मंगळवार, ६ डिसेंबर, २०२२

चिरंजीवी

“ अश्वत्थामा बलिर्व्यासः हनूमांश्च बिभीषणः।
कृपः परशुरामश्चैव सप्तेते चिरंजीविनः॥ 

सप्तैतान् संस्मरेन्नित्यं मार्कण्डेयमथाष्टमम्।
जीवेद्वर्षशतं सोपि सर्वव्याधिविवर्जित॥ "

म्हणजेच अश्वत्थामा, बली, व्यासऋषी, हनुमान, बिभीषण, कृपाचार्य, परशुराम हे सात व्यक्ती चिरंजीवी आहेत, यांच्या व्यतिरिक्त मार्केण्ड ऋषी हेदेखील चिरंजीवी होते ज्यांना मृत्यूची देवता यम देखील हात लावू शकता नाही. पुरातन काळापासून कालियुगाच्या अंतापर्यत ह्या व्यक्ती आपल्यात मिसळून राहणार आहे. अनंत काळासाठी जीवन नक्कीच तोटा असला तरी काहींच्या चांगल्या कर्माचे तर काहींच्या वाईट कर्माचे फळ म्हणजे चिरंजीवी आयुष्य. आज आपण ह्याच सात चिरंजीवी व्यक्तीची थोडक्यात माहिती घेऊ.

परशुराम


आईवर चिडलेल्या वडील जमदग्नी ऋषी यांना आज्ञा देताच त्याच क्षणी परशुरामजींनी आईचे मस्तक धडपासून वेगळे केले, आज्ञाधारक मुलाचे कर्तृत्व, धाडस पाहून जमदग्नींचा राग अचानक शांत झाला आणि त्यांना आनंद झाला. परशुरामजींना काहीही वर मागण्यास सांगितले,तेव्हा परशुरामजींनी युद्धात माझा सामना करणारा कोणी नसावे आणि मला दीर्घायुष्य मिळावे म्हणूनच त्यांना जमदग्नी ऋषीकडून चिरंजीवी होण्याचे वरदान मिळाले होते.

बळी राजा

श्री विष्णू यांच्या वामन अवताराची गोष्ट तर तुम्हाला माहित असेलच. दानशूर, दिलेल्या शब्दाला जागणारा बळीराजा याच्या डोक्यावर तिसरे पाऊल ठेवून त्याला पाताळात ढकलले. बळीराजाची सर्वस्व अर्पण करण्याची वृत्ती, भगवंताबद्दल असलेले प्रेम, भक्ती पाहून बळीराजाला श्री विष्णूनी अपार वैभव दिले आणि कालियुगाच्या अंत झाल्यावर इंद्रपद देण्याचे आश्वासन दिले म्हणूनच बळी राजा चिरंजीवी झाला.

हनुमान

हनुमानाची श्रद्धा, भक्ती याचा श्रीराम याना सदैव हेवा वाटत असायचा. ज्यावेळी राम ह्या अवताराचे कार्य पूर्ण झाले त्यावेळी त्याची कल्पना त्यांनी हनुमानाला दिली. हनुमानाने श्रीराम याचा सहवास लाभावा म्हणून त्याच्याबरोबर जाण्याचा हट्ट करू लागला पण जलसमाधी घेतल्यानंतर माता सीता, लव कुश यांची काळजी घेण्यासाठी, पृथ्वीवर हनुमानाचे अवतार कार्य अजूनही बाकी असल्याची सबब पुढे करत श्रीरामांनी हनुमानाला चिरंजीवी होण्याचा आशीर्वाद दिला. 

विभीषण

असुर कुळात जन्मलेल्याया, रावणाचा सख्खा भाऊ असलेला धर्माने, नैतिकतेने वागणाऱ्या विभीषण याच्या सत्कर्माचे फळ आणि विश्वाच्या अंतापर्यत धर्म, नैतिकता याचे मार्गदर्शन जगाला देण्याचे वरदान श्रीराम यांच्याकडून मिळाल्याने विभीषण चिरंजीवी झालेले आहेत. चिरंजीवी विभीषण यांचा हनुमानाची भिमाशी भेट उल्लेख महाभारत काळात झाला होता त्याचप्रकारे पांडवांचा राजसुय यज्ञाच्या वेळी सहदेव आणि नकुल याची विभीषण याच्या भेटीचा उल्लेख मिळतो

अश्वत्थामा

रागाच्या, बदला घेण्याच्या विचाराने ब्रह्मस्त्र सारखे भयानक शस्त्र चालवून लाखो पांडव सेनेचा बळी घेण्यासाठी चालवले पण श्रीकृष्णाच्या कानउघडणीनंतर त्याची दिशा बदलून पांडवांचा वंशाचा सर्वनाश करण्यासाठी गर्भाच्या आत असलेल्या न जन्मलेल्याया अर्भकाला मारून टाकल्यामुळे चिडून श्रीकृष्णाने अश्वत्थामाच्या कपाळावरील माणिक तोडून टाकला आणि विश्वाच्या अंतापर्यत तुझी कपाळावरील जखमेतून घाण वाहत राहील, तुला कोणीही जवळ घेणार नाही, सगळे तुला झिडकरात राहतील असा शाप मिळाल्याने शिक्षा म्हणून का होईना अश्वत्थामा चिरंजीवी झाला

कृपाचार्य

कृपाचार्य याचा उल्लेख सप्तऋषीपैकी एक असा मिळतो शिवाय ते कौरव आणि पांडव याचे गुरू होते. ते सदैव निःपक्षपाती स्वभावाने वागायचे, कौरव पांडव युद्धाची सुरुवात होण्याआधी सामोपचाराने निर्णय घेण्याचा, दोन्ही गटात तह करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. महाभारतात पांडवांच्या विजयानंतर ते पांडवासोबत गेल्याचा शिवाय पांडवानंतर त्याचा वंशाच्या राजा परीक्षित याला शस्त्र, शास्र याचे शिक्षण दिल्याचा देखील दाखला पुराणात मिळतो

महर्षी वेद व्यास

महर्षी व्यास द्वापर युगांपासून आपला आयुष्यकाळ चालू झाला त्यानी भविष्यात धर्माचा होणारा ह्रास ओळखला होता ज्यामुळे मनुष्याची बुद्धी आणि आयुष्य कमी होईल असा तर्क बांधला होता. मानवाला योग्य धर्माची साथ लाभण्यासाठी त्यांनी चार वेद, अठरा पुराणे, महाभारत सारखा सर्वात मोठा ग्रंथ लिहला. 

मार्कण्डेय ऋषि

मार्कन्डेय ऋषि खरतर अल्पायुषी होते पण त्यांनी कठोर साधना करून भगवान शंकराला प्रसन्न केले. मृत्यूला हरवण्यासाठी महामृत्युंजय मंत्राची निर्मिती केली याचमुळे शंकर भगवानानी त्यांना चिरंजीवी होण्याचा आशीर्वाद दिला होता.









कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सी ए टॉपर

स्वभावाला औषध नाही कारण प्रत्येक व्यक्तीच्या एक स्वभाव असतो.स्वभाव म्हणजे त्याची वागण्याची, बोलण्याची किंवा निर्णय घेण्याची प्रक्रिया. प्रत्...