मंगळवार, १७ जानेवारी, २०२३

पिप्पलाद अवतार

!! ओम नमः शिवाय !!
देवाचा देव शिव शंकर भोलेनाथ महादेव याचा पहिला अवतार माहितीसाठी इथे क्लिक करा
वीरभद्र अवतार

आज तुमच्यापुढे भगवान महादेवांचा द्वितीय अवतार पिप्पलाद अवताराची गोष्ट सादर करणार आहे. सनातन हिंदू धर्माच्या या गोष्टी प्रत्येक हिंदू व्यक्तिपर्यत पोहचण्यासाठी शेयर करायला विसरू नका.

विलासी इंद्रदेव स्वर्गात नृत्य आणि संगीत याचा आनंद घेत असताना देवाचे गुरू ब्रहस्पती दरबारात आले. गुरू आलेले असतानाही इंद्राने नृत्य आणि संगीतात बाधा येईल म्हणून गुरूंचा आदरातिथ्य, स्वागत न करता त्याच्याकडे दुर्लक्ष केले ज्यामुळे ब्रहस्पती क्रोधीत होऊन स्वर्ग सोडून निघून गेले. गुरुचे आधारछत्र निघून गेल्यावर राक्षसांनी स्वर्गावर हल्ला करत सर्व देवांना पळवून लावत स्वर्गाचा ताबा मिळवला. इंद्रदेव मदतीसाठी भगवान श्रीविष्णू यांच्याकडे गेल्यानंतर गुरू ब्रहस्पती सारखेच विद्वान गुरू विश्वरूप याना गुरुस्थानी बसवण्याची आज्ञा विष्णूनी केली. विश्वरूप याच्या मदतीने इंद्राने स्वर्ग परत काबीज केला. इंद्राचे सिहासन दृढ होण्यासाठी विश्वरूप यांनी एक यज्ञ करण्याचे ठरवले. विश्वरूप याची माता राक्षसी कुळाची असल्याने राक्षसांबद्दल थोडा का होईना कळवळा विश्वरूप याना होता. प्रगट रूपात इंद्राची करत असताना अप्रगट, छुप्या पद्धतीने राक्षसांना मदत विश्वरूप मदत करत आहे हे पाहून इंद्राचा रागाचा पारा चढला आणि त्याने कोणताही विचार न करता विश्वरूप गुरूंचा वध केला.

विश्वरूप याचे वडील त्वष्टा यांना इंद्राचा खूप राग आला आणि इंद्राचा सर्वनाश करण्यासाठी यज्ञातून तेजस्वी बालकाच्या निर्मितीचा संकल्प।केला पण चुकीच्या उच्चार मंत्रांमुळे इंद्राला मारणारा नाही तर इंद्राकडून मरणारा पुत्र वृत्रासूर निर्माण झाला. पिता त्वष्टा याचा संकल्प, बंधू विश्वरूप याचा वध यामुळे त्याच्या जीवनाचे एकमात्र ध्येय इंद्राचा वध असला तरी अशुद्ध उच्चारण झाल्यामुळे वृत्रासूराचा वध इंद्राकडून होणार असतो. वृत्रासूराने देवतांवर हल्ला केला ज्याच्याविरोध घनघोर युद्धाला सुरुवात झाली पण देवांनी केलेल्या प्रत्येक हल्ला मोडत काढत देवतांचे सर्व अस्त्र वृत्रासूरने तोडून टाकली. वृत्रासूराच्या पुढे टिकाव न लागल्याने इंद्र देव पुन्हा एकदा भगवान विष्णूंना नतमस्तक झाले. महर्षी दधिती याच्या हाडापासून तयार होणाऱ्या शस्त्राने वृत्रासूर वध होईल अशी गुप्त बातमी इंद्राला भगवान विष्णू याकडून मिळाली. हाडे मिळवून त्यापासून वज्र बनवणे सोप्प असले तरी महर्षी दधिती जिवंत असल्याने ते शक्य नव्हते तरीही मोठे साहस करत वृत्रासूराचा नायनाट करण्याचे कारण पुढे करत दधिती यांच्याकडे इंद्राने हात पसरले. देवाच्या, सृष्टीच्या संवर्धनासाठी महर्षी दधिती यांनी तपोबलाच्या आधारे प्राणत्याग केले. दधितीच्या मृत्यूनंतर त्याच्या हाडांपासून इंद्राने कठोर, तेजस्वी, शक्तिशाली असे वज्र  हत्यार बनवले आणि राक्षस वृत्रासूरावर आक्रमण केले. वृत्रासूर हुशार होता इंद्रावर विजय मिळवल्यावर स्वर्ग मिळणार आहे हे माहीत असतानाही मृत्यूला कवटाळून भगवान विष्णूंच्या वैकुंठात स्थान मिळवण्यासाठी त्याने वज्राचा प्रतिकार केला नाही. शेवटी व्हायचे तेच झाले आणि वृत्रासूर ठार झाला. इंद्राला आपला स्वर्ग परत मिळाला.

तुम्ही संबंध गोष्ट वाचल्यानंतर काय विचार करत असाल हे मला चांगले माहीत आहे त्यामुळे महादेवाचा अवताराबद्दल सांगण्याआधी त्याआधीची ही गोष्ट माहीत असणे गरजेचे होते. आता आपण महादेवाच्या अवताराची गोष्ट जाणून घेऊ
महर्षी दधिती याचा मृत्यू झाल्याने त्याची पत्नी सारी जाण्यास निघाली पण एक आकाशवाणी झाली त्यानूसार तिच्या पोटात महर्षी दधिती यांचा अंश जो महादेचा अवतार होता त्याने आकार घेण्यास सुरुवात केली होती. मुलाला जन्म देण्यासाठी महर्षी दधिती याच्या पत्नीने सती न जाता जंगलातील एका पिपळाच्या झाडाखाली तपश्चर्येत लिन झाली. मुलाच्या जन्मानंतर तिने आपले प्राण त्याग केले. जन्मतः अनाथ झालेल्या बालकाने पिंपळाच्या झाडाची पाने खात उदरनिर्वाह सुरू केला. पिंपळाच्या झाडाखाली झालेला जन्म म्हणूनच त्या बालकाचे नाव ब्रम्हदेवाने पिप्पलाद असे ठेवले आणि त्या बालकाला एक ब्रम्हदंड नावाचे शस्त्र भेटले. महर्षी नारद आणि इतर देवांकडून त्याला त्याच्या पालकांची माहिती मिळाली. जन्मापूर्वी वडील तर जन्मानंतर आईचा मृत्यू शनिदेवाच्या वक्रदृष्टीमुळे झाला अस देवांनी सांगितल्याने पिप्पलाद क्रोधीत झाला. शनिदेवाला शिक्षा करण्यासाठी त्यांनी तपोबलाच्या आगीने जाळण्यास सुरुवात केली. शनिदेवाने अनेक विनवण्याकेल्यानंतर ही पिप्पलादचा राग शांत झाला नाही म्हणून हातातील ब्रह्मदंड शनिदेवाला फेकून मारला. ब्रम्हदंड पायाला लागल्याने शनी देव लंगडा झाला, त्याची गती कमी झाली तर आगीमुळे संपूर्ण शरीर काळे पडले. ब्रम्हदंडापासून वाचण्यासाठी शनीदेव तिन्ही लोक पळू लागला. शनिदेवाची झालेली ही परिस्थिती देवांनी ब्रह्मदेवला सांगितली ज्यामुळे पिप्पलाद याचा राग शांत करण्यासाठी स्वतः ब्रह्मदेव याना यावे लागले. ब्रह्मदेवाने पिप्पलाद याचा राग शांत केला पण त्याआधी पिप्पलाद यांनी त्याच्यासारखे आई वडीलाशिवाय कष्टप्रद जगणे इतर बालकाच्या वाट्याला येऊ नये म्हणून शनिदेवांकडून 16 वर्षापर्यंतच्या मुलांना साडेसाती न लावण्याचे, शनीची वक्रदृष्टी न पाडण्याचे वचन घेतले.

म्हणूनच भगवान महादेव आणि पिप्पलाद अवतार याचे स्मरणमात्र शनीची अवकृपा दूर करण्यास साह्य होते. 

महादेवाचा तिसरा अवतार नंदी अवताराची गोष्ट पुढच्या भागात वाचण्यासाठी सबस्क्राईब, लाईक करायला विसरू नका बर.

बोला हर हर महादेव, ओम नमः शिवाय

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सी ए टॉपर

स्वभावाला औषध नाही कारण प्रत्येक व्यक्तीच्या एक स्वभाव असतो.स्वभाव म्हणजे त्याची वागण्याची, बोलण्याची किंवा निर्णय घेण्याची प्रक्रिया. प्रत्...