट्या जुन्नर आणि आसपासच्या परिसर खूप महत्त्वाचा त्यामुळे जुन्नरच्या शिवनेरी किल्ल्याला वेगळेच महत्व प्राप्त झालेले होते. अश्या जुन्नर शहर आणि आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी शिवनेरी ह्या किल्ल्याचे महत्व खूप होते. ह्या किल्ल्यावर सत्ता निजामाची असो की आदिलशाहीची वा असो मुघलांची काळजी घेण्यासाठी गडावर महादेव कोळी समाज असायचा. कोळी समाज म्हणजे मासेमारी करणारा अस ठरलेले असलं तरी जो कोळी समाज शेती करायचा त्याला महादेव कोळी अस संबोधलं जात. जुन्नरच्या आसपास राहणाऱ्या ह्या कोळी समाजाकडे किल्ल्याची राखणदारी,देखभाल ही काम पूर्वापार चालू होती. यवनांच्या दूर्लक्ष झालेल्या ह्या गडावर स्वतःचे अधिपत्य सांगून स्वतःचे राज्य उभे करण्याची प्रेरणा शिवाजी महाराजाच्या स्वराज्य ह्या गोष्टीतून कोळी बांधवांनी घेतली होती हे विशेष. कोणताही संघर्ष नाही, कत्तल नाही पण गडावरचे निशाण आता बदलले होते.
गडावरचे निशाण बदलल्याची बातमी दिल्लीचा पातशहा जहांगीरच्या कानावर पडली. दक्षिणेत राज्य विस्तारासाठी त्याने त्याचा क्रूर, कपटी, धर्माध औरंगजेब मुलाला पाठवले होते. आदिलशहाचे दुर्लक्ष तसेच संपत चाललेल्या निजामाच्या गडांवर मुघलांचे वर्चस्व स्थापन करण्यास औरंगजेब आग्रही होता. शिवनेरी किल्ल्याचे भौगोलिक तसेच आर्थिक महत्व लक्षात घेत औरंगजेबाने शिवनेरीवर फार मोठी सैन्याची तुकडी पाठवली. सैन्याच्या ह्या तुकडीने गडावरील महादेव कोळीच्या गटाला पराभूत करत अटक केली. हा गट थोडा थोडका नसून किमान हजार लोकांचा तरी होता त्यांनी केलेले बंड आणि किल्ला ताब्यात घेतला म्हणून औरंगजेब खूप रागावला होता. अटकेत असणंऱ्या ह्या सगळ्या लोकांचा अमानुष छळ तो करत राहिला. धर्माध औरंगजेबाने एक दिवस शिवनेरी गडाच्या माथ्यावर मधोमध असलेल्या चौथऱ्यावर एका एक कोळी बांधवांना आणून त्याचा शिरच्छेद केला. इस्लामी धर्माध पुस्तकानुसार इतर धर्मीयांचे शिरच्छेद करणे, त्या शिराचे ढीग निर्माण करून दहशत माजवणे त्यातून धर्मातर करणे हे प्रकार त्यावेळी प्रसिद्ध होते. चौथाऱ्यावर केलेला हा रक्तपात एक धडा म्हणून कायम रहावा अशी ह्या क्रूर औरंगजेबाची इच्छा होती. चौथरा असलेल्या हे ठिकाणावर नंतर एक गोल घुमट बांधण्यात आले तसेच इथे फारसी भाषेत शिलालेख आढळतो. पुढे खिळखिळी झालेली आदिलशाहीकडून छत्रपती शिवाजी महाराज यांनी शिवनेरी किल्ला हस्तगत केला होता.
बंड अयशस्वी झाले, हजारो महादेव कोळी समाजाचे तरुणांची हत्या झाली असे हे शिवनेरी गडावरील ठिकाण बहुतांश लोकांना माहीत असेलच असे नाही म्हणूनच हा लेख. कधी शिवनेरीवर गेलाच तर त्या वीरांचे स्मरण करण्यासाठी इथे नक्की भेट द्या. शिवजन्मभूमी च्या शेजारी हेलिकॉप्टर उतरण्यासाठी जिजामाता आणि बाल शिवाजी याच्या पुतळ्यामागे जी बाग आहे तिथून थोड्याच अंतरावर हे ठिकाण आहे.
मंगळवार, ७ फेब्रुवारी, २०२३
धार्मिक शिक्षणाची गरज भाग 2
शनिवार, ४ फेब्रुवारी, २०२३
गृहपती अवतार
गृहपती हा भगवान शंकराचा सातवा अवतार आहे. कथेनुसार, नर्मदेच्या तीरावर असलेल्या धरमपूर नावाच्या नगरात विश्वनर नावाचा एक साधू आणि त्याची पत्नी शुचिष्मती राहत होते. शुचिष्मती दीर्घकाळ निपुत्रिक राहिली पण एके दिवशी तिला पतीपासून शिवासारखा पुत्र मिळावा अशी इच्छा झाली. मुनी विश्वनरांनी काशीला जाऊन भगवान शंकराच्या विरेश लिंगाची पूजा केली. एके दिवशी मुनी विरेश लिंगाच्या मध्यभागी एक बालक प्रकटले. मुनींनी शिवाची बालरूपात पूजा केली. तिच्या उपासनेने प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी गर्भातून अवतार घेण्याचे शुचिष्मतीचे वरदान दिले. कालांतराने, शुचिष्मती गरोदर राहिली आणि भगवान शंकर शुचिष्मतीच्या गर्भातून पुत्राच्या रूपात प्रकट झाले.
गृहपती बालकाचे वय वाढत होते त्याच्या जन्मानंतर घरात आनंदाचे वातावरण होते. एक दिवस देवर्षी नारद भ्रमण करत मुनींच्या आश्रमात आले. बालकाकडे पाहत तुमचा मुलगा अप्लायुषी आहे असं मुनींनी सांगितलं. नारदाच्या वक्तव्याने मुनी आणि त्याची पत्नी दुःखी झाले. पालकांना दुःखी पाहून गृहपतीने महादेवांची आराधना करत महामृत्युंजय मंत्र मिळवण्याचा निग्रह केला.
एक चांगल्या मुहूर्तावर गृहपतीने काशी विश्वेश्वराचे दर्शन घेऊन एका शिवलिंगाची स्थापना करत आराधना चालू केली. थोड्याच दिवसाच्या उपासनेनंतर देवेंद्र इंद्र गृहपतींपुढे अवतरीत होऊन हवा तो वरदान मागण्याचे आव्हान करू लागले. नम्र भाषेत गृहपतीने नकार देत त्याचे आराध्य देव महादेवाची उपासना करत असून तेच मला वरदान देतील अस सांगितलं. गृहापतीच्या उत्तराने इंद्र रागावले आणि गृहपतीवर प्रहार करण्यास चाल केली. हल्ला होण्याआधीच तिथे महादेव अवतरीत होऊन इंद्राच्या रूपात गृहापतीची परीक्षा घेत होते सांगत यमराजाच्या प्रभावापासून वाचवण्याचे वरदान दिले.
ज्याठिकाणी गृहपतीनी लिंग तयार केले होते ते आज अग्निश्वर म्हणून प्रसिद्ध असून त्याची आराधना केल्याने वीज, अग्नी यापासून रक्षण होते असा भाविकांची भावना आहे.
शुक्रवार, ३ फेब्रुवारी, २०२३
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका
हो अजून 10-12 दिवसाचे अंतर आहे ऑस्ट्रेलिया दौरा चालू होण्यासाठी पण ज्या पद्धतीचा खेळ आणि खेळाडू त्याच्याकडे आहे ते पाहता क्रिकेट रसिकांना ह्या श्रुखलेकडून बऱ्याच अपेक्षा असतील यात दुमत नसेल. आज ऑस्ट्रेलिया संघाचा थोडासा अंदाज घेऊ या अस वाटल्याने हा थ्रेड वाढवतो आहे.
पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली येणारा हा संघ त्याच्या इतर भूतकालीन संघांप्रमाणे भारतात शृंखला जिंकण्याच्या मनसुब्याने येत असणार हे निश्चितच. क्रिकेट इतिहासात ऑस्ट्रेलिया संघ बलाढ्य होता आणि आहे पण ह्या बलाढ्य संघाला भारतात भारताला हरवणे अनेकवेळा अवघड गेले आहे.
ऑस्ट्रेलिया संघ पुढील
प्रमाणे आहे
उस्मान ख्वाजा
डेव्हिड वॉर्नर
मारनस लबुसचेंजने
स्टीव्ह स्मिथ
ट्रविस हेड
अॅलेक्स कॅरी
कॅमेरून ग्रीन
नॅथन लायन
पॅट कमिन्स
जोश हेजलवूड
मिचेल स्टार्क
या आघाडीच्या खेळाडूंबरोबर
मॅट रेनशॉ
पीटर हॅन्डस्कॉम्ब
अशटोन अगर
मिचेल स्वीपसन
स्कॉट बोलंड
टॉड मर्फी आणि
लान्स मॉरिस
भारतीय भूमीत 70 च्या दशकात मिळालेल्या यशाची पुनरावृत्ती करण्याच्या इच्छेने भारतात येणार आहे. खेळाडूंचा गठ्ठा पाहता कोणाला खेळवायचे, कोणाला वगळायचे ही प्रमुख डोकेदुखी ऑस्ट्रेलिया संघावर आहे हे निश्चितच.
वर उल्लेख केल्याप्रमाणे ऑस्ट्रेलियाचा हा संघ धोकेदायक तर आहेच हे कोणाच्याही लक्षात आलेच असेल पण टॉड मर्फी आणि लान्स मॉरिस सोडले तर बाकीचे सदस्य देखील पट्टीचे खेळाडू आहेत. पहिला सामना नागपुरात आहे आणि नागपूरमध्ये खेळपट्टी जलदगती गोलंदाजांना जास्त सहकार्य करते असा इतिहास आहे
अश्या परिस्थितीत काही दिवसांपासून उत्तम कामगिरी करणाऱ्या बोलंडला संधी देण्यासाठी कमिन्स कोणाचा बळी देईल बर? मिचेल स्टार्क की ग्रीन असो पण इतर उर्वरित संघ फिक्स आहे. खेळपट्टी पाहून लायनला साथ देण्यासाठी अगर किंवा स्वीपसन याना वेगवान गोलंदाजांच्या ऐवजी जागा संघात मिळू शकते.
पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ देखील घोषित झालेला आहे ज्यात
रोहित
शुभमन
पुजारा
विराट
श्रेयस/ सूर्या
के एस भारत/ के एल राहुल
जडेजा
अश्विन
शमी
सिराज
कुलदीप
तसेच
उमेश यादव
जयदेव उनाडकट
इशान किशन
अक्सर पटेल खेळाडूंचा समावेश आहे.
श्रेयसला झालेली दुखापत आणि न्यूझीलॅन्ड
मालिकेतून घेतलेली माघार पाहता पहिल्या कसोटी श्रेयस की सूर्या हे फिटनेस टेस्ट ठरवू शकते. तस सूर्या कसोटीत काही दिवे लावले असे मला वाटत असल्याने श्रेयसने फिट व्हावे ही इच्छा आहे. संघातील काहींचा आवडता के एल राहुल हा देखील ह्या पाचव्या नंबरसाठी आग्रही असण्याची शक्यता आहे अन्यथा
यष्टीरक्षक बनल्याशिवाय संघात त्याची जागा बनत नाही. कैक दिवसापासून दुसरा यष्टीरक्षक म्हणून हिंडणारा के एस भारतच पहिली कसोटी खेळेल अस वाटत असेल तरी राहुलला बेंचवर बसलेले पाहणे टीम मॅनेजमेन्टसाठी अवघड निर्णय असू शकतो. भारतीय भूमीत कसोटी आणि फिरकी गोलंदाज याची प्रेम कहाणी खूप जुनी अश्यावेळी अश्विन, जडेजा, कुलदीप हे त्रिकुट चारपैकी 3 कसोटीत खेळताना मी तरी पाहतोय. यातही अश्विनने दमदार कामगिती करावी अशी मनोमन इच्छा असली तरी कुलदीप प्रकशझोतात असण्याची दाट शक्यता वाटते.अक्षर पटेलला संधी केवळ रवींद्र जाडेजाच्या जागी मिळू शकेल अन्यथा नाही. शमी सिराज हे दोन वेगवान गोलंदाज इतर फिरकी गोलंदाजांना मदत करताना दिसू शकतात. दोन्ही संघ बघता विजय मिळवणारा हा संघ अस कोणीही ठामपणे सांगू शकणार नसले तरी जिंकणारा आणि हरणारा यांच्यात धाग्याइतके फरक असणार आहे. नशीब ज्याचे बलवत्तर तो जिंकेल. जरी मालिका भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असली तरी वैयक्तिकदृष्ट्या खेळाडू एकमेकांना वरचढ राहण्याचा प्रयत्न करतील. उदा अश्विन विरुद्ध लायन अश्विन 88 सामन्यात 449 तर लायन 115 सामन्यात 460 विकेट आहेत. 4 सामन्याची ही लढाई दोघात देखील पहायला मिळणार आहे
दुसरी महत्त्वाची जोडी म्हणजे विराट विरुद्ध स्मिथ. 104 सामन्यात 8119 धावा 49 च्या सरासरीने जमवणारा विराटच्या विरुद्ध 92 सामन्यात 8647 धावा 61 च्या सरासरीने करणारा स्मिथ. दोघांच्या खेळलेल्या सामन्यात आणि स्वतःच्या खात्यात धावा जमावण्यात तफावत असली तरी दोघांतील संघर्ष जोरदार होईल
इतर खेळाडूंचे म्हणाल तर फेस टू फेस स्पर्धा नसली तरी प्रत्येक खेळाडू वैयक्तिक कामगिरी चांगली करत आपल्या नावाचे नाणे वाजवण्याचा प्रयत्न करेल. भारतच्या तुलनेत ऑस्ट्रेलियाचा संघ उजवा वाटतो तो त्याच्या रेकॉर्डस् आणि त्याच्या खेळण्याच्या शैलीमुळे. कसोटीत संयमाची परीक्षा असली तरी एकदा मैदानात पाय रोवले की ख्वाजा, वॉर्नर,मारन्स मोठ्या खेळी खेळण्यात तरबेज आहेत. त्याचा हेड, ग्रीन आणि कॅरी हे रिषभ पंत जश्या ताबडतोब खेळया खेळतो तश्या करण्यात माहीर आहेत. गोलंदाजीत कमिन्स, हेझलवूड, स्टार्क यांच्याबद्दल जग जाणतेच. स्टार्क जखमी असल्याने त्यांच्या बदली खेळाडू बोलंडदेखील तितकाच घातक गोलंदाज. फिरकी गोलंदाजात लायनला सोबत एकतर अगर करेल किंवा स्वीपसन. दोघे लायन इतके कुशल नसले तरी एखाद दुसरी सर्वोत्कृष्ट खेळी करण्याची त्याच्यात ताकद आहे. ऑस्ट्रेलियन थिंक टॅन्कची मनस्थिती आणि भूतकाळातील संघ निवड पाहता 3 वेगवान, 1 फिरकी, ऑलराउंडर ग्रीन अशी
गोलंदाजाची फळी सोबत यष्टीरक्षक आणि प्रमुख 5 फलंदाज असा संघ ते निवडतील हे जवळपास फिक्स आहे. कारण कामचलाऊ गोलंदाजी करण्यासाठी त्याच्याकडे एक सोडून दोन दोन लेग स्पिनर आहेत, स्मिथ आणि लबुसचेंजने
तुलनेत भारताकडे असणारे खेळाडु कामगिरीत कमी नसले तरी त्याची कामगिरीचा आलेख वर खाली असण्याचे प्रमाण पाहता ऑस्ट्रेलिया संघापेक्षा कमकुवत संघ वाटतो.ज्याप्रकारे ऑस्ट्रेलियाचा कोणता संघ खेळेल हे जवळपास पक्के आहे तिथे भारतीय संघात कोणाला घ्यायचे याबद्दल ठाम मत सामन्याच्या आधी तयार होईल
टीम मॅनेजमेंटचा आवडता खेळाडू के एल राहुलची जागा संघात बनवण्यासाठी संघाचा समतोल बिघडला जाईल अस माझं वैयक्तिक मत आहे. राहुलला सलामीला खेळवायचे की दुखापतग्रस्त श्रेयसच्या जागी की श्रीकर भारतला डावलून यष्टीरक्षक म्हणून खेळवायचे हे लवकर ठरेल असा विषय नाही. माझ्या मतानुसार शुभमन गिल ज्या फॉर्मात आहे ते पाहता रोहितसह सलामीला खेळवले पाहिजे. पुजाराने केवळ चेंडू न खाता धावा काढल्या पाहिजे. विराट चौथ्या तर पाचव्या स्थानी के एल आणि सूर्या यातील एकाची निवड. यष्टीरक्षक म्हणून श्रीकरला पहिल्या कसोटीत स्थान मिळाले पाहिजे. जडेजा आणि अक्सर समान शैलीचे खेळाडू असल्याने
त्यातील एक, अश्विन याबरोबर फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर कुलदीपला संधी दिल्यास ऑस्ट्रेलिया संघातील खेळाडूंची पिसे उडवण्यास सोप्प पडेल. बुमराहच्या अनुपस्थितीत सिराजने केलेली उत्तम कामगिरी सोबत अनुभवी शमी असा संघ निवडला जाऊ शकतो. अक्सर, उमेश गुणवत्ता असूनही संघाबाहेर रहावे लागेल
जयदेव उनाडकट आणि इशान किशन राखीव खेळाडू म्हणून सध्यातरी योग्य वाटत आहे. तुलनेत ऑस्ट्रेलिया खेळाडू सरस असले तरी भारतीय खेळपट्टीवर कसलेल्या फिरकी गोलंदाजांना सामोरे जाणे त्यांना सोपे जाईलच असे नाही. असो भारतीय संघाने ही मालिका जिंकावे हीच इच्छा कारण हेच पहिले ध्येय भारतीय खेळाडु असायला हवे नंतर WTC ची फायनल. भारतीय संघाने मालिका जिंकल्यास क्रिकेटच्या प्रत्येक प्रकारात पहिल्या क्रमांकावर येणारा पहिला संघ बनू शकतो. खेळातील शत्रुत्व पाहता येणाऱ्या ह्या चार कसोट्या जोरदार होतील यात कोणतीही शंका नाही. केवळ भारत वा ऑस्ट्रेलियात नाही तर जगातील क्रिकेट रसिक
ह्या कसोटी मालिका सुरू होण्याची वाट पाहत असणार हे नक्की.
------- सनातन
बुधवार, १ फेब्रुवारी, २०२३
धार्मिक शिक्षणाची गरज
सी ए टॉपर
स्वभावाला औषध नाही कारण प्रत्येक व्यक्तीच्या एक स्वभाव असतो.स्वभाव म्हणजे त्याची वागण्याची, बोलण्याची किंवा निर्णय घेण्याची प्रक्रिया. प्रत्...
-
९० च्या काळात एड्स आणि एड्सबद्दलची जनजागृती यामुळे टीव्हीवर कंडोमच्या जाहिराती सर्रास दिसत असल्याच्या. बलवीर पाशा कौन है ते मादक...
-
Afghanistan played well अस म्हणत हरलेल्या संघाचे मनोधैर्य वाढवण्यासाठी बोलणारे अनेक पुढे येतील पण त्या शब्दांनी खरच काही बदलणार ...
-
स्वभावाला औषध नाही कारण प्रत्येक व्यक्तीच्या एक स्वभाव असतो.स्वभाव म्हणजे त्याची वागण्याची, बोलण्याची किंवा निर्णय घेण्याची प्रक्रिया. प्रत्...