विराटने घातले आता हिंदूंनो तुम्हीही घाला हातात कलावा. डोक्यावर चंदन टिळक, हातात कलावा ह्या दोन गोष्टी हिंदू असण्याचे प्रतीक म्हणून मी स्वतः अंगभूत केलेली गोष्ट आहे. तुम्ही ही करा काही लोकांना कपाळावर टिक्का लावणे हे बुरसटलेले,जुन्या विचारसरणीचे लक्षण वाटते तर कधी ऑफिस,शाळा अश्या ठिकाणी परंपरागत धार्मिक गोष्टीचे समाजात अनुकरण करणे शक्य होत नाही त्यावेळी पाण्याचा टिळा लावणे सहज शक्य कारण लोकांना तो दिसणार नाही पण तुम्ही तो लावलाय याचे समाधान तुम्हाला मिळणार विराट एकटा पडला, वैयक्तिक कामगिरी ढासळली, अडचणी वाढल्या त्यावेळी देवाला नतमस्तक झाला आणि आयुष्यात झालेल्या सकारात्मक बदलामुळे त्याची अध्यात्मिक रुची वाढली अस म्हणायला हरकत नाही. देवावर श्रद्धा त्याची आधीही असेल पण आता निष्ठा वाढली हे सरळ स्पष्ट होते. जे होते ते चांगल्यासाठीच अस म्हटलं तर वावगे ठरू नये पण बहुतांश हिंदू कुटुंब, समाजात धार्मिक विधी, कर्मकांड, शिक्षणाला दुय्यम महत्व दिले जाते कारण पालक असलेल्या व्यक्तींना असे शिक्षण त्याच्या पालकांनी दिलेले नसते. पाचव्या सहाव्या वर्षी मुलांना शाळा ह्या चक्रात अडकवले जाते ज्यामुळे वयाच्या 21 बावीस वर्षापर्यत शालेय शिक्षण, डिग्री वा मुलाच्या आवड निवड असलेल्या गोष्टीत मास्टरकी मिळवण्यात निघून जातात. मास्टरकी मिळवली की पैसे कमावण्याचे पुढचे ध्येय मग लग्न त्यानंतर येणारी जवाबदारी, होणारी मुलाचे पालनपोषण यामुळे धार्मिक गोष्टीचे शिक्षणात हिंदू अशिक्षित राहतो. बर हिंदू ही इतकी मोठी शिक्षण पद्धती आहे की त्यात हजारो पुस्तके, कैक कोटी देव यामुळे कितीही शिक्षण, ज्ञान घेतले तरी ते समुद्रातून वाटीभर पाणी काढल्यासारखे. घरात देवघर असले पाहिजे, सकाळ संध्याकाळ त्याची पूजा अर्चना व्हायला हवी, शुभंकरोती, प्रमुख आराध्य देवाचे मंत्र, श्लोक तोंडपाठ हवे. पण सणसूद साजरे करण्याव्यतिरिक्त, सुट्टीच्या दिवशी फिरणे उपक्रमात वा अडचणीत सापडल्याशिवाय हिंदू देवळात जात नाही अश्यावेळी धार्मिक ज्ञान नसलेला हिंदू कोणत्याही स्वयंघोषित बाबा बुवांच्या भक्तीत जाण्याचा धोका असतो. कलियुगात बाबा, बुवा अवतारी पुरुष होऊ शकतील यावर माझा विश्वास नसल्याने भोलेनाथ, भगवान विष्णू या प्रमुख देवता तसेच आदर्शवत असलेल्या राम, कृष्ण याच्या नामस्मरणात नतमस्तक सनातनी हिंदूंनी व्हावे अशी माझी इच्छा असते. शेवटी हिंदू धर्माला चौकट कोणीही उभारू शकत नसल्याने किनी कोणाची भक्ती करावी हे ठरवता येऊ शकत नसले तरी सत्याच्या कसोटीवर परीक्षा घेत कोणावर विश्वास ठेवावा वा न ठेवावा हे लोकांनी ठरवले पाहिजे. भगवद्गीतेसारखा ग्रंथ घरात असेल तर त्याचे वाचन करावे, श्लोक पाठ करावे अश्या साध्या साध्या गोष्टीतून मुलांमध्ये धार्मिक गोष्टीची आवड, ज्ञान, माहिती देता येईल. हिंदूंनो जितके शाळेतील शिक्षण महत्वाचे तितकेच धार्मिक शिक्षण महत्वाचे हिंदूंनो विचार करा, सजग व्हा, संघटित व्हा.......
असाच एखादा लेख घेऊन तुमचा मित्र सनातन तुमच्यापुढे पुन्हा येईल, तोपर्यत माझा तुम्हाला नमस्कार.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा