गृहपती हा भगवान शंकराचा सातवा अवतार आहे. कथेनुसार, नर्मदेच्या तीरावर असलेल्या धरमपूर नावाच्या नगरात विश्वनर नावाचा एक साधू आणि त्याची पत्नी शुचिष्मती राहत होते. शुचिष्मती दीर्घकाळ निपुत्रिक राहिली पण एके दिवशी तिला पतीपासून शिवासारखा पुत्र मिळावा अशी इच्छा झाली. मुनी विश्वनरांनी काशीला जाऊन भगवान शंकराच्या विरेश लिंगाची पूजा केली. एके दिवशी मुनी विरेश लिंगाच्या मध्यभागी एक बालक प्रकटले. मुनींनी शिवाची बालरूपात पूजा केली. तिच्या उपासनेने प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी गर्भातून अवतार घेण्याचे शुचिष्मतीचे वरदान दिले. कालांतराने, शुचिष्मती गरोदर राहिली आणि भगवान शंकर शुचिष्मतीच्या गर्भातून पुत्राच्या रूपात प्रकट झाले.
गृहपती बालकाचे वय वाढत होते त्याच्या जन्मानंतर घरात आनंदाचे वातावरण होते. एक दिवस देवर्षी नारद भ्रमण करत मुनींच्या आश्रमात आले. बालकाकडे पाहत तुमचा मुलगा अप्लायुषी आहे असं मुनींनी सांगितलं. नारदाच्या वक्तव्याने मुनी आणि त्याची पत्नी दुःखी झाले. पालकांना दुःखी पाहून गृहपतीने महादेवांची आराधना करत महामृत्युंजय मंत्र मिळवण्याचा निग्रह केला.
एक चांगल्या मुहूर्तावर गृहपतीने काशी विश्वेश्वराचे दर्शन घेऊन एका शिवलिंगाची स्थापना करत आराधना चालू केली. थोड्याच दिवसाच्या उपासनेनंतर देवेंद्र इंद्र गृहपतींपुढे अवतरीत होऊन हवा तो वरदान मागण्याचे आव्हान करू लागले. नम्र भाषेत गृहपतीने नकार देत त्याचे आराध्य देव महादेवाची उपासना करत असून तेच मला वरदान देतील अस सांगितलं. गृहापतीच्या उत्तराने इंद्र रागावले आणि गृहपतीवर प्रहार करण्यास चाल केली. हल्ला होण्याआधीच तिथे महादेव अवतरीत होऊन इंद्राच्या रूपात गृहापतीची परीक्षा घेत होते सांगत यमराजाच्या प्रभावापासून वाचवण्याचे वरदान दिले.
ज्याठिकाणी गृहपतीनी लिंग तयार केले होते ते आज अग्निश्वर म्हणून प्रसिद्ध असून त्याची आराधना केल्याने वीज, अग्नी यापासून रक्षण होते असा भाविकांची भावना आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा