बुधवार, २२ फेब्रुवारी, २०२३

सनातन भाग 3 : श्री व्यंकटेेश्वरा बालाजी कथा


मी तुमचा मित्रा सनातन, आज पुन्हा एकदा एक सनातन भागातील पुढील कथा घेऊन तुमच्या समोर उपस्थित झालो आहे.
PK नावाचा फालतू कलाकार गरीब घाण याचा चित्रपट तुम्ही पाहिला असेल. त्यात हिंदू देव देवता, रूढी परंपरा याचा केलेला अपमान पाहून लोकांना हसायला आलेले त्यात तो एका दगडाला पानात असलेला भगवा रंग लावून देव असल्याचा बनाव करतो आणि परीक्षेला येणाऱ्या विद्यार्थी तिथं डोकं टेकवतात, पैसे टाकतात हा प्रसंग वास्तवदर्शी वाटतो की नाही? हो मी वास्तवदर्शी म्हणालो कारण मूर्ख हिंदू समाज कोणतीही माहिती न घेता कोणत्याही नसलेल्या देवाच्या पायावर डोकं ठेवायला, भोंदू स्वयंघोषित बाबा बुवा महाराज यांच्या दावणीला स्वतःला बांधून घेतात ही वस्तुस्थिती आहे. हिंदूंनी सजग होणे, डोळस होणे किती गरजेचे आहे हे यातून आपण शिकले पाहिजे.

आज व्यक्त होतोय ते एक अशी गोष्ट तुमच्यासमोर घेऊन येतोय जी तुम्हाला निश्चित माहीत नसणार आणि तरीही बहुतांश हिंदू लोक त्या देवतेच्या पाया पडायला तिथे जातात, केस दान करतात पण त्या देवाची माहिती शून्य असते.केस दान का करतात हे माहीत नसते तरीही त्या देवाला गेल्यावर तिथं जाऊन टक्कल करणे म्हणजे देवाला गेलो याचा पुरावाच समाजात.

सुरुवात वाचून तुम्हाला समजले असेलच की मी जे देवस्थानबद्दल बोलतोय तो देव म्हणजे आंध्रप्रदेशमधील आणि भारतातील सर्वात श्रीमंत देव व्यंकटेश्वरा म्हणजेच बालाजी. आजची ही गोष्ट नक्की वाचा आणि नवीन माहिती मिळाली असेल तर नक्की आपल्या मित्रमंडळीत शेयर करायला, माझा ब्लॉग, ट्विटर follow करायला विसरू नका.
गोष्ट खूप जुनी आहे. देवदेवतांना प्रसन्न करण्यासाठी पूर्वापार पासून होम हवन, यज्ञ करणे सनातन हिंदू धर्मात आघाडीचे काम. असाच एक यज्ञ देवता करायला घेतात पण ह्या यज्ञचा भोग कोणत्या देवाला द्यायचा असा मोठा प्रश्न देवतांना पडला. सृष्टीचे जनक श्री ब्रम्हा, तारणहार श्री नारायण विष्णू की दुष्टाचा संहार करणारा षी शंकर या परमात्म्यापैकी कोणाला भोग द्यायचा याबद्दल वाद वाढू लागला. प्रत्येक देवता आपआपल्या आराध्य देवाचे नाव घेऊ लागली त्यामुळे कोणत्या देवाला सर्वोत्तम मानायचे हे ठरेना. पडलेला हा प्रश्नाचे उत्तर मी शोधून काढतो अस म्हणत श्री ब्रह्मा याचा पुत्र तपस्वी योगी भृग जवाबदारी डोक्यावर घेतो. परमात्मा देवाच्या त्रिकुटात नक्की कोण सर्वोत्तम शोधण्यासाठी भृगु त्याच्या रागाची, करुणेची, दयेची परीक्षा घेणार असतो.

परीक्षा घेण्यासाठी भृगु सर्वात प्रथम आपल्या पित्याच्या म्हणजेच श्री ब्रम्हा याच्या घरी जातो पण आपल्या पित्याला नमस्कार न करता त्याच्याशी बोलत बसला. मुलाच्या अश्या वागण्याने खरतर श्री ब्रम्हा याना खूप राग आला होता. मुलाची चूक दाखवत त्यांनी आपल्याला प्रणाम कर अशी आज्ञा भृगुला केली मात्र त्याला स्पष्ट नकार देत भृगु त्यांना तो त्याचा मुलगा म्हणून नाही तर परीक्षक म्हणून आला अस म्हणाला. आधीच कोपिष्ट झालेले ब्रम्हा मुलाला मारण्यासाठी त्याचा कमंडलू उचलला. परिस्थिती हाताबाहेर जाते हे पाहत भृगुने तिथून धूम ठोकली ते सरळ हिमालयात महादेवाच्या घरात घुसले. महादेव आपल्या पत्नी माता पार्वतीबरोबर एकांतात होते पण अचानक आलेल्या भृगुमुळे त्याचा एकांत विरून गेला. रागाच्या भरात महादेवांनी आपला त्रिशूल उचलणार तेच भृगु तिथूनही धूम ठोकत श्री विष्णू याच्या क्षीरसागरात प्रवेश केला. भगवान विष्णू शेषनागावर विश्रांती घेत पहुडले होते तर त्याची पत्नी त्याचे पाय दाबत बसली होती. भृगुने कोणताही विचार न करता भगवंताच्या छातीवर पाय मारला ज्यामुळे भगवंताची निद्रा भंग पावली पण तरीही स्मित हास्य करत त्यांनी श्री ब्रम्हापुत्राच्या पायाला हातात घेऊन भृगुला कोठे लागले तर नाही ना याची चौकशी करू लागले. झालेल्या ह्या प्रकारामुळे भृगु मुनी सर्वोत्तम देव कोण या परीक्षेच्या निष्कर्ष पर्यत पोहचले. तिन्ही परमात्माची माफी मागत त्याने केलेल्या वाईट वर्तनाचे कारण सांगून परत देवतांचा यज्ञस्थळी परत आले. जमलेल्या सर्व तपस्वी, साधू आणि देवतांना झालेला प्रसंग सांगत सर्वोत्तम देव म्हणून श्री विष्णू योग्य आहे असे घोषित केले.

कथेचा पहिला भाग झाला पण इथे श्री व्यंकटेश बालाजी कुठे असा प्रश्न तुम्हाला पडणे अपेक्षित आहे आणि हाच ट्विस्ट वाचण्यासाठी कथेचा हा उत्तराधार्थ वाचू या.

कोण कुठला तपस्वी येतो. सृष्टीच्या पालनकर्त्याला छातीवर पाय मारतो त्याला शासन करण्याचे सोडून त्याच्या पायाला लागले की नाही अशी चिंता करणाऱ्या श्री विष्णूचा माता लक्ष्मी यांना खूप राग आला. पतीचा डोळ्यादेखत झालेल्या ह्या अपमानाने त्या खूप व्यथित झाल्या. ज्यावेळी विष्णू वराह अवतार घेऊन सृष्टीला वाचवत होते त्यावेळी लक्ष्मी माता वैकुंठातून गायब झाला आणि आपला देहत्याग केला. देहत्याग करून माता लक्ष्मी चोल राजाच्या घरात पद्मावती रूपात जन्म घेऊन मानवी अवतारात जगू लागल्या. वैकुंठातून लक्ष्मी गायब झाल्याने विष्णूनी खूप शोधाशोध केली आणि शेवटी लक्ष्मी मातेचा वैकुंठ सोडण्याचा आणि पद्मावती रूपात पृथ्वीवर विहार लक्षात आला. लक्ष्मी मातेला पुन्हा प्राप्त करण्यासाठी विष्णूनी मानवी रूपात श्रीनिवास रूपात अवतार घेऊन मानवी हाल अपेष्टा दुःख सहन करत, कोणत्याही मायेचा वापर न करण्याचा प्रण करत पद्मावतीला मिळवण्याचे ध्येय ठेवले.

पद्मावती देवी एकदा जलक्रीडा करण्यासाठी वनात भटकंती करत असताना एका हत्तीने त्याच्यावर हल्ला केला. जवळच असलेले भगवंत विष्णूनी श्रीनिवास रूपात पद्मावतीला हत्तीच्या हल्ल्यातून वाचवले. दोघांनी एकमेकांना पाहिले आणि ते प्रेमात पडले. पद्मावती झालेल्या प्रसंगानंतर राजमहाल परतली खरी पण श्रीनिवास याच्या विरहात त्यांनी खाणे पिणे बंद केले ज्याची उपरिती त्या आजारी पडण्यात झाले.दुसरीकडे श्रीनिवास घरी तर परतले पण त्यांचे लक्ष कशात लागेना. पद्मावतीचा शोध घेण्यासाठी त्यांनी घरोघरी फिरून ज्योतिष सांगणे चालू केले. राजा चोल मुलीच्या आजारपणामुळे काळजीत पडले बरेच औषध उपचार केल्यानंतर ही तब्बेतीत सुधार न झाल्याने राजकन्यांच्या आजाराच्या शोधासाठी शहरात दवंडी पेटवली. श्रीनिवासची ज्योतिष सांगण्यामुळे ते अल्पवधीत प्रसिद्ध झाले होते त्यांना राजकन्या चा आजाराचे कारण शोधण्यासाठी बोलवण्यात आले. ज्योतिष पहायला आलेल्या श्रीनिवास यांना पाहून पद्मावती बऱ्याच दिवसांनी हसली तेच श्रीनिवास यांनी राजा चोल याना वनात घडलेला प्रसंग सांगून हत्तीपासून वाचवणाऱ्या व्यक्तीवर राजकन्येचा जीव जडला आहे असे सांगितले शिवाय ती व्यक्ती कोणी साधी सुधी व्यक्ती नसून भगवान श्रीविष्णू याचा अवतार असल्याचे सांगितले. श्रीविष्णूचा अवतार आपला जावई होणार यामुळे चोल राजा प्रसन्न झाला आणि आनंदाच्या भरात आपल्या मुलीचा विवाह त्याच मुलाशी करण्याची घोषणा केली.

श्रीनिवास मानवी अवतारात असल्याने त्याच्याकडे लग्न करण्यासाठी धन नव्हते. लग्नाची बातमी तिन्ही लोकांत पसरली होती अश्यावेळी स्वतः श्रीनिवास मात्र चिंताचुर होते. लक्ष्मी देवींनी विष्णूची साथ सोडल्याने ते निर्धन झाले होते अश्यावेळी धनाची देवता कुबेर त्याच्यासमोर प्रगट होऊन हवे तेवढे धन देण्याची आर्जव करू लागले पण मनुष्य देह घेतलेल्या श्रीनिवास यांनी ते धन घेण्यास नकार देत कर्ज रूपात धन देण्याची विनंती कुबेरांना केली. कुबेरांना देवाची अशी विनंती खटकली पण श्रीनिवास मात्र कर्जरूपात धन घेण्याच् अटीवर ठाम होते. श्रीब्रम्हा आणि महादेव याच्या साक्षीने मानवी देहात मानवी सुख दुःख, पैशाची अडचण समजून घेण्यासाठी कर्जरूपात धन घेण्यावर ठाम होते. श्रीनिवास यांचा ठाम निर्धार पाहून कुबेरानी घेत असलेले कर्ज कसे फेडणार अशी विचारणा केली. श्रीनिवास म्हणाले की हे कर्ज मी नाही तर माझे भक्त फेडतील. भक्तांच्या भक्तीला माझी कृपा भेटली की ते धनवान होतील. माझ्यामुळे धनवान झालेले भक्त मला दान रूपात जे देतील त्यातून मी कर्जाची परतफेड करेल. कालियुगाच्या अंतापर्यत माझी लोक पूजा अर्चना धनाची देवता म्हणून करतील. माझ्यामुळे मिळालेल्या संपत्तीत ते माझा वाटा ठेवतील आणि मला ते देत राहतील. मी माझ्या भक्तांना कधीच निर्धन ठेवणार नाही त्यामुळे तुझे कर्ज मी भक्तांच्या दानातून पूर्ण करेल. शेवटी कुबेरानी कर्ज रूपात श्रीनिवास याना मुबलक धन दिले ज्यामुळे श्रीनिवास आणि पद्मावतीचा विवाह थाटामाटाने संपन्न झाला. असे म्हंटले जाते की आजही कुबेराचे कर्ज फिटलेले नाही आणि त्या कर्जातून मुक्तता मिळण्यासाठी आजही बालाजीचे भक्त भरभरून दान करत असतात.

श्री बालाजी याच्यावर असलेल्या श्रद्धेपोटी भक्त तिरूमला डोंगरावर जात असतात पर्यटन आणि देवाचे दर्शन यासाठी लोकांच्या झुंडी च्या झुंडी एकमेकांचे अनुकरण करत बालाजीला जात असतात पण देवाच्या अवताराची ही गोष्ट मात्र सगळ्यांना माहीत असतेच असे नाही.
एका पौराणिक कथेनुसार तिरूमला डोंगरावर एक गवळी आपल्या गायी चरण्यासाठी घेऊन जायचा पण रोज त्याच्या गायींतील एक गायीचे दूध येत नसे अश्यावेळी त्याने त्या गाईवर विशेष लक्ष ठेवले आणि त्याला निदर्शनास आले की ती गाय रोज डोंगरावर एका वारुळवर आपले दुधाचा वर्षाव करत असायची हे पाहून तो गवळी खूप चिडला आणि हातात असलेली कुऱ्हाड त्या वारुळावर फेकली.  ह्या हल्ल्यात वारुळात वास करत असलेल्या बालाजीच्या डोक्याला जखम झाली आणि त्याचे केसही उडून गेले. मुलाला झालेली जखम त्याच्या आईने पाहिली आणि तिने आपल्या केस कापून बालाजीच्या डोक्यावर ठेवले. सुंदरतेची प्रतीक असलेले केस सहज सोडल्यामुळे जो भक्त नवसपूर्तीनातर स्वतःहून मला केस दान करेल त्याच्या सर्व इच्छा मी पूर्ण करेल असे आश्वासन आपल्या आईला दिले म्हणूनच बालाजीला जाणाऱ्या अनेक लोक देवाला नवस बोलतात आणि नवस पूर्ण झाल्यावर तिथे केस दान देत असतात. 

मग कशी वाटली आजची गोष्ट. आवडली ना? अशीच एक सनातनी गोष्ट माहिती रूपात परत घेऊन तुमच्या समोर हजर राहतो तोपर्यत हा ब्लॉग जास्तीत जास्त शेयर करायला विसरू नका बर का...... तोपर्यत

।।ॐ नमोः नारायणाय नमः।।
।।ॐ नमोः भगवते वासुदेवाय नमः।।
।।ॐ नमः शिवाय।।




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सी ए टॉपर

स्वभावाला औषध नाही कारण प्रत्येक व्यक्तीच्या एक स्वभाव असतो.स्वभाव म्हणजे त्याची वागण्याची, बोलण्याची किंवा निर्णय घेण्याची प्रक्रिया. प्रत्...