रविवार, ११ सप्टेंबर, २०२२

जर मी भारतीय संघाचा सिलेक्टर असतो तर

शीर्षक बघून गडबडला तर नाही ना? नाही निबंध लिहत नाही मी पण येणारा T20 विश्वचषक भारताने जिंकावा म्हणून माझी स्वतःच्या आवडी निवडी वर कोण कोण भारतीय संघात असावे हे मांडणार आहे. तस पहायला गेले तर वय जरी झाले नसले, अजून बरच क्रिकेट खेळू शकत असले तरी काही खेळाडू ह्या छोट्या फॉरमॅट मधून निवृत्ती जाहीर करू शकतात आणि त्या खेळाडूंना कारकीर्द विजयी चषकाबरोबर होवो ही जशी क्रिकेटप्रेमी जनतेची इच्छा असणार तस ती त्या खेळाडूंची असणार यात शंका नाही. भारतीय संघाचा गणवेश किंवा जर्सी यावर जे तीन स्टार आहेत त्यात दोन स्टार येत्या दोन वर्षात वाढावे अस प्रत्येक भारतीय माणसाला वाटत असेल. सध्या त्यावर कपिल देव यांनी १९८२ मध्ये जिंकलेला ६० षटकांचा, महेंद्रसिंग धोनी याने २००७ चा T20 आणि २०११ मध्ये ५० षटकांचा एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा जिंकल्याचे स्वरूप एक एक स्टार. रुपात पहायला मिळते. 

नुकतीच आशिया कप स्पर्धेतून भारताला बाहेर पडला, सामना म्हंटल की दोन संघातील एकाचे जिंकणं किंवा हारणे ठरलेले पण गुणवत्तेच्या बाबतीत वरचढ असलेला भारत स्पर्धेतून बाहेर जाणे ना क्रिकेट रसिक याना पचनी पडत आहे ना आयसीसीला ना स्पर्धेचे पुरस्कर्ते पण असे पराभव गरजेचे असतात ज्यामुळे पाय जमिनीवर येतात. 
भारतीय संघ बराच समतोल आहे आणि निवडकर्ते कोणाला निवडणार आणि कोणाला नाही हे जवळपास ठरलेले आहे. एकापेक्षा एक उत्कृष्ट खेळाडू भारतात असताना निवड समितीचा निवड करण्यासाठी कस लागणे अपेक्षित होते पण निवड समिती तस करेलच असे नाही कारण सुरक्षित, सोप्पा पर्याय निवडून स्पर्धा जिंकणारा संघ कसा निवडला याचे कौतुक त्यांना करून घ्यायचे आहे, आडवळणाला जाऊन धक्कादायक निर्णय घेण्याची ही वेळ नाहीच मुळी. त्यामुळे अपेक्षित संघ खालील प्रमाणे असणार यात शंकाच नसावी.

रोहित शर्मा (कर्णधार)
केएल राहुल (उपकर्णधार)
विराट कोहली
सुर्यकुमार यादव
रिषभ पंत (यष्टिरक्षक)
दिनेश कार्तिक
हार्दिक पंड्या
अक्सर पटेल
युझुवेंद्र चहल
भुवनेश्वर कुमार
जसप्रीत बुमराह
हर्षल पटेल
दीपक हुड्डा
दीपक चहर
अर्शदीप सिंग

जर असाच संघ निवडला गेला तर खरच निवड समितीची गरज आहे का? निवड समिती त्याच्या कामाला न्याय देते का असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. कधी कधी कोणता माणूस कसा वागेल हे अंदाज व्यक्त करण्यासारखे सोप्प काम असत आणि मला खात्री नाही तर गॅरंटी आहे की एक किंवा जास्तीत जास्त दोन बदल सोडले तर संघ असाच असेल पण ही संघनिवड भारताला विश्वचषक जिंकून देईल का? माझंच मत विचाराल तर नाही. खेळाडूंच्या नावाचे आणि कामाचे वलय जर त्याची निवड संघात करत असेल तर कामगिरी हवी तशी होईल असे नाही. संघ तसा तगडा आहे, अनुभवी आहे पण तरीही तो जिंकणार नाही अस वाटण्याचे कारण म्हणजे इतर संघाना ह्या संघविरुद्ध कस लढायचं आहे हे स्पष्ट माहीत आहे. उदारणार्थ पहिली गोलंदाजी घेऊन डावखुऱ्या गोलंदाजाच्या हातात बॉल देऊन दणादण आत येणारे स्विंग बॉल टाकून वरची फळी उधळून लावायची नंतर येणारे लुटुपुटूची लढाई लढणार आणि कसे बसे धावसंख्या वाढवत 150 पर्यत नेणार. असो. 2007 च्या पहिल्या वर्ल्डकंप स्पर्धेत सगळे खेळाडू नवखे होते, फॉरमॅट नवीन होता त्यामुळे एक तर प्रतिस्पर्धी गाफील होता किंवा त्यांना खेळाडूंचा खेळ माहीत नव्हता म्हणूच कामगिरी, नियोजन याच्या बळावर भारत ती स्पर्धा जिंकली होती जी ह्या संघात पहायला मिळत नाही

संघ निवड करताना अनेक खेळाडू उत्तम असतानाही त्यांना संघातून डाववल जाईल, शेवटी संघात 11 खेळाडू खेळू शकतात. सोप्पा पेपर आलेला कोणाला आवडत नाही पण काही पर्याय आहेत त्याचा विचार झाला पाहिजे. 

संजू सॅम्पसन सारखा खेळाडू कोणत्याही संघासाठी एक एक्स फॅक्टर ठरू शकतो ज्याला भारतीय संघ नीट वापरतच नाही. दिनेश कार्तिक मध्ये रोहितला काय दिसले देव जाणे पण तो स्पर्धेत यशस्वी होईल असं माझं मत नसल्याने त्याला पर्याय म्हणून संजू उत्तम पर्याय आहे. केएल राहुल याला सलामीला खेळवण्यापेक्षा मिडल ऑर्डर मध्ये टाकले पाहिजे किंवा त्याला खेळवलेच गेले नाही पाहिजे कारण त्यांच्यामुळे माझ्या संघावर परिणाम होतात. तो एक उत्कृष्ट फलंदाज आहे यात शंका नाही पण त्याच्याऐवजी दुसरा सलामीला खेळाडू शोधले गेले पाहिजे किंवा काही सामन्यात रिषभ पंत, सूर्य किंवा विराट अश्या फ्लेक्सिबल ऑर्डरने प्रतिस्पर्धी पाहून योजना बनवली पाहिजे. एकाच संघात तीन चार यष्टिरक्षक ही गुंत्याची बाब. जिथं सलामीचे बॅटर व्यवस्थित काम न केल्याने धावा बनवण्याची जवाबदारी मिडल ऑर्डर वर येत असते. विराटने केलेले 71 शतक त्याच्या डोक्यावरचा भार उरतरवणारे ठरणार आहे तसेच त्याचा क्लास पाहता, कामगिरी पाहता त्याच्याबद्दल शंका उपस्थित करणारा वेडाच ठरवला जाईल. 
सुर्यकुमार नावाचा सूर्य नुकताच उगवला आहे ते त्याच्या आयपीएल आणि काही आंतरराष्ट्रीय सामन्यात केलेल्या कामगिरीमुळे, मुळात क्रिकेटमध्ये जगावेगळे फटके मारणारा हा खेळाडू 360 डिग्री खेळतो म्हणून प्रसिद्ध आहे पण ह्या संघाची सर्वात कमकुवत बाब म्हणजे मधली फळी अस माझं मत आहे सुर्याचा खेळ परिस्थिती पाहून असतो मान्य पण त्याच्यानंतर येणारे पंत, हार्दिक, दिनेश, हुड्डा याच्यावर रोहित, राहुल, विराट लवकर बाद झाल्यावर किती विश्वास ठेवावा हे विचार करणारे आहे.
स्पिन/ फिरकी मध्ये कालपर्यंत रवींद्र जडेजा नाव फिक्स होते पण गुडघा दुःखीमुळे तो संघात असणार नाही त्याच्याबदली अक्सर पटेल त्याच्यासारखाच डावखुरा गोलंदाज आणि वेळप्रसंगी फलंदाजी करणारा खेळाडू आहे. जडेजाचे क्षेत्ररक्षण जरी भारतीय संघ मिस करणार असेल तरी अक्सर हाच त्यांचा बदली खेळाडू असेल असा अंदाज आहे. रिस्ट स्पिन आजची गरज शिवाय युझुवेंद्र चहलची कामगिरी त्याचे संघात स्थान बळकट करते. रवीचंद्रन अश्विन, बिष्णोई किंवा कुलदीप वगैरे याचा विचार होईल असं सध्या तरी वाटत नाही
फास्ट बॉलिंग मध्ये जसप्रीत, भुवनेश्वर, अर्शदीप आणि हर्षल पटेल संघातील जागेला योग्य न्याय देतील असे वाटते पण मोहम्मद शमी सारखा गोलंदाज बाहेर ठेवणे कस योग्य हे समजत नाही. त्याचा विचार छोट्या फॉरमॅट मध्ये का करणार नाही हे सांगितले गेले नाही पण असाच रोष सध्या संघात असलेल्या अनेक खेळाडूंवर लावण्याचे धाडस निवड समिती दाखवू शकेल का?

इशान किशन, उस्मान मलिक, आवेश खान, रवीचंद्रन अश्विन, दिनेश कार्तिक, कुलदीप ह्याची निवड होऊ नये अन्यथा स्पर्धा जिंकण्याच्या मोहिमेला स्वतःच सुरुंग लावला जाईल कारण त्याच्याकडे स्किल असले तरी त्याची गॅरंटी नाही किंवा काही खेळाडूंचे वय किंवा त्याच्यापेक्षा चांगला पर्याय यामुळे संघात त्याची जागा बनत नाही.

डावखुरा फलंदाज किंवा गोलंदाज याची आबाळ हा विषय महत्वाचा आहे. गोलंदाज तरी आहेत पण फलंदाज शोधून सवडणार नाही. मध्यंतरी खेळलेला खलील, नटराजन,चेतन सकारिया असे काही पर्याय नक्कीच आहेत पण त्यांना संधी मिळेल असे वाटत नाही. वॉशिंग्टन सुंदर हा एक पर्याय चांगला होता पण दुर्दैवाने तो खेळण्यास फिट नाही याशिवाय अनेक असे खेळाडू आहेत ज्यांनी देशांतर्गत आणि आयपीएल मध्ये खूप चांगली कामगिरी करत असले तरी त्याची संघात निवड होत नाही. अश्याया खेळाडूंच्या व्यथा मांडत बसलो तर हा लेख संपायचा नाही. एकंदरीत मागील काही सामने, आशिया कप मधील निवड आणि मीडियात फिरत असलेल्या बातम्या पाहता हाच संघ निवडला जाईल अस वाटत जो विश्वचषक जिंकू शकतो याची शक्यता 70% मानता येईल म्हणजेच अजूनही 30% योग्य बदल होण्याची शक्यता आहे. मीडियात येणाऱ्या बातम्या आणि एकंदरीत कर्णधार, कोच आणि निवड समिती याची विचार करण्याची पद्धत पाहता एखादा अनपेक्षित बदल पहायला मिळेल अस वाटत पण प्रतिस्पर्ध्याला चकित करणारा फॅक्टर ह्या संघात नाही अस वाटतय. 

लेख संपवत असताना महत्वाची ही बाब जी तुमच्यापैकी कैक लोक मान्य कराल की हा T20 कप जिंकू किंवा हरू माझ्यामते रोहित, विराट, भुवनेश्वर, रवीचंद्रन अश्विन, दिनेश कार्तिक सारखे खेळाडू नवीन खेळाडूंना संधी किंवा भविष्यात खेळण्याची न मिळणारी संधी यामुळे ह्या छोट्या फॉरमॅट मधून निवृत्ती जाहीर करतील.

असो. लेख आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्या प्रतिक्रियाची अपेक्षा असेच लेख वाचण्यासाठी follow करा

ट्विटर @pincode410501
ब्लॉगर पोस्ट diarynotes137.blogpost.com
डेलीहंट @cm_newsinformation

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सी ए टॉपर

स्वभावाला औषध नाही कारण प्रत्येक व्यक्तीच्या एक स्वभाव असतो.स्वभाव म्हणजे त्याची वागण्याची, बोलण्याची किंवा निर्णय घेण्याची प्रक्रिया. प्रत्...