आज महाशिवरात्री,
मार्च महिन्याचा पहिला दिवस. याआधी दोन मुद्दे घेऊन लिहण्याचा प्रयत्न केलेला पण म्हणावं तसा काही प्रतिसाद मिळाला अस वाटत नाही त्यामुळे आजपासून कोणा इतरांसाठी लिहणे बंद,कोणी लाईक करेल,प्रतिसाद देईल,कौतुक करेल की टीका करेल यांच्याकडे लक्ष न देता मनात येईल ते लिहण महत्वाचे अस वाटायला लागले आहे. तसही डायरी लिहणे आणि नंतर कधी तिची पाने चाळून भूतकाळातील गोष्टीत रमण्यासारखी दुसरी मनोरंजक गोष्ट कोणतीही नाही.तसही @chakan84 नावाचे ट्विटर हँडल बॅन झाल्याने मनात येईल ते, दिसेल ते यावर मत प्रदर्शन करण्याची इतकी सवय जडली होती की ट्विटरवर भेटलेल्या अनेक समविचारी लोकांशी भेटण्या बोलण्यात दिवसभरातील बराच वेळ खर्ची करायचो त्यापेक्षा आता लिहण्याचा किडा ब्लॉग लिहून पूर्ण करण्याचा मानस किती दिवस लांब नेऊ शकणार आहे ते मला शोधायचे आहे.
आज बऱ्याच बातम्या झळकत आहेत जस भारतपे चा निर्माता ग्रोव्हर याचा राजीनामा, हा ग्रोव्हर तोच आहे जो कोणत्या त्या कार्यक्रमात नवीन धंदा करू पाहणाऱ्या लोकांचा यच्छेद अपमान करत होता, हो हा तोच बोल घेवडा जो त्याच्या दिवसाचा किंवा तासाचा इनकम किती करोड याची शेखी मिरवायचा त्याला स्वतःला आज स्वतःच्या कंपनीतुन राजीनामा द्यावा लागला, कर्मा अजून काय? बऱ्याच लोकांचा सार्वजनिक स्वरूपात केलेला अपमान आणि त्याचे फळ म्हणून त्याचा स्वतःचा झालेला सार्वत्रिक अपमान म्हणजे जशास तस झालं म्हणायला हरकत नाही
युक्रेन रशिया विवाद आणि त्यातून चाललेला संघर्ष, त्यात सामान्य माणसाची होणारी पिळवणूक दयनीय असली तरी युद्ध म्हटलं की अमानवीय अश्या घटना घडणार. एकमेकांची उणिधुनी दाखवून स्वतःचे मत कस योग्य हे बिंबवण्याची एकही संधी युद्ध करणारे देश का सोडतील? रशिया, युक्रेन देशात शिकण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना सुखरूप फुकट देशात परत आणण्याचे मिशन गंगा, आल्यानंतर त्यांचे होत असलेले कौतुक यापेक्षा ज्यावेळी युद्ध चालू होण्याचे ढग देशांवर गोळा होत होते त्यावेळी ही लोक अक्कल चालवायला विसरली होती का? काहींना गंगा नावावरून देखील अडचण आहे तर भारताने तटस्थ राहिल्याने युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण झाली आणि निष्काळजी दाखवली म्हणून मोदींचे आतंरराष्ट्रीय राजकारण किती कुचकामी आहे अशी बोंब विरोधक करू लागले आहे.
महाराष्ट्रातील राजकारण विशेषतः ते तीन पक्ष एकत्र येऊन चालवलेले भेसळयुक्त, भ्रष्ट शासन याबद्दल बोलावे,लिहावे ते कमीच की काय म्हणून त्यांचे नाव नवीन उद्योग दररोज उघड होत असले तरी गिरे तो भी टांग उपर. भंगारवाला, कट्टर धर्माध मलिक पाठोपाठ त्याच्या मुलाला देखील ईडीने जवळ केले, कोट्यवधी रुपय शिवसेनेच्या नगरसेवक यशवंत जाधवकडे निघतात तरीही तीन तिघाडी राज्य बिघडी सरकार जनतेच्याया डोक्यावर मिऱ्या लटण्याचे काही थांबत नाही. भ्रष्टवादीच नाव असलं पाहिजे त्या पक्षाचा नेता जयंत पाटील शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देऊ करून शरद पवारांनी कसा मास्टर स्ट्रोक मारला आणि ह्या पाच वर्षात संघटन मजबूत करून पक्ष कसा वाढवायचा, मजबूत करायचा अस बाष्पळ बडबड करण खर तर विनोद वाटतो. मुळात इतक्या वर्षात साडे तीन जिल्हा किंवा फार फार तर 50 ते साठ जागा जिंकणाऱ्या, सतत स्वार्थी राजकारण करणाऱ्या शरद पवारांना जनतेनी योग्य जागा दाखवली पाहिजे पण तस होत नाही याचाच फायदा गेल्या कित्येक वर्षे ते कुटुंब घेऊन काही एकरात करोडो रुपयांचे उत्पन्न घ्यायला लागले पण राज्यातील इतर शेतकरी मात्र हालअपेष्टा, आत्महत्या चक्रात अडकलेला आहे. महाराष्ट्रात किंवा समस्त देशात देवासमान पूजल्या जाणाऱ्या शिवाजी महाराजांच्या गुरुबद्दल संशय निर्माण केला जातोय ज्यात काही लोक मुद्दाम जात,धर्म वगैरे गोष्टी मध्ये आणत आहे. आमच्या लहानपणी शिकलेला इतिहास असेल की पाहिलेले चित्रपट यात शिवाजीना शिकवणारा पहिला गुरू म्हणजे जिजाईबाई, ज्यांनी छोट्या शिवाजीला रामाच्या,कृष्णाच्या गोष्टी सांगितल्या, देव,धर्म आणि देश याची जाण करून लहानपणीच एक क्रांतिकारी विचार त्याच्या डोक्यात घातला नंतर त्यांना शस्त्र आणि राजकारण यांचे शिक्षण देणारे दादोजी कोंडदेव, अध्यात्मिक वाटेवर दृष्टांत देणारे तुकाराम महाराज,रामदास स्वामी हे सगळेच त्यांचे गुरू होते आणि आहे. आजच्या कोणत्याही फुटकळ लोकांनी कितीही स्वार्थी राजकारण करून लोकांची माथी भडकवण्याचे जे कट कारस्थान करत आहे ते आज ना उद्या जगासमोर उघडे पडतीलच
घरगुती सिलेंडरचा भाव रुपय 100 ते 110 रुपयांनी महागले, युद्धाचा परिणाम म्हणून इंधनाचे दर देखील वाढवले जातील, सोने चांदी महाग होत राहतील यात शंका नाही त्यामुळे सामान्य माणसाचे महागाईमध्ये भरडण्याचे दिवस काही संपतील अस वाटत नाही
एकामागून एक सिरीज जिंकून भारत यशाचे नवनवीन इमले रचत आहे, क्रिकेटमध्ये भारतीय संघात खेळण्यासाठी एकाहून एक खेळाडू यांची रांग लागली आहे यातच रणमशिन म्हणून घेणारा माजी कर्णधार विराट कोहली काही दिवसात त्याचा 100 वा कसोटी सामना श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे, बऱ्याच दिवसांपासून शतकांचा दुष्काळ या सामन्यात त्याने संपवावा ही प्रत्येक भारतीयांची इच्छा तो पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरेल. पाकिस्तानसारख्या आतंकवादी देशात जिथं आतंकवादी जन्म घेतात त्या देशात ऑस्ट्रेलिया तीस वर्षांनी दौरा करतोय त्यामागे येत्या काही काळात भारतीय दौऱ्यात आजपर्यंत न मिळालेले यश चाखण्याची पूर्वतयारी करण्यासाठी पाकिस्तानसारख्या देशाचा दौरा करण्याची जोखीम घेणे निश्चितच त्याचे कौतुक करावे लागेल पण भारतीय भूमीत जिंकण्याचे स्वप्न यावेळीही पूर्ण होईल असं मला वाटत नाही. न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका कसोटी मालिका बरीबरीत संपली तर पाकिस्तानची लीग लाहोर ने जिंकली
कच्चा बदाम वर पक्क्या बदामाची शारीरिक हालचाली पाहून धन्य झालेल्या अनेक भारतीयांप्रमाणे त्या गीताच्या गायकाची झालेली आर्थिक फसवणूक किंवा काल झालेल्या अपघात यातून सहीसलामत बाहेर यावे यासाठी लोकांनी प्रार्थना केली पाहिजे.
आयुष्यात आजपर्यंत कधीही उपास तपास केले नाही पण आज पहिल्यांदा न खाता न पिता महाशिवरात्रीचा उपवास करण्याचा मानस केलेला आहे शिवाय यावर्षात 12 जोतिर्लिंग दर्शन करण्याचे जे स्वप्न पाहिले आहे त्यात जानेवारी महिन्यात भीमाशंकर, फेब्रुवारीत त्रंबकेश्वर पूर्ण केले आहे. या महिन्यात कुठले ना कुठले जोतिर्लिंग दर्शन घ्यायला जायचे आहे. केदारनाथचे कपाट शक्यतो मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात उघडतील अशी घोषणा आज होईल त्याआधी बद्रीनाथ मंदिर 8 मे ला उघडणार याची घोषणा झाली आहे. केदारनाथ मंदिराला मे महिन्यात जाण्याचा योजले आहेच म्हणजे काशी,पुष्कर आणि केदारनाथ हा टप्पा पूर्ण करेल अस वाटतय.
शेयर मार्केट हा माझा जिव्हाळ्याचा विषय,ज्यात जास्त काही समजत नसलं तरी वेगवेगळे व्यवसायाचे चार्ट पाहणे, त्याचे लेखा जोखा (बॅलन्सशीट) वाचणे चालू असते. जवळपास दोन लाख वीस हजार रुपयांची वेगवेगळ्या 15 शेयर मध्ये गुंतवणुक केली आहे.मार्केट कस चालत याचा अंदाज आला असला तरी अजून बरच शिकणे बाकी आहे. अजून इंट्राडे, ऑपशन यांची ओळख ही झालेली नाही पण ते शिकून दिवसाला किमान रक्कम कमावण्याची इच्छा आहे,त्या दृष्टीने एक एक पाऊल पुढे टाकत आहे. हा लेख, नोंदी वाचून कोणाला काही प्रश्न असतील, स्टॉक मार्केट मध्ये गुंतवणूक किंवा काहीही विचारायचे असेल तर नक्की प्रतिक्रिया नोंदवा.