नमस्कार
https://twitter.com/Notes247Diary/status/1500812070811430916?t=qxuUNZxbZyn3zIarnftIWQ&s=19
ही एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे आणि तिने एक आव्हान लोकांना दिले आहे. एव्हाना सगळ्या लोकांना ही कोण, काय आव्हान केले माहीत असले तरी ही पोस्ट करण्याचा माझा विचार वेगळा आहे. असा पेहराव केल्यावर ती व्यक्ती कोण हे कोणाला ओळखता येईल का?प्रामाणिक राहून स्वतःला उत्तर द्या. नाही हेच उत्तर येणार हे सर्वश्रुत आहेच पण अश्याच पेहरवाचे समर्थन करताना एक समाज मोठी मागणी करताना दिसतो आंदोलन करतोय ते त्यांच्या समाजाचे अनुकरण म्हणून. योग्य आहे का ते? चेहरा म्हणजे ओळख आणि ही ओळख लपवून जर कोणते कांड झाले तर आरोपीला शोधायचे कसे? बर हा हिजाब वा बुरखा सारखे पेहराव घालून, ओळख लपवून काय काय आणि कसं केले जाते याचे दाखले बऱ्याच हिंदी मराठी चित्रपटात दाखवले गेले आहे, आपल्या आजूबाजूला घडत असणाऱ्या गुन्हेगारीत सुद्धा वापरले जाते हा माझा मुद्दा क्रमांक एक. दुसरं म्हणजे ऐच्छिक विषय असतानाही धार्मिक कट्टरता आणि त्यातून सामाजिक वर्चस्व दाखवण्याचा केलेला अट्टाहास सामाजिक तेढ निर्माण करत नाही का? आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे पारंपरिक, गुलामगिरीत महिलांना ठेवून त्याचे अधिकार, स्वातंत्र हिरावून घेणारा त्याच समाजातील बहुभार्या करताना त्याच महिलांचा अपमान त्यांना दिसत नाही का? ज्याप्रकारे जादुई पुस्तकात हिजाब किंवा बुरखा याचे कोठेही आज जसा वापर आहे तसा उल्लेख केलेला नसताना जादुई पुस्तकातील गोष्टींचा अनादर केलेला त्या समाजाला कसा चालतो? कारण ज्या जादुई पुस्तकात काहीही बदल करण्याची मुभा नसताना त्यातील गोष्टीचा चुकीचा अर्थ काढणारे खरच त्या समाजाचे खरे, सच्चे अनुसारक असावे का? मुळात तो समाज ज्या कुप्रथा अनुसारण्याचे आव्हान किंवा दडपण त्या समाजाच्या महिलांवर करत आहे ते चुकीचे. जिथं एक समाज सती प्रथा, घुंगट, विधवा विवाह वगैरे काळाबरोबर बदल स्वीकारत असताना तो समाज बुरसटलेले,जंगली आचार विचार धरून बसने योग्य का? मुद्दा लहान असला तरी त्यातून त्या समाजातील लोकांसाठी देण्यात येणारी समज धमकी आणि भारतीय सविधानापेक्षा जादुई पुस्तकांचे अनुकरण करून दडपशाही करण्याचा त्या समाजाचा इरादा आहे हे स्पष्ट होते. मुक्ता बर्वेला सगळ्या प्रकारात मुद्दा म्हणून वापरायचे नसले तरी त्याच्या एका फोटोने मला माझा मुद्दा मांडता आला आहे. बंदी कोणत्याच पेहरावाला नसावी पण ती मागणी करत असताना इतर कायदे, नियम तुटणार नाही याची काळजी घ्यायला नको का? पोलीस असणारी स्त्री जर बुरखा घालून ड्युटी करायला लागली तर जसे योग्य ठरणार नाही त्याच प्रकारे स्वतःच्या धर्माचे अनुसरण करत असताना शाळेत विशेषतः वर्गात बसतानाही बुरखा घालण्याची मागणी चुकीची आणि ती कधीच मान्य होणार नाही हे त्या समाजाला सांगावं, शिकवावं लागणार आहे. मुळात लहानपणी माझ्या आजूबाजूला असणाऱ्या मुस्लिम घरातील स्त्रियांना मी काही बुरखा घालताना, वावरताना पहिली नव्हते अपवाद एखादं दुसरी महिला पण हिजाब किंवा बुरखा वाद करून ह्या लोकांनी त्याच्या समाजातील स्त्रियांवर इतके दडपण निश्चित आणले आहे
की हे प्रमाण आज खूप वाढले आहे. अनैतिक आणि चुकीच्या गोष्टीना विरोध केला पाहिजे त्यामुळे हा थ्रेड.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा