रविवार, ३० ऑक्टोबर, २०२२

म्हमद्या आणि त्याचा प्रवास भाग 2

बायकोचा मृत्यू, तिच्या व्यवसायात नसलेले ज्ञान त्यामुळे जवळजवळ भविष्यात काय करायचे हा संभ्रम महमद्याच्या मनात होता. बायकोच्या संपत्तीच्या वाट्यामळे म्हमद्या श्रीमंत तर होताच पण त्याची स्तुती करणारा खुशमस्कऱ्यांचा एक कळप म्हमद्या बरोबर होता. महमद्याने स्वतःला ईश्वराचा दूत अस भासवत इतरांच्या धार्मिक भावना दुखावल्या, मूर्तिपूजा वा इतर रितिभाती चुकीच्या अस सतत बोलल्यांने गावातील इतर गटांनी त्याला आपल्या भागातून हुसकावून लावले त्यामुळे स्थलांतरशिवाय दुसरा कोणताच मार्ग महमद्याकडे उरला नव्हता.

महमद्याच्या मागे असलेला खुशमस्करे याचा गट, थोड्याफार प्रमाणात असलेले पैसे यांच्या जोरावर म्हमद्या दुसऱ्या गावात आला तिथे त्याने आपल्या पाठीरख्याना गावात फिरून फिरून महमद्याची कीर्ती, दैवी शक्ती, देवाचा दूत, नवीन पंथ, त्याची माहिती पसरवायला सुरुवात केली. म्हमद्याचे एकंदरीत महती आणि त्याच्या पंथात सामील होणाऱ्या लोकांना पैश्याची मदत यामुळे नवीन गावात त्याला बराच पाठिंबा मिळू लागला. त्याच्या गटात लोकांची संख्या आता बळावू लागली होती पण लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी त्याचा पैसा हव्या त्या प्रमाणात उरला नव्हता अश्यावेळी मिळणारी प्रसिद्धी त्यामुळे काहीही न करता राजेशाही थाटात जगणाऱ्या महमद्याच्या कुरापती डोक्यात एक कल्पना उभी राहू लागली आणि ती कल्पना उभी करण्यासाठी त्याने लोकांच्या निरागसतेचा फायदा घेण्याचे ठरवले.

महमद्याने एक अचाट, अभूतपूर्व अशी पटकथा मनातल्या मनात तयार केली ज्यामुळे एक नवीन पंथाची निर्मिती झाली. ह्या धर्माचा सर्वेसर्वा म्हणून स्वतःला पुढं करत देवाने त्याला अधिकृत प्रमुख म्हणून घोषित केले अशी बतावणी लोकांत पसरवली. दैवी चमत्कार आपल्या बाजूने असून त्याने देव त्याच्याशी कसा संपर्क साधतो, पुढं कस वागायचे हे सांगतो यांची अफवा बाजारात बसवली. धर्माची घडी बसवत असताना त्याने उभ्या केलेल्या ईश्वराची सेवा केल्याने स्वर्ग कसा प्राप्त होतो, स्वर्गातील अकल्पनिय गोष्टी, तेथील सुख, समाधान याचे विस्तीर्ण वर्णन तो करू लागला. मृत्यूनंतर स्वर्गात शरीरसुख, तिथल्या स्वप्नसुंदऱ्या याची इतकी आकर्षक मांडली लोकांत पसरवली की लोक पैश्याचे प्रलोभन नसताना ही महमद्याच्या गटाशी जोडू लागले. जोडलेले लोकांची श्रद्धा आपल्यावर आणि त्याने निर्माण केलेल्या देवावर रहावी म्हणून जीवन जगताना काय करावे, न करावे याचे नियम बनवले. म्हमद्या आणि त्याने निर्माण केलेल्या देवाचा अनादर करणाऱ्याला मृत्यूनंतर कसे आगीमध्ये होरपळून काढले जाते शिवाय स्वर्गातल्या ऐश्वर्य, आनंद यापासून कसे लांब ठेवले जाते याचे चित्रण केल्याने म्हमदद्याच्या मागे आलेला गट अधिक आणि अधिक कट्टरवादी बनू लागला.

आपल्या गावातून हुसकावून लावल्याचे दुःख म्हमद्या कित्येक वर्षे मनात दाबून ठेवून होता. आपल्याशी केलेला दुरव्यवहार तो विसरला नव्हता त्याचा बदला घेण्याचे कित्येक वर्षे मनाशी स्वप्न म्हमद्या बाळगून होता. दुसऱ्या शहरात त्याला मिळालेला पाठिंबा, कट्टरवादी माणसाचा गट याच्या जोरावर आपल्या जन्मस्थानी परतून तिथल्या जनतेशी बदला घ्यायचे अस त्याचे मन त्याला सांगत होते. एक दिवस आपल्या सर्व प्रमुख पाठीरख्याना त्याने एकत्र बोलवले आणि धर्माचा प्रसार आपल्या जन्मस्थानी करण्याचा आदेश देवाने आपल्याला दिला आहे असं खोट लोकांच्या मनात बिंबवले. इतर लोकांच्या चालीरीती, देवाच्या कल्पना चुकीच्या आणि आपण जे सांगतो तेच शेवटचे सत्य अस सांगून धर्माच्या प्रसारासाठी तलवार उचलून रक्तपात करण्याची तयारी ठेवा असा संदेश पाठीरख्यात पसरवला.

लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेत उभा केलेला हा डौलारा सगळीकडे वाढवून केन्द्रस्थानी स्वतःला उभं ठेवून राजेशाही थाट उपभोगण्याची महमद्याची मनीषा आता पूर्ण होणार होती. काही निवडक समर्थकांना घेऊन म्हमद्या आपल्या जन्मगावी परतला आणि ज्या कारणाने त्याला गावातून हुसकावून लावले होते तेच कार्य परत करायला लागला त्यामुळे स्थानिक रहिवासी यांनी त्याला पुन्हा विरोध केला. हा विरोध काही दिवसांनी इतका वाढला की दोन्ही गट हिंसक होऊन एकमेकांवर हल्ले करण्याची भाषा करू लागले. महमद्याच्या लक्षात आले की हीच ती वेळ शेवटचा घाव घालण्याची त्यामुळे त्याने आपल्या सगळ्या कट्टर साथीदारांना गावाच्या वेशीवर एकत्र येण्याची निरोप धाडला आणि स्वतः काही निवडक पाठीराख्यासहित गावाच्या मुख्य धार्मिक ठिकाणी येऊन त्याला करत असलेला विरोध सोडून त्याच्या निर्माण केलेल्या धर्मात समाविष्ट होण्याचे आव्हान केले. साहजिकच त्याला प्रतिसाद विरोधाचा आला त्यामुळे शेवटी महमद्याने आपला शेवटचा डाव खेळण्याचे ठरवले. वेशीवर उभ्या असलेल्या हिंसक, कट्टर साथीदारांना निरोप पोहचवले गेले आणि त्यांनी अचानक गावावर हल्ला केला.

अचानक झालेल्या हिंसक हल्ल्याची साधी पूर्वकल्पना नसणाऱ्या गावकऱ्यांना अनपेक्षित हल्ल्यामुळे पळण्यासाठी जागा अपुरी पडली. तलवारीच्या जोरावर महमद्याने विरोध करणाऱ्या गावकऱ्यांना अक्षरशः कापून काढले. होत असलेला रक्तपात पाहून गावकरी महमद्याला शरण आले आणि महमद्याने तलवारीच्या जोरावर आपल्या अपमानाचा बदला घेतला होता. गावातील प्रमुख धार्मिक स्थळावर स्वतःचा हक्क प्रस्थपित करून त्यातील देव देवता याच्या मुर्त्या नष्ट केल्या गेल्या. सगळीकडे म्हमद्या आपला निर्माण केलेल्या नवीन पंथ पसरवू लावला आणि अश्या पद्धतीने म्हमद्या त्या भागातील अनभिज्ञ हुकूमशहा बनला

क्रमशः

रविवार, २३ ऑक्टोबर, २०२२

म्हमद्या आणि त्याचा प्रवास

फार फार वर्षांपूर्वी एका ओसाड गावात म्हमदयाचा जन्म झाला. हे कुटुंब जंगली जनावरे जसे कळपात राहते तसे कळपात राहत. प्रत्येक कळपाचा कोणी एक प्रमुख असायचा जो कळपातील प्रत्येकाच्या पोटापाण्याची आणि संरक्षणाची जवाबदारी घ्यायचा. तसा म्हमद्या इतर मुलासारखाच असला तरी शांत, कोपरयात बसणारा, मुलांपासून वेगळा बसणारा, एकटक छत पाहत बसणारा, खेळण्यात वेळ घालवण्यापेक्षा डोंगर, दऱ्या गुहेत जाऊन बसणारा वेंधळा, विचित्र, वेडसर मुलगा होता.

ह्याला झोपेत बदबडण्याचा आजार होता तसेच कधी कधी फिटही यायची अश्या ह्या म्हमद्याचे आई बाप त्याच्या वयाच्या पाचव्या सहाव्या वर्षी वारले त्यानंतर त्याचा सांभाळ त्याचा काकाने केले पण सांभाळ करतांना ह्या मंद मुलाची बुद्धी किती याचा अंदाज काकाला आला त्यामुळे त्याचा सांभाळ म्हणजे त्याला खायला प्यायला पाहणे याव्यतिरिक्त त्याने महमद्याकडे लक्ष दिले नाही ज्यामुळे म्हमद्याकडे पुष्कळ वेळ असायचा ज्यात तो काहीच न करता गावात हिंडणे, डोंगर चढणे, एकटक एखाद्या गोष्टीकडे पाहत बसने, मनातल्या मनात गोष्टी तयार करणे आणि त्या गोष्टीत बुडून जाण्याव्यतिरिक तो विशेष असे काहीही करत नव्हता. महमद्याच्या काकांचा ट्रान्सपोर्टचा धंदा होता. ओसाड रानातुन मालाची ने आण करण्यासाठी लागणारी गाढवे पुरवण्याचा शिवाय मालाची संपूर्ण जवाबदारी घेऊन ती सांगेल त्या ठिकाणी पोहचवणे ह्यात काकांचा हातखंडा होता.
काकाने रिकामटेकड्या महमद्याला व्यवसायात गुंतवले ज्यामुळे मालाची ने आण करणे, गाढव सांभाळणे, लोकांवर लक्ष ठेवणे यासाठी फुकटचा, विश्वासाचा माणूस भेटला होता. ओसाड भागात राहत असल्याने जिवंत राहण्यासाठी, अन्न धान्य यासाठी बऱ्याच वेळा वेगवेगळे कळप एकमेकांवर आक्रमण करायचे ज्यात खूप वेळा मोठ्या प्रमाणात रक्तपात होत असे त्यामुळे स्वरक्षणासाठी कळप हत्यारे बाळगत, चालून येणाऱ्या कळपाशी युद्ध करणे हे एक सामान्य गोष्ट होती.

म्हमद्या आता काकाला मदत करत असाल तरी वेंधळा, मंद स्वभावात कोणताही फरक पडलेला नव्हता अश्याया वेळी गावातील एक प्रसिद्ध व्यावसायिक असलेल्या महिलेने मालाची ने आण करण्यासाठी ह्याच महमद्याच्या कंपनीला कॉन्टॅक्ट केला आणि कॉन्ट्रॅक्ट ही दिले. हे काम महमद्याने वेळेत पूर्ण केले त्यामुळे त्या महिलेच्या व्यवसायातील मालाची ने आण करण्यासाठी महमद्याच्या कंपनीला झुकते माप मिळू लागले. कामानिमित्त ही महिला आणि म्हमद्या एकमेकांना भेटू लागले. ही महिला म्हणजे गावातील एका गर्भश्रीमंत माणसाची मुलगी. मालाची वाहतूक करताना झालेल्या खुनी हल्ल्यात बाप मेल्यावर व्यवसायाची संपूर्ण जवाबदारी स्वतःच्या अंगावर घेतली होती. कळपात राहणाऱ्या ह्या महिलेचे एक मोठे कुटुंब होते आणि इस्टेटीच्या हव्यसापोटी घरातल्या घरात लग्न करून प्रॉपर्टी हस्तगत करण्याचा विचार घरातले काही लोक करत होते. हुशार चाणाक्ष असलेली ही महिला व्यावसायिक हिला घरच्यांचा डाव लक्षात येत होता पण हा डाव तिला यशस्वी होऊन द्यायचा नव्हता.
ह्या महिलेचे नाव होते कात्रीजा, कात्रीजा हुशार, चाणाक्ष होतीच पण श्रीमंत असल्याने तिला वाटेल तसे वागण्याचा मुभा होती. कात्रीजाचे दोन लग्न झाली होती, पहिला नवरा मेला होता तर दुसऱ्याला तिने स्वतः सोडले होते अश्यावेळी तिला कोणत्याही पुरुषात विशेष अस स्वास्य नव्हते पण वडिलांची संपत्ती, आपल्याला हवं तसं वागण्याची मोकळीक हातातून निसटून जाऊ नये म्हणून तिच्या शातीर डोक्यात एक डाव आला आणि तिने तो पूर्ण करून एका दगडात अनेक पक्षी मारले होते. लग्नाचा तगादा, स्वतःचे स्वातंत्र्य अबाधित राहण्यासाठी तिने महमद्याबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला. पुरुषात स्वास्य नसल्याने, केवळ स्वतःचे अस्तित्व अबाधित राहण्यासाठी म्हमद्यासारखा मंद, वेडसर माणसाशी लग्न ही केवळ तडजोड होती. म्हमद्याबरोबर लग्न झाल्याने बऱ्याच गोष्टीवर कात्रीजाचे नियंत्रण होते. वयाच्या चाळीस पंचेचाळीस वर्षात पंचवीस वर्षीय नवरा करण्याचे दुहेरी फायदे कात्रीजा घेत होती.
अचानक श्रीमंत व्यापारी कात्रीजा हिच्याबरोबर लग्न झाल्याने महमद्याच्या चालण्या बोलण्यात, कपडे, खाण्यापिण्यात बदल झाल्याने त्याचे रुपडे पालटले. मागे पुढे नोकराची गर्दी असे, त्यात काही महमद्याची खोटी खोटी स्तुती करणारे नोकर असत जे खोटी स्तुती करून महमद्याकडून बक्षीस मिळवत असे. कात्रीजा बरोबर लग्न केल्यावरही महमद्याच्या रिकाम्या वेळेत गावात,डोंगरात, गुहेत फिरणे, एक टक छताकडे पाहत बसने, मनातल्या मनात गोष्टी तयार करणे आणि त्यात गुंतत जाणे याव्यतिरिक्त दुसरे काम नव्हते. कात्रीजाला ही असाच नवरा हवा असल्याने तिने महमद्याला कधीही आडकाठी आणली नाही. म्हमद्या आणि कात्रीजा आपआपले जीवन असेच जगत राहिले. आर्थिक पाठबळ आणि आजूबाजूला असणारे खुशमस्करे यामुळे म्हमद्याचे आयुष्य एकदम भारी चालू होते.

आपल्या एकलकोंडी स्वभाव, स्वप्नाळू, आणि अकल्पनीय गोष्टी बनवण्याचे विलक्षण कौशल्य, सोबतीला कात्रीजा बरोबर लग्नामुळे आर्थिक घडी बसलेला म्हमद्या वेळ घालवण्यासाठी आजूबाजूच्या डोंगरावर, गुहेत वेळ घालू लागला. एक दिवशी असाच डोंगराच्या गुहेत झोपलेला असताना एक विचित्र स्वप्न त्याला पडले आणि गडबडून जागा झाला.त्याला दरदरून घाम फुटला होता तो लगबगीने घरी परतला आणि सारे स्वप्न त्याच्या पत्नी कात्रीजाला सांगितले. कात्रीजाने सर्व शांतपणे ऐकून घेतले आणि ईश्वराची तुझ्यावर कृपादृष्टी झाली आता तू देवाच्या सांगण्यानुसार वाग, त्याची माहिती आजूबाजूच्या कबिल्याना सांग अस सांगितले.

बायकोचा पाठिंबा, आजूबाजूच्या खुशमस्करे याच्या बळावर म्हमद्या त्याला पडलेल्या स्वप्न लोकांना सांगू लागला त्यात त्याने ईश्वराने त्याला सर्वोच्च स्थान दिले आहे, ईश्वर एक आहे, तो इतर लोक मुर्त्यामध्ये देव शोधतात ते चुकीचे असे नाही नाही ते दावे करू लागला ज्याला तिथल्या लोकांनी बराच विरोध केला पण कात्रीजाच्या श्रीमंतीपुढे त्यांनी जास्त विरोध केला नाही. दिवसेंदिवस महमद्याला अनेक स्वप्ने पडू लागली आणि ती स्वप्ने, त्याचे विचार हेच खरे मानून ईश्वराने त्याला धर्माचा प्रसार, देवाची महती इतरांना नेमून दिले असे सगळ्यांना सांगू लागला. काही वर्षांनी कात्रीजाचे निधन झाले आणि हेकेखोर, मूर्तिपूजा नाकारणारा म्हमद्या लोकांच्या डोक्यात जाऊ लागला त्यांनी त्याला आपल्या भागातून पळवून लावले त्यामुळे थोड्या फार समर्थकांच्याया बळावर म्हमद्या आपले राहते घर, गाव सोडून धर्माचा प्रसार करण्यासाठी इच्छेविरुद्ध बाहेर पडला

क्रमशः

सदर गोष्ट ही केवळ एक गोष्ट आहे, काल्पनिक आहे. हिचा कोणत्याही इतर गोष्टींशी, जागा, माणसाशी होणारी तुलना केवळ आणि केवळ एक योगायोग समजावा ही विनंती. 
गोष्टीचा पुढचा भाग वाचायला आवडणार असेल तर आपले प्रेम पोस्टला लाईक, शेयर करायला विसरू नका. अगणित प्रेमाचा परतावा ह्या गोष्टीचा पुढचा भाग तुमच्यासमोर आणायला भाग पाडले अन्यथा इथेच गोष्टीचा शेवट करावा लागेल.
धन्यवाद

रविवार, ९ ऑक्टोबर, २०२२

महाराष्ट्रातील राजकीय संघर्ष

 महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवरील माझं मत

पक्षाचे नाव आणि चिन्ह गोठवल्यानंतर भगवा झेंडा जो जाज्वल्य हिंदुत्व, ज्ञान, त्याग,बलिदान आणि हिंदू सांस्कृतिक धार्मिक महत्व असलेले प्रतीक आहे ते मूर्ख, बेअक्कल राजकारण्यांना वापरण्यास बंदी, मज्जाव घातला पाहिजे.
नवीन चिन्ह, नाव शोधण्याची मोहीम चालू झाली असेल अश्यावेळी वाघ, जुन्याच नावपुढं किंवा मागे काहीतरी नाव टाकून ते निवडणूक आयोगाकडून मान्य करण्याची तयारी चालू असलेल्या बातम्या यायला सुरुवात झाली आहे त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून माझा बाप, बाप चोरला सारखी बोंब ठोकणाऱ्याना बापाचा
इतकाच पुळका असेल तर बापाच्या नावाचा पक्ष #ठाकरेसेना #बाळसेना हे नाव आणि बापाचे सगळ्यात मोठे हत्यार #लेखणी किंवा कुंचला ही पक्षाचे चिन्ह म्हणून वापरण्यास समर्पक असल्याने त्या नावाचा आग्रह ते चौकोनी कुटुंबातील त्रिकोण घेईल का? राजकारणातील दूरदृष्टी, अजेंडा केवळ सत्ता आणि खुर्ची असेल तर नाव काहीही असले तरी त्याची ओंजळी रिकामीच राहणार हे जवळपास पक्के आहे पण केवळ सत्ता, खुर्ची, प्रकाशझोतात राहण्याची सवय, स्वतःचे स्वार्थ साध्य करण्यासाठी मागे पुढे फिरणारी लोक, तो लवाजमा, थाट मिळवण्यासाठी औकात नसताना पक्ष परत उभा करण्याचा अयशस्वी प्रयत्न नक्की होणार त्यासाठी गोचीड जशी जगण्यासाठी कुत्र्याच्या शरीराचा आसरा घेतो तस इन मिन साडे तीन जिल्ह्यात ज्याची हुकमुत चालते त्याची मदत घेईल यात शंका वाटू देऊ नका तरीही येणारे अपयश त्या माणसाची अपरिपक्व बुद्धी, कर्तुत्वशून्यता सिद्ध करेल. राज ठाकरे याने स्वतःच्या जीवावर पहिल्या निवडणुकीत जेवढे आमदार निवडून आणले त्याच्या निम्मे आमदार जर ह्या माणसाच्या नेतृत्वात जिंकले तर ते एक अजोड आश्चर्य म्हणून जगात नोंदवले जाईल. आता नाण्याच्या दुसऱ्या बाजू शिंदे गटाकडे लक्ष देऊ, मुळात अकार्यक्षम नेतृत्वाला, अहंकारी वागण्याला कंटाळून वेगळा झाला हे सत्य सर्वश्रुत आहे. पक्षातून बाहेर निघतानाच भविष्यात होणाऱ्या सगळ्या संभावना यांचा अंदाज घेऊनच त्या गटाने काम केले असावे. पक्ष सोडल्यावर संख्येच्या आधारावर पक्ष, पक्ष चिन्ह याचा दावा असेल किंवा दुसऱ्या समांतर विचारधारेच्या पक्षाशी संगनमत करणे, भविष्यात नवीन पक्ष उभारणे, स्वतःची राजकीय कारकीर्द लांबवणे सारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे सापडल्यानंतरच बंडखोरी केली गेली असणार आहे. ज्यापद्धतीने मुख्यमंत्रीपदाचे बंद खोलीतील आश्वासने ह्याचे कारण पुढे करून युतीत निवडणूक लढल्यानंतर आपल्या मदतीशिवाय सरकार बनणे अवघड आहे हे लक्षात घेऊन स्वार्थी डाव खेळणाऱ्या,खंजीर पाठीत घुसवत अनैसर्गिक पक्षाशी आघाडी करून
युतीतील पक्षाला खडे चारले ह्या गोष्टीचा शेवट पक्ष समूळ नष्ट होईल, केला जाईल अस स्वप्नात सुद्धा कोणाला वाटले नसेल।चुकीला माफी नाही या तत्वावर देशातील सगळ्यात मोठा पक्ष असा कुटील डाव खेळून प्रेमात आणि युद्धात सारे क्षम्य असते याचा दाखला देऊन गेले.
मुळात पक्ष,संघटना कोणतीही असो
त्यांनी लोकांच्या भल्यासाठी काम करणे अपेक्षित असते मात्र राजकारणात लोकांच्या जीवावर लोकांची कामे करण्याच्या आश्वासनावर राजकारणी स्वतःचा स्वार्थ साधत असतात हे सत्य नाकारणे म्हणजे मूर्खपणा ठरेल. राजकारण, पक्ष, संघटना आली म्हणजे पैसा आला त्यामुळे भ्रष्टचार किंवा स्वतःच्या फायद्याचे
काम करण्याची कारस्थाने सगळेच करतात पण त्याच बरोबर देश, देशातील लोक याच्यासाठी झटण्याची वृत्तीदेखील हवी तीच वृत्ती कमाल राजकीय पक्षात नसल्याने देशात एकाच पक्षाचे राज्य दिसून येते आहे. त्यांच्यातही कमतरता असणार, उणिवा असणार पण त्याचे प्रमाण इतर भ्रष्ट,स्वार्थी पक्षांपेक्षा कमी किंवा अजून उघडे झालेले नसावे. हा राजकारणी चांगला तो वाईट अस काही नसतं, सगळे राजकारणी एका माळेचे मणी असल्याने लोकांनी वासरात लंगडी गाय शहाणी या तत्वावर आपल्या अमूल्य मताचे दान केले पाहिजे.


• • •
xxx
असो. लेख आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच लेख वाचण्यासाठी follow करा.
ट्विटर @pincode410501
ब्लॉगर पोस्ट diarynotes137.blogpost.com
डेलीहंट @cm_newsinformation

कोजागिरी पौर्णिमा


Image

रामराम मंडळी,

आज तुमच्या समोर कोजागिरी पौर्णिमा ह्या सनातन हिंदू धर्माच्या सणाबद्दल छोटीशी माहिती सादर करत आहे

कोजागिरी पौर्णिमा हा सण अश्विनी महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. याला शरद पौर्णिमा, अश्विन पौर्णिमा किंवा कौमुदी पौर्णिमा इत्यादी वेगवेगळ्या नावांनी देखील ओळखले जाते. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीची पूजा करण्याचा नियम आहे.कोजागिरी महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, ओरिसा आणि आसामसह देशातील जवळपास सर्व राज्यांमध्ये कोजागिरी पूजा पूर्ण श्रद्धा आणि श्रद्धेने साजरी केली जाते. पश्चिम बंगाल आणि ओरिसामध्ये या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी मध्यरात्री पूजा केली जाते. आपण कोजागिरी पूजा का करतो, तिची श्रद्धा, विधी आणि महात्म्य जाणून घेऊया.

कोजागिरी पूजेचे महत्त्व

  आश्विन महिन्यातील पौर्णिमेला सनातन धर्मात विशेष महत्त्व आहे. पुराणानुसार, शरद पौर्णिमेच्या दिवशी समुद्रमंथनातून देवी लक्ष्मी प्रकट झाली, म्हणून हा दिवस देवी लक्ष्मीची जयंती म्हणूनही साजरा केला जातो. असे मानले जाते की या दिवशी मध्यरात्री, देवी लक्ष्मी पृथ्वीवर अवतरते आणि मानवी क्रियाकलाप पाहते आणि आपल्या भक्तांना आशीर्वाद देते असे सांगितले जाते. सनातन हिंदू धर्मात प्रत्येक सणाला एक किंवा अनेक आख्यायिका असतात त्यातलीच ही एक गोष्ट वाचायला नक्कीच आवडली असेल पण लहान मोठ्या लोकांना ही गोष्ट माहीत असेल असे नाही कारण कोजागिरी म्हणजे सकाळी छान उठायचे, आवरायचे देवांचा देव महादेव याचे दर्शन घ्यायचे आणि हा दिवस कधी संपून एकदाची रात्र होईल याची घाई लहान मुलांनाच नाही तर मोठी लोक देखील आतुरतेने रात्रीची वाट पाहत असतात.

संपूर्ण चंद्र डोक्यावर येईपर्यत जाग रहायचं, मंदिर, मैदानात एकत्र यायचं तस आजच्या काळात सोसायटी तत्वामुळे वर्षभरात टेरेसवर सगळ्यांनी एकत्र येण्याचा दिवस म्हणजे कोजागिरी पौर्णिमा. संथ, शांत मृदू आवाजात मंजुळ गाणी, लहान मुलांचा गलका आणि गॅसच्या शेगडीवर ठेवलेले दूध असा हा आजचा दिवस. पौर्णिमेच्या दिवशी घोटण्यात येणाऱ्या दुधामध्ये सुकामेवा, काजू, बदाम, चारोळ्या, किसमिस असे अनेक पदार्थ टाकून बनवण्यात येत असते. आणि जोपर्यंत ते घट्ट पेढासारखे बनत नाहीत, तोपर्यंत दूध घोटण्यात येत असते. डोक्यावर चंद्र आल्यावर दुधाच्या भांड्यात चंद्राचे रूप पाहून त्यानंतर त्याची चव घेत घेत फस्त करणे हा सगळ्यांचा आवडता छंद आहे ह्याला कोणीही नाकारू शकणार नाही. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री दूध आणि तांदळाची खीर तयार करून ती चंद्राच्या प्रकाशात ठेवण्याला महत्त्व आहे. खीरीमध्ये चंद्राचा प्रकाश शोषून घेण्याची क्षमता अधिक असते असं मानलं जातं. या दिवशी चांदण्यांसोबतच अमृताचा वर्षाव होतो अशी धार्मिक श्रद्धा आहे.

असा हा सण सगळ्यांनी एकत्र येऊन धुमधडाक्यात साजरा करावा अशी मी विनंती करतो.


सर्वांना कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा, देवी लक्ष्मीची सदैव तुमच्यावर कृपादृष्टी राहो, सुख समृद्धी घरात नांदो. हा सण तुम्हाला सुखसमाधानकारक आणि आनंदाची उधळण करावा असावा हिच परमेश्वर चरणी सहिच्छा..कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा





• • •
xxx
असो. लेख आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच लेख वाचण्यासाठी follow करा.
ट्विटर @pincode410501
ब्लॉगर पोस्ट diarynotes137.blogpost.com
डेलीहंट @cm_newsinformation







शनिवार, ८ ऑक्टोबर, २०२२

स्टॉक मार्केट बेसिक : गुंतवणूकदारांचे प्रकार

स्टॉक मार्केट बेसिकच्या पुढच्या भागात आपले स्वागत, मागील भागात आपण जगातील स्टॉक एक्सचेंज आणि त्याच्या कामाच्या वेळा याव्यतिरिक्त त्या एकमेकांवर अवलंबून कश्या असतात ते आपण जाणून घेतले. आज आपण स्टॉक मार्केट मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गटाबद्दल माहिती घेणार आहे.

सदरची माहिती ही केवळ आणि केवळ आपले सामान्य ज्ञान वाढण्यासाठी, स्टॉक मार्केटची ओळख व्हावी यासाठीच आहे आणि माहितीची सत्यता पडताळून पाहणे ज्यामुळे आपल्याला ह्या विषयातील अधिक माहिती मिळू शकते.

स्टॉक मार्केटमध्ये कंपनीच्या शेयरची देवाणघेवाण खरेदी विक्री द्वारे केली जाते, ह्याच शेयर किंवा समभाग खरेदी करणाऱ्यांना गुंतवणूकदार असे म्हंटले जाते. शक्यतो 50% शेयरची मालकी असणारा व्यक्ती वा संस्था ही त्या कंपनीची मालकी हक्क सांगू शकतो त्यामुळे शेयरच्या मालकी हक्क कोणकोणाकडे असतो ते आपण पाहू या.

स्टॉक मार्केट मध्ये शेयरच्या विक्रीतून कंपन्या बिगर व्याजी रक्कम जमा करून ती रक्कम आपला व्यवसाय मोठा करण्यासाठी वापरत असतात. स्टॉक मार्केट मध्ये लिस्ट होण्यासाठी कंपनीने किमान 25% शेयर/समभाग विकणे क्रमप्राप्त असते अश्यावेळी कंपनीची मालकी असणारा व्यक्ती, गट कमीत कमी 75% शेयर स्वतःकडे ठेवू शकतो. 

प्रमोटरनंतर सामान्य वैयक्तिक गुंतवणूकदार म्हणजेच छोटे मोठे तुमच्या आमच्यासारखे लोक रोख रक्कम देऊन जे शेयर विकत घेतात ते एका अर्थाने कंपनीच्या व्यवसायावर विश्वास ठेवून छोटा मोठ्या प्रमाणात कंपनीची मालकी विकत घेत असतात. कंपनी आपल्या प्रत्येक समभाग धारकाला वेळोवेळी कंपनीची आर्थिक ताळेबंद सांगण्यास बांधील असते. काही कंपन्या झालेला नफा आपल्या भागधारकांमध्ये वाटून देत असतात ज्याला डिव्हिडंट म्हंटले जाते पण हा झालेला नफा वाटावाच असा नियम नसतो. झालेला फायदा कंपनी व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी, कंपनीचे कॅपिटल म्हणजेच मशीन, जागा वा अन्य ठिकाणी वापरण्यास मुक्त असतात.

प्रमोटर आणि सामान्य गुंतवणूकदार यांच्यानंतर म्यूचुअल फंड आणि इन्शुरन्स कंपन्या यादेखील स्टॉक मार्कट मध्ये कंपन्याचे समभाग विकत घेण्यात अग्रेसर असतात. म्यूचुअल फंड म्हणजे असे तज्ञ गुंतवणूकदार असतात जे लोकांनी दिलेली रक्कम योग्य ठिकाणी गुंतवणूक करून लोकांची मुद्दल वाढवून देण्याचे काम करत असतात. म्यूचुअल फंड मध्ये गुंतवणूक करणारे व्यक्ती शक्यतो स्टॉक मार्केटच्या चढ उताराची जोखीम किंवा स्टॉक मार्केटचे कमी ज्ञान यामुळे गुंतवणुकीचा सोप्पा मार्ग म्हणून म्यूचुअल फंडमध्ये गुंतवणूक करत असतात. तज्ज्ञांच्या स्टॉक मार्केटमधील ज्ञानाचा फायदा घेऊन फायदा मिळवणे यासाठी हा कमी जोखीम असलेला पर्याय असतो. म्यूचुअल फंड लोकांचे पैसे गुंतवणूक करून त्यातून स्वतः देखील फायदा मिळवत असतात तसेच हा फायदा लोकांची गुंतवणूक वाढवुन परतावाही देत असतात.

इन्शुरन्स कंपन्या यांच्याकडे इन्शुरन्स च्या हप्त्याच्या रूपाने खूप मोठ्या प्रमाणात येणारा पैसा स्टॉक मार्केटमध्ये लावलेला असतो. प्रमोटर, सामान्य गुंतवणूकदार, म्यूचुअल फंड, इन्शुरन्स कंपन्या याखेरीज नॉन इन्स्टिट्यूट संस्था ह्या देखील स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास अग्रेसर असतात. 

वर उल्लेख केलेल्या गुंतवणूकदाराशिवाय तुम्ही FII आणि DII ही नावे बऱ्याच वेळा न्यूज चॅनेल किंवा स्टॉक मार्केटचे ज्ञान असणाऱ्या लोकांच्या तोंडात ऐकले असणार. आता आपण ह्या दोन प्रकारच्या गुंवणूकदाराबद्दल थोडीशी माहिती घेऊया

FII म्हणजे फॉरेन इन्स्टिटय़ूयशनल इन्व्हेस्टर. विदेशी संस्थागत गुंतवणूकदार (FIIs), अनिवासी भारतीय (NRIs), आणि भारतीय वंशाच्या व्यक्ती (PIOs) यांना पोर्टफोलिओ गुंतवणूक योजनेद्वारे (PIS) भारतातील प्राथमिक आणि दुय्यम भांडवली बाजारात गुंतवणूक करण्याची परवानगी आहे तसेच देशाबाहेरील जगातील लोकांनी केलेली गुंतवणूक म्हणजे FII होय. व्यवसायाच्या आणि गुंतवणूकदार याच्या गुंतवणूक सुरक्षा राहावी म्हणून जास्तीत जास्त 24% समभाग खरेदी करण्याची परवानगी असते ज्यामुळे त्यांना प्रमाणापेक्षा जास्त गुंतवणूक करून व्यवसाय हस्तगत करण्यापासून तसेच मोठ्या प्रमाणात खरेदी वा विक्री केल्याने स्टॉक मार्केट मध्ये तेजी किंवा मंदी आणण्यास मज्जाव व्हावा म्हणूनच हा नियम असतो.

गुंतवणूकदारांचा शेवटचा प्रकार म्हणजे DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिटय़ूयशनल इन्व्हेस्टर.ज्या पद्धतीने जगातील इन्स्टिटय़ूयशनल इन्व्हेस्टर समभाग विकत घेतात तसच देशांतर्गत इन्स्टिटय़ूयशनल इन्व्हेस्टर यांनी स्टॉक मार्केट मध्ये केलेली गुंतवणूक म्हणजे DII


अश्याप्रकारे आज आपण गुंतवणूकदारांचे वेगवेगळे प्रकार, गुंतवणूक करण्यास असलेले नियम अटी यांची थोडक्यात माहिती घेतली आहे. असाच एखादा दुसरा विषय घेऊन तुमच्यापुढे लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न असेल. तुम्हाला काही शंका, प्रश्न असतील तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा. पुढच्या लेखापर्यत माझा रामराम......



• • •
xxx
असो. लेख आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच लेख वाचण्यासाठी follow करा.
ट्विटर @pincode410501
ब्लॉगर पोस्ट diarynotes137.blogpost.com
डेलीहंट @cm_newsinformation


शुक्रवार, ७ ऑक्टोबर, २०२२

खलनायकी शकुनी

 शकुनी, महाभारतातील एक महत्वाचे पात्र ज्याच्या खलनायकी विचारांच्या पाठबळावर दुर्योधन आणि त्याच्या कौरव कुटुंबाचा सर्वनाश झाला.

शकुनी हा गांधार देशाचा राजा पण मनातील असंतोष, राग यामुळे तो आपल्या बहिणीच्या म्हणजेच गांधारीच्या घरी राहत होता. अतिप्रचंड देशाचा राजा, पराक्रमी, कुटील माणूस धुतराष्ट्राच्या घरातील एक बाहुले म्हणून का वागत असावे यामागची गोष्ट तुम्हाला माहिती असलीच पाहिजे

शकुनी कौरवांचा शत्रू होता का हो? शत्रू होता की नव्हता यापेक्षा त्याच्या मनात धुतराष्ट्र आणि त्याचे संपूर्ण कुटुंब यांबद्दल कमालीचा राग,द्वेष होता हे मात्र खरे आणि ह्याच रागाला शांत करण्यासाठी शकुनीने खेळलेला कुटील डाव म्हणजे आजची ही गोष्ट

शकुनीचे धृतराष्ट्र आणि कौरवांशी वैर असण्याची दोन प्रमुख कारणे होती. प्रथम त्याची बहीण गांधारी हिचा विवाह धृतराष्ट्र या अंध व्यक्तीशी झाला. हस्तिनापूरच्या राजाने गंधारच्या राजाचा पराभव केला. त्यामुळे गांधारीला धृतराष्ट्राशी लग्न करावे लागले. पती आंधळा असल्याने आणि चांगली पत्नी असल्याने गांधारीलाही जग बघायचे नव्हते, तिने डोळ्यावर पट्टी बांधली. आणि शपथ घेतली की ती त्याला पुन्हा कधीही पाहणार नाही. आपल्या लाडक्या बहिणीच्या बलिदानाचा शकुनीला खूप राग आला, पण त्यावेळी तो काही करू शकला नाही, 

शकुनीच्या वैराचे आणखी एक कारण म्हणजे तिच्या वडिलांचा अपमान. खरे तर गांधारीच्या लग्नापूर्वी तिचे वडील सुबाला यांना एका पंडिताने सांगितले होते की, गांधारीच्या लग्नानंतर तिचा पहिला नवरा मरेल. याची काळजी घेऊन राजा सुबलाने तिचे लग्न एका बकऱ्याशी लावले, त्यानंतर शेळी मारली गेली. अशा प्रकारे गांधारी विधवा होती. ही गोष्ट फक्त सुबाला आणि तिच्या जवळच्या मैत्रिणींनाच माहीत होती, ही गोष्ट कोणाला सांगू नकोस अशी सर्वाना सूचना होती. या घटनेनंतर काही काळानंतर गांधारीचा हस्तिनापूरचा राजकुमार धृतराष्ट्राशी विवाह झाला. गांधारी ही शेळीची विधवा होती हे धृतराष्ट्र आणि पांडवांना माहीत नव्हते.

काही वर्षांनी ही गोष्ट सर्वांसमोर आली, या गोष्टीने धृतराष्ट्र आणि पांडव खूप दुखावले आणि त्यांना वाटले की राजा सुबलाने आपली फसवणूक केली आहे, आपला अपमान केला आहे. त्याच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी धृतराष्ट्राने राजा सुबाला आणि त्याच्या 100 मुलांना कैद केले. धृतराष्ट्र त्याच्याशी खूप वाईट वागायचा, त्याला खूप मारले जायचे. धृतराष्ट्राने राजा सुबलासोबतच्या नातेसंबंधाचाही आदर केला नाही, राजा आणि त्याच्या कुटुंबीयांना दररोज फक्त मूठभर तांदूळ दिले जायचे, जे ते वाटून खात. दिवस गेले आणि राजा सुबलाचा एक मुलगा भुकेने मरण पावला. तेव्हा राजा सुबाला विचार करू लागला की अशा प्रकारे आपण आपल्या वंशाचा अंत होऊ देणार नाही. धृतराष्ट्रावर राग आल्याने सुबालाने ठरवले की ते सर्वजण आपापल्या वाट्याचे अन्न त्यागून ते कोणाला तरी द्यायचे जेणेकरुन त्यांच्यापैकी कोणीतरी जगू शकेल आणि बलवान होईल आणि सर्वांनी झालेल्या अपमानाचा बदला घ्यावा. शकुनी त्या सर्व भावांमध्ये सर्वात लहान होता, म्हणून सुबालाने ठरवले की प्रत्येकाने आपले अन्न शकुनीला द्यावे. वडिलांच्या या निर्णयाला शकुनीचा विरोध होता, तो आपल्या वडिलांना आणि भावांना अशा प्रकारे त्रास देताना दिसत नव्हता, परंतु वडिलांच्या आदेशामुळे त्याला ते मान्य करावे लागले. त्यामुळे शकुनी हा कौरवांचा उपकारक नसून त्यांचा विरोधक होता.

काळ लोटला आणि राजा सुबालाही आता अशक्त झाला. या दरम्यान त्याने धृतराष्ट्राला विनंती केली, त्याने त्याची माफी मागितली आणि आपल्या एका मुलाला शकुनीला क्षमा करून तुरुंगातून बाहेर येण्यास सांगितले. धृतराष्ट्राने आपल्या सासरची ही शेवटची इच्छा मान्य करून शकुनीला हस्तिनापूरला आणले. राजा सुबाला याने अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे शकुनी कौरवांचा शत्रू बनला, पण मरण्यापूर्वी सुबालाने आपल्या मुलाला शकुनीला तिच्या मणक्यातून असे फासे बनवायला सांगितले जे तिच्या इच्छेनुसार संख्या दाखवतील (हाच फासा शकुनी पांडव आणि कौरवांच्या खेळात वापरत असे. युधिष्ठिराने आपले ४ भाऊ आणि पत्नी द्रौपदीला गमावले आणि द्रौपदी फाडली गेली.महाभारत युद्ध याच फासेंनी केले होते. राजा सुबालानेही शकुनीचा एक पाय बेशुद्ध करून टाकला जेणेकरून त्याला आपल्या वडिलांचे हे वचन सदैव स्मरणात राहावे आणि आपल्या वडिलांचा आणि भावांचा अपमान तो कधीही विसरु नये.

वडिलांच्या वचनानुसार शकुनी १०० कौरवांचा शुभचिंतक राहिला, पण प्रत्यक्षात शकुनी हा कौरवांचा उपकार नव्हता तर त्याचा विरोधक होता. शकुनीने कौरवांना तेच आपले श्रेष्ठ उपकार मानले, त्याच वेळी शकुनी नेहमी चुकीच्या गोष्टी मनात ठेवून चुकीचे धडे देत राहिले. शकुनीला माहित होते की कौरवांना पांडव आवडत नाहीत, ज्याचा त्यांनी फायदा घेतला. या गोष्टीचा उपयोग त्याने आपले काम पार पाडण्यासाठी केला. कुरुक्षेत्रात घडलेल्या महाभारताचा सर्वात मोठा जबाबदार शकुनी होता, त्याने दुर्योधनाला पांडवांच्या विरोधात भडकवले आणि चुकीच्या गोष्टी पेरल्या. शकुनी हा देखील महाभारत युद्धाचा एक भाग होता, तो कुंतीचा मुलगा सहदेवाच्या हातून युद्धाच्या अठराव्या दिवशी घनघोर युद्धात मरण पावला आणि कावेबाज, कपटी, धूर्त, चलाख बुद्धीच्या खलनायकी व्यक्तिमत्वचा अंत झाला.

गुरुवार, ६ ऑक्टोबर, २०२२

स्टॉक मार्केट बेसिक : जागतिक स्टॉक एक्सचेंज

 स्टॉक मार्केट बेसिक ह्या नवीन लेखात आपले स्वागत

भारतीय शेअर बाजार सकाळी 9:15 वाजता उघडतात आणि दुपारी 3:30 वाजता बंद होतात हे आपल्या सर्वांना माहीत आहे. (IST). जगभरात अनेक शेअर बाजार अस्तित्वात आहेत.

जगभरात अनेक स्टॉक मार्केट एक्स्चेंज अस्तित्वात आहेत आणि त्यांच्या उघडण्याच्या आणि बंद होण्याच्या वेळा बदलतात. बहुतेक स्टॉक एक्स्चेंजसाठी, सोमवार ते शुक्रवार पर्यंत ट्रेडिंग केले जाते आणि ते शनिवार, रविवार आणि स्टॉक एक्स्चेंजने घोषित केलेल्या ट्रेडिंग सुट्ट्या बंद राहतात. जगभरातील काही प्रमुख स्टॉक मार्केट एक्सचेंज म्हणजे न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज, लंडन स्टॉक एक्सचेंज; शांघाय स्टॉक एक्सचेंज, स्विस एक्सचेंज आणि नॅसडॅक. 

आता, जागतिक स्टॉक मार्केट एक्सचेंजच्या ट्रेडिंगच्या वेळा पाहू.

Image

वरील चित्राचा अभ्यास केल्यास तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की भारतीय स्टॉक मार्केट एक्सचेंज उघडण्याच्या आधी काही एक्सचेंज उघडले जातात. ज्यांचा अभ्यास करून भारतीय स्टॉक मार्केट मध्ये गुंतवणूकदारांचा कल कोठे असू शकतो याचा अंदाज बांधला जातो हाच प्रकार दुपारी 1.30 च्या सुमारास जागतिक बाजारपेठा बाजार उघडल्यानंतर बऱ्याचवेळा भारतीय बाजार कधी पडतो तर कधी चढतो असा अनुभव तुम्हाला आला असेलच परंतु प्रत्येक बाजार स्टॉक एक्सचेंज वेगळा असल्याने ते एकमेकांवर अवलंबून असले तरी त्याचा प्रभाव एकमेकामच्या कामगिरीवर होतोच हे 100% खात्रीलायक कोणीही बोलू शकत नाही तरीही ट्रेंडिंग करणारे भारतीय स्टॉक एक्सचेंज बरोबर इतर एक्सचेंज वर लक्ष ठेवून असतातच.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने म्हटले आहे की, भारताची अर्थव्यवस्था या वर्षी 7% ने वाढण्याचा अंदाज आहे, ज्यामुळे ती जगातील 5 व्या क्रमांकावर आहे. काही दिवसांपूर्वीच भारताने युनायटेड किंगडम ला पिछाडीवर टाकून पाचव्या स्थानी उडी मारली आहे आता जर्मनी, जपान, चीन आणि अमेरिका ह्या देशाच्या अर्थव्यवस्था आघाडीवर आहे. IMF च्या निकष आणि अंदाजानुसार येत्या 2027 पर्यत जर्मनीच्या अर्थव्यवस्थेला भारतीय अर्थव्यवस्था मागे ढकलू शकते

शक्यतो भारत अमेरिकेतून बरीच उत्पादने आणि सेवा आयात करतो आणि अशा प्रकारे जर भारतीय रुपयाच्या तुलनेत अमेरिकन डॉलरचे मूल्य वाढले तर आयात करणार्‍या कंपन्यांना अधिक पैसे द्यावे लागतील. थोडक्यात, विनिमय दर वाढल्याने या कंपन्यांची नफा कमी होतो. इंधनासाठी लागणारे कच्चे तेल यावर भारत प्रामुख्याने जगातील काही देशांवर अवलंबून असल्याने शेयर बाजारात काम करणाऱ्या लोकांना भारतीय स्टॉक एक्सचेंज शिवाय अमेरिकी अर्थव्यवस्था, स्टॉक एक्सचेंज वर लक्ष ठेवावेच लागते.

सिंगापूर स्टॉक एक्स्चेंज हे भारतातील अग्रगण्य स्टॉक एक्स्चेंज असल्याने, SGX निफ्टी भारतीय निफ्टीच्या वर्तणुकीचा अंदाज आणि निरीक्षण करण्यास मदत करते आणि त्यामुळे भारतीय शेअर बाजारात महत्त्वाची भूमिका बजावते.

अश्या प्रकारच्या छोट्या मोठ्या गोष्टींची नोंद शेयर मार्केट मध्ये काम करणाऱ्या लोकांना असावीच लागते त्यामुळे शेयर मार्केट मध्ये नशीब आजमवायचे असल्यास ह्या बेसिक टिप्स चा फायदा उठवणार ना?




• • •
xxx
असो. लेख आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच लेख वाचण्यासाठी follow करा.
ट्विटर @pincode410501
ब्लॉगर पोस्ट diarynotes137.blogpost.com
डेलीहंट @cm_newsinformation

शेयर मार्केट आणि मैत्रीचा अनुभव

 

माझा एक विद्वान मित्र आहे,ज्याचे शिक्षण 15वी पण धंदा करण्याची इच्छा आणि कोणाच्याही अधिपत्याखाली नोकरी करणे त्याला मान्य नव्हते म्हणूनच त्याने वेगवेगळे एका हाताच्या बोटावर मोजता येईल इतके व्यवसाय केले. काहीत जम बसवला तर काहींत अपयश आले पण बाबा काही थांबला नाही शेवटी त्याने
स्टॉक मार्केटचा छोटा तीन सहा महिन्यांचा कोर्स केला त्याच्या जीवावर आज तो व्यवस्थित ट्रेडर म्हणून जीवन जगतोय. लॉक डाउन आणि कोरोना काळ संपल्यानंतर माझा स्वतःचा इंटरेस्ट शेयर मार्केटकडे झुकला आणि आपला मित्र ज्यात कित्येक वर्षे काम करतोय त्याला सुरुवात कशी करायची ते विचारले
त्याने पाच सहा youtube channel ची नावे सांगितली आणि व्हिडीओ पहायला मिळाले सांगितले पण तरीही नक्की स्टॉक मार्केट म्हणजे काय, कस काम करत, आपण कसे पैसे कमवायचे हे समजत नव्हतं म्हणून हक्काने ह्या मित्राकडे माहिती विचारल्यानंतर ज्या अहंकारात त्याने उत्तरे दिली, मदत सोडा माहितीही

सांगण्यास नकार केला ते माझ्या खूप जिव्हारी लागले आणि स्टॉक मार्केट स्वतःच्या जीवावर शिकण्याचे ठरवले. सगळ्यात पाहिले एक डिमॅट अकाउंट काढले. डिलिव्हरी प्रकारात छोटे छोटे टार्गेट घेऊन गुंतवणूक करायला लागलो. ही वेळ अशी होती की ट्रेड square off केल्यावर 20 रुपय ट्रेड फी शिवाय
ते transaction करण्यासाठी अजून ठराविक रक्कम कट होत असते हेदेखील माहीत नव्हते. पण तरीही पुढचे एक वर्ष तरी न लागणारी आणि बाजूला असलेली शिल्लक यात त्यातल्या त्यात नावाजलेले स्टॉक विकत घेतले. ठराविक फायदा गाठल्यावर प्रॉफिट बुक ही केला. सध्या पोर्टफोलिओ लाल आहे पण तो पुन्हा
त्याच्या जैसे थे परिस्थितीत येईल असेच स्टॉक असल्याने भीती नाही पण अश्या पद्धतीने गुंतवणूक करून तुम्ही तुमची मुद्दल दुप्पट, तिप्पट करू शकता, दररोज पैसे कमवू शकत नाही त्यासाठी intraday, option हे प्रकार असतात ज्यात पैसे जाण्याची भीती जास्त असते त्यामुळे मागचा अनुभव विसरत परत त्या
मित्राकडे गेलो पण परत तेच. कोणत्याही प्रकारची माहिती देणे सोडा, साध्या छोट्या गोष्टी सांगणे देखील त्याने टाळले. असो द्रोणाचार्यानी शिकवायचे टाळले तर एकलव्य धनुष्य बाण चालवायचा राहिला का? म्हणूनच ह्या अनुभवातून शिकून आपल्याला जे समजले ते इतरांना समजण्यासाठी मी ट्विट, लेख लिहतो
कदाचित त्या बेसिक माहितीमुळे त्या विषयाकडे तुम्ही आकर्षले जाल, अभ्यास कराल, कदाचित इतकं ज्ञान घ्याल की शेयर मार्केट हा उत्पनाचा दुसरा स्रोत म्हणून तुम्ही पहाल. मला थोडं समाधान मिळत, आपण व्यक्त केलेले अंदाज किती बरोबर किती चुकीचे याचे मुद्रण ट्विट माध्यमात राहिल्याने आपल्या
चुका ओळखण्याची, सुधारण्याची एक संधी मिळते. असो हा प्रसंग इथे सांगण्याचे कारण म्हणजे मला जो अनुभव मिळाला तसा तुम्हाला मिळू नये, स्टॉक मार्केट बेसिक बद्दल माहिती आपल्या मातृ भाषेत मिळावी म्हणून हे लेख आणि ट्विट करत असतो तरी मी दिलेली माहिती हीच योग्य न मानता स्वतःचा अभ्यास,माहिती
घेण्याची वृत्ती ठेवा, अनुभव घ्या, कोणाच्याही सल्ल्याने गुंतवणूक वा ट्रेड करू नका. अर्ध्या माहितीने, शिक्षणाने मोठ्या गुंतवणूक करू नका. पैसा आणण्यासाठी कष्ट खूप असतात पण पैसे जायचे असतील तर ते खूप सोप्या, जलद पद्धतीने जातात त्यामुळे जिथं पैसा हा विषय येतो तिथं सावधान होणे गरजेचे
मग होणार ना सावधान?

शेयर मार्केट ऑपशन आणि फ्युचर्स भाग 2

ऑपशन म्हणजे काय ते समजलं असेल तर फ्युचर्स प्रकार काय असतो ते समजवण्यासाठी हे ट्विट. Obligation म्हणजे बंधनकारक. फ्युचर्स मध्ये खरेदी किंवा विक्री ही निश्चित वेळेसाठी,निश्चित केलेल्या किंमतीला पूर्ण करण्याचे बंधन असते. होणारा फायदा वा तोटा याला मर्यादा नसते,खरेदी वा विक्री करतानाImage
ना प्रीमियन असतो ना कोणता ऍडव्हान्स द्यायचा असतो पण करार पूर्ण झाल्यावर जो करार केला असेल तो पूर्ण करण्याचे बंधन असते जर तो व्यवहार नफ्यात असेल ते त्याला मर्यादा नाही हे जसे सुखवणारे आहे तसेच तो व्यवहार तोट्यात असेल तर त्या तोट्याला मर्यादा नाही म्हणजेच फ्युचर्स मध्ये जोखीम जास्त शेयर मार्केट मध्ये पैसा आहे हे निश्चित पण पैसे गमावणारे अधिक. समजा 100 लोक मार्केट मध्ये पैसे लावत असतील तर त्यातील फक्त 10 लोक पैसे कमवतात, 90 गमावतात. ज्या 90 लोकांनी पैसे गमावले ते पैसे त्या 10 लोकांच्या खिश्यात जातात. जरी हा सट्टा नसला तरी लोक मात्र सट्टाप्रमाणे याकडे बघतात. कमी वेळेत जास्त पैसे ह्या विचाराने अनेक लोक येतात आणि पैसे गमावून जातात. शुभ मंगल सावधान अस सांगूनही लोक सावधान होत नाही हे ट्विट सावधान करण्यासाठीच. गमावण्याची भीती आणि कमावण्याची हाव यांचा खेळ म्हणजे शेयर मार्केट.
जर वरील लेख आणि ट्विट्स वाचलेले असतील तर धोकेदायक आणि अतिधोकेदायक म्हणजे काय हे तुम्हाला लक्षात आले असेल आज ऑपशन ची अधिक माहिती देण्याचा प्रयत्न करतोय.
ऑपशन मध्ये कॉल आणि पुट हे दोन प्रकारकॉल मध्ये खरेदी करण्याचा तर पुट मध्ये विकण्याचा अधिकार असतो पण जो करार केला त्याला बांधिलकी नसते अश्यावेळी केलेल्या कराराच्या वेळी दिलेली रक्कम (प्रीमियम) इतकाच तोटा असतो पण ऑपशन मध्ये ट्रेड लॉटने केला जातो त्यामुळे प्रीमियम गुणिले लॉट इतके नुकसान होणार असते. शक्यतो बाजार चढता आणि वाढेल असा O असेल त्यावेळी कॉल ऑपशन हा प्रकार केला जातो तर बाजार घसरले वाटत असेल तर पुट ऑपशन घेतला जातो.
ऑपशन हा प्रकार दोन प्रकारे ट्रेड केला जातो1. मुदत संपेपर्यत2. इन्ट्राडे
मुदत म्हणजेच एक्सपायरी हा महत्वाचा घटक असतो हे विसरता काम नये.
मुदत संपेपर्यंत प्रकारात एक्सपायरी तारेखेपर्यत विकता येत नाही असे नाही, तुम्हाला वाटेल त्यावेळी तुम्ही तुमची पोजीशन square off करू शकता आणि इन्ट्राडे म्हणजे एका दिवसाच्या मुदतीत बाजार बंद होण्यापर्यतच्या वेळेस केला जाणारा ट्रेड. 
PE म्हणजे कॉल CE म्हणजे पुट
कोणताही ऑपशन हा त्या कंपनीचे नाव, एक्सपायरी तारीख, खरेदी वा विक्री याचे चिन्ह आणि खरेदी किंवा विक्री केलेल्या प्रीमियम ची किंमत असा लिहलेला असतो उदा खालील चित्र
Titan 27 Oct 22 CE 2640
याचा अर्थ समजून घेऊ टायटन हा स्टॉक डेरीव्हेटिव्ह27 oct 22 एक्सपायरी CE खरेदी केलास्ट्राइक प्राईस 2640 दुसऱ्या चित्रात वेगवेगळ्या स्ट्राइक प्राईसला असणारा प्रीमियम (LTP) वाचायला मिळतो जिथे 2640 ह्या स्ट्राइक प्राईसला


ImageImage

प्रीमियम 69 रुपये आहे. टायटन कंपनीच्या ऑपशन लॉट ची संख्या 375 अशी आहे म्हणजे 375 च्या पटीत 1 किंवा 2 किंवा तुमच्या गुंतवणूक करण्याच्या शक्तीवर लॉट खरेदी करता येतात. सध्या टायटन कंपनीचा शेयर किंमत 2582 इतकी आहे हे लक्षात ठेवा

हा वरील भाग नीटसमजून घ्या.
म्हणजेच
27 oct 22 ला टायटन ह्या शेयरची असलेली किंमत स्टॉक डेरीव्हेटिव्हच्या प्रीमियमची किंमत किती हे ठरवणार जर किंमत जास्त असेल तर तुमचा नफा अन्यथा तोटा.

वरील उदाहरणात काही गोष्ट अजून समजून घेऊ उदा
स्टॉक स्पॉट प्राईस 2582
स्ट्राईक प्राईस 2640
LTP वा प्रीमियम 69
मुदत 27 oct 22
आहे. ज्यावेळी स्टोकची किंमत 2640 वा त्याहून अधिक होईल त्यावेळी प्रीमियमची किंमत त्याच पटीत वाढलेली असेल.
आजची तारीख 6 oct 22 ला 27 तारखेला टायटन कंपनीचा डेरीव्हेटिव्ह 2640 वा त्यापेक्षा जास्त असण्याच्या तुमच्या अंदाजला केलेली खरेदी म्हणजे कॉल ऑपशन

तुम्ही खरेदी करत असलेला डेरीव्हेटिव्ह याच्या स्पॉट आणि स्ट्राईक प्राईस यामधील फरक पहा जो ₹58 आहे पण प्रीमियम वा LTP मात्र ₹69 आहे जी मूळ किमतीच्या अधिक आहे जी तुम्ही विकत घेण्यासाठी देत आहात. म्हणजेच नफा, फायदा चालू होण्यासाठी टायटन ह्या शेयरची किंमत (स्ट्राईक प्राईस+प्रीमियम)
2640 + 69 = 2651 वा त्यापुढे जाणे अपेक्षित आहे 2651 वा त्यापुढे कोणतीही 27 oct 22 ला असणारी शेयरची किंमत गुणिले लॉट साईज म्हणजे तुमचा फायदा असणार आहे. उदारणार्थ 27 तारखेला टायटनचा शेयर 2705 रुपय असेल तर 2705 वजा (स्ट्राईक प्राईस+प्रीमियम) 2651 = 50 गुणिले लॉट साईझ 375 = ₹18750
तुमचा नफा असणार आहे.

स्ट्राईक प्राईस आणि प्रीमयम (₹2651) यापेक्षा स्टॉक ची किंमत कमी असणे तुमचा तोटा असतो…
समजा ती किंमत तुमच्या स्ट्राईक प्राइज 2640 वा त्यापेक्षा कितीही खाली असेल तर केलेल्या कराराप्रमाणे ती विकत घेण्यास बांधील नसल्याने केवळ तुम्ही दिलेला प्रीमियम म्हणजे रुपय 69 गुणिले लॉट साईज 375 = 25875 हा सरळ सरळ तुमचा तोटा, नुकसान असणार आहे.

कॉल ऑपशन मध्ये वरील उदाहरणानुसार नुकसान झालेच तर ते 25875 इतके असणार होते पण स्टोकची किंमत 27 तारखेला जर 2800 किंवा 2900 रुपय असेल तर? चला तर 2900 रुपय आहे अशी कल्पना केली तर 2900 वजा(स्ट्राईक प्राइज
अधिक प्रीमियम) 2651 = 249 गुणिले लॉट साईझ 375 = 93375 हा फायदा असणार आहे
माझ्या माहितीप्रमाणे जितक्या सुलभ ही गोष्ट मांडण्याचा, सांगण्याचा प्रयत्न केला आहे त्यापेक्षा जास्त सोप्प करून सांगणे शक्य नाही तरीही यातील जास्तीत जास्त माहिती वाचण्याचा प्रयत्न केला तर ऑपशन हा ट्रेंडिंग प्रकार तुम्हाला पक्का समजेल हे नक्की. 


हा लेख किंवा थ्रेड लिहण्याचा
मूळ उद्देश वाचणाऱ्यांना विषय सोप्प्या भाषेत समजणे, ट्रेंडिंग प्रकारात असलेले धोके दाखवणे, हुशारीने गुंतवणूक केल्यास होणार आर्थिक फायदा याची ओळख करून देणे ही होती.


• • •
xxx
असो. लेख आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्या प्रतिक्रियाची अपेक्षा असेच लेख वाचण्यासाठी follow करा.
ट्विटर @pincode410501
ब्लॉगर पोस्ट diarynotes137.blogpost.com
डेलीहंट @cm_newsinformation



शनिवार, १ ऑक्टोबर, २०२२

शेयर मार्केट ऑपशन आणि फ्युचर्स

मित्रानो नमस्कार,

आज तुमच्या पुढे शेयर मार्केटबद्दल बोलणार आहे. शेयर  मार्केट मध्ये गुंतवणूक करणाऱ्याची संख्या कमी असली तरी बहुतांश लोक गुंतवणुकीसाठी पुढे येत आहेत हे नाकारता येणार नाही.सरळ साधेपणाने सामान्य गुंतवणूकदार शिल्लक असलेला पैसा चांगल्या स्टॉक मध्ये गुंतवणूक करून त्याच्या परतव्याच्या हिशोबाने काढून घेणे ही सगळ्यात सोपी आणि जुनी पद्धत.

ज्यांना परतावा अधिक पाहिजे आणि ज्यांच्याकडे शिल्लक पैसे कमी प्रमाणात आहेत ते जोखीम घेऊन intraday म्हणजेच घेतलेले शेयर एका दिवसार1त खरेदी करून विक्री किंवा विक्री करून खरेदी करून त्यात पैसे कमावत असतात. शक्यतो बऱ्याच लोकांना ह्या दोन गोष्टीची सर्वसाधारण माहिती असतेच आणि नसेल तर ती करणे अवघड नाही पण गुंतवणूक आणि इन्ट्राडे ट्रेड प्रकारचा पुढचा प्रकार म्हणजे ऑपशन आणि फ्युचर्स (Option & Futures) जो समजण्यास आधी सांगितलेल्या गुंतवणूक किंवा इन्ट्राडे  ट्रेडपेक्षा अवघड, किचकट असतो त्याबद्दल मला तुम्हाला सहज सोप्प्या भाषेत माहिती देण्याचा प्रयत्न म्हणजे आजचा हा लेख.

What is Future and Option? इतकं जरी गूगलवर टाकलं की उत्तर येते 

Futures and Options are “derivative products” in the stock market since they derive their values from an underlying asset, like shares or commodities, they are called derivatives. Two parties enter a derivative contract where they agree to buy or sell the underlying asset at an agreed price on a fixed date.

पण अश्या पुस्तकी व्याख्या वाचल्यानंतर त्या समजतात अस नाही म्हणूनच की काय आपल्याला समजेल त्या भाषेत त्याचे रूपांतर केल्याशिवाय आपल्याला हा भाग समजणे अवघड जाऊ शकते. उदारणार्थ निफ्टी५० मध्ये वेगवेगळ्या सेक्टर मधील ५० स्टॉक यांचा समावेश असतो. जर निफ्टी५० ला किंमत वाढवायची असेल तर त्यासाठी त्या निफ्टी च्या ५० स्टॉकची किंमत वाढली पाहिजे म्हणजेच काय तर निफ्टी५० हा Derivative आहे आणि त्यातील स्टॉक हे Underline Asset. निफ्टी50 च्या Derivative मध्ये निश्चित वेळेसाठी केलेली गुंतवणूक म्हणजे फ्युचर्स आणि ऑपशन. वेगेवगळ्या Commodities, Stock, Currency, index याचीच उदाहरणे आहेत. 

समजलं का? लेख आवडला तर follow करा हवं तर शेयर करा म्हणजे ही माहिती अनेक लोकांपर्यत पोहचवू शकू. करणार ना?

फ्युचर्स आणि ऑपशन यामध्ये गुंतवणुकदारांची जोखीम जास्त असते म्हणूनच की काय कोणत्याही Derivative ला ह्या प्रकारात ट्रेड होण्यासाठी काही पात्रता पूर्ण कराव्या लागतात त्याशिवाय त्यांना FnO मध्ये दाखल होता येत नाही म्हणूनच सगळेच स्टॉक यात असतातच असे नाही. 

Derivatives चे मूळ चार प्रकार असतात ज्यातील फक्त Future आणि Option या दोन प्रकारात ट्रेंडिंग केली जाते उरलेल्या Forward आणि Swap या दोन प्रकारात ट्रेंडिग केली जात नाही. Future, option यामध्ये जोखीम असतेच पण forward आणि swap यापेक्षा कमी म्हणूनच गुंतवणूकदारांचे हित सांभाळण्यासाठी, जास्त नुकसान होऊ नये, फसवणूक होऊ नये म्हणून Forward आणि swap यामध्ये ट्रेंडिंग होत नाही. याचा अर्थ Futures आणि option यामध्ये जोखीम नसते असा काढू नका,यामध्येही कमालीची जोखीम असतेच. 

Future and Option यामध्ये ट्रेंडिंग करण्याचे कमालीचे साम्य असले तरी या दोघांतील फरक खालील व्याख्या समजून घेतल्यास तुम्हाला सोपे वाटेल

An option gives the buyer the right, but not the obligation, to buy (or sell) an asset at a specific price at any time during the life of the contract. A futures contract obligates the buyer to purchase a specific asset, and the seller to sell and deliver that asset, at a specific future date.

शब्दशः भाषांतर केल्यास आपल्याला समजेल की ऑपशन खरेदीदाराला कराराच्या कालावधीत कोणत्याही वेळी विशिष्ट किंमतीवर मालमत्ता खरेदी (किंवा विक्री) करण्याचा अधिकार देतो, परंतु बंधन नाही. फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट खरेदीदाराला विशिष्ट मालमत्ता खरेदी करण्यास आणि विक्रेत्याला भविष्यातील विशिष्ट तारखेला ती मालमत्ता विकण्यास आणि वितरित करण्यास बाध्य करते.

बंधनकारक असणे आणि नसणे हा एकमात्र फरक सोडला तर Future असो की Option ट्रेंडिंग यात फरक नाही पण हा फरक खूप लक्षात घेणे गरजेचे

आता आपण Option या ट्रेंडिंग प्रकारची अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करू

Option treding म्हणजे नक्की काय? हे वरील व्याख्येवरून आपल्याला लक्षात आले असेलच. 

Option treding चे दोन प्रकार 1. Call Option 2. Put option बर ह्या प्रत्येक प्रकारचे परत दोन पार्टी / गट पडतात

Call option चे Call Buyer आणि Call Seller तसेच
Put option चे Put Buyer आणि Put Seller असे पार्टी / गट असतो.

खरेदी करणार म्हणजे विक्रेता असणार आणि विक्रेता असणार म्हणजे खरेदीदार असणार म्हणूनच कॉल असो की पुट त्यामध्ये दोन गट/ पार्टी असतातच अन्यथा व्यवहार पूर्ण कसा होणार?

आजच्या लेखात आपण ह्या प्रत्येक प्रकारची माहिती घेणार आहोत आणि जर तुम्ही सगळ्यांनी ह्या लेखाला अमाप प्रसिद्धी दिली तर Future's बद्दलची माहिती तुमच्यापुढे मांडण्याचा मी प्रयत्न करेल. हे सगळं लिहण्यासाठी, माहिती गोळा करण्यासाठी, चुकीची माहिती तुम्हाला न देण्यासाठी बरीच मेहनत लागते आणि ह्या मेहनतीसाठी तुमचे एक लाईक,रिट्विट, follow याची अपेक्षा करणे चुकीचे नाही ना? तुमची आवड निवड आणि माझी मुद्दे मांडण्याची,विषय घेण्याची पद्धत योग्य की अयोग्य तेही मला तुमच्या प्रतिक्रिया वाचून समजत राहील त्यामुळे कृपया आपल्या साथीची गरज आहे. असो मूळ विषयाकडे परत येऊ.

★ कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन म्हणजे काय? दोन्हीमध्ये काय फरक आहे?

कॉल ऑप्शन धारकाला स्टॉक विकत घेण्याचा अधिकार देतो, हा भविष्यातील तारखेला निश्चित किंमतीवर परंतु आज ठरलेल्या किंमतीवर अंतर्निहित मालमत्ता किंवा करार खरेदी करण्याचा अधिकार आहे. दुसरीकडे, पुट ऑप्शन धारकाला स्टॉक विकण्याचा अधिकार देतो, हा भविष्यातील तारखेला निश्चित किंमतीला परंतु आज ठरलेल्या किंमतीवर अंतर्निहित मालमत्ता किंवा करार विकण्याचा अधिकार आहे.

थोडस किचकट वाटत असले तरी वरील उतारा शांतपणे एक दोन वेळा वाचला तरी कॉल आणि पुट यातील फरक तुमच्या लक्षात येईल याची मला खात्री आहे.

ऑपशनचा पहिला प्रकार म्हणजे कॉल (Call) उदाहरणातून शिकण्याचा प्रयत्न करू

समजा तुम्हाला एखादा गाळा विकत घ्यायचा आहे. गावात शहरात एखाद्या रिकाम्या जागी व्यावसायिक संकुल उभारणार असल्याची बातमी तुम्हाला आहे अश्या वेळी तुम्ही तिथं जाता आणि गाळ्याची किंमत 25 लाख रुपय असल्याचे तुम्हाला समजते आणि तो किमान 2 वर्षात तयार होऊन तुमच्या हातात येणार आहे. करार मान्य असेल तर बुकिंग करण्याची किंमत 50 हजार रुपये असेल पण ही किंमत भरल्यावर परत मिळणार नाही अशी बोली असते. तुम्ही 50 हजार रुपय देऊन तो गाळा बुक करता अचानक काही दिवसांनी ह्या व्यापारी संकुलाची बातमी खूप प्रसिद्ध होऊन गाळ्याची किंमत 35 लाख होते. कराराची मुदत संपल्यानंतर हातात मिळणारा गाळा याची किंमत गुंतवलेल्या रक्कमेच्या कैक पटीने जास्त असते शिवाय गाळ्यांना मागणी जास्त असल्याने तो विकून अजून नफा कमावला जाऊ शकतो

हे साधे उदाहरण म्हणजे दुसरे तिसरे काही नाही कॉल ऑपशन आहे. 

● बुकिंग केलेली किंमत म्हणजे Premium

● गाळ्याची किंमत म्हणजे Strike Price

● गाळा मिळण्याची मुदत 2 वर्ष म्हणजे Expiry Date

● गाळ्याची भविष्यातील किंमत म्हणजे Spot price

वर उल्लेख केलेले उदाहरण आणि वस्तुतः शेयर मार्केट मध्ये होणारे ऑपशन ट्रेंडिंग यामध्ये फरक असला तरी मुद्दा समजण्यासाठी हे उदाहरण आहे हे लक्षात ठेवा

कॉल बायर (Call buyer ) मध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे

° स्टॉक मार्केटमध्ये भविष्यात होणारी वाढ हा अभिप्रेत असते म्हणजेच Call buyer प्रकारचा ट्रेड घेण्यासाठी बाजार Bullish असावा लागतो 

ज्यामुळे छोटासा प्रीमियम देऊन आपण एखादा Derivatives चा लॉट खरेदी करून Underline Asset ने वेगाने प्रगती करावी अशी इच्छा गुंतवणूकदार करत असतो. कॉल बायरमध्ये

नुकसान मर्यादित पण नफा अगणित असू शकतो. 

कॉल सेलर (Call seller) मध्ये 

° स्टॉक मार्केटमध्ये भविष्यात होणारी पडझड अपेक्षित असते म्हणजेच कॉल सेलर प्रकारात बाजार Bearish किंवा sideways असावा अशी अपेक्षा केली जाते. कॉल सेलरमध्ये स्टोकची किंमत घसरावी अशी अपेक्षा केली जाते ज्यात

फायदा मर्यादित पण नुकसान अमर्याद असते

अजून जास्त कॅलिअरिटी साठी आपण स्टॉक मार्केटच्या उदाहरणातून Call buyer आणि Call seller ह्या संकल्पना समजावून घेण्याचा प्रयत्न करू

समजा तुम्ही ABC कंपनीचा ₹ 800 चा Call ₹20 प्रमाणे लॉट साईज 500 शेयर महिनाभराच्या मुदतीसाठी घेतले तर तुम्हाला गुंतवणूक करावी लागणारी एकूण रक्कम 500x20= 10000 रुपये इतकी असणार आहे.समजा मुदत संपल्यावर ABC कंपनीचा शेयरची किंमत  ₹900 असेल तर खरेदी आणि विक्री करताना शेयरच्या किमतीतील फरक हा तुमचा नफा असणार आहे.   ₹ 20 प्रीमियम आधीच दिल्याने खरेदी किंमत ₹820 असणार आहे. मुदतीनंतर विक्री केलेला शेयर ₹900 वजा खरेदी किंमत ₹820 म्हणजे तुमचा नफा प्रति शेयर ₹80 आहे. असे तुमच्याकडे 500 शेयर असल्याने एकूण नफा ₹40000 असणार आहे

समजा शेयरचा भाव न वाढता कमी झाला म्हणजेच ₹800 पेक्षा कमी झाला किंवा तो ₹600 जरी झाला तरी तुमचे नुकसान केवळ तुम्ही प्रीमियम खरेदी करण्यासाठी लावलेले रक्कम इतकेच असणार आहे कारण कमी भाव झालेला हा शेयर तुम्हाला खरेदी करावाच लागेल असे करारात बंधन नसते अश्यावेळी फक्त प्रीमियम दिलेली रक्कम सोडावी लागेल

आता आपण पुट ऑपशन माहिती घेऊ 

समजा तुमच्याकडे चार चाकी गाडी आहे आणि अपघाताच्या भीतीने किंवा सरकारी नियम म्हणून तुम्ही जो गाडीचा इन्शुरन्स करता त्यातून पुट ऑपशन ही संकल्पना आपण समजून घेऊ शकतो

गाडीचा अपघात झाल्यास इन्शुरन्स चे 5 लाख रुपय मुदत 1 वर्ष पर्यत मिळणार आणि त्याचा प्रीमियम 15 हजार रुपय असेल असा करार गाडी मालक खरेदी करतो. अपघात विमा घेतल्यावर काही दिवसात किंवा मुदत संपेपर्यत कधीही गाडीचा अपघात झाला तुमच्या गाडीची अवस्था किंवा तिचे भंगाराची किंमत रुपय 50 हजार रुपय इतकेच होत असेल तर प्रीमियम घेतल्याची किंमत 15 हजार रुपय लक्षात घेता गाडीची अपघातांनंतरची किंमत अधिक इन्शुरन्स प्रीमियम याची वजावट करून तुम्हाला इन्शुरन्स कंपनीकडून जी किंमत 4लाख 35 हजार रुपय तुमचा नुकसानीमध्ये ही फायदा होऊ शकतो आणि हेच भविष्यातील अपघाताचा अंदाज बांधून त्यातून नफा मिळवण्याच्या पद्धत म्हणजे पुट ऑपशन अस म्हणतात. 

● घेतलेला इन्शुरन्स म्हणजे premium

● अपघात झाल्यावर मिळणारी रक्कम म्हणजे strike price

● इन्शुरन्स मुदत म्हणजे Expiry Date

● गाडीची भविष्यातील किंमत म्हणजे Spot price


वरील उदाहरण ढोबळमानाने पुट ऑपशन कसा चालतो हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे

पुट बायर हा प्रकार कॉल बायर प्रकराच्या विरुद्ध तर पुट सेलर हा कॉल सेलर च्या विरुद्ध काम करते.

म्हणजेच पुट बायर स्टॉक मार्केट पडझडीच्या/ घसरणीचा काळात ऍक्टिव्ह असतो. स्टॉक मार्केट bearish असेल त्यावेळी पुट बायर तर स्टॉक मार्केट sideways किंवा bullish असेल तर पुट सेलर मार्गाने नफा कमवता येऊ शकतो.

पुट बायर मध्ये नफा अमर्याद तर तोटा मर्यादित असतो

तर पुट सेलर मध्ये नफा मर्यादित आणि तोटा अमर्याद असतो

वर दिलेल्या साध्या उदाहरणातून तुम्हाला ऑपशन ट्रेडिंग प्रकारातील कॉल ऑपशन आणि पुट ऑपशन हा प्रकार समजला असेलच अशी खात्री बाळगणे मूर्खपणाचे असले तरी ऑपशन ट्रेडिंगची एकंदरीत रूपरेषा, स्वरूप तुमच्या लक्षात आले असावे असा अंदाज व्यक्त करून आता थांबतो

बहुतांश लोकांना थोडी रक्कम आणि कमी कालावधीत जास्त नफा कमवायचा असतो आणि हीच लोकांची गरज स्टॉक मार्केट आणि ऑपशन ट्रेंडिंग पूर्ण करत असाल तरी आपण हे विसरता कामा नये नाहीतर करायला गेलो गणपती पण झाला मारोती अस व्हायला वेळ लागणार नाही त्यामुळे लेखातील माहिती केवळ आणि केवळ प्राथमिक शिक्षण आहे, ऑपशन ट्रेंडिंग याची केवळ तोंड ओळख आहे असं समजावं.

ट्रेंडिंगममध्ये खूप अभ्यास, अनुभव घेतल्याशिवाय ट्रेडिंग करायला जाऊ नका

Most Important : Options involve risks and are not suitable for everyone. Options trading can be speculative in nature and carry a substantial risk of loss.

सर्वात महत्त्वाचे : ऑपशनमध्ये जोखीम असते आणि ते प्रत्येकासाठी योग्य नसतात. ऑप्शन्स ट्रेडिंग हे सट्टा स्वरूपाचे असू शकते आणि त्यात नुकसानाचा मोठा धोका असतो

आपल्या प्रतिक्रियांची, प्रेमाची वाट पाहतोय हे विसरू नका. 


• • •
xxx
असो. लेख आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्या प्रतिक्रियाची अपेक्षा असेच लेख वाचण्यासाठी follow करा.
ट्विटर @pincode410501
ब्लॉगर पोस्ट diarynotes137.blogpost.com
डेलीहंट @cm_newsinformation



सी ए टॉपर

स्वभावाला औषध नाही कारण प्रत्येक व्यक्तीच्या एक स्वभाव असतो.स्वभाव म्हणजे त्याची वागण्याची, बोलण्याची किंवा निर्णय घेण्याची प्रक्रिया. प्रत्...