नमस्कार
आपल्या देशाचा इतिहास भूगोल पूर्ण माहीत नसताना युक्रेन रशिया यांच्यातील वाद त्यामुळे निर्माण झालेला तिढा आणि युद्ध याचा कोणताही अभ्यास न करता रशिया जे करत आहे तेच योग्य असावं कारण स्वतंत्र असला तरी युक्रेन राशियाबरोबर भूतकाळात संलग्न होता. नाटोच्या देशांनी रशियाला कोंडीत पकडण्यासाठी जर युक्रेनचा वापर केला असेल तर आज जे काही युद्ध होत आहे त्याला जवाबदार फक्त रशिया कसे असेल? अमेरिका सारख्या प्रगत देशाविरुद्ध उभं ठाकणाऱ्या रशियासमोर युक्रेनचा निभाव लागूच शकणार नव्हता इतका साधा विचार न करता कलह वाढवणारा युक्रेन होणाऱ्या युद्धाला जवाबदार का नसावा? शक्तिशाली देशाच्या सूचीत पहिल्या तीन क्रमांकावर येणाऱ्या रशियाशी निभाव लागणार नाही हे स्पष्ट असतानादेखील देश धोक्यात आहे असं भासवून सामान्य नागरिकांना ज्यात लहान मोठे जेष्ठ इतकेच काय जेल मध्ये बंद असलेल्या आरोपींना मरणाच्या दारात ढकलणे हा मूर्खपणा नाही का? कॉमेडियन असलेल्या माणसाला देश चालवायला मिळाला म्हणून आजपर्यंत केली नव्हती इतकी मोठी कॉमेडी होत असताना निव्वळ सहनभूतीचे वातावरण निर्माण करून तो गृहस्थ दुसरा केजरीवाल तर बनत नाही ना? झुकेगा नही साला अस म्हणणे आणि ते पाहणे चित्रपटात बर वाटत असेल तरी वास्तवात तस केल्याने उभं राहायला देश उरणार नाही. बर भांडण फक्त दोन देशांचे असते तर कदाचित हे कुठं थांबलं तरी असत पण दोघांच्या भांडणात नक्की फायदा कोणाचा हे लोकांनी लक्षात घेतले पाहिजे. युद्धामुळे रशिया आणि पुतीन यांची जी बदनामी होत आहे किंवा होणाऱ्या संहाराला जवाबदार धरल्यामुळे आणि इतर देशांनी युक्रेनला पुढे केलेला मदतीचा हात आता हे युद्धाची व्याप्ती वाढवणार नाही ना अशी भीती वाटायला लागली आहे. पृथ्वीवरचे सगळ्यात घातक अस्त्र याचा उल्लेख करून रशिया जिंकेपर्यत युद्ध करण्याचा मानस व्यक्त केला आहे हे जगाने समजले पाहिजे. अमेरिकेला स्वतःचे सौर्वभौम आणि पृथ्वीवरील कोणत्याही घटनेत नाक घालून स्वतःचे स्थान अबाधित राखण्याचे अवघड काम करायचे असल्याने जगात अस्थिरता कशी राहील आणो त्याचा फायदा घेऊन जगाच्या राजकारणावर अमेरिकेचा हात कसा राहील हा अजेंडा गेल्या कित्येक वर्षांपासून पूर्ण करत आहे. आता वेळ आली आहे की अमेरिकेचे हे नासके राजकारण संपुष्टात यायला हवं अन्यथा स्वतःला उंच करण्यासाठी अमेरिका कोणत्याही देशाला, त्या देशातील लोकांना पायदळी तुडवू शकते. युक्रेन लवकरच पडेल आणि हा कलह शांत होईल अशी अपेक्षा आहे कारण ह्या युद्धामुळे बऱ्याच इतर देशात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने महागाईचा फुगा फुटून अस्थिरता निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. बलवान शिकारी आणि कमकुवत सावज यांनी किती मोठा खेळ मांडला तरी खेळाचा शेवट काय होणार हे सर्वश्रुत असल्याने वास्तव स्वीकारून चर्चेने मार्ग काढला गेला पाहिजे.असंख्य निरपराध लोकांचा बळी गेल्यानंतर चर्चा हा विकल्प योग्य नसला तरी जी लोक अजून जिवंत आहेत त्याच्यासाठी शांतता प्रस्थपित होणे गरजेचे. भारतीय नागरिकांना युक्रेन रशियामधून बाहेर काढण्यात जरी भारत सरकारला बऱ्यापैकी यश मिळाले असले तरी युक्रेन मध्ये भारतीय विद्यार्थीचा झालेला मृत्यू किंवा भारतीय नागरिकांना झालेल्या मारहाणीच्या बातम्या, एकंदरीत भारत देशाच्या विरोधात केलेले भूतकाळातील राजकारण यामुळे युक्रेनबद्दल विशेष अस चांगलं मत नाहीच पण वेळोवेळी भारताच्या मदतीला उभे राहिलेल्या रशियाला समर्थन भारताने दिले पाहिजे पण मानवता, भविष्यात भारताकडे जगाची बघण्याची दृष्टी सारख्या प्रश्नामुळे भारत सरकारला कोणतीही बाजू सक्षमपणे मांडता येत नसली तरी भविष्यात एक मित्र देश दूर जाणार नाही ना याची काळजी केली पाहिजे अन्यथा उद्या आपल्या शेजारील शत्रू देशांनी काही कुरघुडी केल्यावर मदतीला उभं रहाणारा एक मित्र दूर व्हायला नको. एकंदरीत रशिया युक्रेन विवादावर कोणत्याही एका बाजूने विचार करणे चुकीचे असले तरी निव्वळ मीडियात उभं राहिलेलं वादळ,ज्यात रशियाला एक खलनायक म्हणून पुढं केले जात आहे हे चुकीचे. जरी कर्ता रशि9या असला तरी करीवता कोण याचे मूल्यमापन करणे गरजेचे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा