तुमच्यातला एक, सर्वसामान्य, कष्टकरी, भरपूर फिरणारा, खूप वाचणारा, चवीने खाणारा, शेयर मार्केट आणि आजूबाजूला घडणाऱ्या घटनांना थोडस वेगळ्या नजरेने पाहणारा आणि शब्दातून व्यक्त होणारा, अभिमानी हिंदू ~ सनातन
सोमवार, ११ सप्टेंबर, २०२३
शेयर मार्केट बेसिक
बुधवार, १९ एप्रिल, २०२३
मीडिया की माफिया? बातम्यांचा स्वैराचार
बातम्यांचा स्वैराचार
@AjitPawarSpeaks जी मीडियाची जी शाळा आज घेतली त्यातून मीडिया काही शिकेल अस अजिबात वाटत नाही. देशातील वातावरण गढूळ करण्याचे श्रेय जितके राजकरणी दोषी त्यापेक्षा अधिक प्रमाणात माध्यम जवाबदार आहे. मीडिया स्वतःला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून घेण्यात जरी गोडकौतुक करत असले तरी बेजवाबदर वागणारा सगळ्यात मोठा गट म्हणजे हा 24 तास बातम्यांचे गुऱ्हाळ चालवणारी ही लोक. 24 तास काही ना काही बातमी दाखवणे हेच ज्याचे टार्गेट अश्यावेळी ही मीडिया स्वतःहून बातम्या तयार करते त्यात भर म्हणजे ते डिबेट शो ज्यात डिबेत कमी एकमेकांची उणिधुनी काढण्याचे काम जोरात चालू असते. कोणी पप्पू समर्थक असतात तर काही भक्त काही गुलाम तर काही सतरंजी उचले. महत्वाचे म्हणजे प्रत्येक चॅनेलवर एकदोन कट्टर धार्मिक नुल्ले आपल्या पंथाच्या चुकीच्या गोष्टीवर पांघरून घालण्याचे काम करत असतात. स्वतःच्या घरातील गु घाण लपवत दुसऱ्या धर्मातील गोष्टींवर बोट ठेवणारे हे नुल्ले आणि त्याची व्यवस्थित शाळा घेणारे काही हुशार लोकांचे टोळके दिवसभर चालू असतात. आजची मीडिया ही ब्रेकिंग न्यूजच्या विळख्यात अशी काही अडकली आहे की बातमी खरी की खोटी याची पडताळणी न करता, सूत्राचा हवाला देत पत्रकारिता स्वातंत्र्याचा मुबलक प्रमाणात फायदा घेताना दिसते. फुटकळ, रोखठोक अजित पवारांनी त्याच्या शेलकी भाषेत मीडियाची मस्ती उतरवली असली तरी ही जवाबदरीचे भान त्यांना येईल असे नाही. तुम्हाला कदाचित माहीत नसेल पण मनोरंजनाचे चॅनेल कमी पण न्यूज चॅनेल अधिक आहेत आणि ह्या लोकांची खरी मिळकत केवळ बातम्यांच्या मध्ये येणाऱ्या जाहिराती नसून पेंड वृत्तांकन, कोणत्यातरी पक्षाची तळी उचलून विरोधी पक्षावर तोंडसुख घेणे, बदनामी करणे हेच आहे. उद्धव ठाकरेंच्या काळात महाराष्ट्रात किंवा दिल्लीचा केजरीवाल सरकारी जाहिरात यातून सरकारी तिजोरी किती उधळतो ह्याचे आकडे पाहिल्यास भारतात इतके न्यूज चॅनेल का ह्याचे उत्तर सापडते. माईक आणि कॅमेरा घेऊन वाहेर पडणारी ही मंडळी इतके कामसू आहेत की दररोज न थकता 24 तास बातम्यांचे पीक घेत असतात आणि त्याच्या ह्याच कामसूवृत्तीमुळे संजय राऊत, नवाब मलिक सारखे विकृत लोक रोज सकाळी शौचालयात मोकळे न होता दररोज सकाळी टीव्हीवर तोंडातून घाण बाहेर काढत मोकळे होत असलेले कित्येक दिवस आपण पाहिले असेल. बर ते ज्या प्रकारची भाषा, शब्द वापरतात ती ऐकून लहानपणी रोज सकाळी सार्वजनिक नळावर होणाऱ्या बायकांच्या गलका, भांडण आणि हमरीतुमरी आठवल्याशिवात राहत नाही. विरंगुळा म्हणून ही भांडणे लहानपणी पाहताना मज्जा वाटायची पण ह्या नीच राजकारणी लोकांची वक्तव्य ऐकणाऱ्याच्या दिवसाची सुरुवात अशी होते की सामान्य माणूस कामाच्या ठिकाणीही त्याच भाषेत साहेबांच्या शिव्या दिवसभर खातो, त्याचा राग घरी आल्यावर कुटुंबावर देखील काढत असावा. बर हे चक्र इथेच संपले तर बरे पण नाही प्राईम टाइम वर येणारेटे संपादक चर्चा घडवण्यासाठी कमी आणि आग लावायला जास्त येतात अस वाटायला लागते. जगातील, भारतातील आणि परिसरातील माहिती घेण्याच्या ह्या सवयीमुळे न्यूज चॅनेल, राजकरणी याचे फावले आहे अश्या ह्या मीडियाला नियंत्रणात आणणे खरेच गरजेचे आहे आणि त्यासाठी काही वर्षांपूर्वी मीडियाने कसे काम करावे न करावे यावद्दल नवीन कायदा मोदी सरकारने आणला होता त्याचा बराच विरोध मीडियातील एका गटाने करून मोदीला कायदा मागे घेण्यास लावले होते हे बहुतांश लोक तर विसरली देखील असतील. होय कृषी कायदेच नाही तर मीडिया ने कसे काम करावे याबद्दलचा कायदा देखील मोदी सरकारला माघारी घ्यावा लागला होता पण आजच्या दिवसभर चाललेल्या अकल्पित बातम्या पाहून तो कायदा मीडियावर लादला का पाहिजे याचे उत्तर जनतेला मिळाले असेल नाही का? कोणतीही बातमी खरी नसताना, केवळ ठोकताळे, अंदाज यावर केली जाणारी ही पत्रकारिता किती धोक्याची ह्याची कल्पना राजकरणी आणि जनतेला आज आली असेल आणि मोदीने आणलेल्या त्या कायद्याची गरज देखील आह कळली असेल. सत्य, निरपेक्ष बातमी एकदा नाही तर दहादा तपासून सांगणे तर मीडिया विसरली आहे की काय अशी शंका येते. नक्की ही मीडिया की माफिया याबद्दल सामान्य जनमानसात संभ्रम असण्याची शक्यता आहे. कुप्रसिद्ध गुंड अतिकला नेणाऱ्या रस्त्यावर पाठलाग करणारी मीडिया, त्याला मुतताना दाखवणारी आणि त्याच्यावर झालेला खुनी हल्ला याची चित्रणे प्रसिद्ध करण्याचा मूर्खपणाचे काम मीडिया करते ते पाहून वाईट वाटते. आतंकवादी हल्ल्यात वरखा दत्त आणि इतर लोकांनी केलेले वार्तांकन पाहून त्याप्रमाणे पोर्किस्तान मध्ये टीव्हीसमोर बसून हल्ल्यात बदल करणारे आतंकवादी असतील किंवा अश्याच भ्याड हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या जवानांचे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले व्हिडीओ दाखवणारे गलवान खोऱ्यात घडलेल्या हल्ल्यातील चुकीच्या बातम्या असतील की बलात्कार झालेल्या मुलीची ओळख उघडी करणे यासारखी कित्येक पाप माफिया मीडियाने समर्थपणे स्वतःच्या खांद्यावर वाहिले आहे. पाश्चात्य देशात देखील मीडिया आहे पण भारतातील माफिया मीडिया इतकी स्वैर दुसरी कुठेही नसेल याबाबत मी तरी ठाम आहे. फ्रान्सच्या चार्ली हेबदो प्रकरणातील वृत्ताकन चाळून पहा, रक्ताचा एक थेंब की मेलेल्या माणसाचे एक शरीर त्या मीडियाने दाखवले नव्हते आयाबी याउलट आपली मीडिया, जितकं वाईट दाखवता येईल तितकं वाईट दाखवते. समाजात फूट पडेल असे कार्यक्रम करते. योग्य अयोग्य याचा सारसार विचार न करता काहीही बातम्यांच्या नावावर खपवणारी माफिया मीडियावर निर्बध हवेच अस तुम्हाला ही वाटते का हो? नक्की उत्तर द्या आणि जो कोणी जवाबदार व्यक्ती असे नियम बनवू शकतो त्याला हा थ्रेड टॅग करा म्हणजे कदाचित एक वेगळे मीडियाचे रूप आपल्याला पहायला मिळेल.
असेच लेख वाचण्यासाठी follow करायला विसरू नका आणि शेयर करायला तर अजिबात विसरू नका.
पुढच्या लेख तुमच्यासमोर सादर करेपर्यत माझा नमस्कार.
।।ॐ नमः शिवाय ।।
शुक्रवार, २४ मार्च, २०२३
राजकारण ह्याचे नाव
राजकीय व्यक्ती आणि #राजकरण यांचा स्तर कालही आणि आजही तळाशीच आहे. वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी केलेले राजकीय डाव वेळप्रसंगी मागे घेत राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू नसतो म्हणत मैत्री करायची असते. एक आमदार चुकून का होईना आज एक सत्य बोलून गेला की राजकीय लोकांचा समाज एकत्रच असतो वितुष्ट कार्यकर्त्यांमध्ये असते. कार्यकर्त्यांना कामाला लावण्यासाठी हेच राजकारणी डावावर डाव खेळत स्वार्थ साधत असतात. थिल्लर, बालिश टीका करण्यात पुढाऱ्यांचे तोंड बंद होऊ शकत नाही तसच पद, खुर्चीची ताकद हातात असणारे कायद्याला हाताशी घेऊन विरोधकांना गतिरोध निर्माण करतात. कायदा शिक्षा करतो पण कधी पाहिले आहे का पुढाऱ्यांना शिक्षा भोगताना? काही अपवाद सोडले तर तात्पुरत्या शिक्षेनंतर बेल, कायद्याच्या पळवाटा शोधून हे पुढारी परत आपले राजकरण खेळताना मैदानात दिसतात. कधी हा माघार घेतो तर कधी तो पण सत्तेची संगीत खुर्ची सदैव ह्याच दोघांकडे असते. खेळत ते दोघे असतात पण खेळवले जाणारे आपण असतो, सर्वसामान्य माणूस. ज्याच्या आयुष्यात मर मर काम करणे, कुटुंबाच्या गरजा भागवणे, कष्टातून विरंगुळा म्हणून मनोरंजनासाठी खेळ, चित्रपट आणि राजकरण यावर भाष्य करणे यापलीकडे त्याच्या हातात असतो तो मोठा घंटा. मुळात हात रिकामेच असतात पण त्या रिकाम्या हातात नसलेली घंटा असतेच. काबाडकष्ट करणारा सामान्य माणूस स्वतःच्या मर्जीने खर्च करताना दहादा विचार करतो कारण मिळकत मर्यादित असते पण राजकारणी यापेक्षा भिन्न कारण स्वतःला मिळणारी मिळकत, भत्ते, पेंशन ठरवण्याचा हक्क स्वतः त्याच्याच हातात असतो. एकीकडे आम्ही जनतेचे सेवक म्हणून घ्यायचे, समाजकारण करतो म्हणायचे आणि दुसरीकडे व्हाईट पैसे पगार पेन्शन मधून तर वाममार्गाने ब्लॅक मनी लाटत राहायचे ह्याचे काम. जनतेचे सेवक म्हणवणारे ही लोक दादा, भाई, साहेब असतात यापेक्षा मोठा विनोद दुसरा कुठे? लिहावं तेवढ थोडंच कारण शिक्षणाच्या डिग्री घेऊन दिवसभर काबाडकष्ट करणारा सामान्य एकावेळी एकच काम करतो पण राजकारणी मात्र एकाचवेळी गल्लीतला, गावातला, सहकारी संस्था, खाजगी संस्था, खेळ, बँका,राजकीय पक्ष आणि अजून काय नाही नाही त्या ठिकाणी काम करण्याचे, निर्णय घेण्याचे काम करतो. साधं शिपाई होण्यासाठी दहावी बारावीचे सर्टिफिकेट सामान्य माणसाला लागते पण राजकारणी होण्यासाठी मात्र शिक्षणाची अटच नसते. स्वतःची राजकीय कारकीर्द घडवण्यासाठी लोकांना लोकांशी भांडायला लावणारे, फायदा नुकसान याचा ताळेबंद लावून आरक्षण, नुकसान भरपाई देणारे हे पुढारी राजकारणात येतात तेव्हा रिकाम्या हाती येतात पण काही वर्षात कुबेराला ही त्याच्या घरी कामाला ठेवतात. पुढाऱ्यांत झालेला ह्या बदलाच्या विरुद्ध सामान्य माणूस खर्चाच्या डोंगराखाली कधी निम्मा तर कधी संपूर्ण बुडून जातो. सत्ता वा सत्तेच्या जवळ राहून राजकारणी सामान्य माणसाला खेळ खेळ खेळवतो. पूर्ण वेळ रिकामा असलेला हा राजकारणी क्षणांचा रिकामा नसतो. अडलेला, पडलेला, कधी स्वतःचे हित साधायला तर कधी कोणावर डुक काढणारा सामान्य माणूस राजकारण्यांच्या दाराचा उंबरा झिजवत असतो. स्वतःहून शिकार शिकाऱ्याचे तोंडात आपसूक पडत असते आणि शिकारी त्यावर ताव मारत असतो. वाचाळ राजकारणी हवे ते निरर्थक बोलतो, त्या बोलण्याची बातमी होते मीडियाच्या माध्यमाने देश,राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचले जाते पण ह्याच नेत्या, पुढाऱ्यांच्या, राजकारण्यांच्या विरोधात सामान्य नागरिक बोलला की कायद्याच्या, पैश्याच्या जोरावर त्याला धडा शिकवला जातो, त्याला मारहाण केली जाते, आयुष्यातून उठवले जाते. असो इतपर्यत वाचत आलाच असाल तर एक गोष्टीची खूणगाठ नक्की मनाशी पक्की करा की तुमची आवड निवड एखाद्या राजकरण्याशी असू द्या, पक्षाशी असू द्या पण त्या लोकांना आदर्श मानण्याचा, देवत्व पद देण्याची चूक करू नका. कितीही आदर्शवत असणारा नेता हा आदर्श असेलच असे नाही कारण राजकीय डाव करणे हे त्याच्या रक्तात भिनलेले असते. कार्यकर्त्यांनो सजग व्हा रे......
हे इतकं लिहलेले का तुम्हाला माहित नाही तरीही मूर्खासारखं लिहतोय कारण मनात आलेले हे एकटा मीच विचार करत का खुडत बसावं म्हणून तुम्हाला ऐकवतोय. झालाच तर थोडा त्रास तुम्हालाही व्हायला पाहिजेच की कारण जे घडतंय त्याला जवाबदार आपण दोघेही समान भागीदार आहोत हे लिहताना एकदम मला क्रांतिवीर चित्रपटातील नाना पाटेकर आठवला. का सांगतोय मी हे तुम्हाला, का बरळतोय मी हे सर्व काही असा फील येऊन गेला. असो असाच अनुभव तुम्हाला यावा म्हणून ह्या लिंकवर क्लिक करा हवे तर
https://youtu.be/vfYJUHw5c70
असेच ब्लॉग वाचण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
https://diarynotes137.blogspot.com
लेख आवडला तर लाईक करा, शेयर करा. पुढचा लेख घेऊन येईपर्यत तुम्हा सर्वांना माझा नमस्कार.
।।ॐ नमोः नारायणाय नमः।।
।।ॐ नमोः भगवते वासुदेवाय नमः।।
।।ॐ नमः शिवाय।।
बुधवार, २२ मार्च, २०२३
सनातन भाग ६ : नटराज
गुरुवार, ९ मार्च, २०२३
हटके अलोन चित्रपट
शनिवार, २५ फेब्रुवारी, २०२३
सनातन भाग ५ : विठ्ठल
शुक्रवार, २४ फेब्रुवारी, २०२३
सनातन भाग 4 भगवद्गीता
सनातन भाग चार.
लवजिहाद असेल की प्रेम प्रकरणे हे जातीबाह्य विवाह याचे मूळ कारण चित्रपट, आधुनिक जीवन किंवा पालकांचे दुर्लक्ष हे कारण आहेच शिवाय हिंदूंनी आपल्या घरात, घराबाहेर हिंदू संस्कृती, धर्मग्रंथ याचे अनुकरण बंद केल्याने आपला सनातन हिंदू धर्माची शिकवण मुलांमध्ये प्रवाहित होत नाही.समजा जर भगवद्गीतेसारखा प्राचीन पुरातन धार्मिक ग्रंथ याचा थोडा जरी हिंदूंनी घरात वाचला असता तर कदाचित मुलांची मानसिकता आज जशी आहे तशी राहिली नसती. दुसऱ्या पंथाची लोक कट्टर असण्याची आणि हिंदू तसे नसण्याचे कारण धर्मग्रंथांना घरात नसलेले स्थान हेच आहे. पटत नाही ना? मग पुढे वाचाच
भगवद्गीतेचा पहिला अध्याय अर्जुनविषादयोग म्हणजे युद्धाला सुरुवात होण्याआधी रणांगणात आपल्याच रक्ताचे भाऊ, आप्त, गुरू, नातेवाईक याच्याविरुद्ध युद्ध करण्याची वेळ आली त्यावेळी त्याचे हातपाय गळून पडले, अर्जुन भयभीत झाला, त्याला भयंकर दुःख झाले आणि पडलेले अनेक प्रश्न त्याने योगेश्वर श्रीकृष्णाना विचारू लागला. हेच प्रश्न भगवद्गीतामधील श्लोक, भगवद्गीता घरात शिकवली, बोलली गेली असती तर त्याचा परिणाम मुलांवर होऊन विवाह संस्था, धर्म जाती याचे महत्व मुलांना लहानपणीच कळले असते आणि मोठे झाल्यावर त्याचे अनुकरण ही
केले असते असा माझा तरी समज आहे. हा सगळेच नाही पण बहुतांश मुलांना लव जिहाद, धर्म किंवा जाती बाहेर प्रेम वा लग्न न करण्याचे कारण कळले असते अस मला वाटते. काही प्रगत झालेल्या, विकसित, पाश्चात्य देशाची संस्कृती, वैयक्तिक आयुष्य, खुलेपणाचा स्वीकार करणाऱ्यांना कुंपण वाटेल पण त्या वाटण्यापेक्षा धर्माने कसे वागावे, योग्य अयोग्य याची ओळख लहानपणीच झाली असती. म्हणूनच मी तुम्हा सर्वांना आवाहन करेल की आता तरी आपल्यात बदल घडवा, सजग व्हा कारण हिंदू म्हणून असलेली ही ओळखच माणसाला माणूस म्हणून जगण्यास मदत करते. दिवसातील अर्धा तास, एक एक श्लोक असे ध्येय ठेवले तरी घरातील अबालवृद्ध मध्ये अध्यात्मिक जागृती तुम्ही करू शकता त्यासाठी आता तुम्हाला कोण्या गुरुची गरज आहे असे नाही. हातातील हा मोबाईल ज्यावर तासनतास बिभस्य रील पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा एखादे भगवद्गीता अँप, youtube वरील भगवद्गीता विश्लेषण व्हिडीओ यातूनही ज्ञान घेता येऊ शकते. आता तुम्हाला वर दिलेले मुद्दे भगवद्गीतेत आहे हेच माहीत नसेल. मुळात आयुष्यात पडणारे कोणतेही प्रश्न याचे उत्तर गीतेत आहे असं साधू संत म्हणून गेलेत ते काही उगीच नाही. अर्जुनाला पडलेले प्रश्न श्रीकृष्णांना विचारात असताना त्याने उपस्थित केलेले हे प्रश्न आणि त्याची मीमांसा यासाठी आजचा हा थ्रेड. उदारणार्थ अध्याय एक श्लोक 38 ते 43 याची माझ्या बौद्धिक पातळीवर मीमांसा मी करतो आहे.ज्याची माहिती तुम्ही स्वतः स्वतंत्र पद्धतीने नक्की करा असंही मी सांगू इच्छितो. चला ह्या ब्लॉगमुळे गीतेचा पहिला अध्याय
अर्जुनविषादयोग आहे हे आज भरपूर लोकांना समजले असेल. जोडलेल्या स्क्रिन शॉट मधील हे श्लोक अर्थ असा आहे की अति लोभामुळे बुद्धी भ्रष्ट झालेल्याना कुळाचा (कुटुंब वा वंश) नाश होण्यामुळे निर्माण होणारे दोष व मित्राशी वैर केल्याचे पाप दिसत नसले तरी बुद्धी नितीमत्तेने वागणाऱ्या लोकांनी तरी लाभापासून दूर का राहू नये. कुळाचा नाश झाला तर परंपरागत कुळधर्म नष्ट होतो आणि कुळधर्म नष्ट झाला तर मोठ्या प्रमाणात पाप वाढण्यास मदत होते. पाप वाढल्याने कुळातील स्त्रिया बिघडतात. कुळात वर्णसंकर उत्पन्न होतो ( वर्णसंकर म्हणजे भिन्न जातीच्या स्त्री पुरुषाच्या जवळ आल्याने जन्मणारी व्यक्ती) वर्णसंकरामुळे कुळाचा नाश होतो, नरकात ढकलतो. वर्णसंस्कारामुळे परंपरागत जातीधर्म आणि कुळधर्म उधवस्थ होतात. एकदा का कुळधर्म नष्ट झाला तर अनिश्चित काळासाठी नरकात रहावं लागते.
असा शब्दशः अर्थ आहे. समजा भगवद्गीता घराघरात शिकवली गेली असती तर लहानपणीच पाल्याना कुळ म्हणजेच वंश, धर्म,जाती याची माहिती मिळाली असती ह्या माहितीच्या आधारे जगात घडणारे लव जिहाद सारख्या प्रकारात न अडकण्याचे शिक्षण लहानपणीच समजले असते तसे संस्कार त्याच्यावर झाले असते. मुलगा असो की मुलगी यांना जातीबाह्य विवाह चुकीचे असतात त्यामुळे दोष निर्माण होऊ शकतात हे बाल्यवयातच कळल्याने तरुणपणात प्रेम प्रकरणे, जाती बाहेर लग्न यासारखे प्रश्नच उद्भवले नसते का? पण हिंदूंनी चार पुस्तक शिकून धर्मग्रंथांना बाजूला सारले ज्यामुळे संस्कृती मुलापर्यत पोहचत नाही आणि जे व्हायला नको ती पावले मूल तरुणपणात घेतात. काहींना जे वाचतोय ते खटकेल, संकुचित वाटेल, चुकीच्या वाटतील पण ज्या पालकांच्या मुलीचे 40 तुकडे करून फ्रीज मध्ये ठेवले जातात किंवा मुलींना प्रेमाच्या खोट्या जाळ्यात अडकवून त्याचा उपभोग करून सोडून दिले जाते त्या पालकांना किंवा ज्यांनी असे प्रसंग जवळून घडलेले पाहिले त्यांना अर्जुनाने मांडलेले मुद्दे चुकीचे वाटतील का हो? भले आज आपण जाती व्यवस्था मानत नसलो, प्रगत पुढारलेले झालो असेल तरी जवळच्या व्यक्तीचे असे आंतरजातीय विवाह कपाळावर आठ्या निर्माण करतात की नाही. भले असे विवाह झाल्याने नरकात अनिश्चित काळासाठी अडकणार नाही पण आयुष्याचाच नरक झाला तर? माझा उद्देश गीतेतील श्लोक सांगून, जातीभेद, धर्म, आंतरजातीय विवाह, आजची जगण्याची पद्धत यावर बोट ठेवायचे नाहीच मुळी. कसे वागायचे हे ज्यांनी त्यांनी ठरवायचे आहे पण जर आपण आपल्या धर्मीक ग्रंथांना जवळ घेतले, त्याचा अभ्यास केला,घरात चर्चा केली तर नैतिकता, सभ्य असभ्य वर्तन, समाजात वावरण्याचे पद्धत यांचे सामान्य ज्ञान मुलाना देऊ शकू याची खात्री वाटते. प्रसंग बेतल्यावर त्याचे गांभीर्य समजण्यापेक्षा ते आधीच समजले तर वाईट कुठे आहे. जीवापाड प्रेम असणाऱ्या आपल्या जवळच्या लोकांचे भले व्हावे, आयुष्यभर त्यांनी सुखात रहावे यासाठीच झटत असतो ना आपण मग हा छोटासा बदल केवळ धार्मिक नाही तर कौटुंबिक स्वास्थ सुधारणा करेल अस मला वाटत. भगवद्गीतेचा मी काही खूप मोठा अभ्यासक नाही कदाचित छोट्या तोंडी मोठा घास घ्यावा तसा उपदेश द्यायचा मला काहीच अधिकार नाही पण समाजातील आजची परिस्थिती पाहता हिंदूंना जागृत करण्यासाठी, धर्माशी जोडण्यासाठी भगवद्गीता हा धार्मिक ग्रंथ खूप मोठे काम करू शकतो अस मला वाटले. गेल्या दोन तीन महिन्यांपासून मी स्वतः पहिलाच अध्याय समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. आपणच आपले धार्मिक ग्रंथांना जवळ करणार नाही तर कोण करणार. भले त्यातल्या सगळ्याच गोष्टी पटणार नाही पण काही तर पटतील. आज पाहिल्यानंदा लेखाचा शेवट कसा करायचा हे समजत नाही आहे. कित्येकदा लिहलेले खोडुन परत लिहले पण शेवट काही जमेना पण कुठं तरी थांबावे लागेल त्यामुळे हिंदूंनो भविष्यकाळातील धोके ओळखून सजग व्हा, संघटित व्हा ह्या माझ्या पेटंट डायलॉग मारून विश्रींती घेतो. पुढचा लेख येईपर्यत
।।ॐ नमोः नारायणाय नमः।।
।।ॐ नमोः भगवते वासुदेवाय नमः।।
।।ॐ नमः शिवाय।।
सी ए टॉपर
स्वभावाला औषध नाही कारण प्रत्येक व्यक्तीच्या एक स्वभाव असतो.स्वभाव म्हणजे त्याची वागण्याची, बोलण्याची किंवा निर्णय घेण्याची प्रक्रिया. प्रत्...
-
९० च्या काळात एड्स आणि एड्सबद्दलची जनजागृती यामुळे टीव्हीवर कंडोमच्या जाहिराती सर्रास दिसत असल्याच्या. बलवीर पाशा कौन है ते मादक...
-
Afghanistan played well अस म्हणत हरलेल्या संघाचे मनोधैर्य वाढवण्यासाठी बोलणारे अनेक पुढे येतील पण त्या शब्दांनी खरच काही बदलणार ...
-
स्वभावाला औषध नाही कारण प्रत्येक व्यक्तीच्या एक स्वभाव असतो.स्वभाव म्हणजे त्याची वागण्याची, बोलण्याची किंवा निर्णय घेण्याची प्रक्रिया. प्रत्...