।।ॐ नमः शिवाय।।
नमस्कार मंडळी,
आज गुढीपाडवा, साडे तीन मुहूर्तातील एक विशेष दिवस याखेरीज हिंदू नवीन वर्ष देखील आहे, या दिवसाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सनातन धर्मातील गोष्टी ह्या भागात आजची गोष्ट वा माहितीरुपी लेख आहे तो नटराज.
नटराज हे देवाचा देव महादेव शंकराचे एक नाव आहे. नटराज मुद्रा म्हणजे भगवान शंकर तांडव करत असणारी ही मुद्रा आहे. तांडव म्हंटल की क्रोधीत झालेले शंकर भगवान असा समज केला जातो पण तांडवमध्ये देखील दोन प्रकार आहेत. क्रोधीत आणि विनाश करण्यासाठी उत्सुक झालेले शिवशंकर जे तांडव करतात त्याला रौद्र तांडव अस म्हंटल जात तर आनंदात करत असलेले नृत्य म्हणजे नटराज होय.
नटराज शब्दाची फोड केल्यास नट म्हणजे कला आणि राज म्हणजे अधिपत्य. कलेचे अधिपत्य असणारी देवता म्हणून कला, नृत्य याचे शिक्षण घेणारे नटराजाच्या मूर्तीला नतमस्तक होत असतात.
नटराज मूर्तीवरील हावभाव, प्रतीक जाणून घेण्यासाठी वरील चित्र तुम्हाला मदत करेल.
नटराज चतुभुज आहे, उजव्या हातात डमरू जे सृष्टी सृजन करण्याचे तर डाव्या हातातील अग्नी सृष्टी संहार करण्याचे प्रतीक आहे. तिसरा हात भक्ताला आशीर्वाद देण्याचा तर चौथा हात जमिनीपासून वर उचललेला पायाकडे लक्ष देण्याचे सुचवतो. हे पाऊल म्हणजे मोक्ष मिळवण्याचे रस्ता अस प्रतीक असून बुटक्या दानवावर ठेवलेले पाऊल म्हणजे अहंकाराचा, अज्ञानाचा, दुःखाचा सर्वनाश करण्याचे प्रतीक आहे. शरीरावर असणारे सर्प शक्तीचे द्योतक असून नटराज मूर्तीच्या सभोवताली असणारे आगीचे वर्तुळ दुसरे तिसरे काही नसून संपूर्ण ब्रम्हांड असल्याचे प्रतीक आहे. सुटलेले केस एक प्रकारची मुक्तता, शांतता आणि आनंद दाखवत गंगा नदीचे वेगेवेगळ्या शाखा, प्रवाह दाखवत आहेत
बहुतांश लोकांना नटराज म्हणजे काय हे आज समजले असेल त्याची प्रतीक, मुद्रा यामागील भाव प्रथमतः समजले असतील तर ही पोस्ट आपल्या मित्र मंडळीत शेयर करायला अजिबात विसरू नका. नटराज यांच्या पायाशी नक्की लहान बाळ का आहे असा प्रश्न कैक लोकांच्या डोक्यात आला असेल पण ते काही लहान बाळ नसून एक बुटके दानव आहे जे अज्ञान, रोगराई याचे प्रतीक आहे. अहंकाराचा पाडाव करताना शिव कोणताही विचार करत नाही त्यामुळे मोक्ष मिळवण्यासाठी भक्तीत लिन व्हावे असच नटराज सांगत असावा.
हे झाले मूर्तीचे विस्तृत वर्णन पण ह्या नटराजाचे तुम्हाला कळलेले हे वर्णन घरात नक्की सांगायला विसरू नका कारण मिळालेलं ज्ञान स्वतःकडे ठेवल्यापेक्षा इतरांना शिकवले तर त्याचा प्रसार होईलच पण वाचलेले हे तुमच्या लक्षात देखील राहील याची मला खात्री आहे.
असाच पुढचा लेख घेऊन येईपर्यत
।।ॐ नमोः नारायणाय नमः।।
।।ॐ नमोः भगवते वासुदेवाय नमः।।
।।ॐ नमः शिवाय।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा