जय श्रीराम,
कश्मीर पृथ्वीवरील स्वर्ग, लहानपणी चित्रपटात दिसणारा कश्मीर, तिथला निसर्ग, झाड झुडपे, तळी, त्यात फिरणाऱ्या होड्या आणि आपल्या भागात कधीही न पडणारा,दिसणारा बर्फ आणि बर्फाचा पाऊस सगळं पाहून वाटायचं की किती भारी आहे हे सगळं आणि चित्रपट चालू असतानाच आई वडिलांकडे तिकडे जाण्याचा हट्ट केला जायचा तितक्याच उस्फुर्तपणे तो मान्य ही केला जायचा पण तो कधी पूर्ण होऊ शकला नाही, तेव्हा ही आणि आजही. कटारा, वैष्णवदेवीला जाऊन आलो पण अजूनही कश्मीर फाईल्स माझ्यासाठी अनोळखी आणि खूप लांब आहे. भविष्यात नक्कीच कश्मीर फिरणार असा मनोदय लहानपणी होता तसा आजही आहे फक्त तो पूर्ण कधी होणार हे सांगणं थोडं अवघड आहे.
चाकणसारख्या गावात लहानाचा मोठा झालेलो मी लहानपणापासून एक गोष्ट पाहत आलोय ती म्हणजे तो अल्पसंख्याक समाज वेगळा राहायचा, गरज म्हणून एकत्र असण्याचे नाटक ही करत असावा पण ती लोक त्यांची मूल फक्त त्याच्यात धर्माच्या लोकांशी एकत्र असत. शॉट पिच क्रिकेटच्या स्पर्धा भरायच्या जागोजागी लहानपणी त्यावेळीही त्याचे चार पाच संघ चांद तारा नावाने खेळले जायचे. जमातीची लोक गल्लीतून फिरायचे, जी लोक,मूल नमाज ला जायचे नाही त्यांना समजावून गोंजारून तस करण्यास भाग पाडायचे. कित्येकदा त्याची मुलं संध्याकाळी जमातीची मानस येऊन बोअर करतील म्हणून लपून राहायची, जमातीची लोक दिसली की पळून जायची. बुरखा असो की जाळीदार टोपी किंवा बिना मिशीची मोठी दाढी क्वचित दिसायची पण संख्येने कमी असले तरी कुठं थोडस वादाचे कारण झाले की हे अल्पसंख्याक मशिदीतून लोंढेच्या लोंढ्याने आलेले ही मी पाहिले आहे. हिंदू अश्यावेळी एकटा पडतो, शेजारीही सोबत उभा राहत नाही त्यावेळी त्या हिंदूंची जात पहिली जाते नंतर त्याची वागणुक आणि सगळ्यात शेवटी त्याच्याशी असच व्हायला पाहिजे म्हणत घरात जाताना ही पाहिले आहे. याचा अर्थ चाकण मध्ये धार्मिक तेढ आहे, धार्मिक संघर्ष आहे असं अजिबात नाही सगळे एकोप्याने राहतात पण तो एकोपा कुठपर्यंत जपायचा याचे ज्ञान त्या अल्पसंख्याक समाजाला नक्कीच आहे. माझ्या ह्या लिखाणाने तुम्ही चाकण मधील परिस्थितीचे चुकीचे निष्कर्ष काढावे अस वाटत नाही पण अशीच सर्वसाधारण परिस्थिती प्रत्येक भागात असणार याबाबत दुमत नाही. थोडस आठवून पाहिले तर तुमच्या आठवणी देखील अश्याच असण्याची शक्यता आहे. आज चाकण खूप मोठं झाले आहे, नाही नाही त्या ठिकाणाहून लोक चाकणला येत आहे,राहत आहे तस तो बौद्धिकदृष्ट्या मागासलेला, धार्मिक, बुरसटलेला समाज ही वाढत आहे, त्याची कट्टरता वाढत आहे, दाढ्या टोप्या सर्रास झाल्यात, जिथं त्याची संख्या जास्त आहे तिथं हिंदू लोक जागा विकत आहे कारण त्याचे राहणीमान, बहुसंख्य झाल्यावर त्याच्या मानसिकतेत होणारा बदल आणि एकट पडल्याची भावना हिंदूंना आजही पलायन करण्यास भाग पाडत आहे हे सत्य आहे फक्त ते कोणी व्यक्त करत नाही किंवा बोलत नाही. (खंडोबाचा माळ आता मुस्लिम बहुसंख्य आहे)
आज द काश्मीर फाईल्स चित्रपट पाहिला
चित्रपटाची ज्याप्रकारे माऊथ पब्लिसिटी झाली, चित्रपट पाहून परतणारे जसे भारत माता की जयकारे देत होते, लोकांचे रडणारे व्हिडीओ व्हायरल होत होते, पंतप्रधान, उपराष्ट्रपती इतकेच काय करणं जोहर किंवा अन्य फिल्म लाईन संबंधी लोक हा चित्रपट नसून एक विचार आहे, चळवळ आहे असं बोललं गेले. राजकारणी केजरी किंवा उद्धट टॅक्स फ्री न करण्यासाठी केलेले वक्तव्ये एकूण चित्रपट पहायचा अस पहिल्यापासून असणारे मत अजून दृढ झाले आणि आज हा चित्रपट पहिला आणि जास्त फिरून फिरून बोलण्यापेक्षा एका वाक्यात सांगायचे झाले तर माझा अपेक्षाभंग झाला. अनुपम खेर असो की मिथुन यांचा अभिनय चांगला झालाय पण चित्रपटात महत्वाचे कॅरेक्टर करणारा कृष्णा असो की बिट्टा अभिनय अजून चांगला करता आला असता इतकेच नाही तर विवेक अग्निहोत्रीचे डायरेक्शन हे ही सुमार दर्जाचे आहे असं वाटलं. जितक्या प्रचंड प्रकारे चित्रपटाची बुम झाली, शिकरा चित्रपटाशी तुलना झाली ते पाहता जो काही आतंकवाद, हिंसाचार, भीतीचे वातावरण दिग्दर्शक दाखवू शकला असता ते तो दाखवण्यास पूर्णपणे अपयशस्वी ठरला आहे असं माझं मत आहे. गर्दीला डोकं नसत आणि ज्याप्रकारे चित्रपटाची चर्चा झाली, त्याला विरोध झाला, लोकांनी हा विषय राष्ट्रीय मुद्दा बनवला त्यामुळे चित्रपटाला बॉक्स ऑफिस वर खूप यश मिळवून दिले पण मला मात्र यात खरा, वास्तविक कश्मीरमधील हिंसाचार,अत्याचार लोकापुढं आला अस वाटत नाही
वास्तवाच्या तेजापुढे द काश्मीर फाईल्स चित्रपट म्हणजे मिणमिणता तेलाचा दिवा आणि ह्या दिव्याचा प्रकाश सर्वदूर पडतोय कारण वास्तविकता अंधारात खितपत पडलेली होती, ह्याच वास्तवतेला जगापुढे आणण्याचा प्रयत्न केल्याबद्दल चित्रपट निर्माण करणाऱ्या प्रत्येकाचे अभिनंदन
पण वास्तव अजून प्रखरतेने मांडता आले असते किंवा जे दाखवले ते वास्तव कदाचित १% ही नसावे अस माझं मत आहे. कृष्णा पंडित हे पात्र तर इतकं विस्कळीत आहे की त्याला आपला आजोबा ज्या ३७० हटाव साठी कित्येक वर्षे काम करतोय ते एकत्र राहून कळलेच नाही, दाढी वाढवण्याइतका मोठा झालेला कृष्णाचा मेंदू मात्र विकसनशील राहिला ANU खरतर JNU म्हणायचे असेल पण वाद नको म्हणून चित्रपटात ANU म्हणून उल्लेख केलेल्या कॉलेजात शिकत असे पर्यंत आपल्या आई बापाचा फोटोही न पाहिलेला कृष्णा, प्रसंग लोकांच्या काळजाचा ठाव घेण्यासाठी दर्शवलेला असेल तरी मन ते मान्य करू शकत नाही. आईबाप भावाचा अपघाती मृत्यू हे खोट किती झालं तरी 30 वर्ष सत्य मानणारा, वेळोवेळी कधी प्रोफेसर, कधी आजोबांचे मित्र, कधी आतंकवादी आणि सरत शेवटी मिथुन म्हणजे ब्रह्मने सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवणारा कृष्णा खरच JNU शिकण्याचा लायकीचा नसून त्याने लगेच JKG मध्ये दाखला घ्यावा अस चित्रपट संपल्यानंतर वाटलं. कृष्णाच्या मतपरिवर्तनाचा वेग एकवेळ लाईटच्या आणि मनाच्या धावण्याच्या वेगाला हारावेल की काय अस वाटत. तांदळाच्या ड्रम मधील खून, लाकडे कापण्याच्या मशीनवर कत्तल केलेली स्त्री किंवा चित्रपटाच्या शेवटी २० ते २५ लोकांना एकाच गोळ्या न संपणाऱ्या पिस्टलने केलेला हिंसाचार याव्यतिरिक्त खूप मोठा हिंसाचार, इस्लामी तुष्टीकरण दाखवता आले असते पण तस घडलं नाही. मृत्यू समोर असूनही निव्वळ गोळी लागल्यावर पडण्याचा अभिनय म्हणजे वास्तविकता दर्शवली असा आहे का? शेजारच्या व्यक्तीला गोळीने मारल्यानंतर पुढचा नंबर आपला आहे हे माहीत असताना चेहऱ्यावर भीतीचा लवलेश, एक आर्त आरोळी निघत नसेल का? अभिनयाच्या बाबतीत चित्रपट सुमार दर्जाचा होता, आहे यापेक्षा खूप जास्त अभिनयाची गरज होती हे दिग्दर्शकाने मान्य करायला हवे. पंडितांचे पलायन हा मुद्दा दाबला गेलेला, तो लोकांना माहीत होता पण त्याची व्याप्ती किती मोठी होती यांची थोडीशी जाणीव चित्रपट करून देतो आणि हीच थोडी का होईना व्याप्ती प्रेक्षकांनी एकदा अनुभवायला हरकत नाही. विवेक अग्निहोत्री याचा आधीचा ताशकंद फाईल्स मनाला भावलेला चित्रपट आहे तसाच काहीसा अनुभव हा ही चित्रपट देऊन जातो पण..........
असो
जय हिंद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा