ट्रेलर पाहिल्यावर ह्या भावना, चित्रपट पाहिल्यानंतर बदलल्या असे नसले तरी. महाराजांना भगव्या कपड्यात पाहताना मज्जा आली, उर भरून आला. अफजल्याला उचलून नरसिंहासारखे फाडणे हा नसलेला इतिहास मांडणे गैर असले तरी महाराजांचे व्यक्तिमत्त्व आहे त्यापेक्षा मोठे दाखवण्याचा दिग्दर्शकाचा क्रीयेटीव्ह लिबर्टी घेतल्याचे दुःख छत्रपतींच्या वंशजांना वा महाराजांच्या आजच्या मावळ्यांना का होते आहे हे कळण्यापालिकडे आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छ्त्रपती संभाजी महाराज हे मराठीच नाही तर संपूर्ण देशाचे आदर्श आहेत किंवा आदर्श कमी दैवत्व मिळालेले व्यक्ती आहेत. खोटा इतिहास नावाची पुडी, महाराजांचे नाव पुढं करत स्वतःचा राजकीय डाव खेळणारी लोकांनी वाद वाढवण्यापेक्षा सर्जनशील स्वातंत्र्य घेऊन तयार झालेला चित्रपट अस म्हणत चित्रपटाला साह्य करणे अपेक्षित होत. आजी आजोबांनी सांगितलेल्या गोष्टी, शैक्षणिक आयुष्यात शिकलेला इतिहास, चित्रपटातून वा सोशल मीडिया, मित्र परिवारातून ऐकलेला इतिहास हा योग्य की इतिहासाचा अभ्यास करणारे, बखरी, त्यावेळची भाषा यांचे ज्ञान असलेल्या लोकांचा अभ्यास यात तफावत असू शकते. चित्रपटात बाजी प्रभू देशपांडे याच्याशी महाराजांची झालेली लढाई हा सुद्धा एक वादाचा मुद्दा आहे असं काही जीतूद्दीन सारखे नाठाळ करतात ज्याचे उत्तर सामान्य ज्ञान असलेला माझ्यासारखा व्यक्ती ते चूक की बरोबर हे सिद्ध करू शकत नसला तरी इतिहासाचे अभ्यासक, ज्यांनी कैक वर्ष इतिहास वाचण्यासाठी घालवले ते उत्तर देण्यास खरे लायकीचे माणसे आहेत. माझ्या सामान्य ज्ञानाप्रमाणे तशी लढाई त्या दोघात झाली असेल अस मला तरी वाटत कारण शिवाजी महाराज यांना जसे पुण्याची जहागिरी त्याच्या वडिलांकडून मिळाली होती तशीच जहागिरदारी आजूबाजूच्या अनेक सरदाराची असावी हा माझा कयास आहे. हिंदवी स्वराज्य उभं करण्याची शपथ घेतल्यावर, यवन/लांडे आदिलशहा,निजाम, मुघल सारख्या बलाढ्य शत्रूच्या सैन्यापासून जनतेचा बचाव करण्याचे, सगळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य उभ करताना युवा शिवाजी महाराज यांना ह्या जहागीरदारांनी विरोध केला नसेल का? बाजीप्रभू देशपांडे बांदल घराण्याचे एकनिष्ठ होते ते सहजासहजी हत्यार टाकून महाराजांना पाठिंबा दिला असेल का? जावळीतील अनेक जहागीरदार यांचा किंवा जावळीच्या मोऱ्याचा इतिहास ज्यांनी ज्यांनी वाचला आहे ते पाहता शिवाजी महाराज साम्राज्य विस्तार करत होते त्याला विरोध आपल्याच लोकांचा, जहागीरदार, वतनदार, महसूल गोळा करणाऱ्यांचा होता हे आपण जाणतोच मग बाजीप्रभूंनी बांदल घराण्याची निष्ठा सोडून लगेच शिवाजी महाराजांवर निष्ठा ठेवली असेल असं घडलं असेल का? नाही ना, महाराजांनी साम्राज्य विस्तार करण्यासाठी केले की विखुरलेल्या मराठी जनतेला एकत्र करण्यासाठी की मुसलमानी राजवटीतून लोकांना वाचवण्यासाठी मुद्दा काहीही असला तरी आपआपली जहागिरदारी सोडायला ती लोक तयार नव्हती म्हणूनच ज्यांना बोलून समजेल त्यांना बोलून, ज्यांना बोलून समजणार नाही त्याच्याशी लढाई करत सगळ्यांना एक उद्देश, एक ध्येय, एक झेंड्याखाली आणण्यासाठी महाराजांना जे जे करायला लागले ते सत्य इतिहास अभ्यासकांनी लोकांपुढे आणले पाहिजे. चुकीचा इतिहास नावाची बोंब करून आपल्या उथळ ज्ञानाची कबुली देणाऱ्यांनी वरील गोष्टींचा विचार तरी करावा ही विनंती. आजकाल शिवप्रेमी इतके जहाल झालेत की महाराजांच्या नावापुढे छत्रपती न म्हंटल्यास नावामागे महाराज न म्हटल्यास कोणालाही ट्रोल केले जाते ज्याचा परिणाम चित्रपटात शिवाजी महाराजांचे शत्रू असलेले पात्र मग तो क्रूरकर्मा अफजल्या असो की इतर कोणीही लांडया सरदार महाराजांचा उल्लेख आदरपूर्ण करताना दिसतो जे शत्रू त्या काळात करत असेल अस कोणाला कसे वाटू शकेल? वाद नकोत म्हणून केलेली ही सारवासारव चुकीच्या इतिहास मांडण्याच्या प्रकारात येत नाही का? महाराजांना भवानी मातेने तलवार दिली हा इतिहास खोटा की खरा? खरा असेल असं आपण मानतोच पण खोटा आहे असला तरी तो नाकारण्याचे धाडस कोणीही करू शकणार नाही. खोटा असेल तर तो त्या काळात का पसरवला गेला असावा याचेही अंदाज आपण आज लावू शकतो. स्वराज्य निर्मिती करण्याचे दिव्य हाती घेतलेल्या एका युवा नेतृत्वाबद्दल आदर, आस्था निर्माण करण्यासाठी चक्क भवानी माता ह्या देवाने निवडलेला माणूस अशी बातमी ज्यावेळी तळागाळात, निरक्षर, अज्ञानी, शेती करणे, पिकवणे आणि उदरनिर्वाह करणाऱ्या जनतेपर्यत पोहचल्यावर शिवाजी महाराज याच्यावर जनतेची श्रद्धा, विश्वास द्विगणिक करण्याचा तो सगळ्यात सोप्पा पर्याय, युक्तीदेखील असू शकते त्यामुळे हर हर महादेव चित्रपटात महाराजांची व्यक्तिरेखा आहे त्यापेक्षा मोठी करण्याचा,दाखवण्याचा प्रयत्न झाला, खोटा इतिहास म्हणत गरळ ओकली जात आहे ती अयोग्य नाही का? बरं चुकीचे आहे असं जरी मानलं तर सप्रमाण सिद्ध करायचे सोडून केवळ प्रकरण तापवणे, वाद निर्माण करणे, चित्रपटग्रहातून चित्रपट काढण्यास भाग पाडणे, आता दूरचित्रवाणीवर प्रदर्शित करण्यापासून अडवणे हे चुकीचे नाही का? मुळात संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत असलेला माझा राजा याचे वंदन, अभिमान त्यांच्या वंशजांना द्यायला मराठी जनता तयार आहे पण त्याच्या वंशजांनी केवळ महाराजांचे वंशज म्हणून त्याचा गैरफायदा घेत अडवणूक करणे देखील चुकीचे नाही का? राज्यपाल यांनी अपमान केला, अबक ने हे बोलले, दुसऱ्याने ते बोलले अस करत केवळ राजकीय स्वार्थ साध्य करणाऱ्या लोकांना आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा हक्क नाही. काँट्रॅव्हरसी तयार करण्यापेक्षा खरा इतिहास सप्रमाण जनतेपुढे आणावा, गड किल्ले याचे संवर्धन करावे, प्रत्येक किल्याचा इतिहास, वीर पुरुष, लढाई असे इतिहास लोकांना पाहता येईल, अनुभवता येईल अशी शिवसृष्टी उभारणे, मराठी समाजाला महाराजांच्या नावाखाली, भगव्या झेंड्याखाली एकसंध , एकत्रित, संघटित करण्याचे सोडून केवळ वाद निर्माण करणे थांबवले गेले पाहिजे. गड किल्ले यावर गेल्यावर त्या जागेचा मान प्रत्येकाने राखलाच पाहिजे पण एखादी चुकीची घटना करणाऱ्यांना शिवप्रेमी लाथाबुक्यांचा मार देतात तेही चुकीचेच. एखाद्या व्यक्तीने केलेली चूक निदर्शनात आणून देने,समज देणे, जास्तीत जास्त त्या उचापती व्यक्तिची रीतसर पोलीस तक्रार करणे योग्य पण कायदा हातात घेत मारहाण करणे, व्हिडीओ काढणे, प्रसिद्ध करणे चुकीचेच नाही का? बर योग्य मानले तर नवाब मलिक किंवा त्याच्याच धर्माची लांडे लोक स्वराज्याच्या राजधानी रायगडावर येतात पण महाराजांचा जयजयकार करण्याचे टाळतात त्यावेळी नाही ही शिवप्रेमी विरोध करत, ना त्या व्यक्तीला जयजयकार करण्यास बाध्य करत, का त्यावेळी तुमचं शिवप्रेम बाहेर उफाळून येत नाही का? महाराजांच्या नावाने चुकीची कामे करणाऱ्यांनी स्वतः अंतर्मनात डोकावणे खूप गरजेचे. खोट नाट काय यात वेळ दडवणे, सामान्य शिवप्रेमी, पाठीराखे याना भडकवणे बंद झाले पाहिजे. कोरेगाव भीमा दंगलीत शिवाजी महाराज यांचे चित्र असलेले जॅकेट घालणाऱ्या व्यक्तीचा खून झाला त्यावेळी कुठे होते शिवप्रेमी? तो संज्या महाराजांचे वंशज पुरावे मागत होता त्यावेळी का शांत होते हे शिवप्रेमी? कित्येकवर्षं दादोजी कोंडदेव बाळ शिवाजीचे शिक्षक म्हणून पाठ्य पुस्तकात होते ते गायब करणारे, लाल महालातून पुतळा उखडणाऱ्या विरोध केला का ह्या शिवप्रेमींनी? माझ्या राजाला जाणता राजा म्हणू नका म्हणणाऱ्यांना केला का कधी विरोध? गो मातेचा, ब्राह्मणरक्षक माझा राजा नाही अशी आवई उठवणाऱ्यांना दिले का फटके कधी? शिवभोजन, शिवबंधन, शिववडा, शिवसेना ह्या सगळ्यात माझ्या राजाचे नाव वापरताना केले जाणारे राजकारण, स्वार्थ ह्याला कधी विरोध केला का? अरे थांबवा हा सेलेक्टिव्ह अँपरोच, ज्या राजाने तुम्हाला हिंदू म्हणून ओळख दिली, हिंदू म्हणून भारतात एकहाती सत्ता आणली, मुस्लिम शासकांना पळवत अटकेपार भगवा फडकवला त्या राजाच्या जनतेला, शिवप्रेमींत फूट पाडण्याचे काम करू नका. भारतीय सैन्यात प्रत्येक बटालियन कोणत्या ना कोणत्या देवाचे नाव घोषणा देत शत्रूवर चाल करते केवळ मराठा बटालियन कोणत्याही देवाचा नाही तर आपल्या छत्रपतींचा उद्घोष करत शत्रूवर तुटून पडते याचा तरी विचार करत महाराजांच्या नावावर एकत्र येण्याचा प्रयत्न करा, भगव्या झेंड्याखाली संघटित व्हा........
कानात डुल, चेहऱ्यावर दाढी, डोक्यावर शिवगंध, पांढरे कपडे, कपड्यावर महाराजांचा चित्राचा बिल्ला अस बाह्य दर्शनीय रूप घेऊन जगाला फसवू शकाल पण स्वतःला कसे फसवाल बर?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा