वीरभद्र अवतार
शंकर भगवान यांना त्याच्या भोळ्या स्वभावानुसार भोळेबाबा/ भोलेबाबा म्हणण्याचा पायंडा आहे पण महाशक्तीशाली भगवान शिव भोळे असले तरी त्याचा रागीट स्वभाव विसरता कामा नये. भगवान शिवाला विध्वंसंकदेखील म्हंटले जाते पण चुकीच्या वृत्तीच्या, कृतीच्या विरोधात उभा राहणारा देव म्हणजे देवाचा देव महादेव.शिवशंकर देवाचे वेगवेगळे अवतार, रुद्र आहेत त्यातील आज वीरभद्र ह्या अवताराची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. कृपया ही गोष्ट वाचा, घरातील लहानच नाही तर मोठ्याना थोरांना देखील ही गोष्ट नक्की सांगा कारण अनेकांच्या घरात ना देव आहे ना देवाची चर्चा त्यामुळे आज हिंदूंची अशी परिस्थिती आहे की त्यांना पुराणातील कथा, माहिती माहीतच नसते. हिंदूंनी संगठित होणे, आपल्या चालीरीतीची, दैवत याची माहिती असणे ही काळाची गरज आहे. हिंदू पारंपरिक वेशभूषा असेल की पेहराव याना दूर सारत पाश्चात्य संस्कृतीचे अनुसरण करतोय तो रक धोका टाळण्यासाठी ही कथा जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहचविण्याची जवाबदारी आता तुमची. महाशक्ती भगवान शिवाच्या इतर अवतार, रुद्राची गोष्ट क्रमाक्रमाने पोस्ट केल्या जातील त्या आवर्जून वाचा ही नम्र विनंती.
ब्रह्मदेवाचे पुत्र, पृथ्वीवरील राजाचे राजा असलेले दक्ष यांची कन्या सती ही लहानपणापासूनच शिवभक्तीत तल्लीन झालेली होती. जसजसे वय वाढत गेले तसतसे मनोमन तिने महादेवानाच पती स्वीकारण्याचे ठरवले होते. इतर सामान्य पित्यांप्रमाणे आपल्या मुलीचा विवाह धनाढ्य घरात व्हावा, मुलीला कष्ट पडू नये अशीच इच्छा असलेल्या दक्ष राजाला मुलगी सतीचा हा निर्णय आवडला नव्हता. कोणता पिता आपल्या मुलीचा विवाह स्मशानात, हिमालयात राहणाऱ्या कफल्लक, गरीब माणसाच्या हातात देईल बर? मुलीचे हित पाहण्याच्या नादात दक्ष राजाने सतीचा स्वयंवर घोषित केला आणि मुद्दामच त्यात महादेवांना निमंत्रण धाडले नाही.
स्वयंवरच्या दिवशी दरबारात एकाहून एक श्रेष्ठ राजा हजर असताना देवी सतीला मात्र शिवशंकर महादेव कुठे दिसेना. तिने मनोमन पती म्हणून स्वीकारलेल्या महादेवाची अनुपस्थिती पाहून तिने हातातील वरमाला हवेत उडवली आणि पत्नी म्हणून स्वीकारण्याची शंकर महादेवाला साकडे घातले. सतीच्या लहानपणापासून असलेल्या भक्तीवर आधीच खुश असणाऱ्या भोळेनाथांनी सतीची इच्छा पूर्ण केली. अनिच्छेने का होईना पण दक्ष राजाने महादेवांना आपला जावई म्हणून स्वीकारावे लागले.
दिवसांमागून दिवस जात होते अश्यातच सुर्ष्टीचे जनक, निर्माते ब्रम्हदेवाने एक मोठा यज्ञ करण्याचे योजले. ज्यात सगळ्याच देव देवांना, राजांना निमंत्रित केले होते. ब्रम्हपुत्र दक्ष राजा कार्यक्रमाला थोडेसे उशिरा उपस्थित झाले असता त्याचे स्वागत करण्यासाठी भगवान शिव आणि सती याच्याव्यतिरिक्त सर्व आलेले पाहुणे,राजे, देव उभे राहिले. दक्ष राजाने शिव आणि सती यांनी स्वागत केले नाही याचा राग मनाशी घर करत होता, किंबहुना तो स्वतःचा अपमान आहे असा समज केला. झालेल्या अपमानाचा प्रतिशोध घेण्यासाठी काही दिवसांनी राजा दक्ष यांनी एका मोठ्या यज्ञाची घोषणा केली मात्र त्याचे निमंत्रण मुलगी सती आणि जावई शिवशंकर याना दिले नाही.
यज्ञाच्या दिवशी देवी सतीने महादेवांकडे पित्याच्या घरी जाण्याचा हट्ट केला मात्र जिथे निमंत्रण नाही तिथे जाऊ नये अशी सबब पुढे करत देवी सतीचा हट्ट दूर करत होते पण पित्यावरच्या प्रेमापोटी देवी सती एकटीच महायज्ञाच्या समारंभाला निघून गेली. ब्रम्हदेवाच्या यज्ञाच्या वेळी झालेला अपमान न विसरलेला राजा दक्ष निमंत्रण नसताना महायज्ञात आलेल्या मुलीचा अपमान करू लागले, नाही नाही ते दोष देऊ लागले. देवी सतीला वडिलांचे बोलणे जिव्हारी लागले आणि पुढचा मागचा कशाचा विचार न करता तिने यज्ञाच्या अग्नीत उडी मारत देहत्याग केला.
देवी सतीने प्राणत्याग केल्याची बातमी जशी भोलेशंकराना कळाली त्याच्या रागाला मर्यादा राहिली नाही. रागाच्या भरात त्यांनी आपल्या केसांची एक बट उपटून जमिनीवर फेकली त्यातून अतिशय बलवान, शक्तिशाली आणि तितकाच रागीट शिवशंकराला अंश उत्पन्न झाला तोच वीरभद्र. वीरभद्रला शंकरांनी आदेश दिला आणि आदेश पूर्ण करण्यासाठी वीरभद्रने अक्राळ विक्राळ रूप घेत राजा दक्ष याच्या यज्ञाच्या समारंभात जो विरोध करेल त्याचा वध करू लागला. यज्ञात आलेले विघ्न दूर करण्यासाठी शक्तिशाली दक्ष राजा वीरभद्रवर चालून गेला. तुंबळ युध्द झाले पण विरभद्राच्या शक्तीपूढे राजा दक्ष याची शक्ती प्रतिकार करू शकत नव्हती. शेवटी विरभद्रने राजा दक्ष याचे शीर धडापासून वेगळे केले.
आपल्या मुलाचा झालेला वध पाहून ब्रम्हदेव यांना दुःख झाले आणि महादेवाचा राग दूर करण्यासाठी स्वतः ब्रम्हदेव कैलासावर धावत गेले. महायज्ञ अपूर्ण राहणे चुकीचे, राजा दक्ष याला माफ करण्याची विनवणी महादेवांना केली. शेवटी स्वभावाने भोळ्या असणाऱ्या महादेवांनी आपला राग शांत करत दक्षच्या धडाला बकऱ्याचे शीर जोडत जीवदान दिले.
क्रमशः
लेख आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्या प्रतिक्रियाची अपेक्षा, असेच लेख वाचण्यासाठी follow करा.
ट्विटर @pincode410501
ब्लॉगर पोस्ट diarynotes137.blogpost.com
डेलीहंट @cm_newsinformation
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा