गुरुवार, ६ ऑक्टोबर, २०२२

शेयर मार्केट ऑपशन आणि फ्युचर्स भाग 2

ऑपशन म्हणजे काय ते समजलं असेल तर फ्युचर्स प्रकार काय असतो ते समजवण्यासाठी हे ट्विट. Obligation म्हणजे बंधनकारक. फ्युचर्स मध्ये खरेदी किंवा विक्री ही निश्चित वेळेसाठी,निश्चित केलेल्या किंमतीला पूर्ण करण्याचे बंधन असते. होणारा फायदा वा तोटा याला मर्यादा नसते,खरेदी वा विक्री करतानाImage
ना प्रीमियन असतो ना कोणता ऍडव्हान्स द्यायचा असतो पण करार पूर्ण झाल्यावर जो करार केला असेल तो पूर्ण करण्याचे बंधन असते जर तो व्यवहार नफ्यात असेल ते त्याला मर्यादा नाही हे जसे सुखवणारे आहे तसेच तो व्यवहार तोट्यात असेल तर त्या तोट्याला मर्यादा नाही म्हणजेच फ्युचर्स मध्ये जोखीम जास्त शेयर मार्केट मध्ये पैसा आहे हे निश्चित पण पैसे गमावणारे अधिक. समजा 100 लोक मार्केट मध्ये पैसे लावत असतील तर त्यातील फक्त 10 लोक पैसे कमवतात, 90 गमावतात. ज्या 90 लोकांनी पैसे गमावले ते पैसे त्या 10 लोकांच्या खिश्यात जातात. जरी हा सट्टा नसला तरी लोक मात्र सट्टाप्रमाणे याकडे बघतात. कमी वेळेत जास्त पैसे ह्या विचाराने अनेक लोक येतात आणि पैसे गमावून जातात. शुभ मंगल सावधान अस सांगूनही लोक सावधान होत नाही हे ट्विट सावधान करण्यासाठीच. गमावण्याची भीती आणि कमावण्याची हाव यांचा खेळ म्हणजे शेयर मार्केट.
जर वरील लेख आणि ट्विट्स वाचलेले असतील तर धोकेदायक आणि अतिधोकेदायक म्हणजे काय हे तुम्हाला लक्षात आले असेल आज ऑपशन ची अधिक माहिती देण्याचा प्रयत्न करतोय.
ऑपशन मध्ये कॉल आणि पुट हे दोन प्रकारकॉल मध्ये खरेदी करण्याचा तर पुट मध्ये विकण्याचा अधिकार असतो पण जो करार केला त्याला बांधिलकी नसते अश्यावेळी केलेल्या कराराच्या वेळी दिलेली रक्कम (प्रीमियम) इतकाच तोटा असतो पण ऑपशन मध्ये ट्रेड लॉटने केला जातो त्यामुळे प्रीमियम गुणिले लॉट इतके नुकसान होणार असते. शक्यतो बाजार चढता आणि वाढेल असा O असेल त्यावेळी कॉल ऑपशन हा प्रकार केला जातो तर बाजार घसरले वाटत असेल तर पुट ऑपशन घेतला जातो.
ऑपशन हा प्रकार दोन प्रकारे ट्रेड केला जातो1. मुदत संपेपर्यत2. इन्ट्राडे
मुदत म्हणजेच एक्सपायरी हा महत्वाचा घटक असतो हे विसरता काम नये.
मुदत संपेपर्यंत प्रकारात एक्सपायरी तारेखेपर्यत विकता येत नाही असे नाही, तुम्हाला वाटेल त्यावेळी तुम्ही तुमची पोजीशन square off करू शकता आणि इन्ट्राडे म्हणजे एका दिवसाच्या मुदतीत बाजार बंद होण्यापर्यतच्या वेळेस केला जाणारा ट्रेड. 
PE म्हणजे कॉल CE म्हणजे पुट
कोणताही ऑपशन हा त्या कंपनीचे नाव, एक्सपायरी तारीख, खरेदी वा विक्री याचे चिन्ह आणि खरेदी किंवा विक्री केलेल्या प्रीमियम ची किंमत असा लिहलेला असतो उदा खालील चित्र
Titan 27 Oct 22 CE 2640
याचा अर्थ समजून घेऊ टायटन हा स्टॉक डेरीव्हेटिव्ह27 oct 22 एक्सपायरी CE खरेदी केलास्ट्राइक प्राईस 2640 दुसऱ्या चित्रात वेगवेगळ्या स्ट्राइक प्राईसला असणारा प्रीमियम (LTP) वाचायला मिळतो जिथे 2640 ह्या स्ट्राइक प्राईसला


ImageImage

प्रीमियम 69 रुपये आहे. टायटन कंपनीच्या ऑपशन लॉट ची संख्या 375 अशी आहे म्हणजे 375 च्या पटीत 1 किंवा 2 किंवा तुमच्या गुंतवणूक करण्याच्या शक्तीवर लॉट खरेदी करता येतात. सध्या टायटन कंपनीचा शेयर किंमत 2582 इतकी आहे हे लक्षात ठेवा

हा वरील भाग नीटसमजून घ्या.
म्हणजेच
27 oct 22 ला टायटन ह्या शेयरची असलेली किंमत स्टॉक डेरीव्हेटिव्हच्या प्रीमियमची किंमत किती हे ठरवणार जर किंमत जास्त असेल तर तुमचा नफा अन्यथा तोटा.

वरील उदाहरणात काही गोष्ट अजून समजून घेऊ उदा
स्टॉक स्पॉट प्राईस 2582
स्ट्राईक प्राईस 2640
LTP वा प्रीमियम 69
मुदत 27 oct 22
आहे. ज्यावेळी स्टोकची किंमत 2640 वा त्याहून अधिक होईल त्यावेळी प्रीमियमची किंमत त्याच पटीत वाढलेली असेल.
आजची तारीख 6 oct 22 ला 27 तारखेला टायटन कंपनीचा डेरीव्हेटिव्ह 2640 वा त्यापेक्षा जास्त असण्याच्या तुमच्या अंदाजला केलेली खरेदी म्हणजे कॉल ऑपशन

तुम्ही खरेदी करत असलेला डेरीव्हेटिव्ह याच्या स्पॉट आणि स्ट्राईक प्राईस यामधील फरक पहा जो ₹58 आहे पण प्रीमियम वा LTP मात्र ₹69 आहे जी मूळ किमतीच्या अधिक आहे जी तुम्ही विकत घेण्यासाठी देत आहात. म्हणजेच नफा, फायदा चालू होण्यासाठी टायटन ह्या शेयरची किंमत (स्ट्राईक प्राईस+प्रीमियम)
2640 + 69 = 2651 वा त्यापुढे जाणे अपेक्षित आहे 2651 वा त्यापुढे कोणतीही 27 oct 22 ला असणारी शेयरची किंमत गुणिले लॉट साईज म्हणजे तुमचा फायदा असणार आहे. उदारणार्थ 27 तारखेला टायटनचा शेयर 2705 रुपय असेल तर 2705 वजा (स्ट्राईक प्राईस+प्रीमियम) 2651 = 50 गुणिले लॉट साईझ 375 = ₹18750
तुमचा नफा असणार आहे.

स्ट्राईक प्राईस आणि प्रीमयम (₹2651) यापेक्षा स्टॉक ची किंमत कमी असणे तुमचा तोटा असतो…
समजा ती किंमत तुमच्या स्ट्राईक प्राइज 2640 वा त्यापेक्षा कितीही खाली असेल तर केलेल्या कराराप्रमाणे ती विकत घेण्यास बांधील नसल्याने केवळ तुम्ही दिलेला प्रीमियम म्हणजे रुपय 69 गुणिले लॉट साईज 375 = 25875 हा सरळ सरळ तुमचा तोटा, नुकसान असणार आहे.

कॉल ऑपशन मध्ये वरील उदाहरणानुसार नुकसान झालेच तर ते 25875 इतके असणार होते पण स्टोकची किंमत 27 तारखेला जर 2800 किंवा 2900 रुपय असेल तर? चला तर 2900 रुपय आहे अशी कल्पना केली तर 2900 वजा(स्ट्राईक प्राइज
अधिक प्रीमियम) 2651 = 249 गुणिले लॉट साईझ 375 = 93375 हा फायदा असणार आहे
माझ्या माहितीप्रमाणे जितक्या सुलभ ही गोष्ट मांडण्याचा, सांगण्याचा प्रयत्न केला आहे त्यापेक्षा जास्त सोप्प करून सांगणे शक्य नाही तरीही यातील जास्तीत जास्त माहिती वाचण्याचा प्रयत्न केला तर ऑपशन हा ट्रेंडिंग प्रकार तुम्हाला पक्का समजेल हे नक्की. 


हा लेख किंवा थ्रेड लिहण्याचा
मूळ उद्देश वाचणाऱ्यांना विषय सोप्प्या भाषेत समजणे, ट्रेंडिंग प्रकारात असलेले धोके दाखवणे, हुशारीने गुंतवणूक केल्यास होणार आर्थिक फायदा याची ओळख करून देणे ही होती.


• • •
xxx
असो. लेख आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्या प्रतिक्रियाची अपेक्षा असेच लेख वाचण्यासाठी follow करा.
ट्विटर @pincode410501
ब्लॉगर पोस्ट diarynotes137.blogpost.com
डेलीहंट @cm_newsinformation



शनिवार, १ ऑक्टोबर, २०२२

शेयर मार्केट ऑपशन आणि फ्युचर्स

मित्रानो नमस्कार,

आज तुमच्या पुढे शेयर मार्केटबद्दल बोलणार आहे. शेयर  मार्केट मध्ये गुंतवणूक करणाऱ्याची संख्या कमी असली तरी बहुतांश लोक गुंतवणुकीसाठी पुढे येत आहेत हे नाकारता येणार नाही.सरळ साधेपणाने सामान्य गुंतवणूकदार शिल्लक असलेला पैसा चांगल्या स्टॉक मध्ये गुंतवणूक करून त्याच्या परतव्याच्या हिशोबाने काढून घेणे ही सगळ्यात सोपी आणि जुनी पद्धत.

ज्यांना परतावा अधिक पाहिजे आणि ज्यांच्याकडे शिल्लक पैसे कमी प्रमाणात आहेत ते जोखीम घेऊन intraday म्हणजेच घेतलेले शेयर एका दिवसार1त खरेदी करून विक्री किंवा विक्री करून खरेदी करून त्यात पैसे कमावत असतात. शक्यतो बऱ्याच लोकांना ह्या दोन गोष्टीची सर्वसाधारण माहिती असतेच आणि नसेल तर ती करणे अवघड नाही पण गुंतवणूक आणि इन्ट्राडे ट्रेड प्रकारचा पुढचा प्रकार म्हणजे ऑपशन आणि फ्युचर्स (Option & Futures) जो समजण्यास आधी सांगितलेल्या गुंतवणूक किंवा इन्ट्राडे  ट्रेडपेक्षा अवघड, किचकट असतो त्याबद्दल मला तुम्हाला सहज सोप्प्या भाषेत माहिती देण्याचा प्रयत्न म्हणजे आजचा हा लेख.

What is Future and Option? इतकं जरी गूगलवर टाकलं की उत्तर येते 

Futures and Options are “derivative products” in the stock market since they derive their values from an underlying asset, like shares or commodities, they are called derivatives. Two parties enter a derivative contract where they agree to buy or sell the underlying asset at an agreed price on a fixed date.

पण अश्या पुस्तकी व्याख्या वाचल्यानंतर त्या समजतात अस नाही म्हणूनच की काय आपल्याला समजेल त्या भाषेत त्याचे रूपांतर केल्याशिवाय आपल्याला हा भाग समजणे अवघड जाऊ शकते. उदारणार्थ निफ्टी५० मध्ये वेगवेगळ्या सेक्टर मधील ५० स्टॉक यांचा समावेश असतो. जर निफ्टी५० ला किंमत वाढवायची असेल तर त्यासाठी त्या निफ्टी च्या ५० स्टॉकची किंमत वाढली पाहिजे म्हणजेच काय तर निफ्टी५० हा Derivative आहे आणि त्यातील स्टॉक हे Underline Asset. निफ्टी50 च्या Derivative मध्ये निश्चित वेळेसाठी केलेली गुंतवणूक म्हणजे फ्युचर्स आणि ऑपशन. वेगेवगळ्या Commodities, Stock, Currency, index याचीच उदाहरणे आहेत. 

समजलं का? लेख आवडला तर follow करा हवं तर शेयर करा म्हणजे ही माहिती अनेक लोकांपर्यत पोहचवू शकू. करणार ना?

फ्युचर्स आणि ऑपशन यामध्ये गुंतवणुकदारांची जोखीम जास्त असते म्हणूनच की काय कोणत्याही Derivative ला ह्या प्रकारात ट्रेड होण्यासाठी काही पात्रता पूर्ण कराव्या लागतात त्याशिवाय त्यांना FnO मध्ये दाखल होता येत नाही म्हणूनच सगळेच स्टॉक यात असतातच असे नाही. 

Derivatives चे मूळ चार प्रकार असतात ज्यातील फक्त Future आणि Option या दोन प्रकारात ट्रेंडिंग केली जाते उरलेल्या Forward आणि Swap या दोन प्रकारात ट्रेंडिग केली जात नाही. Future, option यामध्ये जोखीम असतेच पण forward आणि swap यापेक्षा कमी म्हणूनच गुंतवणूकदारांचे हित सांभाळण्यासाठी, जास्त नुकसान होऊ नये, फसवणूक होऊ नये म्हणून Forward आणि swap यामध्ये ट्रेंडिंग होत नाही. याचा अर्थ Futures आणि option यामध्ये जोखीम नसते असा काढू नका,यामध्येही कमालीची जोखीम असतेच. 

Future and Option यामध्ये ट्रेंडिंग करण्याचे कमालीचे साम्य असले तरी या दोघांतील फरक खालील व्याख्या समजून घेतल्यास तुम्हाला सोपे वाटेल

An option gives the buyer the right, but not the obligation, to buy (or sell) an asset at a specific price at any time during the life of the contract. A futures contract obligates the buyer to purchase a specific asset, and the seller to sell and deliver that asset, at a specific future date.

शब्दशः भाषांतर केल्यास आपल्याला समजेल की ऑपशन खरेदीदाराला कराराच्या कालावधीत कोणत्याही वेळी विशिष्ट किंमतीवर मालमत्ता खरेदी (किंवा विक्री) करण्याचा अधिकार देतो, परंतु बंधन नाही. फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट खरेदीदाराला विशिष्ट मालमत्ता खरेदी करण्यास आणि विक्रेत्याला भविष्यातील विशिष्ट तारखेला ती मालमत्ता विकण्यास आणि वितरित करण्यास बाध्य करते.

बंधनकारक असणे आणि नसणे हा एकमात्र फरक सोडला तर Future असो की Option ट्रेंडिंग यात फरक नाही पण हा फरक खूप लक्षात घेणे गरजेचे

आता आपण Option या ट्रेंडिंग प्रकारची अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करू

Option treding म्हणजे नक्की काय? हे वरील व्याख्येवरून आपल्याला लक्षात आले असेलच. 

Option treding चे दोन प्रकार 1. Call Option 2. Put option बर ह्या प्रत्येक प्रकारचे परत दोन पार्टी / गट पडतात

Call option चे Call Buyer आणि Call Seller तसेच
Put option चे Put Buyer आणि Put Seller असे पार्टी / गट असतो.

खरेदी करणार म्हणजे विक्रेता असणार आणि विक्रेता असणार म्हणजे खरेदीदार असणार म्हणूनच कॉल असो की पुट त्यामध्ये दोन गट/ पार्टी असतातच अन्यथा व्यवहार पूर्ण कसा होणार?

आजच्या लेखात आपण ह्या प्रत्येक प्रकारची माहिती घेणार आहोत आणि जर तुम्ही सगळ्यांनी ह्या लेखाला अमाप प्रसिद्धी दिली तर Future's बद्दलची माहिती तुमच्यापुढे मांडण्याचा मी प्रयत्न करेल. हे सगळं लिहण्यासाठी, माहिती गोळा करण्यासाठी, चुकीची माहिती तुम्हाला न देण्यासाठी बरीच मेहनत लागते आणि ह्या मेहनतीसाठी तुमचे एक लाईक,रिट्विट, follow याची अपेक्षा करणे चुकीचे नाही ना? तुमची आवड निवड आणि माझी मुद्दे मांडण्याची,विषय घेण्याची पद्धत योग्य की अयोग्य तेही मला तुमच्या प्रतिक्रिया वाचून समजत राहील त्यामुळे कृपया आपल्या साथीची गरज आहे. असो मूळ विषयाकडे परत येऊ.

★ कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन म्हणजे काय? दोन्हीमध्ये काय फरक आहे?

कॉल ऑप्शन धारकाला स्टॉक विकत घेण्याचा अधिकार देतो, हा भविष्यातील तारखेला निश्चित किंमतीवर परंतु आज ठरलेल्या किंमतीवर अंतर्निहित मालमत्ता किंवा करार खरेदी करण्याचा अधिकार आहे. दुसरीकडे, पुट ऑप्शन धारकाला स्टॉक विकण्याचा अधिकार देतो, हा भविष्यातील तारखेला निश्चित किंमतीला परंतु आज ठरलेल्या किंमतीवर अंतर्निहित मालमत्ता किंवा करार विकण्याचा अधिकार आहे.

थोडस किचकट वाटत असले तरी वरील उतारा शांतपणे एक दोन वेळा वाचला तरी कॉल आणि पुट यातील फरक तुमच्या लक्षात येईल याची मला खात्री आहे.

ऑपशनचा पहिला प्रकार म्हणजे कॉल (Call) उदाहरणातून शिकण्याचा प्रयत्न करू

समजा तुम्हाला एखादा गाळा विकत घ्यायचा आहे. गावात शहरात एखाद्या रिकाम्या जागी व्यावसायिक संकुल उभारणार असल्याची बातमी तुम्हाला आहे अश्या वेळी तुम्ही तिथं जाता आणि गाळ्याची किंमत 25 लाख रुपय असल्याचे तुम्हाला समजते आणि तो किमान 2 वर्षात तयार होऊन तुमच्या हातात येणार आहे. करार मान्य असेल तर बुकिंग करण्याची किंमत 50 हजार रुपये असेल पण ही किंमत भरल्यावर परत मिळणार नाही अशी बोली असते. तुम्ही 50 हजार रुपय देऊन तो गाळा बुक करता अचानक काही दिवसांनी ह्या व्यापारी संकुलाची बातमी खूप प्रसिद्ध होऊन गाळ्याची किंमत 35 लाख होते. कराराची मुदत संपल्यानंतर हातात मिळणारा गाळा याची किंमत गुंतवलेल्या रक्कमेच्या कैक पटीने जास्त असते शिवाय गाळ्यांना मागणी जास्त असल्याने तो विकून अजून नफा कमावला जाऊ शकतो

हे साधे उदाहरण म्हणजे दुसरे तिसरे काही नाही कॉल ऑपशन आहे. 

● बुकिंग केलेली किंमत म्हणजे Premium

● गाळ्याची किंमत म्हणजे Strike Price

● गाळा मिळण्याची मुदत 2 वर्ष म्हणजे Expiry Date

● गाळ्याची भविष्यातील किंमत म्हणजे Spot price

वर उल्लेख केलेले उदाहरण आणि वस्तुतः शेयर मार्केट मध्ये होणारे ऑपशन ट्रेंडिंग यामध्ये फरक असला तरी मुद्दा समजण्यासाठी हे उदाहरण आहे हे लक्षात ठेवा

कॉल बायर (Call buyer ) मध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे

° स्टॉक मार्केटमध्ये भविष्यात होणारी वाढ हा अभिप्रेत असते म्हणजेच Call buyer प्रकारचा ट्रेड घेण्यासाठी बाजार Bullish असावा लागतो 

ज्यामुळे छोटासा प्रीमियम देऊन आपण एखादा Derivatives चा लॉट खरेदी करून Underline Asset ने वेगाने प्रगती करावी अशी इच्छा गुंतवणूकदार करत असतो. कॉल बायरमध्ये

नुकसान मर्यादित पण नफा अगणित असू शकतो. 

कॉल सेलर (Call seller) मध्ये 

° स्टॉक मार्केटमध्ये भविष्यात होणारी पडझड अपेक्षित असते म्हणजेच कॉल सेलर प्रकारात बाजार Bearish किंवा sideways असावा अशी अपेक्षा केली जाते. कॉल सेलरमध्ये स्टोकची किंमत घसरावी अशी अपेक्षा केली जाते ज्यात

फायदा मर्यादित पण नुकसान अमर्याद असते

अजून जास्त कॅलिअरिटी साठी आपण स्टॉक मार्केटच्या उदाहरणातून Call buyer आणि Call seller ह्या संकल्पना समजावून घेण्याचा प्रयत्न करू

समजा तुम्ही ABC कंपनीचा ₹ 800 चा Call ₹20 प्रमाणे लॉट साईज 500 शेयर महिनाभराच्या मुदतीसाठी घेतले तर तुम्हाला गुंतवणूक करावी लागणारी एकूण रक्कम 500x20= 10000 रुपये इतकी असणार आहे.समजा मुदत संपल्यावर ABC कंपनीचा शेयरची किंमत  ₹900 असेल तर खरेदी आणि विक्री करताना शेयरच्या किमतीतील फरक हा तुमचा नफा असणार आहे.   ₹ 20 प्रीमियम आधीच दिल्याने खरेदी किंमत ₹820 असणार आहे. मुदतीनंतर विक्री केलेला शेयर ₹900 वजा खरेदी किंमत ₹820 म्हणजे तुमचा नफा प्रति शेयर ₹80 आहे. असे तुमच्याकडे 500 शेयर असल्याने एकूण नफा ₹40000 असणार आहे

समजा शेयरचा भाव न वाढता कमी झाला म्हणजेच ₹800 पेक्षा कमी झाला किंवा तो ₹600 जरी झाला तरी तुमचे नुकसान केवळ तुम्ही प्रीमियम खरेदी करण्यासाठी लावलेले रक्कम इतकेच असणार आहे कारण कमी भाव झालेला हा शेयर तुम्हाला खरेदी करावाच लागेल असे करारात बंधन नसते अश्यावेळी फक्त प्रीमियम दिलेली रक्कम सोडावी लागेल

आता आपण पुट ऑपशन माहिती घेऊ 

समजा तुमच्याकडे चार चाकी गाडी आहे आणि अपघाताच्या भीतीने किंवा सरकारी नियम म्हणून तुम्ही जो गाडीचा इन्शुरन्स करता त्यातून पुट ऑपशन ही संकल्पना आपण समजून घेऊ शकतो

गाडीचा अपघात झाल्यास इन्शुरन्स चे 5 लाख रुपय मुदत 1 वर्ष पर्यत मिळणार आणि त्याचा प्रीमियम 15 हजार रुपय असेल असा करार गाडी मालक खरेदी करतो. अपघात विमा घेतल्यावर काही दिवसात किंवा मुदत संपेपर्यत कधीही गाडीचा अपघात झाला तुमच्या गाडीची अवस्था किंवा तिचे भंगाराची किंमत रुपय 50 हजार रुपय इतकेच होत असेल तर प्रीमियम घेतल्याची किंमत 15 हजार रुपय लक्षात घेता गाडीची अपघातांनंतरची किंमत अधिक इन्शुरन्स प्रीमियम याची वजावट करून तुम्हाला इन्शुरन्स कंपनीकडून जी किंमत 4लाख 35 हजार रुपय तुमचा नुकसानीमध्ये ही फायदा होऊ शकतो आणि हेच भविष्यातील अपघाताचा अंदाज बांधून त्यातून नफा मिळवण्याच्या पद्धत म्हणजे पुट ऑपशन अस म्हणतात. 

● घेतलेला इन्शुरन्स म्हणजे premium

● अपघात झाल्यावर मिळणारी रक्कम म्हणजे strike price

● इन्शुरन्स मुदत म्हणजे Expiry Date

● गाडीची भविष्यातील किंमत म्हणजे Spot price


वरील उदाहरण ढोबळमानाने पुट ऑपशन कसा चालतो हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे

पुट बायर हा प्रकार कॉल बायर प्रकराच्या विरुद्ध तर पुट सेलर हा कॉल सेलर च्या विरुद्ध काम करते.

म्हणजेच पुट बायर स्टॉक मार्केट पडझडीच्या/ घसरणीचा काळात ऍक्टिव्ह असतो. स्टॉक मार्केट bearish असेल त्यावेळी पुट बायर तर स्टॉक मार्केट sideways किंवा bullish असेल तर पुट सेलर मार्गाने नफा कमवता येऊ शकतो.

पुट बायर मध्ये नफा अमर्याद तर तोटा मर्यादित असतो

तर पुट सेलर मध्ये नफा मर्यादित आणि तोटा अमर्याद असतो

वर दिलेल्या साध्या उदाहरणातून तुम्हाला ऑपशन ट्रेडिंग प्रकारातील कॉल ऑपशन आणि पुट ऑपशन हा प्रकार समजला असेलच अशी खात्री बाळगणे मूर्खपणाचे असले तरी ऑपशन ट्रेडिंगची एकंदरीत रूपरेषा, स्वरूप तुमच्या लक्षात आले असावे असा अंदाज व्यक्त करून आता थांबतो

बहुतांश लोकांना थोडी रक्कम आणि कमी कालावधीत जास्त नफा कमवायचा असतो आणि हीच लोकांची गरज स्टॉक मार्केट आणि ऑपशन ट्रेंडिंग पूर्ण करत असाल तरी आपण हे विसरता कामा नये नाहीतर करायला गेलो गणपती पण झाला मारोती अस व्हायला वेळ लागणार नाही त्यामुळे लेखातील माहिती केवळ आणि केवळ प्राथमिक शिक्षण आहे, ऑपशन ट्रेंडिंग याची केवळ तोंड ओळख आहे असं समजावं.

ट्रेंडिंगममध्ये खूप अभ्यास, अनुभव घेतल्याशिवाय ट्रेडिंग करायला जाऊ नका

Most Important : Options involve risks and are not suitable for everyone. Options trading can be speculative in nature and carry a substantial risk of loss.

सर्वात महत्त्वाचे : ऑपशनमध्ये जोखीम असते आणि ते प्रत्येकासाठी योग्य नसतात. ऑप्शन्स ट्रेडिंग हे सट्टा स्वरूपाचे असू शकते आणि त्यात नुकसानाचा मोठा धोका असतो

आपल्या प्रतिक्रियांची, प्रेमाची वाट पाहतोय हे विसरू नका. 


• • •
xxx
असो. लेख आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्या प्रतिक्रियाची अपेक्षा असेच लेख वाचण्यासाठी follow करा.
ट्विटर @pincode410501
ब्लॉगर पोस्ट diarynotes137.blogpost.com
डेलीहंट @cm_newsinformation



रविवार, १८ सप्टेंबर, २०२२

लोकशाहीचा चौथा स्तंभ

दिनांक: १८ सप्टेंबर २०२२
देशात जर शांतता प्रस्थापित करायची असेल तर देशातील न्युज चॅनेलवर बंदी यायला हवी नाहीच तर निदान जे डिबेट शो आहेत त्यावर बंदी आणली पाहिजे. मीडिया विकाऊ आहे त्यामुळे त्यावर निर्बध / अंकुश आणायचा प्रस्ताव जो केंद्र सरकारने आणण्याचा प्रयत्न केला होता तो योग्य होता पण लोकशाहीचा चौथा खांब, विरोधक आणि समाजातील बुद्धिवंतांनी त्याला विरोध केला होता तो चुकीचा. आतंकवादी हल्ल्यात लाईव्ह प्रक्षेपण करून फुकट, घरबसल्या पाकिस्तानातील मास्टर माईंड याना माहिती कोणी पुरवली होती? नागव्या हिरोईनची फक्त पाठ दाखवून ही अभिनेत्री कोण सारखा बालिश प्रश्न असेल की सूत्रांच्या आधारे पेड न्यूज चालवणे असेल किंवा निपक्ष पद्धतीने वृत्तांकन न करता कोणत्या तरी राजकीय पक्षाच्या दारात बांधून ठेवलेली पत्रकारिता खरच गरजेची आहे का?पुराच्या पाण्यात बुडणाऱ्या माणसाला प्रश्न विचारणारे, न्यायालयीन खटल्यांवर वृत्तांकन करणारे, बलात्कार झाल्यावर विशेष समुदायाचे आरोपी नाव न सांगणारे, बलात्कार झालेल्या स्त्रीची ओळख उघड न करण्याचा न्यायालयीन आदेश न मानणारे, दररोज हिंदू मुस्लिम विषयावर धार्मिक तेढ वाढवणारे, बातम्या देण्याऐवजी मोठं मोठ्याने ओरडणारे, माहितीपर डॉक्टर विशेष कार्यक्रमात सेक्स बद्दल ज्ञान वाटणारे ही मीडिया सेन्सॉरशिप कायद्याखाली आलीच पाहिजे माहिती लोकांपर्यत पोहचवण्यासाठी सरकारी कामे पारदर्शक करणे, प्रत्येक गोष्ट सोशल मीडियात प्रसिद्ध करून देशात न्यूज चॅनेलची गरज संपुष्टात आली आहे हे दाखवणे केंद्र सरकारची जवाबदारी आहे. तस पाहता वलगर, भरकटलेली मीडिया लोकशाहीचा चौथा खांब राहिला नसून सोशल मीडियाने ती जागा घेतली आहे त्यामुळे खोट्या, पुरस्कृत, पक्षपाती बातम्या देणारे हे न्यूज चॅनेल बंदच झाले पाहिजे. काय त्या जुन्या बातम्या असायच्या तो प्रदीप भिडे, सलमा नावाची हिंदीत बातम्या देणारी बाई बातम्या सांगायची वेळ आली की घरात पिन ड्रॉप सायलेन्स झोन तयार व्हायचा. बातम्या धीरगंभीर आवाजात,शांत, स्पष्ट भाषेत ऐकताना बर वाटायचे, आजकाल सारखा बटबटीतपणा नसलेला बातमीला बातमीच्या रुपात सादर करणारे ती लोक, ती विचारसरणी किती छान होती की नाही? दूरदर्शनवरच्या बातम्या अजूनही तशाच असतात पण बातम्यांचा नावाखाली कॉर्पोरेट अजेंडे चालवणारे,त्यातून आर्थिक फायदा मिळणारे आजचे न्यूज चॅनेल उथळ वाटतात ज्या बातम्यांनी समाजात दंगली उसळतील त्या बातम्या लाईव्ह दाखवून घडलेल्या क्ष ठिकाण ची आग संपूर्ण देशात लावणारे हे न्यूज चॅनेल आणि त्यातील पत्रकार म्हणवून घेणाऱ्यांना कोणती बातमी दाखवू नये इतकी अक्कल कशी नाही. बाहेरच्या देशातील मीडिया पहा, तिथले पत्रकार पहा कसे राजकारणी लोकांना योग्य प्रश्न विचारून सळो की पळो करून सोडतात आणि आपल्या देशात हागल मुतल माईकचे दांडके लोकांच्या तोंडात जाईल इतपर्यत ओढाताण करताना बातमीसाठी कुत्र मागे लागल्यासारखे मागे लागतात. चार्ली हेब्दो हल्ल्यात झालेला रक्तपात असेल किंवा अमेरिकेतील ट्वीन टॉवर उधवस्थ झाल्यावर रक्ताचा एक थेंब, जखमी लोक, मेलेल्या माणसाचे मृतदेह तरी ती मीडिया दाखवले अस दिसलं का? त्यांना सेन्सॉरशिप मध्ये राहून बातम्या देता येतात तर आपल्या इथे तस का होऊ नये. पत्रकार स्वतःला असे समजतात की त्यांना काही विशेष अधिकार आहे असं त्याचे एकंदरीत काम चालू असते अश्यावेळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, अब्दुल कलाम यांच्या ज्ञानाचा नाही तर पदाचा मान सन्मान न राखणाऱ्या पत्रकारांना त्या लोकांनी त्याची लायकी कशी दाखवली होती ते फटफजितीचे व्हिडीओ आज ही प्रसिद्ध आहेत की. बिनबुडाच्या बातम्या देणारे मीडिया निर्बध असावे का? यावर मत नक्की द्या कदाचित पोल खूप प्रसिद्ध झाला तर बदल घडला तर घडला भारत देशात.
• • •
x

असो. लेख आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्या प्रतिक्रियाची अपेक्षा असेच लेख वाचण्यासाठी follow करा. चूक भूल असेल तर माफ करा पण प्रतिक्रिया द्यायला विसरू नका
ट्विटर @pincode410501
ब्लॉगर पोस्ट diarynotes137.blogpost.com
डेलीहंट @cm_newsinformation

शेतकरी, कर्जमाफी, भ्रष्टाचार आणि काही उपाय

 नमस्कार मंडळी,

महाराष्ट्रात सध्या तुफान पाऊस पडतोय, शहरात रस्त्यांवरून वाहणारे पाणी याचा पुरावा आहे. मुंबई, बेंगलोर, पुणे अनेक कित्येक शहरी भागात पाण्याचा निचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन चुकीचे असल्याने पाणी तुंबने, पूर येणे यामुळे बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शहरांपेक्षा गावाकडे परिस्थिती भीषण आहे असं मीडिया आणि विरोधी बाकावर बसलेले लोक भुंकायला लागले की आपल्याला समजायला लागते. अतीवृष्टीमुळे शेतीचे आणि पर्यायाने बळीराजा शेतकरी बेजार झाला आहे असं मत ऐकायला वाचायला मिळाले की विरोधी ओला दुष्काळ जाहीर करा, अमुक तमुक पैश्यांची मदत करा असा तगादा सत्ताधारी पक्षाकडे लावला जातो. कधी ओला दुष्काळ, कधी सुका तर कधी कर्जबाजारी झालेल्या शेतकरी आत्महत्या पुढे करून विरोधी पक्ष शेतकरी समाजाचा कैवारी बनण्याचा आणि सत्ताधारी पक्ष दानशूर कर्णाचा अवतार बनत असतात.

प्रत्येकवेळी शेतकऱ्यांना मदत करण्याच्या नावाखाली प्रचंड मोठा भ्रष्टाचार केला जात असावा असं माझं मत आहे. प्रत्येक वेळी ज्या मोठ्या मोठ्या घोषणा, पैश्याची मदत खऱ्या गरजू शेतकरी बळीराजपर्यत पोहचत असेल का? कर्जमाफीचे मोठं मोठे पॅकेज शेतकऱ्यापर्यत पोहचत असतील का? पाच दहा हजार रुपयांच्या मदतीचे काही मेसेज बातम्यात फिरवले की बाकीचे पैसे एका एकरात कोट्यवधी रुपयांचे वांगे उत्पादन करणारे गरीब शेतकरी किंवा घराच्या गॅलरीत फ्लॉवरचे विक्रमी पीक घेणारे शेतकरी, राजकीय पक्ष लाटत असतील का अशी शंका कायम येत असते. मध्यंतरी आदिवासी लोकांनी जंगली, कसणारी जमीन नावावर करून देण्यासाठी केलेले आंदोलनात किती आदिवासी लोकांच्या नावावर जमिनी झाल्या आणि किती ते आंदोलन पुरस्कृत करत असलेल्या नेत्यांच्या नावावर झाले असतील. शेतकऱ्यांसाठी अत्यल्प दरात वीज, नदीवरून शेती भागात पाईपलाईन, जंगली जमिनी कसणाऱ्या आदिवासी लोकांच्या नावावर जमिनी करून देणे, वेळोवेळी होणाऱ्या कर्जमाफी, कमी व्याज दारात कर्ज, नैसर्गिक आपदा आल्यावर दिली जाणारी सूट अश्या कित्येक गोष्टी ह्या केवळ दिखावा असण्याची शक्यता मला कायम वाटत असायची कारण ह्या गरीब, अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांचा असा कोणता डेटाबेस सरकारकडे असेल की प्रत्येक गरजू शेतकऱ्यांना मदत पोचवत असतील? 

डेटाबेस असेल? मला नाही वाटत असेल म्हणून आणि त्याचा गैरफायदा कुठे जातो हे आपण समजत असालच. बर ते डिजिटल क्रांतीचे की आता पैसे डायरेक्ट शेतकऱयांच्या खात्यावर जमा होतात अस म्हंटल जात ( जातात की नाही माहीत नाही) अन्यथा हे पैसे देण्याचे काम प्रामुख्याने सहकारी पीडीसी बँका यांची जवाबदारी असायची आणि ह्या बँका कोणत्या राजकीय पक्षाच्या अधिकारात येतात, कसे तिथे वर्षानुवर्षे अपहार केले गेले यांची सविस्तर बातम्या आपण कित्येकदा ऐकल्या असतीलच.

केंद्रातील सरकारने नवीन कृषी कायदे केले त्याला कोणी कसे विरोध केले,का केले हे आपण जाणताच. कृषी उत्पन्न समित्या कश्या शेतकऱ्याची पिळवणूक करतात हे ऐकून वाचून चोथा झाला आहे. आणलेल्या मालाला अडते, दलाल कसे पाडून किंमत देतात कधी कधी तर टनावर माल विक्री करून वाहतूक खर्चही न निघणे, किंवा मालाची विक्री करून हमाली खर्च देण्यासाठी शेतकऱ्यांना स्वतःच्या खिश्यातून द्यावा लागतो आणि शेतीमाल फुकटात विकून जाणाऱ्या कित्येक बिलटया सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या आहेत मग पिचलेला शेतकरी तो माल रस्त्यांवर ओतून छाती बदडत घरी जातो, दुधाला भाव मिळाला नाही की दुधाच्या गाड्या अडवून टँकर रस्त्यावर रिकामा केला जातो (दुधाच्या गाड्याची मालकी कोणातरी भालत्याची किंवा सार्वजनिक असते) अश्या एक ना धड शंभर बातम्या आपण कित्येकदा पाहिल्या आहेत त्यामुळे सरकार ज्या घोषणा, सवलती, मदत वेळोवेळी जाहीर करत असते त्या खऱ्या शेतकऱ्यांपर्यत पोहचत असतील का याबाबत कोणी असो की नसो मी शाशंक आहे. कृषी कायदा आणि त्याला झालेला विरोध, ट्रॅक्टरचे मोर्चे, सामान्य जनतेची केलेली अडचण, जगभरात झालेली नाचक्की ही सगळी थेर, मग त्यावर पडदा टाकायचा म्हणून केलेले उपाययोजना केवळ आणि केवळ भ्रष्टचारच. कदाचित सत्ताधारी आणि विरोधक यांच्या सहमतीने होणारा, एकाने मारल्यासारखं करायचं दुसऱ्याने रडल्यासारखे करायचे अस नियोजनबद्ध काम असेल का? का इतक्या सोयी सुविधा, मदती, सवलती, कर्जमाफी करायची आणि ती ही थोडयाफार सतत फरकाने चालूच असते. 

शेती हा व्यवसाय आहे का? बरं नसेल मानलं तर इतर कोणत्या व्यवसायात नैसर्गिक आपदा आल्याने कर्जमाफी मिळते का? जगाचा पोशिंदा, शेतकऱ्यांने पिकवलेच नाही तर खाणार काय? भाजीपाला बाजारात भाव करायचा नाही आणि त्याला पाठिंबा म्हणून मॉल मध्ये कधी मोलभाव करता का असा खोचक प्रश्न, बर एखाद्याने विरोध केलाच शेतकऱ्यांच्या सवलतीना की असे शेतकरी प्रेमी तुटून पडतात की त्याला मर्यादा नाही. इतकं सगळं शेतकऱ्यांना सवलती मिळतात तर ते त्याचा माल फुकट देतात का? नाही ना मग इतक्या सुविधा त्यांना जनतेच्या खिश्यातून गोळा केलेल्या करातून देणे योग्य का?  योग्य मानले तरी त्या शेतकऱ्यांपर्यत पोहचतात का? किती दिवस आर्थिक मदतीचे नाटक करत राहायचे त्याला काही ठोस उपाययोजना करायच्या आहेत की नाही? 

प्रत्येक भाग, प्रदेश यांच्यानुसार, जमिनीचा पोत, बाजारात असलेली मागणी याचा विचार केला जातो का? हवामानाचे अंदाज, प्रगतशील व्यवस्थापन, नवीन पद्धतीने शेती पद्धती यांचे अवलंबन केले जाते का? की शेजारच्याने कांदा लावला की आपण पण कांदा लावायचा, बटाटा लावला की बटाटा आणि ऊस लावला की ऊस अस केल्याने पुरवठा जास्त होतो आणि मालाला भाव कमी मिळतो इतकं अर्थशास्त्र कळत नाही का? बी बियाणे, खत, रासायनिक खत, औषध यांचे दर नियमित नसतात अश्या कितीतरी गोष्टी आहेत की ज्यांचा विचार करून ठोस, कायमस्वरूपी उपाययोजना केली पाहिजे पण शेतकरी, राजकारणी आणि मीडिया सगळ्यांची असणारी उदासीनता आणि काही न करता मिळणारी आर्थिक मदत, ही आर्थिक मदत करताना होणारे भ्रष्टाचार हे न संपणारे चक्र कधी थांबेल का? 

कस थांबणार हे अपहार?

सगळ्यात पहिले शेती हा व्यवसाय आहे हे घोषित केले पाहिजे कारण शेतीवरच शेतकरी आणि त्याचे कुटुंब उदरनिर्वाह करत असते.शेतीवर उत्पन्न कर लावला पाहिजे. शेतकऱ्यांची जमीन आणि शेतकरी यांची यादी बनवली पाहिजे. ज्या शेतकऱ्यांनी नाव नोंदणी केली असेल त्यांनाच सरकारी सवलती,नैसर्गिक आपदा याच्यावेळी मदत मिळेल अशी घोषणा केली पाहिजे. प्रत्येक प्रदेशानुसार जमिनीचा पोत, तिची गुणवत्ता यांचे सर्वेक्षण झाले पाहिजे. शेतीबद्दल एक पोर्टल निर्माण केले पाहिजे. एकाच पिकाचे उत्पादन जास्त होणार नाही यासाठी शेतकऱ्याने शेतकरी पोर्टलवर आपण कोणते पीक घेणार हे घोषित केले पाहिजे. सरकारने नोंदी झालेल्या पीकानुसार कोणते पीक जास्त लावण्यात येत आहे,कोणते कमी यावरून अंदाज बांधून पीक विक्रीच्या वेळी पिकाची किंमत गगनाला भिडणार नाही किंवा घेतलेले पीक कवडीमोल होऊ नये म्हणून जास्त उत्पादन होणाऱ्या मालाचे निर्यात आणि कमी पडणाऱ्या मालाची आयात करण्याचे नियोजन केले पाहिजे. ज्यामुळे शेतकऱ्याशिवाय सामान्य माणसाला भुर्दंड बसणार नाही, महागाई, अन्न धान्य टंचाई सारखे प्रकार रोखता येतील.नोंदणीकृत शेतकरी, शेत जमीन आणि पीक याच्यासाठी लागणारे बी बियाणे, खते, रोगराई वरील औषधे सरकारी योजनेतुन नोंदवून शेतकऱ्यांना निम्म्या खर्चात किंवा पीक विकल्यानंतर त्याचे पैसे कापून घेता येईल असा पर्याय ठेवला पाहिजे. नोंदणी झालेले पीक, जमिनीचा पोत,दर्जा योग्य असेल याची काळजी सरकाने घेतली पाहिजे. प्रमाणापेक्षा अधिक वा कमी पिकाची नोंदणी झाल्यास शेतकऱ्यांना सूचना करून पर्यायी पीक घेण्यास संगितले पाहिजे. शेतीमाल शेतकऱ्यांनी बाजारपेठेत नेण्यापेक्षा बाजारपेठेत लागणाऱ्या गोष्टी शेतकऱ्याच्या दारात जाऊन उचलून आणण्याची पर्यायी व्यवस्था सरकारने केली पाहिजे असे कित्येक निर्णय घेऊन आपण सुनियोजित पद्धतीने शेतीचा विकास करू शकतो पण हे करण्याची इच्छाशक्ती शेतकरी आणि राजकारणी यांच्यात आहे का हे शिधावे लागेल. कृषी खाते, कृषी मंत्री यांच्या डोक्यात कधी असे विचार येतात की नाही की फक्त वर्षानुवर्षे पाट्या टाकायचे, सत्ता, खुर्ची, पद प्रतिष्ठा यांच्यात मदमस्त जगायचे इतकेच नेत्यांचे काम असते का? विचार करायला गेलो तर अजून दहा पाने लिहता येतील पण अस नियोजन केले जाईल का? वर। उल्लेख केलेले योग्य की अयोग्य, करता येईल की नाही याचा विचार नक्कीच केला पाहिजे. पारंपरिक शेती, तीच जुनी पद्धत, ढिसाळ काम यामुळे प्रमाणापेक्षा जास्त वा कमी अन्न धान्य निर्मिती, नैसर्गिक आपदा, रोगराई यामुळे नुकसान त्यातून आर्थिक मदत, कर्जमाफी, भ्रष्टचार हे चक्र थांबले पाहिजे त्यासाठी नवीन विचार, प्रकल्प, चाचणी स्वरूपात करून भविष्यात अजून अचूक ध्येय गाठण्यासाठी योजना केल्या जातील का?

लिहतच राहावं वाटत असेल तरी कुठतरी थांबले पाहिजे. लिहलेले सगळंच बरोबर असेल अस नाही पण सगळंच चुकीचे नाही हे ही तितके खर त्यामुळे चुकून माकून तुम्हाला हा लेख आवडला तर शेयर करा कदाचित हे वाचून थोडाफार शेती, शेतकरी याच्या आयुष्यात बदल झाला तर झाला शिवाय जगाला पोसणारा बळीराजा आर्थिक मजबूत करणे, सामान्य माणसाचा कर रूपातील पैसा फुकटात वाटणे, लाटणे बंद होणे, महागाई कमी होणे, देशात खऱ्या अर्थाने हरितक्रांती येण्यासाठी, देश स्वावलंबी बनण्यासाठी, अपहार, भ्रष्टाचार संपण्यासाठी लेखातील एक गोष्ट जरी पूर्णत्वास आली तर आनंदच आहे.

असो. लेख आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्या प्रतिक्रियाची अपेक्षा असेच लेख वाचण्यासाठी follow करा. चूक भूल असेल तर माफ करा पण प्रतिक्रिया द्यायला विसरू नका

ट्विटर @pincode410501
ब्लॉगर पोस्ट diarynotes137.blogpost.com
डेलीहंट @cm_newsinformation

गुरुवार, १५ सप्टेंबर, २०२२

नीती की अनिती?

दिनांक:१५ सप्टेंबर

भारतीय राजकारण पाहिले तर इथे कोणत्यातरी एका पक्षाचे वर्चस्व कायम पाहण्यात आले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस पक्ष नंतर काही वर्षे त्रिशंकू तर काही वर्षे भाजपा नंतर परत भ्रष्टचाराने बरबटलेले ते मनमोहन दिवस आणि त्यावर पर्याय म्हणून उदयास आलेले मोदी सरकार

Image

आज मोदीच्या विरुद्ध विरोधी पक्षात दावेदारी सादर करणारे अनेक असले तरी पराभूत करतील असा चेहरा आणि कर्तृत्व असणारा नेता दिसत नाही. विरोधक सत्ता मिळवण्यासाठी बेलगाम, बेछूट आरोप करतात, प्रत्येक मोदी सरकारच्या निर्णयाला आव्हान देतात किंवा टवाळी करतात पण त्यामुळे मोदींच्या प्रतिमेत
कमतरता, घसरण होते आहे का की आरोप करणाऱ्या लोकांची खरी मनस्थिती जनतेला कळत आहे? विशिष्ट समाजाला पाठिंबा देऊन, आर्थिक मदत करून CAA विरुद्ध आंदोलन असेल किंवा कृषी कायद्यांविरुद्ध उभे ठाकलेले ट्रॅक्टर आंदोलन किंवा काही दिवसांपूर्वी उभं राहिलेले भारत जोडो आंदोलन यामुळे बातम्यात
नाव झळकेल पण जनतेच्या मनात स्थान निर्माण होईल का? विरोधी पक्ष म्हणून फक्त विरोधच करायचा का? विरोध न करता सत्याची बाजू घेऊन देखील विरोधक स्वतःचा पक्ष उभा करू शकतील. योग्य ला योग्य म्हणण्याची काळाची गरज, जिथे प्रश्न देशाचा असतो तिथे राजकीय पक्ष,विचारधारा सोडून एकत्र उभे राहणे
अपेक्षित असते पण अस वागताना विरोधकांना कधी पाहिले आहे का? नाही तर त्याच्याबद्दल जनतेच्या मनात आदराची भावना कशी येईल? केवळ विरोध करून सत्ता मिळवणे हे लक्ष ठेवल्यास लोक सत्ता देतील अशी अपेक्षा जर विरोधक करत असतील तर त्याच्या मूर्खपणाला काय म्हणायचे? मोदी ज्याप्रकारे राज्य करतोय ते
पाहता येत्या निवडणुकीत त्याचे कदाचित संख्याबळ कमी होईल मात्र सत्ता भाजपाकडेच राहील याची जास्त शक्यता आहे असे असताना विरोधकांनी आपला वैचारिक स्तर उंचावला आहे हे दाखवण्यासाठी विरोध नाही ते सरकारच्या पावलावर पाऊल टाकून चांगल्या निर्णयाने अनुमोदन द्यायला पाहिजे असे करताना स्वतःच्या स्वतःच्या
पक्षाची कार्यपद्धती देशाची आणि जनतेची सेवा असे बिंबवणे त्यांना शक्य होईल शिवाय मनातील सत्ता, खुर्ची मिळवण्याची सुप्त इच्छा लपवून एक निःस्वार्थी नेता, पक्ष यामुळे कदाचित जनतेचा पाठिंबा मिळू शकेल पण इतकी बुद्धी चालण्यासाठी कर्तृत्व साफ असावे लागते, हात, कपडे आणि चारित्र्य स्वच्छ
असावे लागते तेच मुळात विरोधी पक्षाचे मूळ दुखणे आहे. आप, तृणमूल, राष्ट्रवादी, काँग्रेस, समाजवादी, बहुजन, राष्ट्रीय जनता दल यांच्यात भ्रष्टचारचे अनेक गोष्टी भूतकाळात आणि वर्तमानात घडत आहे, उघड्या पडत आहे. भाजपा पक्षावर देखील आरोप झालेत पण त्याचा प्रमुख नेता स्वतःची स्वच्छ, कडक
प्रतिमा घेऊन उभा असल्याने अजूनही भ्रष्टाचाराचे काळे डाग लागले नाही. सक्षम, वैचारिक विरोधी पक्ष असणे गरजेचे अन्यथा एकाधिकारशाही ही हुकूमशाहीपेक्षा अशी वेगळी नसते. ओडिशा मध्ये असलेले राज्य सरकार यांची कामगिरी पाहिल्यास लक्षात येते की मोदींची जादू तिथं चालली नाही किंवा भाजपा बीजेडीविरुद्ध आक्रमक दिसत नाही कारण बीजेडी सरकार लोकांच्या भल्यासाठी करत असलेल्या चांगल्या कामात अडथळा निर्माण केल्यास भाजपा तिथं जास्त उमेदवार निवडून आणू शकेल असे नक्कीच नाही आणि याची जाणीव मोदी आणि भाजपाला असल्याने विरोधासाठी विरोध करण्यापेक्षा हातात हात घालून, चांगल्या गोष्टीना
अनुमोदन देऊन आहे ती शक्ती सत्कारनी लावण्यावर भर भाजपा देत आहे पण त्याचबरोबर स्वतःची शक्ती वाढवण्यावर भर देखील देत असणार आहे आणि हीच पद्धत मोदी विरोधक करण्याचे धाडस आणि इतका वेळ देत नाही म्हणूनच त्यांना दररोज उठून मोदीच्या आरे ला कारे करण्यात वेळ घालवावा लागतो आणि त्यामुळे
लोकांच्या नजरेत त्याची इज्जत वाढण्यापेक्षा कमी होते आणि मोदींचा पाठिंबा अजून बळकट होतो. मोदी अपराजित नाही पण त्याला पराजित करण्याचे सामर्थ्य आज तरी कोणत्याही पक्ष,संघटना आणि पक्षाकडे आहे असं वाटत नाही. छोटे मोठे धक्के ते देऊन स्पर्धेत असल्याची जाणीव ते करून देतील पण येणार ते कायम
दुसरेच. मोदी सरकार आणि मोदीला राष्ट्रवाद, हिंदुत्व या मुद्द्यावर जोरदार पाठिंबा, रोखठोक, बिगर भ्रष्टाचारी अशी ओळख मिळाल्याने आणि गेल्या दोन टर्ममध्ये केलेल्या कामामुळे देशात परदेशात भारतीयत्व वाढीस लागल्याने जनतेचा जोरकस पाठिंबा मिळत असेल तरी देशाला असलेला खरा धोका हा कट्टरवादी
धार्मिक आणि एका विशिष्ट समाजाकडून आहे जो देशाची एकजूट तोडू शकतो त्या गटावर धार्मिक निर्बध लावण्यानेच त्याच्यावर अंकुश ठेवता येईल हे समजत असताना त्याकडे दुर्लक्ष करणे धोकेदायक. सबका साथ सबका विकास घोषवाक्य किंवा एकंदरीत सरकार चालवण्याची पद्धत पाहता हे सरकार हिंदुत्ववादी आहे का यावर शंका उत्पन्न होते. भूतकाळातील नेते, राजकारणी हे जसे इतिहासात अजरामर झाले तसेच आपले नावाचा डंका वाजवत रहावा अशी सुप्त इच्छा मोदींची नाही ना म्हणूनच मधला मार्ग स्वीकारून परत सत्ता मिळवण्याकडे लक्ष तर दिले जात नाही ना असे प्रश्न एक नागरिक म्हणून मनात येतात. असो


विषय राजकीय नेते,पक्ष यांचा नसून भारताचा आहे आणि भारताचे भारतीयत्व दृढ करण्यासाठी काम करणारे,झटणारे पक्ष संघटना याची गरज आहे. योग्य मुद्यांवर अनुमोदन करणारा, चुकीच्या गोष्टीना विरोध करणारा, भारतीय लोकांसाठी, भारत देश बळकट करण्याची बुद्धी भारतीयांना देवाने देवो

जय हिंद



रविवार, ११ सप्टेंबर, २०२२

जर मी भारतीय संघाचा सिलेक्टर असतो तर

शीर्षक बघून गडबडला तर नाही ना? नाही निबंध लिहत नाही मी पण येणारा T20 विश्वचषक भारताने जिंकावा म्हणून माझी स्वतःच्या आवडी निवडी वर कोण कोण भारतीय संघात असावे हे मांडणार आहे. तस पहायला गेले तर वय जरी झाले नसले, अजून बरच क्रिकेट खेळू शकत असले तरी काही खेळाडू ह्या छोट्या फॉरमॅट मधून निवृत्ती जाहीर करू शकतात आणि त्या खेळाडूंना कारकीर्द विजयी चषकाबरोबर होवो ही जशी क्रिकेटप्रेमी जनतेची इच्छा असणार तस ती त्या खेळाडूंची असणार यात शंका नाही. भारतीय संघाचा गणवेश किंवा जर्सी यावर जे तीन स्टार आहेत त्यात दोन स्टार येत्या दोन वर्षात वाढावे अस प्रत्येक भारतीय माणसाला वाटत असेल. सध्या त्यावर कपिल देव यांनी १९८२ मध्ये जिंकलेला ६० षटकांचा, महेंद्रसिंग धोनी याने २००७ चा T20 आणि २०११ मध्ये ५० षटकांचा एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा जिंकल्याचे स्वरूप एक एक स्टार. रुपात पहायला मिळते. 

नुकतीच आशिया कप स्पर्धेतून भारताला बाहेर पडला, सामना म्हंटल की दोन संघातील एकाचे जिंकणं किंवा हारणे ठरलेले पण गुणवत्तेच्या बाबतीत वरचढ असलेला भारत स्पर्धेतून बाहेर जाणे ना क्रिकेट रसिक याना पचनी पडत आहे ना आयसीसीला ना स्पर्धेचे पुरस्कर्ते पण असे पराभव गरजेचे असतात ज्यामुळे पाय जमिनीवर येतात. 
भारतीय संघ बराच समतोल आहे आणि निवडकर्ते कोणाला निवडणार आणि कोणाला नाही हे जवळपास ठरलेले आहे. एकापेक्षा एक उत्कृष्ट खेळाडू भारतात असताना निवड समितीचा निवड करण्यासाठी कस लागणे अपेक्षित होते पण निवड समिती तस करेलच असे नाही कारण सुरक्षित, सोप्पा पर्याय निवडून स्पर्धा जिंकणारा संघ कसा निवडला याचे कौतुक त्यांना करून घ्यायचे आहे, आडवळणाला जाऊन धक्कादायक निर्णय घेण्याची ही वेळ नाहीच मुळी. त्यामुळे अपेक्षित संघ खालील प्रमाणे असणार यात शंकाच नसावी.

रोहित शर्मा (कर्णधार)
केएल राहुल (उपकर्णधार)
विराट कोहली
सुर्यकुमार यादव
रिषभ पंत (यष्टिरक्षक)
दिनेश कार्तिक
हार्दिक पंड्या
अक्सर पटेल
युझुवेंद्र चहल
भुवनेश्वर कुमार
जसप्रीत बुमराह
हर्षल पटेल
दीपक हुड्डा
दीपक चहर
अर्शदीप सिंग

जर असाच संघ निवडला गेला तर खरच निवड समितीची गरज आहे का? निवड समिती त्याच्या कामाला न्याय देते का असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. कधी कधी कोणता माणूस कसा वागेल हे अंदाज व्यक्त करण्यासारखे सोप्प काम असत आणि मला खात्री नाही तर गॅरंटी आहे की एक किंवा जास्तीत जास्त दोन बदल सोडले तर संघ असाच असेल पण ही संघनिवड भारताला विश्वचषक जिंकून देईल का? माझंच मत विचाराल तर नाही. खेळाडूंच्या नावाचे आणि कामाचे वलय जर त्याची निवड संघात करत असेल तर कामगिरी हवी तशी होईल असे नाही. संघ तसा तगडा आहे, अनुभवी आहे पण तरीही तो जिंकणार नाही अस वाटण्याचे कारण म्हणजे इतर संघाना ह्या संघविरुद्ध कस लढायचं आहे हे स्पष्ट माहीत आहे. उदारणार्थ पहिली गोलंदाजी घेऊन डावखुऱ्या गोलंदाजाच्या हातात बॉल देऊन दणादण आत येणारे स्विंग बॉल टाकून वरची फळी उधळून लावायची नंतर येणारे लुटुपुटूची लढाई लढणार आणि कसे बसे धावसंख्या वाढवत 150 पर्यत नेणार. असो. 2007 च्या पहिल्या वर्ल्डकंप स्पर्धेत सगळे खेळाडू नवखे होते, फॉरमॅट नवीन होता त्यामुळे एक तर प्रतिस्पर्धी गाफील होता किंवा त्यांना खेळाडूंचा खेळ माहीत नव्हता म्हणूच कामगिरी, नियोजन याच्या बळावर भारत ती स्पर्धा जिंकली होती जी ह्या संघात पहायला मिळत नाही

संघ निवड करताना अनेक खेळाडू उत्तम असतानाही त्यांना संघातून डाववल जाईल, शेवटी संघात 11 खेळाडू खेळू शकतात. सोप्पा पेपर आलेला कोणाला आवडत नाही पण काही पर्याय आहेत त्याचा विचार झाला पाहिजे. 

संजू सॅम्पसन सारखा खेळाडू कोणत्याही संघासाठी एक एक्स फॅक्टर ठरू शकतो ज्याला भारतीय संघ नीट वापरतच नाही. दिनेश कार्तिक मध्ये रोहितला काय दिसले देव जाणे पण तो स्पर्धेत यशस्वी होईल असं माझं मत नसल्याने त्याला पर्याय म्हणून संजू उत्तम पर्याय आहे. केएल राहुल याला सलामीला खेळवण्यापेक्षा मिडल ऑर्डर मध्ये टाकले पाहिजे किंवा त्याला खेळवलेच गेले नाही पाहिजे कारण त्यांच्यामुळे माझ्या संघावर परिणाम होतात. तो एक उत्कृष्ट फलंदाज आहे यात शंका नाही पण त्याच्याऐवजी दुसरा सलामीला खेळाडू शोधले गेले पाहिजे किंवा काही सामन्यात रिषभ पंत, सूर्य किंवा विराट अश्या फ्लेक्सिबल ऑर्डरने प्रतिस्पर्धी पाहून योजना बनवली पाहिजे. एकाच संघात तीन चार यष्टिरक्षक ही गुंत्याची बाब. जिथं सलामीचे बॅटर व्यवस्थित काम न केल्याने धावा बनवण्याची जवाबदारी मिडल ऑर्डर वर येत असते. विराटने केलेले 71 शतक त्याच्या डोक्यावरचा भार उरतरवणारे ठरणार आहे तसेच त्याचा क्लास पाहता, कामगिरी पाहता त्याच्याबद्दल शंका उपस्थित करणारा वेडाच ठरवला जाईल. 
सुर्यकुमार नावाचा सूर्य नुकताच उगवला आहे ते त्याच्या आयपीएल आणि काही आंतरराष्ट्रीय सामन्यात केलेल्या कामगिरीमुळे, मुळात क्रिकेटमध्ये जगावेगळे फटके मारणारा हा खेळाडू 360 डिग्री खेळतो म्हणून प्रसिद्ध आहे पण ह्या संघाची सर्वात कमकुवत बाब म्हणजे मधली फळी अस माझं मत आहे सुर्याचा खेळ परिस्थिती पाहून असतो मान्य पण त्याच्यानंतर येणारे पंत, हार्दिक, दिनेश, हुड्डा याच्यावर रोहित, राहुल, विराट लवकर बाद झाल्यावर किती विश्वास ठेवावा हे विचार करणारे आहे.
स्पिन/ फिरकी मध्ये कालपर्यंत रवींद्र जडेजा नाव फिक्स होते पण गुडघा दुःखीमुळे तो संघात असणार नाही त्याच्याबदली अक्सर पटेल त्याच्यासारखाच डावखुरा गोलंदाज आणि वेळप्रसंगी फलंदाजी करणारा खेळाडू आहे. जडेजाचे क्षेत्ररक्षण जरी भारतीय संघ मिस करणार असेल तरी अक्सर हाच त्यांचा बदली खेळाडू असेल असा अंदाज आहे. रिस्ट स्पिन आजची गरज शिवाय युझुवेंद्र चहलची कामगिरी त्याचे संघात स्थान बळकट करते. रवीचंद्रन अश्विन, बिष्णोई किंवा कुलदीप वगैरे याचा विचार होईल असं सध्या तरी वाटत नाही
फास्ट बॉलिंग मध्ये जसप्रीत, भुवनेश्वर, अर्शदीप आणि हर्षल पटेल संघातील जागेला योग्य न्याय देतील असे वाटते पण मोहम्मद शमी सारखा गोलंदाज बाहेर ठेवणे कस योग्य हे समजत नाही. त्याचा विचार छोट्या फॉरमॅट मध्ये का करणार नाही हे सांगितले गेले नाही पण असाच रोष सध्या संघात असलेल्या अनेक खेळाडूंवर लावण्याचे धाडस निवड समिती दाखवू शकेल का?

इशान किशन, उस्मान मलिक, आवेश खान, रवीचंद्रन अश्विन, दिनेश कार्तिक, कुलदीप ह्याची निवड होऊ नये अन्यथा स्पर्धा जिंकण्याच्या मोहिमेला स्वतःच सुरुंग लावला जाईल कारण त्याच्याकडे स्किल असले तरी त्याची गॅरंटी नाही किंवा काही खेळाडूंचे वय किंवा त्याच्यापेक्षा चांगला पर्याय यामुळे संघात त्याची जागा बनत नाही.

डावखुरा फलंदाज किंवा गोलंदाज याची आबाळ हा विषय महत्वाचा आहे. गोलंदाज तरी आहेत पण फलंदाज शोधून सवडणार नाही. मध्यंतरी खेळलेला खलील, नटराजन,चेतन सकारिया असे काही पर्याय नक्कीच आहेत पण त्यांना संधी मिळेल असे वाटत नाही. वॉशिंग्टन सुंदर हा एक पर्याय चांगला होता पण दुर्दैवाने तो खेळण्यास फिट नाही याशिवाय अनेक असे खेळाडू आहेत ज्यांनी देशांतर्गत आणि आयपीएल मध्ये खूप चांगली कामगिरी करत असले तरी त्याची संघात निवड होत नाही. अश्याया खेळाडूंच्या व्यथा मांडत बसलो तर हा लेख संपायचा नाही. एकंदरीत मागील काही सामने, आशिया कप मधील निवड आणि मीडियात फिरत असलेल्या बातम्या पाहता हाच संघ निवडला जाईल अस वाटत जो विश्वचषक जिंकू शकतो याची शक्यता 70% मानता येईल म्हणजेच अजूनही 30% योग्य बदल होण्याची शक्यता आहे. मीडियात येणाऱ्या बातम्या आणि एकंदरीत कर्णधार, कोच आणि निवड समिती याची विचार करण्याची पद्धत पाहता एखादा अनपेक्षित बदल पहायला मिळेल अस वाटत पण प्रतिस्पर्ध्याला चकित करणारा फॅक्टर ह्या संघात नाही अस वाटतय. 

लेख संपवत असताना महत्वाची ही बाब जी तुमच्यापैकी कैक लोक मान्य कराल की हा T20 कप जिंकू किंवा हरू माझ्यामते रोहित, विराट, भुवनेश्वर, रवीचंद्रन अश्विन, दिनेश कार्तिक सारखे खेळाडू नवीन खेळाडूंना संधी किंवा भविष्यात खेळण्याची न मिळणारी संधी यामुळे ह्या छोट्या फॉरमॅट मधून निवृत्ती जाहीर करतील.

असो. लेख आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्या प्रतिक्रियाची अपेक्षा असेच लेख वाचण्यासाठी follow करा

ट्विटर @pincode410501
ब्लॉगर पोस्ट diarynotes137.blogpost.com
डेलीहंट @cm_newsinformation

शनिवार, १० सप्टेंबर, २०२२

विराट कोहली

हा फोटो आणि त्यातील रेकॉर्डस् ची तुलना केल्यास @sachin_rt वर @imVkohli वरचढ ठरलाय हे समजत पण खरा संघर्ष आता सुरू होणार आहे. रेकॉर्डस् बनवणे आणि आपलं नाव अजरामर होण्यासाठीच तेंडल्या खेळायचा त्यामुळे खेळण्यामागे एक उद्दिष्ट होते, ध्येय होते आणि आता त्याच्या रेकॉर्डस् ला तोडणे हे एकमेव ध्येय घेऊन क्रिकेट खेळला तर क्रिकेटच्या फलंदाजीच्या विक्रमांचा अनभिषिक्त राजा बनण्यापासून तुला कोणीही रोखणार नाही. गेली दोन अडीच वर्षे पाहिली तर सचिनच्या विक्रमांचा पाठलाग करून त्यांना मागे सोडणे अवघड वाटतय. सचिन जितकी वर्ष खेळला तितकी वर्ष तू खेळणार नाहीस हे आम्ही जाणतो. सचिन तोपर्यत निवृत्त झाला नाही जोपर्यत त्याचा जवळ असलेला स्पर्धक निवृत्त झाला नाही. ज्यावेळी त्याला समजलं की आता कोणीच त्याला पार करू शकणार नाही त्यावेळी विश्वचषक असेल किंवा 100 शतक अशी छोटी छोटी ध्येय घेऊन तो खेळतच राहिला अस विराट तू करशील अस वाटत नाही पण ज्या पद्धतीने तू खेळल आहे, धावा जमवल्या आहे ते पाहता विक्रमाचे प्रत्येक अडथळे पादाक्रांत करून विक्रम म्हणजे विराट कोहली अस जगाला म्हणायला तू लावशील हे नक्की. नवनवीन येणारे खेळाडू, भारतीय क्रिकेट संस्थेने पाठीवरचा उचललेला हाथ यामुळे पुढचा प्रत्येक दिवस, प्रत्येक सामना सोपा असणार नाही त्यामुळे मनात असलेली मरगळ झटक आणि संकल्प कर की प्रत्येक विक्रमावर फक्त तुझे आणि तुझेच नाव असणार आहे. ज्या पद्धतीने छोटा फॉरमॅट प्रसिद्ध होतोय ते पाहता कसोटी किंवा एकदिवसीय सामने आणि त्यात जम बसवणारे खेळाडू सचिन विराट व अन्य खेळाडूंसारखे कारकीर्द लांबवणारे खेळाडू, कदाचीत हे फॉरमॅट भविष्यात खेळवले जातील याबाबत व्यक्तिशः मी शाशंक आहे. विक्रमाचे इमाल्यांवर इमले चढवण्यासाठी कारकीर्द मोठी असली पाहिजे आणि इतकी मोठी कारकीर्द लांबवणारे खेळाडू पुढं पाहायला भेटतील अस वाटत नाही. सुनील गावस्कर नंतर सचिन तेंडुलकरकडे लोकांनी पाहिले तेंडुलकर नंतर विराट तुझ्याकडे ती प्रतिभा आहे आणि लोकांना ती दिसली देखील. तुझ्याव्यतिरिक्त सध्या स्टीव्हन स्मिथ, केन विल्यम्सन कसोटीत तुझा पाठलाग करत आहे तर जो रूटला तू पाठलाग करतोय. एकदिवसीय प्रकारात तुझाच संघ सहकारी रोहित शर्मा सोडला तर कोणी दुसरं आसपास देखील नाही. छोट्या फॉरमॅट मध्ये गुप्तील, रोहित आणि तुझ्यात चढाओढ दिसते आहे जी येत्या विश्वचषक स्पर्धेनंतर संपुष्टात येईल असा अंदाज आहे कारण येणाऱ्या नवीन खेळाडूंना संधी, कारकीर्द लांबवण्यासाठी किंवा फॉर्म ह्या गोष्टी लक्षात घेतल्या तर बरेच खेळाडू छोट्या फॉरमॅट मधून निवृत्त होताना पुढच्या वर्षी पहायला मिळेल ज्यात स्वतः विराट तू, रोहित यांची त्यात नाव;असतील आणि नसली तरी तसा दबाव क्रिकेट मंडळ, मीडिया टाकून निवृत्ती जाहीर करायला लावणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष. याचा अर्थ तुझ्यावर कोणाचा रोष आहे, तुला खेळुच दयायचे नाही असा निश्चितच नाही पण सनातनी हिंदू धर्मात कर्माला महत्वाचे स्थान, त्याच कर्माचे पडसाद तुला मिळत असतील का? तुझा गर्विष्ठ, मुजोर, हट्टी वृत्ती जगाने पहिली आहे. अनिल कुंबळे प्रकरण असेल किंवा नुकतेच कर्णधार पदावरून केलेली उचलबांगडी, इतकेच काय काल परवा केलेल्या शतकानंतर ज्या पद्धतीने तू तोंडाची फटकेबाझी केली ती पाहता अजूनही तुला नम्र होता आले नाही आहे किंवा जे घडतंय ते मान्यच करायचे नाही अश्या अविर्भावात तू जगतोय.सगळ्या गोष्टी ज्यावेळी तुझ्या अवतीभोवती पिंगा घालत होत्या आणि आज रुसून दूर गेल्यात ते पाहता कर्माने आपले काम चोख बजावले आहे आणि अश्यावेळी शांत, संयमी, ठाम निश्चय करणारा विराट कोहली हा विराट कोहलीला वाचवू शकतो? वय 33 वर्ष आणि ज्या पद्धतीचा शारीरिक क्षमता आहे ते पाहता 40 पर्यत खेळत राहणे तुला अवघड नाही त्यासाठी आजूबाजूला होणाऱ्या बदलांची जाणीव करून घेणे आणि स्वतःला त्या बदलात घडवून घेणे तुला क्रिकेट विश्वाचा अनभिज्ञ किंग बनण्यापासून थांबवू शकत नाही. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा तर आजपर्यत केलेल्या कामगिरीसाठी अभिनंदन

सी ए टॉपर

स्वभावाला औषध नाही कारण प्रत्येक व्यक्तीच्या एक स्वभाव असतो.स्वभाव म्हणजे त्याची वागण्याची, बोलण्याची किंवा निर्णय घेण्याची प्रक्रिया. प्रत्...