एकतर स्टॉक परत वर येण्याची वाट पाहत गुंतवणूक अडकून ठेवण्याखेरीज वा तोट्यात विक्री करत मिळेल ती रक्कम स्वीकारण्याची पाळी आली आहे. मी ही गोष्ट अधोरेखित करू इच्छितो की स्टॉक मध्ये वाढ वा घट होण्यामागे सामान्य गुंतवणूकदारांचा हिस्सा अत्यल्प असतो तर मोठे गुंतवणूकदार यांनी केलेली खरेदी वा विक्री ही कमाल कारणीभूत असणारी गोष्ट आहे. कॅम्पस कंपनी किंवा त्याचा व्यवसायाचे ताळेबंद, Fundamental or Technical, बाजाराची सध्याची स्थिती, कच्चा मालाचे भाव, सामाजिक, आर्थिक परिस्थिती अश्या कैक गोष्टी सांगून तो स्टॉक का पडला वा चढणार हे सांगणारे खंडीभर लोक आहेत पण प्रथम दर्शनी तेच सत्य असले तरी एखाद्या स्टोकमध्ये प्रचंड पैसा गुंतवणारे बाजारात त्या स्टोकची जाहिरात करतात, सामान्य नागरिक त्याला भुलतो, गुंतवणूक करतो स्टॉक अजून मोठ्या गतीने पळू लागतो. ज्यांनी तो कमी किंमतीत घेतला नाही त्यांना आपली कमावण्याची संधी जाते की काय असे वाटल्याने सगळे लोक आपापल्या ताकदीप्रमाणे पैसे लावतात आणि हीच ती वेळ असते की ज्यांनी त्या स्टॉकला हवा दिली ते त्याची मिळकत, डबल ट्रिपल झाली असताना अचानक काढून घेतात. एकदम मोठ्या प्रमाणात झालेली विक्री स्टॉक पडला अशी दवंडी पेटवते आणि मग सुरू होतो विक्रीचा हल्लाकोळ. काही वाचतात, काही ठेचळतात पण ठेचळणारे नक्की कोण असते? सामान्य गुंतवणूकदार.
मार्केट सोप्प नाही आणि इतकं वाचूनही डोक्यात प्रकाश न पडलेल्या, कुत्सित हास्य तुमच्या चेहऱ्यावर येत असेल तर आपल्याला मार्केट समजत ह्या गर्वाचे घर खाली झाल्याखेरीज तुम्हाला ही गोष्ट समजणार नाही. असो,याचा अर्थ तुम्ही शेयर मार्केटमध्ये गुंतवणूक करायचीच नाही का? तर तसे ही नाही पण गुंतवणूक करण्यासाठी आपण आपल्याला पुढच्या दोन तीन वर्षात न लागणारा, सगळं खर्च, बचत बाजूला ठेवून उरणारा पैसा बँकांपेक्षा अधिक रिटर्न मिळवण्यासाठी शेयर मार्केट मध्ये गुंतवलाच पाहिजे पण त्यासाठी मार्केट कसे चालते हे सामान्य ज्ञान घेतलेच पाहिजे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा