स्टॉक मार्केट बेसिकच्या पुढच्या भागात आपले स्वागत, मागील भागात आपण जगातील स्टॉक एक्सचेंज आणि त्याच्या कामाच्या वेळा याव्यतिरिक्त त्या एकमेकांवर अवलंबून कश्या असतात ते आपण जाणून घेतले. आज आपण स्टॉक मार्केट मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गटाबद्दल माहिती घेणार आहे.
सदरची माहिती ही केवळ आणि केवळ आपले सामान्य ज्ञान वाढण्यासाठी, स्टॉक मार्केटची ओळख व्हावी यासाठीच आहे आणि माहितीची सत्यता पडताळून पाहणे ज्यामुळे आपल्याला ह्या विषयातील अधिक माहिती मिळू शकते.
स्टॉक मार्केटमध्ये कंपनीच्या शेयरची देवाणघेवाण खरेदी विक्री द्वारे केली जाते, ह्याच शेयर किंवा समभाग खरेदी करणाऱ्यांना गुंतवणूकदार असे म्हंटले जाते. शक्यतो 50% शेयरची मालकी असणारा व्यक्ती वा संस्था ही त्या कंपनीची मालकी हक्क सांगू शकतो त्यामुळे शेयरच्या मालकी हक्क कोणकोणाकडे असतो ते आपण पाहू या.
स्टॉक मार्केट मध्ये शेयरच्या विक्रीतून कंपन्या बिगर व्याजी रक्कम जमा करून ती रक्कम आपला व्यवसाय मोठा करण्यासाठी वापरत असतात. स्टॉक मार्केट मध्ये लिस्ट होण्यासाठी कंपनीने किमान 25% शेयर/समभाग विकणे क्रमप्राप्त असते अश्यावेळी कंपनीची मालकी असणारा व्यक्ती, गट कमीत कमी 75% शेयर स्वतःकडे ठेवू शकतो.
प्रमोटरनंतर सामान्य वैयक्तिक गुंतवणूकदार म्हणजेच छोटे मोठे तुमच्या आमच्यासारखे लोक रोख रक्कम देऊन जे शेयर विकत घेतात ते एका अर्थाने कंपनीच्या व्यवसायावर विश्वास ठेवून छोटा मोठ्या प्रमाणात कंपनीची मालकी विकत घेत असतात. कंपनी आपल्या प्रत्येक समभाग धारकाला वेळोवेळी कंपनीची आर्थिक ताळेबंद सांगण्यास बांधील असते. काही कंपन्या झालेला नफा आपल्या भागधारकांमध्ये वाटून देत असतात ज्याला डिव्हिडंट म्हंटले जाते पण हा झालेला नफा वाटावाच असा नियम नसतो. झालेला फायदा कंपनी व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी, कंपनीचे कॅपिटल म्हणजेच मशीन, जागा वा अन्य ठिकाणी वापरण्यास मुक्त असतात.
प्रमोटर आणि सामान्य गुंतवणूकदार यांच्यानंतर म्यूचुअल फंड आणि इन्शुरन्स कंपन्या यादेखील स्टॉक मार्कट मध्ये कंपन्याचे समभाग विकत घेण्यात अग्रेसर असतात. म्यूचुअल फंड म्हणजे असे तज्ञ गुंतवणूकदार असतात जे लोकांनी दिलेली रक्कम योग्य ठिकाणी गुंतवणूक करून लोकांची मुद्दल वाढवून देण्याचे काम करत असतात. म्यूचुअल फंड मध्ये गुंतवणूक करणारे व्यक्ती शक्यतो स्टॉक मार्केटच्या चढ उताराची जोखीम किंवा स्टॉक मार्केटचे कमी ज्ञान यामुळे गुंतवणुकीचा सोप्पा मार्ग म्हणून म्यूचुअल फंडमध्ये गुंतवणूक करत असतात. तज्ज्ञांच्या स्टॉक मार्केटमधील ज्ञानाचा फायदा घेऊन फायदा मिळवणे यासाठी हा कमी जोखीम असलेला पर्याय असतो. म्यूचुअल फंड लोकांचे पैसे गुंतवणूक करून त्यातून स्वतः देखील फायदा मिळवत असतात तसेच हा फायदा लोकांची गुंतवणूक वाढवुन परतावाही देत असतात.
इन्शुरन्स कंपन्या यांच्याकडे इन्शुरन्स च्या हप्त्याच्या रूपाने खूप मोठ्या प्रमाणात येणारा पैसा स्टॉक मार्केटमध्ये लावलेला असतो. प्रमोटर, सामान्य गुंतवणूकदार, म्यूचुअल फंड, इन्शुरन्स कंपन्या याखेरीज नॉन इन्स्टिट्यूट संस्था ह्या देखील स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास अग्रेसर असतात.
वर उल्लेख केलेल्या गुंतवणूकदाराशिवाय तुम्ही FII आणि DII ही नावे बऱ्याच वेळा न्यूज चॅनेल किंवा स्टॉक मार्केटचे ज्ञान असणाऱ्या लोकांच्या तोंडात ऐकले असणार. आता आपण ह्या दोन प्रकारच्या गुंवणूकदाराबद्दल थोडीशी माहिती घेऊया
FII म्हणजे फॉरेन इन्स्टिटय़ूयशनल इन्व्हेस्टर. विदेशी संस्थागत गुंतवणूकदार (FIIs), अनिवासी भारतीय (NRIs), आणि भारतीय वंशाच्या व्यक्ती (PIOs) यांना पोर्टफोलिओ गुंतवणूक योजनेद्वारे (PIS) भारतातील प्राथमिक आणि दुय्यम भांडवली बाजारात गुंतवणूक करण्याची परवानगी आहे तसेच देशाबाहेरील जगातील लोकांनी केलेली गुंतवणूक म्हणजे FII होय. व्यवसायाच्या आणि गुंतवणूकदार याच्या गुंतवणूक सुरक्षा राहावी म्हणून जास्तीत जास्त 24% समभाग खरेदी करण्याची परवानगी असते ज्यामुळे त्यांना प्रमाणापेक्षा जास्त गुंतवणूक करून व्यवसाय हस्तगत करण्यापासून तसेच मोठ्या प्रमाणात खरेदी वा विक्री केल्याने स्टॉक मार्केट मध्ये तेजी किंवा मंदी आणण्यास मज्जाव व्हावा म्हणूनच हा नियम असतो.
गुंतवणूकदारांचा शेवटचा प्रकार म्हणजे DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिटय़ूयशनल इन्व्हेस्टर.ज्या पद्धतीने जगातील इन्स्टिटय़ूयशनल इन्व्हेस्टर समभाग विकत घेतात तसच देशांतर्गत इन्स्टिटय़ूयशनल इन्व्हेस्टर यांनी स्टॉक मार्केट मध्ये केलेली गुंतवणूक म्हणजे DII
अश्याप्रकारे आज आपण गुंतवणूकदारांचे वेगवेगळे प्रकार, गुंतवणूक करण्यास असलेले नियम अटी यांची थोडक्यात माहिती घेतली आहे. असाच एखादा दुसरा विषय घेऊन तुमच्यापुढे लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न असेल. तुम्हाला काही शंका, प्रश्न असतील तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा. पुढच्या लेखापर्यत माझा रामराम......
• • •
xxx
असो. लेख आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच लेख वाचण्यासाठी follow करा.
ट्विटर @pincode410501
ब्लॉगर पोस्ट diarynotes137.blogpost.com
डेलीहंट @cm_newsinformation
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा