दिनांक: १८ सप्टेंबर २०२२
देशात जर शांतता प्रस्थापित करायची असेल तर देशातील न्युज चॅनेलवर बंदी यायला हवी नाहीच तर निदान जे डिबेट शो आहेत त्यावर बंदी आणली पाहिजे. मीडिया विकाऊ आहे त्यामुळे त्यावर निर्बध / अंकुश आणायचा प्रस्ताव जो केंद्र सरकारने आणण्याचा प्रयत्न केला होता तो योग्य होता पण लोकशाहीचा चौथा खांब, विरोधक आणि समाजातील बुद्धिवंतांनी त्याला विरोध केला होता तो चुकीचा. आतंकवादी हल्ल्यात लाईव्ह प्रक्षेपण करून फुकट, घरबसल्या पाकिस्तानातील मास्टर माईंड याना माहिती कोणी पुरवली होती? नागव्या हिरोईनची फक्त पाठ दाखवून ही अभिनेत्री कोण सारखा बालिश प्रश्न असेल की सूत्रांच्या आधारे पेड न्यूज चालवणे असेल किंवा निपक्ष पद्धतीने वृत्तांकन न करता कोणत्या तरी राजकीय पक्षाच्या दारात बांधून ठेवलेली पत्रकारिता खरच गरजेची आहे का?पुराच्या पाण्यात बुडणाऱ्या माणसाला प्रश्न विचारणारे, न्यायालयीन खटल्यांवर वृत्तांकन करणारे, बलात्कार झाल्यावर विशेष समुदायाचे आरोपी नाव न सांगणारे, बलात्कार झालेल्या स्त्रीची ओळख उघड न करण्याचा न्यायालयीन आदेश न मानणारे, दररोज हिंदू मुस्लिम विषयावर धार्मिक तेढ वाढवणारे, बातम्या देण्याऐवजी मोठं मोठ्याने ओरडणारे, माहितीपर डॉक्टर विशेष कार्यक्रमात सेक्स बद्दल ज्ञान वाटणारे ही मीडिया सेन्सॉरशिप कायद्याखाली आलीच पाहिजे माहिती लोकांपर्यत पोहचवण्यासाठी सरकारी कामे पारदर्शक करणे, प्रत्येक गोष्ट सोशल मीडियात प्रसिद्ध करून देशात न्यूज चॅनेलची गरज संपुष्टात आली आहे हे दाखवणे केंद्र सरकारची जवाबदारी आहे. तस पाहता वलगर, भरकटलेली मीडिया लोकशाहीचा चौथा खांब राहिला नसून सोशल मीडियाने ती जागा घेतली आहे त्यामुळे खोट्या, पुरस्कृत, पक्षपाती बातम्या देणारे हे न्यूज चॅनेल बंदच झाले पाहिजे. काय त्या जुन्या बातम्या असायच्या तो प्रदीप भिडे, सलमा नावाची हिंदीत बातम्या देणारी बाई बातम्या सांगायची वेळ आली की घरात पिन ड्रॉप सायलेन्स झोन तयार व्हायचा. बातम्या धीरगंभीर आवाजात,शांत, स्पष्ट भाषेत ऐकताना बर वाटायचे, आजकाल सारखा बटबटीतपणा नसलेला बातमीला बातमीच्या रुपात सादर करणारे ती लोक, ती विचारसरणी किती छान होती की नाही? दूरदर्शनवरच्या बातम्या अजूनही तशाच असतात पण बातम्यांचा नावाखाली कॉर्पोरेट अजेंडे चालवणारे,त्यातून आर्थिक फायदा मिळणारे आजचे न्यूज चॅनेल उथळ वाटतात ज्या बातम्यांनी समाजात दंगली उसळतील त्या बातम्या लाईव्ह दाखवून घडलेल्या क्ष ठिकाण ची आग संपूर्ण देशात लावणारे हे न्यूज चॅनेल आणि त्यातील पत्रकार म्हणवून घेणाऱ्यांना कोणती बातमी दाखवू नये इतकी अक्कल कशी नाही. बाहेरच्या देशातील मीडिया पहा, तिथले पत्रकार पहा कसे राजकारणी लोकांना योग्य प्रश्न विचारून सळो की पळो करून सोडतात आणि आपल्या देशात हागल मुतल माईकचे दांडके लोकांच्या तोंडात जाईल इतपर्यत ओढाताण करताना बातमीसाठी कुत्र मागे लागल्यासारखे मागे लागतात. चार्ली हेब्दो हल्ल्यात झालेला रक्तपात असेल किंवा अमेरिकेतील ट्वीन टॉवर उधवस्थ झाल्यावर रक्ताचा एक थेंब, जखमी लोक, मेलेल्या माणसाचे मृतदेह तरी ती मीडिया दाखवले अस दिसलं का? त्यांना सेन्सॉरशिप मध्ये राहून बातम्या देता येतात तर आपल्या इथे तस का होऊ नये. पत्रकार स्वतःला असे समजतात की त्यांना काही विशेष अधिकार आहे असं त्याचे एकंदरीत काम चालू असते अश्यावेळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, अब्दुल कलाम यांच्या ज्ञानाचा नाही तर पदाचा मान सन्मान न राखणाऱ्या पत्रकारांना त्या लोकांनी त्याची लायकी कशी दाखवली होती ते फटफजितीचे व्हिडीओ आज ही प्रसिद्ध आहेत की. बिनबुडाच्या बातम्या देणारे मीडिया निर्बध असावे का? यावर मत नक्की द्या कदाचित पोल खूप प्रसिद्ध झाला तर बदल घडला तर घडला भारत देशात.
• • •
x
असो. लेख आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्या प्रतिक्रियाची अपेक्षा असेच लेख वाचण्यासाठी follow करा. चूक भूल असेल तर माफ करा पण प्रतिक्रिया द्यायला विसरू नका
ट्विटर @pincode410501
ब्लॉगर पोस्ट diarynotes137.blogpost.com
डेलीहंट @cm_newsinformation
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा