तुमच्यातला एक, सर्वसामान्य, कष्टकरी, भरपूर फिरणारा, खूप वाचणारा, चवीने खाणारा, शेयर मार्केट आणि आजूबाजूला घडणाऱ्या घटनांना थोडस वेगळ्या नजरेने पाहणारा आणि शब्दातून व्यक्त होणारा, अभिमानी हिंदू ~ सनातन
सोमवार, ४ एप्रिल, २०२२
कॉमेडी आणि कॉमेडियन
कश्मीर फाईल्स
जय श्रीराम,
कश्मीर पृथ्वीवरील स्वर्ग, लहानपणी चित्रपटात दिसणारा कश्मीर, तिथला निसर्ग, झाड झुडपे, तळी, त्यात फिरणाऱ्या होड्या आणि आपल्या भागात कधीही न पडणारा,दिसणारा बर्फ आणि बर्फाचा पाऊस सगळं पाहून वाटायचं की किती भारी आहे हे सगळं आणि चित्रपट चालू असतानाच आई वडिलांकडे तिकडे जाण्याचा हट्ट केला जायचा तितक्याच उस्फुर्तपणे तो मान्य ही केला जायचा पण तो कधी पूर्ण होऊ शकला नाही, तेव्हा ही आणि आजही. कटारा, वैष्णवदेवीला जाऊन आलो पण अजूनही कश्मीर फाईल्स माझ्यासाठी अनोळखी आणि खूप लांब आहे. भविष्यात नक्कीच कश्मीर फिरणार असा मनोदय लहानपणी होता तसा आजही आहे फक्त तो पूर्ण कधी होणार हे सांगणं थोडं अवघड आहे.
आज द काश्मीर फाईल्स चित्रपट पाहिला
वास्तवाच्या तेजापुढे द काश्मीर फाईल्स चित्रपट म्हणजे मिणमिणता तेलाचा दिवा आणि ह्या दिव्याचा प्रकाश सर्वदूर पडतोय कारण वास्तविकता अंधारात खितपत पडलेली होती, ह्याच वास्तवतेला जगापुढे आणण्याचा प्रयत्न केल्याबद्दल चित्रपट निर्माण करणाऱ्या प्रत्येकाचे अभिनंदन
गुरुवार, १० मार्च, २०२२
चाकण८४
जय श्रीराम
चाकण८४ नावाचे ट्विटर अकाउंट कायम स्वरूपासाठी बॅन केले गेले म्हणून डायरीनोट्स नावाचे दुसरे खाते चालू केले. नवीन खात्याला जुने मित्र मंडळी परत गोळा होत होते त्याचबरोबर ब्लॉगर वरचे ब्लॉगला थोडेफार view मिळत होते पण लोभ वाईटच नाही का? विचारांना जास्त लोकांपर्यंत पोचवण्याची हाव नवीन खात्याचे नाव बदलून पूर्वीच्या चाकण८४ च्या जवळपास नाव Chakan84s ठेवून जुने सहकारी, मित्र याना गोळा करण्याचा प्रयत्न केला आणि ट्विटरने नवीन खात देखील बॅन केले. थोडासा मनस्ताप झाला, वाईट वाटले आणि ठरवून टाकले की आता ट्विटरवर परतायचे नाही पण व्यसनी दारुड्या व्यक्तीचे पाय जसे आपसूक ठरलेल्या वेळी दारूच्या गुत्त्यावर घेऊन जातात तसच मला ट्विटर वर नवीन खात काढावे लागले
बोलण्याचे विषय चित्रपट, राजकारण, शेयर मार्केट वगैरे तेच ते असले तरी मनातलं बोलण्यासाठी, भाव भावनांना मोकळं करण्यासाठी मिळणारे हे व्यासपीठाचा वापर करून हिंदू संस्कृती आणि हिंदुत्व यासाठी वापरून प्रबोधन करणे हीच मानसिकता आहे. परत ती सगळी लोक भेटतील याची गॅरंटी नसली तरी थोडेफार जुने, थोडे नवे मित्र, सवंगडी जोडायचे आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांची साथ गरजेची आहे.
जयहिंद
सोमवार, ७ मार्च, २०२२
हिजाब, बुरखा आणि मी
नमस्कार
https://twitter.com/Notes247Diary/status/1500812070811430916?t=qxuUNZxbZyn3zIarnftIWQ&s=19
ही एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे आणि तिने एक आव्हान लोकांना दिले आहे. एव्हाना सगळ्या लोकांना ही कोण, काय आव्हान केले माहीत असले तरी ही पोस्ट करण्याचा माझा विचार वेगळा आहे. असा पेहराव केल्यावर ती व्यक्ती कोण हे कोणाला ओळखता येईल का?प्रामाणिक राहून स्वतःला उत्तर द्या. नाही हेच उत्तर येणार हे सर्वश्रुत आहेच पण अश्याच पेहरवाचे समर्थन करताना एक समाज मोठी मागणी करताना दिसतो आंदोलन करतोय ते त्यांच्या समाजाचे अनुकरण म्हणून. योग्य आहे का ते? चेहरा म्हणजे ओळख आणि ही ओळख लपवून जर कोणते कांड झाले तर आरोपीला शोधायचे कसे? बर हा हिजाब वा बुरखा सारखे पेहराव घालून, ओळख लपवून काय काय आणि कसं केले जाते याचे दाखले बऱ्याच हिंदी मराठी चित्रपटात दाखवले गेले आहे, आपल्या आजूबाजूला घडत असणाऱ्या गुन्हेगारीत सुद्धा वापरले जाते हा माझा मुद्दा क्रमांक एक. दुसरं म्हणजे ऐच्छिक विषय असतानाही धार्मिक कट्टरता आणि त्यातून सामाजिक वर्चस्व दाखवण्याचा केलेला अट्टाहास सामाजिक तेढ निर्माण करत नाही का? आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे पारंपरिक, गुलामगिरीत महिलांना ठेवून त्याचे अधिकार, स्वातंत्र हिरावून घेणारा त्याच समाजातील बहुभार्या करताना त्याच महिलांचा अपमान त्यांना दिसत नाही का? ज्याप्रकारे जादुई पुस्तकात हिजाब किंवा बुरखा याचे कोठेही आज जसा वापर आहे तसा उल्लेख केलेला नसताना जादुई पुस्तकातील गोष्टींचा अनादर केलेला त्या समाजाला कसा चालतो? कारण ज्या जादुई पुस्तकात काहीही बदल करण्याची मुभा नसताना त्यातील गोष्टीचा चुकीचा अर्थ काढणारे खरच त्या समाजाचे खरे, सच्चे अनुसारक असावे का? मुळात तो समाज ज्या कुप्रथा अनुसारण्याचे आव्हान किंवा दडपण त्या समाजाच्या महिलांवर करत आहे ते चुकीचे. जिथं एक समाज सती प्रथा, घुंगट, विधवा विवाह वगैरे काळाबरोबर बदल स्वीकारत असताना तो समाज बुरसटलेले,जंगली आचार विचार धरून बसने योग्य का? मुद्दा लहान असला तरी त्यातून त्या समाजातील लोकांसाठी देण्यात येणारी समज धमकी आणि भारतीय सविधानापेक्षा जादुई पुस्तकांचे अनुकरण करून दडपशाही करण्याचा त्या समाजाचा इरादा आहे हे स्पष्ट होते. मुक्ता बर्वेला सगळ्या प्रकारात मुद्दा म्हणून वापरायचे नसले तरी त्याच्या एका फोटोने मला माझा मुद्दा मांडता आला आहे. बंदी कोणत्याच पेहरावाला नसावी पण ती मागणी करत असताना इतर कायदे, नियम तुटणार नाही याची काळजी घ्यायला नको का? पोलीस असणारी स्त्री जर बुरखा घालून ड्युटी करायला लागली तर जसे योग्य ठरणार नाही त्याच प्रकारे स्वतःच्या धर्माचे अनुसरण करत असताना शाळेत विशेषतः वर्गात बसतानाही बुरखा घालण्याची मागणी चुकीची आणि ती कधीच मान्य होणार नाही हे त्या समाजाला सांगावं, शिकवावं लागणार आहे. मुळात लहानपणी माझ्या आजूबाजूला असणाऱ्या मुस्लिम घरातील स्त्रियांना मी काही बुरखा घालताना, वावरताना पहिली नव्हते अपवाद एखादं दुसरी महिला पण हिजाब किंवा बुरखा वाद करून ह्या लोकांनी त्याच्या समाजातील स्त्रियांवर इतके दडपण निश्चित आणले आहे
की हे प्रमाण आज खूप वाढले आहे. अनैतिक आणि चुकीच्या गोष्टीना विरोध केला पाहिजे त्यामुळे हा थ्रेड.
पुण्यात सर्रास प्रत्येक स्त्री उन्हाळ्यात तोंडावर स्कार्फ लावलेल्या दिसतात ते कोणत्याही एकाच समाजाच्या असतात असा अर्थ काढू नका पण ऊन,उन्हाचे चटके इतके असतात की स्वतःच्या त्वचेची काळजी म्हणून स्कार्फ, गॉगल, सनकोट इतकेच काय हॅन्डग्लोज घालून फिरणाऱ्या बऱ्याच माता बहिणी असतात शिवाय जिथं जिथं गरम वातावरण असत तिथं म्हणजे पुणे मुंबई नागपूर इतकेच काय गावागावात याचे लोन पसरलेलं आपण सगळ्यांना माहीत आहे पण त्या महिला त्याच अवस्थेत काम करण्याची, शिकण्याची इच्छा करतात का? नाही ना म्हणून त्या समाजाचा मूळ उद्देश लोकांनी समजून घेतला पाहिजे आणि त्यांचा उद्देश निश्चितच योग्य नसल्याने त्याला विरोध तुम्हाला आम्हाला करावाच लागेल. कोणत्याही कोर्टात तो दावा गेल्यास त्याला अनुमोदन मिळणार नाही हे जितकं सत्य आहे तितकाच त्या समाजाचा उद्देश कट्टरता दर्शवण्याचा आणि त्यांना हवं तसं कायदे वळवण्याचा मनसुबा योग्य नाही,नाही आणि नाही
शुक्रवार, ४ मार्च, २०२२
पेशावर बॉम्बस्फोट, पाकिस्तान आणि आतंकवाद
आज शुक्रवार, अ शांतीचा विचार जगाला देणाऱ्या धर्माच्या अनुयायांसाठी महत्वाचा दिवस असतो. लहानपणी ती लोक फक्त आजच्याच दिवशी ओंघोळ करतात अस वाटायचं, क्रिकेटची शुक्रवारी येणारा सामना म्हणजे पोर्किस्तान जिंकणार असा पायंडा त्याकाळी पडला होता.
घटनेची माहिती
आत्मघातकी म्हणजे स्वतःच्या अंगावर स्फोटक लावून आलेला तो व्यक्ती लोकांच्या गराड्यात जातो काय ओला उबेर चे नाव घेऊन स्फोट घडवतोय काय हे अनपेक्षित, अचानक हल्ला कोणी, का, कशासाठी केला याची जवाबदारी कोणत्याही व्यक्ती वा संस्थेने घेतलेली नाही पण देवाची प्रार्थना चालू असताना झालेल्या आत्मघातकी स्फोटात किमान ३० जण जागेवर मृत्युमुखी पडले, ५० हुन अधिक लोक जखमी आहेत. आकडेवारी सरकारी आहे शिवाय पोर्किस्तानसारख्या खोटरड्या देशाकडून खरी आकडेवारी लोकांसमोर ठेवली गेली असेल असे नाही याचाच अर्थ मेलेले लोक आणि जखमी यांचा आकडा निश्चितच मोठा असणार आहे. स्फोटानंतर आजूबाजूच्या लोकांनी जखमींना मिळेल त्या वाहनावर दवाखान्यात पोहचते केले, सरकारी अँबुलन्स आणि पाकिस्तानी सुरक्षयंत्रणा मदत कार्य सुरू केले अस ऐकण्यात आले असून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा दावा त्या पाकड्या लोकांनी चालू केला आहे
गुरुवार, ३ मार्च, २०२२
राजकारण
नमस्कार,
भारतात सर्वाधिक लोकप्रिय, सवंग चर्चा, बातम्या कशाच्या होतात? माणूस श्रीमंत असो की गरीब, सुशिक्षित असो की निरक्षर त्याच्या आवडी निवडी नक्की काय असतात? सर्वसाधारण पण चित्रपट,खेळ त्यातही विशेष म्हणजे क्रिकेट आणि राजकारण.
राजकारण !
विरोधी पक्ष म्हणजे ज्यांना सत्ता मिळवायची तर होती मात्र मिळाली नाही आणि आता परत सत्तेत येण्यासाठी त्याचा जीव कासावीस झाला आहे मात्र तशी कोणतीच संधी दिसत नसल्याने भाजपा पक्षाच्या विचारधारेला फक्त विरोध करण्याचा जो अजेंडा सगळे विरोधी पक्ष राबवत आहे त्याने त्यांना यश मिळेल अस मला अजिबात वाटत नाही.
क्रमश:
युद्ध : रशिया, गुक्रेन आणि जग
नमस्कार
आपल्या देशाचा इतिहास भूगोल पूर्ण माहीत नसताना युक्रेन रशिया यांच्यातील वाद त्यामुळे निर्माण झालेला तिढा आणि युद्ध याचा कोणताही अभ्यास न करता रशिया जे करत आहे तेच योग्य असावं कारण स्वतंत्र असला तरी युक्रेन राशियाबरोबर भूतकाळात संलग्न होता. नाटोच्या देशांनी रशियाला कोंडीत पकडण्यासाठी जर युक्रेनचा वापर केला असेल तर आज जे काही युद्ध होत आहे त्याला जवाबदार फक्त रशिया कसे असेल? अमेरिका सारख्या प्रगत देशाविरुद्ध उभं ठाकणाऱ्या रशियासमोर युक्रेनचा निभाव लागूच शकणार नव्हता इतका साधा विचार न करता कलह वाढवणारा युक्रेन होणाऱ्या युद्धाला जवाबदार का नसावा? शक्तिशाली देशाच्या सूचीत पहिल्या तीन क्रमांकावर येणाऱ्या रशियाशी निभाव लागणार नाही हे स्पष्ट असतानादेखील देश धोक्यात आहे असं भासवून सामान्य नागरिकांना ज्यात लहान मोठे जेष्ठ इतकेच काय जेल मध्ये बंद असलेल्या आरोपींना मरणाच्या दारात ढकलणे हा मूर्खपणा नाही का? कॉमेडियन असलेल्या माणसाला देश चालवायला मिळाला म्हणून आजपर्यंत केली नव्हती इतकी मोठी कॉमेडी होत असताना निव्वळ सहनभूतीचे वातावरण निर्माण करून तो गृहस्थ दुसरा केजरीवाल तर बनत नाही ना? झुकेगा नही साला अस म्हणणे आणि ते पाहणे चित्रपटात बर वाटत असेल तरी वास्तवात तस केल्याने उभं राहायला देश उरणार नाही. बर भांडण फक्त दोन देशांचे असते तर कदाचित हे कुठं थांबलं तरी असत पण दोघांच्या भांडणात नक्की फायदा कोणाचा हे लोकांनी लक्षात घेतले पाहिजे. युद्धामुळे रशिया आणि पुतीन यांची जी बदनामी होत आहे किंवा होणाऱ्या संहाराला जवाबदार धरल्यामुळे आणि इतर देशांनी युक्रेनला पुढे केलेला मदतीचा हात आता हे युद्धाची व्याप्ती वाढवणार नाही ना अशी भीती वाटायला लागली आहे. पृथ्वीवरचे सगळ्यात घातक अस्त्र याचा उल्लेख करून रशिया जिंकेपर्यत युद्ध करण्याचा मानस व्यक्त केला आहे हे जगाने समजले पाहिजे. अमेरिकेला स्वतःचे सौर्वभौम आणि पृथ्वीवरील कोणत्याही घटनेत नाक घालून स्वतःचे स्थान अबाधित राखण्याचे अवघड काम करायचे असल्याने जगात अस्थिरता कशी राहील आणो त्याचा फायदा घेऊन जगाच्या राजकारणावर अमेरिकेचा हात कसा राहील हा अजेंडा गेल्या कित्येक वर्षांपासून पूर्ण करत आहे. आता वेळ आली आहे की अमेरिकेचे हे नासके राजकारण संपुष्टात यायला हवं अन्यथा स्वतःला उंच करण्यासाठी अमेरिका कोणत्याही देशाला, त्या देशातील लोकांना पायदळी तुडवू शकते. युक्रेन लवकरच पडेल आणि हा कलह शांत होईल अशी अपेक्षा आहे कारण ह्या युद्धामुळे बऱ्याच इतर देशात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने महागाईचा फुगा फुटून अस्थिरता निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. बलवान शिकारी आणि कमकुवत सावज यांनी किती मोठा खेळ मांडला तरी खेळाचा शेवट काय होणार हे सर्वश्रुत असल्याने वास्तव स्वीकारून चर्चेने मार्ग काढला गेला पाहिजे.असंख्य निरपराध लोकांचा बळी गेल्यानंतर चर्चा हा विकल्प योग्य नसला तरी जी लोक अजून जिवंत आहेत त्याच्यासाठी शांतता प्रस्थपित होणे गरजेचे. भारतीय नागरिकांना युक्रेन रशियामधून बाहेर काढण्यात जरी भारत सरकारला बऱ्यापैकी यश मिळाले असले तरी युक्रेन मध्ये भारतीय विद्यार्थीचा झालेला मृत्यू किंवा भारतीय नागरिकांना झालेल्या मारहाणीच्या बातम्या, एकंदरीत भारत देशाच्या विरोधात केलेले भूतकाळातील राजकारण यामुळे युक्रेनबद्दल विशेष अस चांगलं मत नाहीच पण वेळोवेळी भारताच्या मदतीला उभे राहिलेल्या रशियाला समर्थन भारताने दिले पाहिजे पण मानवता, भविष्यात भारताकडे जगाची बघण्याची दृष्टी सारख्या प्रश्नामुळे भारत सरकारला कोणतीही बाजू सक्षमपणे मांडता येत नसली तरी भविष्यात एक मित्र देश दूर जाणार नाही ना याची काळजी केली पाहिजे अन्यथा उद्या आपल्या शेजारील शत्रू देशांनी काही कुरघुडी केल्यावर मदतीला उभं रहाणारा एक मित्र दूर व्हायला नको. एकंदरीत रशिया युक्रेन विवादावर कोणत्याही एका बाजूने विचार करणे चुकीचे असले तरी निव्वळ मीडियात उभं राहिलेलं वादळ,ज्यात रशियाला एक खलनायक म्हणून पुढं केले जात आहे हे चुकीचे. जरी कर्ता रशि9या असला तरी करीवता कोण याचे मूल्यमापन करणे गरजेचे
सी ए टॉपर
स्वभावाला औषध नाही कारण प्रत्येक व्यक्तीच्या एक स्वभाव असतो.स्वभाव म्हणजे त्याची वागण्याची, बोलण्याची किंवा निर्णय घेण्याची प्रक्रिया. प्रत्...
-
९० च्या काळात एड्स आणि एड्सबद्दलची जनजागृती यामुळे टीव्हीवर कंडोमच्या जाहिराती सर्रास दिसत असल्याच्या. बलवीर पाशा कौन है ते मादक...
-
Afghanistan played well अस म्हणत हरलेल्या संघाचे मनोधैर्य वाढवण्यासाठी बोलणारे अनेक पुढे येतील पण त्या शब्दांनी खरच काही बदलणार ...
-
स्वभावाला औषध नाही कारण प्रत्येक व्यक्तीच्या एक स्वभाव असतो.स्वभाव म्हणजे त्याची वागण्याची, बोलण्याची किंवा निर्णय घेण्याची प्रक्रिया. प्रत्...