आयुष्यात मनोरंजन नसेल तर ते निरस वाटते. दिवसभराच्या कामातून, अनेक कचकटीतून मनोरंजनाचे सगळ्यात मोठे साधन म्हणजे चित्रपट. त्याच चित्रपटांबद्दल आज व्यक्त होतोय. आजकाल भारतीय चित्रपटसृष्टीत दाक्षिणात्य सिनेमाचा वरचष्मा दिसतो. बाहुबली असो की पुष्पा की केजीएफ की असो आरआर आर. दाक्षिणात्य चित्रपटांनी बॉलीवूड चित्रपटाची सत्ता हलवून सोडली आहे. बॉलीवूड किंवा हिंदी चित्रपटसुष्टी सध्या तरी गटातील राजकारण, हिंदू द्वेष, सुमार पटकथा, म्हातारे आणि तेच ते रटाळ अभिनय करणारे अभिनेते याला जनता विटली आहे शिवाय ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर एक से बढकर एक अप्रतिम गोष्टी यांची रेलचेल असताना हिंदी चित्रपटातील तोच तोच पणा लोक किती दिवस सहन करणार?
दाक्षिणात्य सिनेमांनी एकदम हे यश चाखले का? नाही त्यासाठी बऱ्याच वर्षांपासून केलेली मेहनत आहे. सर्वप्रथम ईडीएट बॉक्स वर त्यांनी संपूर्णवेळ हिंदी चित्रपटाचा चोरला, एकवेळ तर अशी होती की जवळजवळ प्रत्येक चॅनेलवर केवळ आणि केवळ डब केलेले साऊथचे चित्रपट टेलकास्ट व्हायचे. त्यातील सर्वसामान्य दिसणारा गहुवर्णीय हिरो, सूंदर नट्या, कुटुंबाला प्राधान्य देणारी, हिंदू संस्कृतीचा, पेहरवाचा पुरस्कार केलेले चित्र त्याशिवाय अकल्पनिय अशी मारामरीची दृश्य यांची रेलचेल म्हणजे साऊथचे चित्रपट असत.ह्या सगळ्यात त्याची चित्र विचित्र नाच विसरता कामा नये. सतत दूरचित्रवाणीवर हेच चित्रपट येत असल्याने कालांतराने त्याची हीच शैली अजब गजब वाटण्यापेक्षा आपल्याकडच्या प्रेक्षकांनी आपलीशी करून घेतली ज्याचा परिणाम आजच्या हिंदी भाषिक चित्रपटाची झालेली वाताहत स्पष्ट करते.
आजही कित्येक प्रसिद्ध झालेले दाक्षिणात्य चित्रपटाचे अधिकार विकत घेऊन त्याचे रिमेक बनवले जात आहेत. सगळ्यात जवळच संदर्भ घ्यायचाच म्हंटल तर नुकताच झालेला विक्रमवेदा हा चित्रपट. हिंदी भाषेत डब केलेले असो रिमेक केलेले असो सध्या दाक्षिणात्य चित्रपटाचा बोलबाला चित्रपटसुष्टीवर दिसतोय हे कोणीही मान्य करेल. दूरचित्रवाणी असो की थिएटर की ऑनलाइन जगाच्या ह्या काळात दक्षिणेकडचे चित्रपट मनोरंजनाचे नेतृत्व करत आहे. ह्याची सुरुवात नक्की कधी झाली याबाबत तर्कविकर्त, वाद संवाद करणारे करू शकतात पण माझ्यामते तरी नव्वदच्या दशकात दाक्षिणात्य चित्रपटांनी आपले पाऊल दक्षिणेकडून भारताच्या इतर तिन्ही दिशांना टाकायला सुरुवात केली होती. त्यातील काही निवडक डब चित्रपटांनी आजच्या दाक्षिणात्य चित्रपटासाठी तयार केलेला कच्चा रस्ता आणि कदम दर मजल त्यांनी केलेला प्रवास तुमच्यापुढे मांडण्याचा हा छोटा प्रयत्न..... आणि हो ह्यात केवळ त्याच प्रसिद्ध चित्रपटांना स्थान देतोय ज्याची माझ्या बालपणात बरीच हवा होती त्यामुळे कदाचित तुमच्या आणि माझ्या लिस्टमध्ये फरक असण्याची दाट शक्यता आहे. एखादा उल्लेख राहून गेलेला चित्रपट जर तुमच्या लक्षात असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगून माझी चूक दाखवायला विसरू नका.
१९८३ साली आलेला कमल हसन आणि श्रीदेवी याचा अप्रतिम चित्रपट
सदमा
सदमा म्हणजे धक्का आणि हा चित्रपट म्हणजे एका पवित्र प्रेमाची धक्कादायक कथा आहे. त्यातील गाणी असतील की कलाकारी तुम्हाला निशब्द केल्याखेरीज राहणार नाही त्यानंतर आलेला खऱ्या अर्थाने नावाजलेला मोठा चित्रपट ज्याने बॉलीवूड मध्ये वाजत गाजत आया है राजा, लोगो रे लोगो अशी आरोळी टाकली तो म्हणजे १९८९ मध्ये आलेला
अप्पूराजा
एक टिपिकल हिंदी चित्रपटला शोभेल अशी कथा पण सामान्य आकाराच्या माणसाने तीन साडे तीन फुटाचा उभा केलेला अप्पू हे पात्र, त्याच्या कसरती, नाच हे सगळे बघण्यासारखे होते. १९९० साली आलेला मूक चित्रपट
पुष्पक हा एक चमत्कारिक चित्रपट, काळाच्या आणि प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन एका माणसाचा प्रवास त्यातील गमतीजमती, सुख दुःख पाहण्यासारखे आहे. १९९० साली आलेला नागार्जुनने अभिनय केलेला
शिवा
हा विशेष प्रसिद्ध झाला ती त्यातील कॉलेजमधील राजकरण आणि हाताला सायकलची चैन बांधून मारामारी करणाऱ्या हिरोमुळे. शिवानंतर चर्चा झालेला मोठा चित्रपट १९९२ साली आलेला
रोजा
अभिनेत्री मधू, अभिनेता अरविंद स्वामी याचा हा भावनिक तसेच देशप्रेम दाखवणारा हा चित्रपट, त्यातील गाणी सगळंच कस श्रवणीय आणि दर्शनीय होते.
उत्तम कथा, श्रवणीय संगीत, तितकेच सुंदर गाणी, अप्रतिम निसर्ग सौंदर्य याबरोबर संस्कृती आणि कौटुंबिक चित्रपट यामुळे दाक्षिणात्य चित्रपट चित्रपट रसिकांच्याया हृदयात हळू हळू जागा करत होते
१९९४ साली आलेला हम से है मुकाबला हा चित्रपटातील गाणी यामुळे तुफान प्रसिद्ध झाला होता. उर्वशी आणि मुकाबला ह्या गाण्यांनी केलेला कहर त्यावर प्रभुदेवाची अनोखी नृत्यकला यामुळे त्या काळात हा खूपच प्रसिद्ध झालेला चित्रपट होता. अरविंद स्वामी आज मनीषा कोईराला याचा
बॉम्बे हा हिंदू मुस्लिम प्रेम आणि त्याकाळात झालेल्या मुंबई दंगलीची पार्श्वभूमीवर निर्माण केलेला एक अप्रतिम संगीत, गाणी असलेला चित्रपट लोकांच्या मनावर दाक्षिणात्य चित्रपटाचे गारुड उभे करत होते. १९९५ ला आलेला नागर्जूनचा
क्रिमिनल
चित्रपटाची केलेली जाहिरात आज त्यातील तू मिले, दिल खिले ह्या गाण्यामुळे भाव खाऊन गेला होता. १९९६ साली कमल हसनचा
हिंदुस्थानी
चित्रपटातील गाणी, कथा यापेक्षा दुहेरी भूमिकेतील म्हताऱ्या देशभक्त माणसाची भूमिका विशेष गाजली होती.
बॉलीवूड मध्ये दाक्षिणात्य चित्रपट आणि तिथल्या कलाकारांनी पाय हळूहळू रोवण्यास केलेल्या ह्या खेळाला अनेक डब चित्रपटांनी पाया घालण्याचे काम केले ज्यात मास, गुंडाराज, इंद्रा द टायगर, चाची ४20 यांनी केलेल्या जोरकस प्रयत्न त्यानंतर केबल टीव्हीवर हिंदी चित्रपटपेक्षा अधिक प्रमाणात दाक्षिणात्य चित्रपटांनी घेतलेली जागा, बॉलीवूडचे माजूरडे, निरस कथातसेच हिंदू धर्माविरुद्ध अजेंडा आणि मधेच आलेला कोरोना ह्या रोगामुळे घरबसल्या मोबाइल, लॅपटॉप वर भन्नाट डब चित्रपट, मालिका यामुळे दाक्षिणात्य चित्रपटाचा एक मोठा चाहता निर्माण झाला त्याचाच फायदा अलीकडे प्रत्येक दाक्षिणात्य चित्रपट घेताना आपल्याला दिसत आहे आणि दिसत राहील अस चित्र दिसत आहे.......
समाप्त.
लेख आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्या प्रतिक्रियाची अपेक्षा असेच लेख वाचण्यासाठी follow करा.
ट्विटर @pincode410501
ब्लॉगर पोस्ट diarynotes137.blogpost.com
डेलीहंट @cm_newsinformation
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा