जय श्रीराम
चाकण८४ नावाचे ट्विटर अकाउंट कायम स्वरूपासाठी बॅन केले गेले म्हणून डायरीनोट्स नावाचे दुसरे खाते चालू केले. नवीन खात्याला जुने मित्र मंडळी परत गोळा होत होते त्याचबरोबर ब्लॉगर वरचे ब्लॉगला थोडेफार view मिळत होते पण लोभ वाईटच नाही का? विचारांना जास्त लोकांपर्यंत पोचवण्याची हाव नवीन खात्याचे नाव बदलून पूर्वीच्या चाकण८४ च्या जवळपास नाव Chakan84s ठेवून जुने सहकारी, मित्र याना गोळा करण्याचा प्रयत्न केला आणि ट्विटरने नवीन खात देखील बॅन केले. थोडासा मनस्ताप झाला, वाईट वाटले आणि ठरवून टाकले की आता ट्विटरवर परतायचे नाही पण व्यसनी दारुड्या व्यक्तीचे पाय जसे आपसूक ठरलेल्या वेळी दारूच्या गुत्त्यावर घेऊन जातात तसच मला ट्विटर वर नवीन खात काढावे लागले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा