तुमच्यातला एक, सर्वसामान्य, कष्टकरी, भरपूर फिरणारा, खूप वाचणारा, चवीने खाणारा, शेयर मार्केट आणि आजूबाजूला घडणाऱ्या घटनांना थोडस वेगळ्या नजरेने पाहणारा आणि शब्दातून व्यक्त होणारा, अभिमानी हिंदू ~ सनातन
रविवार, २७ नोव्हेंबर, २०२२
विक्रम गोखले
बरेच कलाकार विक्रम गोखले याच्या जाण्याने दुःखी झालेत त्याच्याबरोबरचे संबंध, एखादा किस्सा त्याचे व्यक्तिमत्त्व याबद्दल सोशल मीडियावर भावनिक संदेश पोस्ट करत व्यक्त होत आहे. त्याच्या पोस्ट वाचून एक प्रेक्षक म्हणून आपणही व्यक्त व्हावं अस वाटल्याने हा थ्रेड कारण कलाकार मोठा होतो तो त्याच्या अभिनयामुळे आणि प्रेक्षकांमुळे. तस प्रेक्षक म्हणून मी काही यांचे खूप चित्रपट, नाटक पाहिले असे नाही कारण आमच्या लहानपणी आई वडील एखाद्य दुसऱ्या रविवारी पुण्याला घेऊन जायचे जंगली महाराज रोड वरच्या मॉडर्न कॅफेत नाष्टा, शनिवार वाडा, थोडीफार तुळदीबागेत खरेदी, कधी सारसबाग तर कधी इतरत्र फिरून दुपारी एखादा चित्रपट आणि रात्री परत घरी असा प्रोग्रॅम ठरलेला असायचा. प्रभात टॉकीज मध्ये आणि मंगला थिएटरमध्ये चित्रपट पहायला जाणे, तिथे वेफर्स, पॉपकॉर्न, समोसा सारख्या पदार्थाचा हट्ट करत चित्रपट पहायला एक वेगळीच मज्जा असायची. इतर वेळी दूरदर्शनवर लागणारे चित्रपट हाच एकमेव मनोरंजनाचा आणि चित्रपट पाहण्याचा स्रोत होता. त्यातही त्यावेळी रविवारी लागणारे मराठी चित्रपट बहुतेक वेळा मराठी सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ याचेच असायचे. रविवारच्या ह्याच चित्रपटात एकदा विक्रम गोखले यांचा कळत नकळत हा चित्रपट पाहिलेला आठवतो. वय तस लहानच पण काय पाहतोय, काय घडतंय हे समजायला लागलं होतं. चौकोनी कुटुंबाची ती गोष्ट आणि विक्रम गोखले बायकोला फसवून दुसऱ्याच बाईशी जुळलेले सूत त्यातून त्याच्या बायकोची, पोरांची होणारी फरकट पाहून विक्रम गोखले तर मला एक वाईट माणूस वाटलेला. लहान वय त्यामुळे चित्रपट पाहिल्यानंतर त्याला लाखोली वाहिली पण आज त्या अभिनयकडे वाळवून पाहिले तर दिलेल्या पात्रात जीव ओतून प्रेमात कुटुंबाला विसरणारा निर्दयी माणूस काय उभा केला होता ह्याचे कौतुक करावंसं वाटत. कळत नकळत नंतरही त्याचे कोणते सिनेमे पाहिलेले आठवत नाही. पुढचा आठवणीत असलेला त्याचा चित्रपट म्हणजे तुम बिन आणि हम दिल दे चुके सनम चित्रपटातील त्याचा अभिनय. नटसम्राट चित्रपटात छोटी पण अतिशय दर्जदार अभिनयाची झलक त्यांनी दाखवलेली, विशेषतः त्याचा नट म्हणून तू भिकारडा आहेसच पण माणूस म्हणून साल्या नीच आहेस हा डायलॉग नानाच्या कानफटात नसून आपल्याच तोंडात मारली अस पाहताना वाटेल. आज ते जगातून निघून गेल्यावर त्याच्या कामाचा अंदाज घ्यायला गेल्यावर त्याचे नाटक, सिनेमा इतकंच काय टीव्हीवरच्या उत्तम मालिका मधली काम वाचताना कलाकाराची उंची कळते. आज ते आपल्यात नाही पण त्याचे काम, त्यांनी जगलेली भूमिका, पात्र व्हिडीओ रूपात जगाच्या अनंतापर्यत आपल्याबरोबर राहणार आहे. लेखाची सुरुवात ठीक केल्यावर शेवट कसा करायचा याचा विचार मनात येत असताना त्याचा नटसम्राट चित्रपटातील हा शॉट आठवला आणि त्यातील अभिनय, संवाद फेक, एक मास्टर स्ट्रोक अभिनय ऐकण्या बघण्यासाठी ही लिंक शेयर करून त्या उत्कृष्ट अभिनेत्याला आदरांजली वाहतो आणि थांबतो.
शनिवार, २६ नोव्हेंबर, २०२२
सव्वीस अकरा
सव्वीस अकरा हे दोन शब्द म्हणजे अनेक लोकांच्या जखमेवरची खपली. आतंकवादी हल्ल्यात मुंबई होरपळून गेली. कित्येक सामान्य जनतेच्या निर्घृण खून, कित्येक चांगले अधिकारी,पोलीस याचे हुतात्म्य आणि भारताच्या सार्वभौमतेवर केलेला हा हल्ला एक काळा दिवस. पोर्किस्तान हा एक नीच देश ह्या देशाला भारताने शिक्षा केली का? तर नाही. हा थ्रेड झालेला प्रसंग कसा झाला, काय झालं यासाठी नसून भारताने ह्या घटनेचा बदला इतक्या वर्षात बदला घेतला नाही ही खंत आहे. एखादे गटार तुंबले असेल तर त्यावर केवळ चर्चा, वृत्तात, निंदा, टीका करून तो स्वच्छ होणार नसतो त्यासाठी त्या गटारात उभं राहून घाण साफ करणे तितकेच गरजेचे असते. एकंदरीत भारताचा इतिहास आणि स्वतः युद्धाला सुरुवात न करण्याची सबब मध्ये येत असल्याने भारताने गनिमीकावा वापरून पोर्किस्तानला त्या हल्ल्याचे उत्तर दिले असते तर? कदाचित अस करण्याची योजना चालूही असेल पण आजपर्यत ती योजना आपल्यासमोर न आल्याने नक्की भारतीय लोकांना ह्या घटनेचा बदला घ्यायचा आहे का हा प्रश्न मनात येतो. दुर्देवी मृत्यूला कवटाळलेल्या लोकांना त्या आतंकवादी लोकांचा एन्काऊंटर वा फाशी यापेक्षा प्रतिहल्ला सुखावून गेला असता, त्याच्या आत्म्यांना शांती लाभली असती शिवाय आयुष्यात परत असे परत न करण्याची आयुष्यभराची शिकवण त्या आतंकवादी देशाला शिकवता आली असती. आजही त्या हल्ल्यात आपल्या आप्तांना, प्रेमाच्या माणसांना गमावणाऱ्याचे वेळेनुसार दुःख हलके झाले असेल पण संपले नसणार. जोपर्यत भारत कोणतेही ठोस उपाययोजना करणार नाही, प्रतिहल्ला करणार नाही तोपर्यत त्या लोकांचे मनोधैर्य तुटणार नाही. आजच्या दिवशी प्राणाची आहुती दिलेल्या त्या प्रत्येक मुंबईकर, भारतीय लोकांच्या आत्म्याला शांती मिळवून देण्यासाठी भारतीय सरकारने पावले उचलली पाहिजे. दिवस सरतात तसे लोक ही घटना विसरतील अशी नसली तरी काही विशिष्ट गट आजही दोन्ही देशाचे संबंध चांगले होण्यासाठी प्रयत्नशील दिसतात त्यासाठी कला, क्रीडा याचे दरवाजे उघडण्याचे आव्हान केले जातात जे मूलतः चुकीचे आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे.
आतंकवादाला उत्तर देणे अपेक्षित शब्दांनी नाही तर बंदुकीच्या गोळीने तरच भविष्यात असे हल्ले करण्याचे धाडस ती लोक करणार नाही...........
शुक्रवार, २५ नोव्हेंबर, २०२२
प्रश्नचिन्ह
विरोधी पक्ष ज्याचे सख्खे वैरी सत्तेत आणि शेजारी राज्यात असताना राजकारण करून चमकण्याची संधी हातातून जाऊ देतील तरी कसे? महाराष्ट्र, महाराष्ट्रीतील गाव, शहर आणि जनता याचे एकमेव कैवारी असण्याचे केवळ नाटक विरोधी पक्ष करतोय तर दुसरीकडे सगळ्या गोष्टी कश्या नियंत्रणात आहेत हे सांगण्याचे काम सत्ताधारी पक्ष करतोय. मुळात शेजारच्या राज्याच्या मुख्यमंत्री जे अचरट, बोगस दावे करतोय त्याला कवडीची किंमत न देता शांततेत सर्व प्रकरण हाताळता आले असते पण प्रत्येकाला आयत्या आलेल्या वादाच्या आगीत स्वतःच्या पोळ्या भाजायच्या आहेत. केंद्रात आणि दोन्ही राज्यात एकाच पक्षाची सत्ता असताना प्रकरण दाबून टाकण्याचे कोणते प्रयत्न झाले की नाही माहीत नाही पण कर्नाटक सरकारच्या दाव्यावर महाराष्ट्र सरकारचा प्रतिदावा आल्याने परिस्थिती अजून चिघळणार हे सामान्य ज्ञान नसलेल्या राजकारणी लोकांना अक्कल आहे का? बरं केवळ दावे प्रतिदावे यामुळे गावाची हद्द बदलेल का? मूळ वस्तुस्थिती काय याचा कोणताच अभ्यास न करता विरोधक, सत्ताधारी सगळे वातावरण तापवत आहे आणि मीडिया आहेच ह्यात तेल ओतायला. गनिमी काव्यात बैलाच्या शिंगाला मशाली लावून जंगलात सोडून विरुद्ध दिशेला निघून जाण्याची, चकवा देण्याची पद्धत होती तीच पद्धत पद्धतशीरपणे राजकारणी लोक वापरतात की काय आणि सगळं लक्ष वादावर केंद्रित करून दुसरीकडे दुसरेच लपून छपून दुसरंच काम राजकारणी करत नसतील का अस साहजिक मनात येते कारण ही राजकारणी कोणता कुटील डाव खेळातील हे जनतेला समजणारच नाही. ज्याप्रकारे आफताब प्रकरण पुढे आले त्यामुळे लांडयांची प्रतिमा डागळली जाऊ लागल्याने मीडियात हिंदू समाजात तसेच प्रकार, घटना मीडियात येत आहे किंवा एकदा का कोणती मोठी बलात्कार घटना झाली की सलग संपूर्ण देशात बलात्काराचे सत्र चालू आहे अश्या बातम्या एकामागून एक येतात हे केवळ आणि केवळ जनतेच्या डोळ्यात धूळ फेकून त्या परिस्तिथीत पडद्यामागे वेगळ्याच खेळया खेळल्या जातात असा माझा समज आहे राजकारणी मितभाषी, सद्गुणी आणि नैतिकतेला, सगळ्या समाजाला एकत्र बांधून पुढे घेऊन जाणारा नेता असावा अशी अपेक्षा असताना राजकारणी पक्ष, पुढारी ह्याची आजकालची भाषा, विचार, बोलण्याची, राजेशाही थाटात राहण्याची जी लाट आली आहे ती त्या लोकाना कशी साध्य करता येते? राजकारणात येण्याआधी रंक असलेला काही वर्षात राव कसा बनतो याचे उत्तर सगळयांना माहीत असले तरी तेच मूठभर लोक बहुसंख्य जनतेवर राज्य करतात ह्यासारखी वाईट गोष्ट दुसरी नाही. कस बदलणार हे सगळं की असच चालू राहणार? आजच्या काळापेक्षा कदाचित इंग्रजांचे राज्य तरी चांगले निदान जनतेला त्याचा खरा शत्रू कोण हे तेही माहीत असायचे, जनतेची लूट, पिळवणूक कोण करतय हे तरी माहीत असायचे त्याच्याविरुद्ध आंदोलन करणे, सशस्त्र क्रांती घडवून आणणे जनतेच्या हातात तरी होते पण आता जनतेने करायचे काय? एकदा विरोधकांच्या हातात सत्ता द्यायची त्यांना कंटाळून त्याच्या विरोधकांना पुढच्या वेळी संधी द्यायची पण सत्तेवर येणारा तो प्रत्येक वेळी जनतेच्या प्रश्नांना करणी लावण्यापेक्षा वैयक्तिक स्वार्थ, सत्ता, पद प्रतिष्ठा, पैसा यात गुरफटून घेत राहतो आणि शेवटी जनतेच्या हातात धुपाटने राहते ज्यात तूप ही नसते आणि तेल ही. रिकाम होय रिकामं कारण मतदान करण्याखेरीज कोणताच अधिकार जनतेच्या हातात नाही तरीही लोकांनी लोकांसाठी लोकांमार्फत चालवलेला कारभार त्याला लोकशाही म्हणत प्रत्येक दिवस फसवणूक करून घेणेच जनतेच्या हातात आहे का? कायदा बनवणारे कायदे तोडणारे असेल तर पावसाने झोडपले, राजाने मारले तर दाद कुठं मागायची.
असो, थांबतो...........
सोमवार, २१ नोव्हेंबर, २०२२
भारतीय संघाची निवड: वेध पुढच्या विश्वचषकाचे
T20WorldCup भारताच्या हातातून गेला आता वेध लागतील पुढच्या एकदिवसीय विश्वचषकाचे. विराट कोहलीचा राजीनामा असो की रोहित शर्माची चुकीच्या खेळाडूंवर लावलेली बोली यावर मी यापूर्वीही ट्विट्स केलेत पण आता पुढची मोठी स्पर्धा जिंकायची असेल तर जशी @BCCI ने निवड समिती बरखास्त करून कंबर कसली आहे तसच क्रिकेटवेड्या देशात आपल्यासारखे क्रिकेटरसिकांना पुढच्या विश्वचषक स्वप्न पडायला सुरुवात झाली असेल. पुढचा विश्वचषक येईपर्यटचे 25 सामने त्यात मिळणाऱ्या खेळाडूंना संधी यावरून कोणता अंतिम संघ निवडला जाऊ शकतो हे ठरणार असले तरी निवड समिती कोणते मोठे बदल करेल असे वाटत नाही आणि परत तेच खेळाडू खेळताना आपल्याला दिसतील. उदारणार्थ स्फोटक हिटमॅनला, रेकॉर्डस् उद्धवस्थ करणारा विराट, कोणत्याही चेंडूला कोणत्याही ठिकानवरून कुठेही फेकणारा सूर्या,ऑलराऊंडर म्हणून पंड्याला, यॉर्कर किंग बुमराह सारख्या खेळाडूंना कोणी खाली बसवले का? नाही ना मग जागा उरतात केवळ सहा आणि ह्या सहा जागांसाठी किमान 30 ते चाळीस लोकात स्पर्धा आहे. सहा जगासाठी काही खेळाडू ठरलेले आहेत जसे शिखर धवन याला केवळ एकदिवसीय संघात निवड आणि कर्णधार म्हणून केलेली निवड याआधी झाल्याने त्याला संधी मिळू शकते याची शक्यता आहे पण ज्या प्रकारे तो धावा करण्यासाठी झगडतोय ते पाहता त्याचा पत्ता कट देखील होऊ शकतो. क्रमांक पाचवर सोशल मीडियावर जादूचे प्रयोग करणारा जादूगार श्रेयस अय्यर आहे, विकेटच्या मागे पंतच्या नावाने विनाकारण पाय रोवलेले आहे.मागील आणि ह्या विश्वचषकात संधी न मिळालेल्या युझुवेंद्र भावनिक पाठिंबा मिळू शकतो, जडेजा सारखा चतुरस्त्र खेळाडू अश्यावेळी संघात रिकाम्या जागा हळू हळू कमी होत आहे.
रोहित
धवन
विराट
सूर्या
श्रेयस
हार्दिक
रिषभ
रवींद्र जडेजा
युझुवेंद्र
बुमराह
सिराज/शमी/भुवनेश्वर
सर्वसामान्यपणे हा संघ निवडला गेला तर विश्वचषक भारत जिंकेलच अस आहे का? ह्याच लोकांना निवडावे लागणार ही दगडावरची रेष आहे कारण ह्यांना दुर्लक्षित करून संघ उभारू शकतच नाही मग नवीन निवड समिती आणि @BCCI कोणते कठोर निर्णय घेऊ शकेल बर? केएल राहुल, दीपक हुड्डा, शार्दूल ठाकूर, कुलदीप, अक्षर, अर्षदीप, वॉशिंग्टन, हर्षल पटेल, पृथ्वी, गिल, संजू,किशन, उमरान, प्रसिद्ध कृष्णा, दीपक चहर,व्यंकटेश अय्यर, मयांक अग्रवाल, नटराजन, सैनी यातील काही खेळाडू राखीव खेळाडू म्हणून निवडले जातील (काही अपेक्षित नाव नमूद करणे राहू शकते) एकंदरीत भारतीय संघ हा कोणतेही कठोर भूमिका घेऊ शकत नाही कारण इथे खेळापेक्षा खेळाडू मोठे झाले आहे. खेळ जिंकण्यासाठी खेळाडूंना डावलण्याची शक्ती कोणत्याही निवड समितीत,बोर्डाच्या अधिकाऱ्यात येईल किंवा असेल असे वाटत नाही त्यामुळे तीच लोक, तोच विचार आणि तोच संघ याबरोबर त्याच निकालाची पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता. विश्वचषक जिंकणे भारतासाठी कठीण कारण इथे गर्दी जास्त आहे. आता वेळ आली आहे खेळाडूंचे मोठ्या स्पर्धेत अवलोकन, त्यांनी केलेली कामगिरी, भूतकाळातील यश विसरून केवळ आणि केवळ वर्ल्डकप जिंकण्याची मोहीम योग्य खेळाडूंना संधी देण्यापासून चालू करावी लागेल, जे होईल असं वाटत नाही त्यामुळे पुढच्या वेळीही निराशा पदरात पाडून घेण्यास क्रिकेटरसिकांनी तयार रहा. भारतीय संघाने जिंकावे हीच इच्छा असली तरी ती पूर्ण करणारा योग्य संघ निवडण्याची बुद्धी त्या लोकात येऊ दे हीच इच्छा. हा थ्रेड, लेख यावर लाईक, रेट्विट,शेयर काही करू नका, करायचे असेल तर बुकमार्क करून ठेवा आणि बरोबर भारतीय संघ निवडला गेला की हा लेखाशी तुलना करा. दोन नाहीतर तीन बदल सोडले तर हाच संघ खेळताना तुम्हाला दिसेल यात मला खात्री आहे. त्यावेळी मात्र लेखाला लाईक करण्याची कंजूषी सहन केली जाणार नाही. असो स्पर्धेला अजून एक वर्ष आहे, किमान 25 सामने भारत खेळणार आहे त्यातून योग्य खेळाडू भेटावे, संघ निवडीची समस्या सुटावी, मोठ्या नाव, भूतकाळातील कामगिरी पेक्षा योग्य खेळाडूंची निवड व्हावी अश्या वेळी प्रतिष्ठित खेळाडूला जरी खाली बसवावे लागले तेरी बसवले गेले पाहिजे.
पुढचा विश्वचषक भारतात होणार ही जमेची बाजू असली तरी आयपीएल खेळण्याच्या अनुभवाने परदेशी खेळाडू भारतीय वातावरण, मैदाने आणि पिचशी समरस झालेत. पन्नास ओव्हरच्या सामन्यात धावपट्टी चांगलीच असावी लागते जी वेगवान गोलंदाजाबरोबर फिरकीला साथ देणारी असली तरी चांगला खेळ दाखवणारे फलंदाज इथे धावांची शिखर निर्माण करू शकतील त्यामुळे येणारा हा विश्वचषक विस्फोटक असणार यात दुमत नाही. खेळ म्हंटल की कोणी जिंकणार, कोणी हरणार पण ज्या पद्धतीची कामगिरी संपूर्ण वर्ष भारतीय संघ करतो तशीच कामगिरी करून कपवर अजून एकदा आपले नाव लागावे यासाठी सुयोग्य संघ निवड करणे खूप गरेजेचे
येत्या वर्षभरात ठरलेले दौऱ्यात भारतीय संघ खेळत असणारे एकदिवसीय सामने खालील प्रकारे
न्यूझीलॅन्ड 3 सामने
बांगलादेश 3 सामने
श्रीलंका 3 सामने
न्यूझीलॅन्ड 3 सामने
ऑस्ट्रेलिया 3 सामने
उर्वरित दौरे ठरतील त्यात इंगल्ड बरोबर 5 तर दक्षिण आफ्रिका विरुद्ध 3 आणि इतर छोट्या मोठ्या संघाशी वेळेनुसार काही सामने खेळेल जातील. नंतर आयपीएल ही येणार आहे, त्यानंतर आशिया कप आणि नंतर 2023 चा एकदिवसीय विश्वचषक. सामने आणि वेळ कमी आणि प्रश्न अधिक असे असले तरी आपल्याकडे असणारे खेळाडूंची संख्या पाहता चांगले खेळाडूंची कमतरता नाही.
क्रमशः
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
सी ए टॉपर
स्वभावाला औषध नाही कारण प्रत्येक व्यक्तीच्या एक स्वभाव असतो.स्वभाव म्हणजे त्याची वागण्याची, बोलण्याची किंवा निर्णय घेण्याची प्रक्रिया. प्रत्...
-
९० च्या काळात एड्स आणि एड्सबद्दलची जनजागृती यामुळे टीव्हीवर कंडोमच्या जाहिराती सर्रास दिसत असल्याच्या. बलवीर पाशा कौन है ते मादक...
-
Afghanistan played well अस म्हणत हरलेल्या संघाचे मनोधैर्य वाढवण्यासाठी बोलणारे अनेक पुढे येतील पण त्या शब्दांनी खरच काही बदलणार ...
-
स्वभावाला औषध नाही कारण प्रत्येक व्यक्तीच्या एक स्वभाव असतो.स्वभाव म्हणजे त्याची वागण्याची, बोलण्याची किंवा निर्णय घेण्याची प्रक्रिया. प्रत्...