मंगळवार, १३ डिसेंबर, २०२२

बांगलादेश दौरा: कसोटी

 

बांगलादेश दौरा: कसोटी

एकदिवसीय सामन्यात पानिपत झाल्यानंतर कसोटीत निर्विवाद यश मिळवणे हे झालेल्या अपमानाचा बदला घेण्याची वेळ आहे. उद्या सकाळी ठीक 9 वाजता बांगलादेश भारत यांच्यात सामना चालू होईल ज्याचे प्रतिस्पर्धी पाहता मोल कमी असले तरी सामन्याचा निकाल भारतीय संघाचे WTC च्या अंतिम सामन्यात खेळण्याचे भवितव्य ठरवण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे अश्यावेळी सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी सर्वोत्तम संघ निवडण्याची ही समीक्षा.

अभिमन्यू ईश्वरण,सौरभ कुमार, श्रीकर भारत हे 200% पाण्याच्या बाटल्या, केळी किंवा हॅन्डग्लोव्हज याचे आदानप्रदान करणारे प्रवासी खेळाडू असतील. खेळपट्टीचा अंदाज घेऊन स्पिनर दोन खेळवायचे की तीन ठरल्यावर दोन जलदगती म्हणजे मिडीयम फास्ट गोलंदाज ठरवले जातील. 

कर्णधार केल्याने के एल राहुलची संघात जागा पक्की आहे ज्याच्याबरोबर शुभमन गिल खेळेल.जितकी प्रतिभा आहे त्यामानाने मिळालेल्या संधीत केलीत त्यापेक्षा अधिक शतके शुभमनच्या खात्यात हवी होती पण हे रेकॉर्ड सुधारण्याची चांगली संधी त्याला ह्या दोन सामन्यात मिळेल. के एल राहुलबद्दल नो कमेंट्स. 

अजिंक्य रहाणे बरोबर निरोपाचा नारळ मिळता मिळता राहिलेला, कौंटी क्रिकेटमध्ये उधळलेले रंग यामुळे अजून एक संधी मिळालेला चेतेश्वर बॉल खेळणे अपेक्षित आहे, खाणे नाही. दिवसाअंती धावाचे मोल अधिक असते हे चेतेश्वरला समजणे गरजेचे

चौथ्या क्रमांकावर येणाऱ्या विराटने केवळ जगातील नावाजलेले खेळाडू जसे स्मिथ, लबुसचेंगने, जो रूट, तो शेबडा बाबर यांनी नुकत्याच केलेल्या मोठ्या खेळीचे आकडे पाहून मैदानात उतरावं. कर्णधारपद गेल्याचे दुःख, एकटेपणा ही सगळी नाटक बाजूला सारून धावा कराव्या. बाद झाल्यावर आश्चर्यकारक चेहरा करण्याची नाटक करू नये. 

जादूगार श्रेयसने इन्स्टाग्राम रिल्सवर जादूचे प्रयोग करण्यापेक्षा क्रिकेटच्या रियल फील्डवर जादू दाखवणे गरजेचे असणार आहे.यानंतर येणारे महत्त्वाचे नाव म्हणजे रिषभ पंत ज्याला एकदिवसीय संघात स्थान न देता पाणी देण्याचे काम देत त्यात प्राविण्य देण्याचे काम भारतीय संघ व्यवस्थापन करताना दिसत होते. टी ट्वेंटी किंवा एकदिवसीय सामन्यात संधी मिळण्याची शक्यता कमी झाल्याने कसोटी आपली जागा अबाधित राखणे 24 25 वर्षाच्या, तुलना करण्याच्या वयाच्या जवळ नसणाऱ्या, नट्याना सोशल मीडियात उत्तर देणाऱ्या रिषभला गरजेचे. 

100 कसोटी सामने खेळणे हे उद्दिष्ट ठेवून उरलेल्या प्रत्येक सामन्यात अधिकाधिक विकेट घेऊन आपली उपयोगिता सिद्ध करण्याचे आव्हान अश्विनच्या डोक्यावर आहे. सध्या जरी संघातून बाहेर जाण्याची त्याची शक्यता नसली तरी एकदा का त्याचे 100 कसोटी सामने झाले की त्याने निवृत्त व्हावे, दुसऱ्या खेळाडूला संधी द्यावी अशी बोंब मार्केट मध्ये सोडली जाईल. ऑस्ट्रेलियन नॅथन लायनने वेस्टइंडिज विरुद्ध विकेट घेऊन अश्विनला एक घर मागे सरकवले आहे त्याला परत मागे सारत निवृत्ती घेईपर्यत त्याच्यापुढे राहण्याचे अश्विनचे लक्ष असणार हे साहजिकच आहे.बांगलादेश दौऱ्यात असनाऱ्या खेळपट्या फिरकीला पोषक असल्याने अश्विनबरोबर अधिमधी संधी मिळणारा अक्सर आणि चायनिज वस्तूंप्रमाणे अल्पावधीत खराब झाल्यासारखे चायनामन गोलंदाज कुलदीप खेळतील अशी अपेक्षा ठेवता येईल पण राहुल द्रविड अनपेक्षित धक्का देत सौरभ कुमार ज्याने अनधिकृत सामन्यात बॅट आणि बॉल याने बरी कामगिरी केली तो खेळताना दिसू शकेल. काही वर्षांनी सौरभ कुमारचा जयंत यादव झालेला आपल्याला दिसेल याची खात्री वाटते. आता उरल्या दोन जागा आणि खेळाडू पाच ज्यात सिराजला भारतीय संघ मैदानात उतरवणार हे जवळजवळ काळ्या दगडावरची पांढरी रेष अश्यावेळी  पाचवा गोलंदाज एक ऑलराउंडर शार्दूल असावा? की एकमेव डावखुरा वेगवान गोलंदाज, 12 वर्षानंतर संघात येणार जयदेव उनाडकट, की बुमराह, शमी सारखे एकके जखमी असल्यावर संधी मिळणारा उमेश यादव की निष्प्रभ ठरलेला नवदीप सैनी यातील एकाला संधी मिळण्याची दाट शक्यता.

संघाची निवड ही जवळपास काय असणार हे ठरलेले असते अश्यावेळी वारंवार संधी मिळणाऱ्या त्या खेळाडूंनी किमान जनाची नाही पण मनाची लाज बाळगत उत्कृष्ट कामगिरी करत बांग्लादेशसारख्या शाळकरी मुलाच्या संघाची वाताहत करत दोन्ही सामने निर्विवाद जिंकणे महत्वाचे. पहिल्या कसोटीत हा संघ खेळताना दिसू शकतो 

संभावित भारतीय संघ:

राहुल

शुभमन

चेतेश्वर

विराट

श्रेयस

रिषभ

रवीचंद्रन

अक्सर

कुलदीप

सिराज

उमेश

1 टिप्पणी:

  1. भारतीय संघाला WTC फायनल खेळण्यासाठी उरलेल्या एकूण सहा कसोटीपैकी किमान 4 जिंकाव्या तर 2 अनिर्णित राहिल्या तर किंवा किमान पाच सामन्यात जिंकणे आणि 1 सामन्यात मिळालेली हार देखील फायनलचे तिकीट फिक्स करू शकते. या दोन पर्यायशिवाय लागणारे कोणतेही निकाल भारतीय संघाचे WTC चे फायनलचे तिकीट एक स्वप्न ठरेल

    उत्तर द्याहटवा

सी ए टॉपर

स्वभावाला औषध नाही कारण प्रत्येक व्यक्तीच्या एक स्वभाव असतो.स्वभाव म्हणजे त्याची वागण्याची, बोलण्याची किंवा निर्णय घेण्याची प्रक्रिया. प्रत्...