शनिवार, १० डिसेंबर, २०२२

विराट

@imVkohli स्वतः एक दिग्गज, अद्भुत फलंदाज आहे तो आजकाल त्याच्या सर्वोच्च फॉर्ममध्ये नाही पण तरीही तो करत असलेल्या धावा ह्या त्याची दृढशक्ती दाखवते. एक दोन गोष्ट खटकत आहेत 
1. बाद झाल्यावर वा झेल घेतल्यावर त्याच्या चकित झालेल्या भावमुद्रा 
2.दुसऱ्या खेळाडूंच्या खेळासाठी टाळ्या वाजवणे दुसऱ्या खेळाडूचे कौतुक करणे ठीकच पण त्यापेक्षा वरचढ खेळण्याची जिद्द तर हरवला नाही ना अस उगाच वाटत. आरे ला कारे करणारा, बाद झाल्यावर गोलंदाजाला डोळे दाखवणारा, निर्भीड, कोणाची तमा न बाळगणारा विराट हरवलाय. तो हरवलेला विराट शोधण्याचे, त्याला परत आणण्याचे काम विराट तुलाच करायचे आहे. नाही पाहवत तुझे हे आजचे रुप.अस आतून तुला काही गोष्टी खटकत असाव्या बहुतेक पण त्या सगळ्या गोष्टी बाजूला सारून क्रिकेटच्या प्रत्येक प्रकारात सर्वोच्च धावा मिळवण्याचे ध्येय साकार करण्याचे स्वप्न उराशी ठेवून खेळणे गरजेचे. ज्या ज्या वेळी तू ठरवले त्या त्या वेळी तू शतक ठोकले ते संघासाठी मीडियाने शेवटचे शतक दोन वर्षांपूर्वी झाले वगैरेची बोंब केली त्यावेळी तू पहिल्यांदा स्वतःसाठी खेळतोय अस वाटलं पण नशिबाने तुला साथ दिली नाही. अनपेक्षितरित्या टी ट्वेंटीत शतक झाले अन मीडियाची शतक नाही याची एक एक दिवस मोजण्याची सवय तोडली . टी ट्वेंटी वर्ल्डकप मध्ये पोर्किस्तान किंवा एकंदरीत स्पर्धेत चांगल्या खेळीचे जगातील सगळ्यांनी कौतुक केले असेल पण तुला माहीत असेल की त्या धावा बनण्यामागे कौशल्यापेक्षा नशिबाचा भाग जास्त होता. त्या खेळया अप्रतिम होत्याच, त्याला तोड नाही पण त्या खेळीत सामन्यावर असलेले नियंत्रण, फलंदाज म्हणून तुझ्या व्यक्तिमत्वाचा ठसा तुझी दहशत नव्हती हे तुही मान्य करशील. कर्णधारपद म्हणजे काही सर्वस्व नाही आणि ते काढून घेतले म्हणून  तू कोणत्या शेल मध्ये जाणे, धोनी शिवाय कोणी फोन केला नाही, गर्दीत असूनही मी एकटा असतो अशी वक्तव्य तू मनाने खचला आहेस हे दाखवत. मैदानात प्रत्येक निर्णयात तू असण्याचा, टीव्हीवर कॅमेऱ्याच्या फोकसवर असणारा तुला त्या गोष्टी नसल्याचा नाही तर त्या गोष्टी परत तुझ्याकडे येईल असे काम करावं लागेल. प्रतिस्पर्ध्याला डोळे दाखवत, भल्या भल्या गोलंदाजाला आकाश दाखवत जमिनीवर आणणारा तू स्वतःला विसरलाय. तुला फक्त मोकळं खेळायचं आहे इतकंच पण मनातील विचार तुला अडथळे निर्माण करत आहे. कृपया यातून लवकर बाहेर ये. अजून खूप लांबपर्यत तुला पळायचे आहे, एकदिवसीय आणि कसोटीत सचिनचे सर्वाधिक धावांचे रेकॉर्ड तोडायचे आहे, सर्वात जास्त शतक करायची आहे. जर ते तुला साध्य करता आले नाही तर आजपर्यत केलेल्या प्रत्येक धावेची माती होईल. तुला तुझ्या जुन्या रस्त्यावर आज चालताना नाही पळताना पाहिले पाहिजे. श्री हनुमानाला जेव्हा समुद्र लांघून माता सीतेचा शोध घ्यायचा होता त्यावेळी त्याच्याकडे असलेली शक्ती याची जाणीव जांबुवंतला करून द्यावी लागली होती कदाचित माझे हे छोटे शब्द तुला तुझ्या खऱ्या शक्तीची आठवण करून देतील आणि तू क्रिकेटच्या मैदानात परत मोठी उडी मारशील अशी अपेक्षा करत मी थांबतो

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सी ए टॉपर

स्वभावाला औषध नाही कारण प्रत्येक व्यक्तीच्या एक स्वभाव असतो.स्वभाव म्हणजे त्याची वागण्याची, बोलण्याची किंवा निर्णय घेण्याची प्रक्रिया. प्रत्...