महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवरील माझं मत
पक्षाचे नाव आणि चिन्ह गोठवल्यानंतर भगवा झेंडा जो जाज्वल्य हिंदुत्व, ज्ञान, त्याग,बलिदान आणि हिंदू सांस्कृतिक धार्मिक महत्व असलेले प्रतीक आहे ते मूर्ख, बेअक्कल राजकारण्यांना वापरण्यास बंदी, मज्जाव घातला पाहिजे.
नवीन चिन्ह, नाव शोधण्याची मोहीम चालू झाली असेल अश्यावेळी वाघ, जुन्याच नावपुढं किंवा मागे काहीतरी नाव टाकून ते निवडणूक आयोगाकडून मान्य करण्याची तयारी चालू असलेल्या बातम्या यायला सुरुवात झाली आहे त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून माझा बाप, बाप चोरला सारखी बोंब ठोकणाऱ्याना बापाचा
इतकाच पुळका असेल तर बापाच्या नावाचा पक्ष #ठाकरेसेना #बाळसेना हे नाव आणि बापाचे सगळ्यात मोठे हत्यार #लेखणी किंवा कुंचला ही पक्षाचे चिन्ह म्हणून वापरण्यास समर्पक असल्याने त्या नावाचा आग्रह ते चौकोनी कुटुंबातील त्रिकोण घेईल का? राजकारणातील दूरदृष्टी, अजेंडा केवळ सत्ता आणि खुर्ची असेल तर नाव काहीही असले तरी त्याची ओंजळी रिकामीच राहणार हे जवळपास पक्के आहे पण केवळ सत्ता, खुर्ची, प्रकाशझोतात राहण्याची सवय, स्वतःचे स्वार्थ साध्य करण्यासाठी मागे पुढे फिरणारी लोक, तो लवाजमा, थाट मिळवण्यासाठी औकात नसताना पक्ष परत उभा करण्याचा अयशस्वी प्रयत्न नक्की होणार त्यासाठी गोचीड जशी जगण्यासाठी कुत्र्याच्या शरीराचा आसरा घेतो तस इन मिन साडे तीन जिल्ह्यात ज्याची हुकमुत चालते त्याची मदत घेईल यात शंका वाटू देऊ नका तरीही येणारे अपयश त्या माणसाची अपरिपक्व बुद्धी, कर्तुत्वशून्यता सिद्ध करेल. राज ठाकरे याने स्वतःच्या जीवावर पहिल्या निवडणुकीत जेवढे आमदार निवडून आणले त्याच्या निम्मे आमदार जर ह्या माणसाच्या नेतृत्वात जिंकले तर ते एक अजोड आश्चर्य म्हणून जगात नोंदवले जाईल. आता नाण्याच्या दुसऱ्या बाजू शिंदे गटाकडे लक्ष देऊ, मुळात अकार्यक्षम नेतृत्वाला, अहंकारी वागण्याला कंटाळून वेगळा झाला हे सत्य सर्वश्रुत आहे. पक्षातून बाहेर निघतानाच भविष्यात होणाऱ्या सगळ्या संभावना यांचा अंदाज घेऊनच त्या गटाने काम केले असावे. पक्ष सोडल्यावर संख्येच्या आधारावर पक्ष, पक्ष चिन्ह याचा दावा असेल किंवा दुसऱ्या समांतर विचारधारेच्या पक्षाशी संगनमत करणे, भविष्यात नवीन पक्ष उभारणे, स्वतःची राजकीय कारकीर्द लांबवणे सारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे सापडल्यानंतरच बंडखोरी केली गेली असणार आहे. ज्यापद्धतीने मुख्यमंत्रीपदाचे बंद खोलीतील आश्वासने ह्याचे कारण पुढे करून युतीत निवडणूक लढल्यानंतर आपल्या मदतीशिवाय सरकार बनणे अवघड आहे हे लक्षात घेऊन स्वार्थी डाव खेळणाऱ्या,खंजीर पाठीत घुसवत अनैसर्गिक पक्षाशी आघाडी करून
युतीतील पक्षाला खडे चारले ह्या गोष्टीचा शेवट पक्ष समूळ नष्ट होईल, केला जाईल अस स्वप्नात सुद्धा कोणाला वाटले नसेल।चुकीला माफी नाही या तत्वावर देशातील सगळ्यात मोठा पक्ष असा कुटील डाव खेळून प्रेमात आणि युद्धात सारे क्षम्य असते याचा दाखला देऊन गेले.
मुळात पक्ष,संघटना कोणतीही असो
त्यांनी लोकांच्या भल्यासाठी काम करणे अपेक्षित असते मात्र राजकारणात लोकांच्या जीवावर लोकांची कामे करण्याच्या आश्वासनावर राजकारणी स्वतःचा स्वार्थ साधत असतात हे सत्य नाकारणे म्हणजे मूर्खपणा ठरेल. राजकारण, पक्ष, संघटना आली म्हणजे पैसा आला त्यामुळे भ्रष्टचार किंवा स्वतःच्या फायद्याचे
काम करण्याची कारस्थाने सगळेच करतात पण त्याच बरोबर देश, देशातील लोक याच्यासाठी झटण्याची वृत्तीदेखील हवी तीच वृत्ती कमाल राजकीय पक्षात नसल्याने देशात एकाच पक्षाचे राज्य दिसून येते आहे. त्यांच्यातही कमतरता असणार, उणिवा असणार पण त्याचे प्रमाण इतर भ्रष्ट,स्वार्थी पक्षांपेक्षा कमी किंवा अजून उघडे झालेले नसावे. हा राजकारणी चांगला तो वाईट अस काही नसतं, सगळे राजकारणी एका माळेचे मणी असल्याने लोकांनी वासरात लंगडी गाय शहाणी या तत्वावर आपल्या अमूल्य मताचे दान केले पाहिजे.
• • •
xxx
असो. लेख आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच लेख वाचण्यासाठी follow करा.
ट्विटर @pincode410501
ब्लॉगर पोस्ट diarynotes137.blogpost.com
डेलीहंट @cm_newsinformation
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा