हटके चित्रपट म्हंटल की सगळ्यात पहिले लक्षात येणारे नाव म्हणजे पुष्पक
पुष्पक चित्रपटात एकही संवाद प्रमुख कलाकार बोलताना दिसत नाही. पूर्वीच्या काळी संवाद रेकॉर्ड करण्याचे कसब नसल्याने मूक चित्रपट बनवले जायचे. प्रत्येक खेळाच्या वेळी कसलेले कलावंत लाईव्ह म्युझिक द्यायचे पण पुष्पक चित्रपटात मुद्दाम एकही संवाद न वापरता एक सुंदर चित्र प्रेक्षकाना दिला. चित्रपटात मुख्य कलाकार जरी मुके दाखवलेले असले तरी बॅकग्राऊंडमध्ये गर्दीचा आवाज,रेडिओवरील गाणी,बाजारातील गोंधळ हे आवाज होते.
कठीण परिस्थितीशी दोन हात करणारा सुशिक्षित बेरोजगाराला अचानक एके दिवशी एक श्रीमंत व्यक्ती नशेत रस्त्यावर भेटतो त्याला मदत करायला पुढे गेल्यावर त्याचे अपहरण करून काही दिवस श्रीमंतीचा अनुभव घ्यायचा धूर्त डाव नायकाच्या मनात येतो आणि त्यानंतर एकामागे एक असे प्रसंग घडतात की चित्रपट पाहणारा प्रसंगाच्या श्रुखलेत अडकून जातो त्यावेळी त्याला कोणत्याही संवादाची गरज पडली नसावी. हा चित्रपट म्हणजे एक मास्टर क्लासच होता हे वाचणारे कित्येक जण मान्य करतील.
दुसरा असाच हटके चित्रपट म्हणून माझ्या डोक्यात मराठी चित्रपट येतो तो म्हणजे बिनधास्त ह्या चित्रपटाचे हटकेपन म्हणजे सगळ्या महत्वाच्या भूमिका स्त्रियांनी केल्यात. यात पुरुष कलाकार आहेत पण पुरुष कलाकारांच्या तोंडी क्वचितच एखादा संवाद दिला गेला असावा. हा चित्रपट पाहणाऱ्या कित्येकांना तर हा हटके प्रयोग लक्षात आलाही असेल का अशी मनात शंका येते पण लिहले ते खोटे वाटत असेल तर नक्की या चित्रपट पहायला विसरू नका. दोन जिगरी मैत्रिणी, कॉलेज लाईफ, दोन गटातील वाद आणि एका रंगेल व्यक्तीचा खून असा रहस्यमय चित्रपट पुण्याच्या मंगला थिएटरमध्ये पाहताना मज्जाच आलेली. दोन मैत्रिणी एका खुनात अडकल्यानंतर त्यातून त्याची मैत्री सुलाखून बाहेर येते पण ह्या दोन मुलींना वास्तवाची जाणीव करून देण्यासाठीच एकीच्या आत्याने केलेला हा एक गंमतीचा डाव अनावधानाने वेगेळेच वळण घेतो. खून झालेल्या व्यक्ती, त्याचा आरोप त्या दोन मुलींवर येणे, स्वतःला निर्दोष दाखवण्यासाठी त्यांनी केलेला। प्रतिकार,खून झालेला इसम आणि त्याची खुनाची गोष्ट म्हणजे रहस्यमय चित्रपट बिनधास्त.
ह्या दोन हटके चित्रपट आणि हा लेख लिहण्यास कारणीभूत ठरलेला आजचा तिसरा चित्रपट म्हणजे अलोन (Alone) हा चित्रपटदेखील रहस्यमय कटेगिरीत येतो. कथेची गुंफण इतकी बेमुलायम आहे की चित्रपटात केवळ एकच व्यक्तीने अकटिंग केली आहे हे मन मान्य करणार नाही. होय या चित्रपटात केवळ एकच माणूस आहे आणि तेही संपूर्ण चित्रपटात. मुख्य आणि एकमेव कलाकार असलेला कदाचित असला प्रयोग कोणी आजपर्यत केला नसावा. कोरोना ह्या महारोगाची प्राश्वभूमी असलेला हा चित्रपटात सहकलाकाराचे आवाज तर आहे पण एकही सहकलाकार नाही. पहिल्या फ्रेमपासून ते शेवटची फ्रेम पडेपर्यत कोणताही दुसरा चेहरा दिसत नाही. कोरोना,लॉकडाउन यामुळे घरा घरात स्वतःला कैद करून घेतलेल्या गोष्टीवर एक अद्भुत चित्रपट बनवला गेला आहे. कोरोनामुळे कुटुंबापासून लांब एका फ्लॅटमध्ये आलेला चित्रपटाचा नायकाला काही भास होऊ लागतात. भूतकाळात झालेल्या दोन खून आणि त्याचा खुनी याची आभासी माहिती नायकाला मिळते. यानंतर नक्की काय होते, खून कोणाचे आणि का झाले? खुनी कोण? नायकाला होत असलेले भास की नियोजित कट यासारखी असंख्य प्रश्नांची उत्तरे शोधायची असल्यास रहस्यमय चित्रपट अलोन पहायला हरकत नाही.यासारखे चित्रपट, राजकारण, धार्मिक आणि काही मनातल्या गोष्टी वाचण्यासाठी follow करायला विसरू नका. अनेक इतर लेख तुम्हाला माझ्या ब्लॉगर संकेतस्थळावर पहायला मिळतील. लेख आवडत असतील, माझ्या लिखाणाचा किडा वाढवण्यासाठी लाईक, शेयर करायला विसरू नका. पुढचा असाच एखादा लेख घेऊन तुमच्या समोर सादर करेपर्यत माझा रामराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा