मित्रानो नमस्कार,
आज तुमच्या पुढे शेयर मार्केटबद्दल बोलणार आहे. शेयर मार्केट मध्ये गुंतवणूक करणाऱ्याची संख्या कमी असली तरी बहुतांश लोक गुंतवणुकीसाठी पुढे येत आहेत हे नाकारता येणार नाही.सरळ साधेपणाने सामान्य गुंतवणूकदार शिल्लक असलेला पैसा चांगल्या स्टॉक मध्ये गुंतवणूक करून त्याच्या परतव्याच्या हिशोबाने काढून घेणे ही सगळ्यात सोपी आणि जुनी पद्धत.
ज्यांना परतावा अधिक पाहिजे आणि ज्यांच्याकडे शिल्लक पैसे कमी प्रमाणात आहेत ते जोखीम घेऊन intraday म्हणजेच घेतलेले शेयर एका दिवसार1त खरेदी करून विक्री किंवा विक्री करून खरेदी करून त्यात पैसे कमावत असतात. शक्यतो बऱ्याच लोकांना ह्या दोन गोष्टीची सर्वसाधारण माहिती असतेच आणि नसेल तर ती करणे अवघड नाही पण गुंतवणूक आणि इन्ट्राडे ट्रेड प्रकारचा पुढचा प्रकार म्हणजे ऑपशन आणि फ्युचर्स (Option & Futures) जो समजण्यास आधी सांगितलेल्या गुंतवणूक किंवा इन्ट्राडे ट्रेडपेक्षा अवघड, किचकट असतो त्याबद्दल मला तुम्हाला सहज सोप्प्या भाषेत माहिती देण्याचा प्रयत्न म्हणजे आजचा हा लेख.
What is Future and Option? इतकं जरी गूगलवर टाकलं की उत्तर येते
Futures and Options are “derivative products” in the stock market since they derive their values from an underlying asset, like shares or commodities, they are called derivatives. Two parties enter a derivative contract where they agree to buy or sell the underlying asset at an agreed price on a fixed date.
पण अश्या पुस्तकी व्याख्या वाचल्यानंतर त्या समजतात अस नाही म्हणूनच की काय आपल्याला समजेल त्या भाषेत त्याचे रूपांतर केल्याशिवाय आपल्याला हा भाग समजणे अवघड जाऊ शकते. उदारणार्थ निफ्टी५० मध्ये वेगवेगळ्या सेक्टर मधील ५० स्टॉक यांचा समावेश असतो. जर निफ्टी५० ला किंमत वाढवायची असेल तर त्यासाठी त्या निफ्टी च्या ५० स्टॉकची किंमत वाढली पाहिजे म्हणजेच काय तर निफ्टी५० हा Derivative आहे आणि त्यातील स्टॉक हे Underline Asset. निफ्टी50 च्या Derivative मध्ये निश्चित वेळेसाठी केलेली गुंतवणूक म्हणजे फ्युचर्स आणि ऑपशन. वेगेवगळ्या Commodities, Stock, Currency, index याचीच उदाहरणे आहेत.
समजलं का? लेख आवडला तर follow करा हवं तर शेयर करा म्हणजे ही माहिती अनेक लोकांपर्यत पोहचवू शकू. करणार ना?
फ्युचर्स आणि ऑपशन यामध्ये गुंतवणुकदारांची जोखीम जास्त असते म्हणूनच की काय कोणत्याही Derivative ला ह्या प्रकारात ट्रेड होण्यासाठी काही पात्रता पूर्ण कराव्या लागतात त्याशिवाय त्यांना FnO मध्ये दाखल होता येत नाही म्हणूनच सगळेच स्टॉक यात असतातच असे नाही.
Derivatives चे मूळ चार प्रकार असतात ज्यातील फक्त Future आणि Option या दोन प्रकारात ट्रेंडिंग केली जाते उरलेल्या Forward आणि Swap या दोन प्रकारात ट्रेंडिग केली जात नाही. Future, option यामध्ये जोखीम असतेच पण forward आणि swap यापेक्षा कमी म्हणूनच गुंतवणूकदारांचे हित सांभाळण्यासाठी, जास्त नुकसान होऊ नये, फसवणूक होऊ नये म्हणून Forward आणि swap यामध्ये ट्रेंडिंग होत नाही. याचा अर्थ Futures आणि option यामध्ये जोखीम नसते असा काढू नका,यामध्येही कमालीची जोखीम असतेच.
Future and Option यामध्ये ट्रेंडिंग करण्याचे कमालीचे साम्य असले तरी या दोघांतील फरक खालील व्याख्या समजून घेतल्यास तुम्हाला सोपे वाटेल
An option gives the buyer the right, but not the obligation, to buy (or sell) an asset at a specific price at any time during the life of the contract. A futures contract obligates the buyer to purchase a specific asset, and the seller to sell and deliver that asset, at a specific future date.
शब्दशः भाषांतर केल्यास आपल्याला समजेल की ऑपशन खरेदीदाराला कराराच्या कालावधीत कोणत्याही वेळी विशिष्ट किंमतीवर मालमत्ता खरेदी (किंवा विक्री) करण्याचा अधिकार देतो, परंतु बंधन नाही. फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट खरेदीदाराला विशिष्ट मालमत्ता खरेदी करण्यास आणि विक्रेत्याला भविष्यातील विशिष्ट तारखेला ती मालमत्ता विकण्यास आणि वितरित करण्यास बाध्य करते.
बंधनकारक असणे आणि नसणे हा एकमात्र फरक सोडला तर Future असो की Option ट्रेंडिंग यात फरक नाही पण हा फरक खूप लक्षात घेणे गरजेचे
आता आपण Option या ट्रेंडिंग प्रकारची अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करू
Option treding म्हणजे नक्की काय? हे वरील व्याख्येवरून आपल्याला लक्षात आले असेलच.
Option treding चे दोन प्रकार 1. Call Option 2. Put option बर ह्या प्रत्येक प्रकारचे परत दोन पार्टी / गट पडतात
Call option चे Call Buyer आणि Call Seller तसेच
Put option चे Put Buyer आणि Put Seller असे पार्टी / गट असतो.
खरेदी करणार म्हणजे विक्रेता असणार आणि विक्रेता असणार म्हणजे खरेदीदार असणार म्हणूनच कॉल असो की पुट त्यामध्ये दोन गट/ पार्टी असतातच अन्यथा व्यवहार पूर्ण कसा होणार?
आजच्या लेखात आपण ह्या प्रत्येक प्रकारची माहिती घेणार आहोत आणि जर तुम्ही सगळ्यांनी ह्या लेखाला अमाप प्रसिद्धी दिली तर Future's बद्दलची माहिती तुमच्यापुढे मांडण्याचा मी प्रयत्न करेल. हे सगळं लिहण्यासाठी, माहिती गोळा करण्यासाठी, चुकीची माहिती तुम्हाला न देण्यासाठी बरीच मेहनत लागते आणि ह्या मेहनतीसाठी तुमचे एक लाईक,रिट्विट, follow याची अपेक्षा करणे चुकीचे नाही ना? तुमची आवड निवड आणि माझी मुद्दे मांडण्याची,विषय घेण्याची पद्धत योग्य की अयोग्य तेही मला तुमच्या प्रतिक्रिया वाचून समजत राहील त्यामुळे कृपया आपल्या साथीची गरज आहे. असो मूळ विषयाकडे परत येऊ.
★ कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन म्हणजे काय? दोन्हीमध्ये काय फरक आहे?
कॉल ऑप्शन धारकाला स्टॉक विकत घेण्याचा अधिकार देतो, हा भविष्यातील तारखेला निश्चित किंमतीवर परंतु आज ठरलेल्या किंमतीवर अंतर्निहित मालमत्ता किंवा करार खरेदी करण्याचा अधिकार आहे. दुसरीकडे, पुट ऑप्शन धारकाला स्टॉक विकण्याचा अधिकार देतो, हा भविष्यातील तारखेला निश्चित किंमतीला परंतु आज ठरलेल्या किंमतीवर अंतर्निहित मालमत्ता किंवा करार विकण्याचा अधिकार आहे.
थोडस किचकट वाटत असले तरी वरील उतारा शांतपणे एक दोन वेळा वाचला तरी कॉल आणि पुट यातील फरक तुमच्या लक्षात येईल याची मला खात्री आहे.
ऑपशनचा पहिला प्रकार म्हणजे कॉल (Call) उदाहरणातून शिकण्याचा प्रयत्न करू
समजा तुम्हाला एखादा गाळा विकत घ्यायचा आहे. गावात शहरात एखाद्या रिकाम्या जागी व्यावसायिक संकुल उभारणार असल्याची बातमी तुम्हाला आहे अश्या वेळी तुम्ही तिथं जाता आणि गाळ्याची किंमत 25 लाख रुपय असल्याचे तुम्हाला समजते आणि तो किमान 2 वर्षात तयार होऊन तुमच्या हातात येणार आहे. करार मान्य असेल तर बुकिंग करण्याची किंमत 50 हजार रुपये असेल पण ही किंमत भरल्यावर परत मिळणार नाही अशी बोली असते. तुम्ही 50 हजार रुपय देऊन तो गाळा बुक करता अचानक काही दिवसांनी ह्या व्यापारी संकुलाची बातमी खूप प्रसिद्ध होऊन गाळ्याची किंमत 35 लाख होते. कराराची मुदत संपल्यानंतर हातात मिळणारा गाळा याची किंमत गुंतवलेल्या रक्कमेच्या कैक पटीने जास्त असते शिवाय गाळ्यांना मागणी जास्त असल्याने तो विकून अजून नफा कमावला जाऊ शकतो
हे साधे उदाहरण म्हणजे दुसरे तिसरे काही नाही कॉल ऑपशन आहे.
● बुकिंग केलेली किंमत म्हणजे Premium
● गाळ्याची किंमत म्हणजे Strike Price
● गाळा मिळण्याची मुदत 2 वर्ष म्हणजे Expiry Date
● गाळ्याची भविष्यातील किंमत म्हणजे Spot price
वर उल्लेख केलेले उदाहरण आणि वस्तुतः शेयर मार्केट मध्ये होणारे ऑपशन ट्रेंडिंग यामध्ये फरक असला तरी मुद्दा समजण्यासाठी हे उदाहरण आहे हे लक्षात ठेवा
कॉल बायर (Call buyer ) मध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे
° स्टॉक मार्केटमध्ये भविष्यात होणारी वाढ हा अभिप्रेत असते म्हणजेच Call buyer प्रकारचा ट्रेड घेण्यासाठी बाजार Bullish असावा लागतो
ज्यामुळे छोटासा प्रीमियम देऊन आपण एखादा Derivatives चा लॉट खरेदी करून Underline Asset ने वेगाने प्रगती करावी अशी इच्छा गुंतवणूकदार करत असतो. कॉल बायरमध्ये
नुकसान मर्यादित पण नफा अगणित असू शकतो.
कॉल सेलर (Call seller) मध्ये
° स्टॉक मार्केटमध्ये भविष्यात होणारी पडझड अपेक्षित असते म्हणजेच कॉल सेलर प्रकारात बाजार Bearish किंवा sideways असावा अशी अपेक्षा केली जाते. कॉल सेलरमध्ये स्टोकची किंमत घसरावी अशी अपेक्षा केली जाते ज्यात
फायदा मर्यादित पण नुकसान अमर्याद असते
समजा तुमच्याकडे चार चाकी गाडी आहे आणि अपघाताच्या भीतीने किंवा सरकारी नियम म्हणून तुम्ही जो गाडीचा इन्शुरन्स करता त्यातून पुट ऑपशन ही संकल्पना आपण समजून घेऊ शकतो
गाडीचा अपघात झाल्यास इन्शुरन्स चे 5 लाख रुपय मुदत 1 वर्ष पर्यत मिळणार आणि त्याचा प्रीमियम 15 हजार रुपय असेल असा करार गाडी मालक खरेदी करतो. अपघात विमा घेतल्यावर काही दिवसात किंवा मुदत संपेपर्यत कधीही गाडीचा अपघात झाला तुमच्या गाडीची अवस्था किंवा तिचे भंगाराची किंमत रुपय 50 हजार रुपय इतकेच होत असेल तर प्रीमियम घेतल्याची किंमत 15 हजार रुपय लक्षात घेता गाडीची अपघातांनंतरची किंमत अधिक इन्शुरन्स प्रीमियम याची वजावट करून तुम्हाला इन्शुरन्स कंपनीकडून जी किंमत 4लाख 35 हजार रुपय तुमचा नुकसानीमध्ये ही फायदा होऊ शकतो आणि हेच भविष्यातील अपघाताचा अंदाज बांधून त्यातून नफा मिळवण्याच्या पद्धत म्हणजे पुट ऑपशन अस म्हणतात.
● घेतलेला इन्शुरन्स म्हणजे premium
● अपघात झाल्यावर मिळणारी रक्कम म्हणजे strike price
● इन्शुरन्स मुदत म्हणजे Expiry Date
● गाडीची भविष्यातील किंमत म्हणजे Spot price
वरील उदाहरण ढोबळमानाने पुट ऑपशन कसा चालतो हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे
पुट बायर हा प्रकार कॉल बायर प्रकराच्या विरुद्ध तर पुट सेलर हा कॉल सेलर च्या विरुद्ध काम करते.
म्हणजेच पुट बायर स्टॉक मार्केट पडझडीच्या/ घसरणीचा काळात ऍक्टिव्ह असतो. स्टॉक मार्केट bearish असेल त्यावेळी पुट बायर तर स्टॉक मार्केट sideways किंवा bullish असेल तर पुट सेलर मार्गाने नफा कमवता येऊ शकतो.
पुट बायर मध्ये नफा अमर्याद तर तोटा मर्यादित असतो
तर पुट सेलर मध्ये नफा मर्यादित आणि तोटा अमर्याद असतो
वर दिलेल्या साध्या उदाहरणातून तुम्हाला ऑपशन ट्रेडिंग प्रकारातील कॉल ऑपशन आणि पुट ऑपशन हा प्रकार समजला असेलच अशी खात्री बाळगणे मूर्खपणाचे असले तरी ऑपशन ट्रेडिंगची एकंदरीत रूपरेषा, स्वरूप तुमच्या लक्षात आले असावे असा अंदाज व्यक्त करून आता थांबतो
बहुतांश लोकांना थोडी रक्कम आणि कमी कालावधीत जास्त नफा कमवायचा असतो आणि हीच लोकांची गरज स्टॉक मार्केट आणि ऑपशन ट्रेंडिंग पूर्ण करत असाल तरी आपण हे विसरता कामा नये नाहीतर करायला गेलो गणपती पण झाला मारोती अस व्हायला वेळ लागणार नाही त्यामुळे लेखातील माहिती केवळ आणि केवळ प्राथमिक शिक्षण आहे, ऑपशन ट्रेंडिंग याची केवळ तोंड ओळख आहे असं समजावं.
ट्रेंडिंगममध्ये खूप अभ्यास, अनुभव घेतल्याशिवाय ट्रेडिंग करायला जाऊ नका
Most Important : Options involve risks and are not suitable for everyone. Options trading can be speculative in nature and carry a substantial risk of loss.
सर्वात महत्त्वाचे : ऑपशनमध्ये जोखीम असते आणि ते प्रत्येकासाठी योग्य नसतात. ऑप्शन्स ट्रेडिंग हे सट्टा स्वरूपाचे असू शकते आणि त्यात नुकसानाचा मोठा धोका असतो
आपल्या प्रतिक्रियांची, प्रेमाची वाट पाहतोय हे विसरू नका.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा