शनिवार, १७ डिसेंबर, २०२२

भविष्यवाणी


भविष्य हा असा विषय आहे की प्रत्येक माणसाला ते जाणून घेण्याची सुप्त इच्छा असते. त्यासाठी ज्योतिषशास्त्र असेल की जगातील अनेक इतर प्रकार यामुळे माणूस भविष्याचा अंदाज लावण्याचे प्रकार पूर्वापार चालू आहेत. डिसेंबर महिना आला की अश्या भविष्यावाण्याना पाय फुटावे असे बाहेर येत असतात. ज्यातील अनेक इतक्या बालिश असतात की भविष्यवाणी आहे की एप्रिल फुल बनवतात हे समजणे अवघड असते तर काही भविष्यवाणी ह्या तर्कसंगत असल्याने त्याबद्दल कमालीचे औत्सुक्य प्रत्येकाला वाटणे स्वभाविक असते. भविष्य म्हणजे काहींसाठी अभ्यासातून, अनुभवातून व्यक्त केलेले मत असते तर काहींसाठी ढोकताळे, काहींसाठी निव्वळ थाप असते पण जो कोणी ते व्यक्त करतो आणि तसच काहीस होण्याचे प्रमाण अधिक असेल तर त्या व्यक्तीला जग भविष्यवेत्ता म्हणून पोचपावती देत असते. असे भविष्यवेत्ते गावागावात प्रसिद्ध असतात. काहींची ख्याती इतकी वाढते की जगात त्याच्या भविष्य सांगण्याच्या गोष्टीवर विश्वास ठेवला जातो.

एखाद्या न्युज चॅनेल, वर्तमानपत्र यात तुमच्यापैकी अनेकांनी बाबा वेंगा आणि त्याच्या भविष्यात होणाऱ्या घटना यांची भाकिते, अंदाज वाचले असतीलच.नास्त्रेदमस हे नाव तर बहुतांश लोकांच्या माहितीतील असणार ह्याला शंकेला वाव नसावा. आता ह्या लोकांच्या नावाने प्रसिद्ध होणारे भविष्य कथन नक्की त्याचेच हे कोणी पहायला जात नाही केवळ मनोरंजन म्हणून त्या बातम्या पाहणारे, वाचणारे अनेक आहेत. सत्य, असत्य, अंदाज, अनुभव यात किंवा ह्या बाबा वेंगा किंवा नास्त्रेदमस बद्दल माहिती देण्याचा हा लेख नाही तर भविष्यकथानाची अशीच इच्छा माझ्या मनात उड्या मारत असल्याने मला भविष्यात ज्या गोष्टी होतील असे वाटत त्या क्रमशः रूपात इथे मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे म्हणजे मला जे वाटत तस झालंच तर त्याचे क्रेडिट घेत मी माझी कॉलर उडवत मी तर अस म्हंटलोच होतो म्हणायला मी मोकळा होऊ शकतो. हे माझे केवळ अंदाज, ठोकताळे असले तरी त्यामागे काहींना काही विचार नक्कीच असेल हे तितकेच खरे. 

वेळोवेळी केलेले हे अंदाज त्याची वेळ, तारीख याच्या पडताळणीसाठी ट्विटरवरील हा थ्रेडची लिंक इथे पेस्ट करतोय 


निरस, संथ, कंटाळवाणे 50 षटकाचे सामन्यानमुळे पुढचा विश्वचषक ४० षटकाचा असेल.#भविष्यवाणी 
क्रिकेट खेळण्याचे कसब पाहता महिला आणि पुरुष एकाच संघात खेळवणे सहज शक्य होईल. आंतरराष्ट्रीय स्तरावर मिक्स संघ खेळण्याच्या आधी अस घडताना आयपीएल तसेच रणजी मध्ये हा प्रयोग नक्की घडणार #भविष्यवाणी 


 क्रमशः

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सी ए टॉपर

स्वभावाला औषध नाही कारण प्रत्येक व्यक्तीच्या एक स्वभाव असतो.स्वभाव म्हणजे त्याची वागण्याची, बोलण्याची किंवा निर्णय घेण्याची प्रक्रिया. प्रत्...