बुधवार, १ फेब्रुवारी, २०२३

धार्मिक शिक्षणाची गरज

एक दोन महिन्यांपूर्वी असे वाचले होते की हिंदू आपल्या मुलांना धार्मिक ग्रंथ लहानपणी वाचण्यास देत नाही ज्यामुळे त्याच्यात धर्माची पाळेमुळे, संस्कृतीची जाण इतर कट्टरवाद्यांप्रमाणे येत नाही. थोडासा विचार केला आणि वाक्याचे शब्दनशब्द खरे वाटले. थोडी फार देवपूजा,शुभम करोती,आता विश्वात्मके देवे व्यतिरिक्त देवळाच्या पुढून जाताना घाईघाईत एका हाताने, डोळे मिचकावून, छातीला हात लावून, हात उंचावून मान वाकवून नमस्काराचे वेगवेगळे प्रकार करणारे कित्येक भेटतील. माझ्या स्वतःच्या घरात श्रीभगवद्गीता लहानपणापासून आहे पण ना ती माझे पालक वाचताना आढळले ना त्यांनी मला कधी सक्ती केली. सनातन हिंदू धर्मात इतकी पुस्तक, ज्ञान आहे की एका जन्मात ते सगळे आत्मसात करणे कोणालाही शक्य नाही त्यामुळे केवळ एक जादुई पुस्तकाचा रट्टा मारून धर्माध बनणाऱ्या शांतिदूतांपेक्षा आपला धर्म खूप वेगळा आणि मोठा आहे.शक्यतो पालक पैसे कमवण्यासाठी मरमर काम करतात तर आपल्या सारखे आयुष्य मुलाच्या वाट्याला येऊ नये म्हणून मुलांना अभ्यासाची सक्ती करतात त्यामुळे घरात धर्माचे शिक्षण दिले जातेच अस नाही. बहुतांश वेळा वर्षभरात साजरे होणारे सणसूद का साजरे करतात, त्यामागे काय धार्मिक महत्व आहे, कथा काय आहे याबद्दलची माहिती देखील हिंदूंना नसते.केवळ कॅलेंडरमध्ये सण आला की नवे कपडे आणि त्या दिवसाच्या रितिभाती पूर्ण केल्या की सण साजरा झाला याचे समाधान करत सुट्टीचा आनंद घेणारे कैक आहेत. विज्ञानाच्या ह्या युगात धार्मिक शिक्षण घ्या असा माझा आग्रह नाही पण धर्माला विसरून केवळ पोटापाण्याची सोयीचा विचार केल्यास धर्म संपण्याची, मागे पडण्याची, ह्या प्रवृत्तीचा फायदा घेत इतर धर्मीय धर्मातर करण्याचा सपाटा तर लागतच आहे हे वास्तव पाहण्यासाठी कुटुंबाखेरीज आजूबाजूला काय चालले आहे त्याकडे लक्ष द्यायला विसरू नका. मुलांना सनातन धर्माचे ज्ञान देण्याचा प्रयत्न प्रत्येक हिंदू कुटुंबाने केला पाहिजे किमान प्रमुख धार्मिक पुस्तक जसे भगवद्गीता घरात असलीच पाहिजे. गेल्या काही महिन्यापासून मी आणि माझ्या दोन मुली यांनी एक एक श्लोक करत प्रथम अध्याय अर्जुनविषादयोग मधील पहिले 21 श्लोक तोंडपाठ केले आहे. दररोज संध्याकाळी ठीक साडे सहा वाजता गीतेचा एक श्लोक पाठ करण्याचा, त्यानंतर उजळणी म्हणून पहिला श्लोक ते आज पाठांतर चालू असणारा श्लोकपर्यत करणे हा नित्यक्रम झाला आहे. मुलांना आता रोजच्या ह्या दिनक्रमाची सवय लागल्याने स्वतःहून त्या आनंदाने गीता वाचण्यास, पाठ करण्यास बसतात पण अस करणे अवघड आहे कारण आपली बोली भाषा मराठी तर धार्मिक पुस्तक संस्कृतमध्ये असतात. संस्कृत वाचायला, समजायला अवघड शिवाय संस्कृत शिकवत नाही ना शाळेत त्यामुळे धार्मिक पुस्तक वाचण्याचा संकल्प जास्त दिवस चालवणे तसे अवघड. त्यामुळे डिजिटल मदत घेत श्लोक उच्चार, अर्थ समजावून घेत एक एक श्लोक समजवून घेत पाठ करणे, घरात अध्यात्मिक वातावरण वाढवणे, मुलांना धर्माची ओळख करून देणे, माहिती देणे हे प्रत्येक सनातनी हिंदूंचे आद्यकर्तव्य असले पाहिजे.हिंदूंनो मूठभर हिंदू जागे होऊन धर्माचे रक्षण होऊ शकणार नाही त्यामुळे सजग व्हा, संघटित व्हा.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सी ए टॉपर

स्वभावाला औषध नाही कारण प्रत्येक व्यक्तीच्या एक स्वभाव असतो.स्वभाव म्हणजे त्याची वागण्याची, बोलण्याची किंवा निर्णय घेण्याची प्रक्रिया. प्रत्...