T20WorldCup भारताच्या हातातून गेला आता वेध लागतील पुढच्या एकदिवसीय विश्वचषकाचे. विराट कोहलीचा राजीनामा असो की रोहित शर्माची चुकीच्या खेळाडूंवर लावलेली बोली यावर मी यापूर्वीही ट्विट्स केलेत पण आता पुढची मोठी स्पर्धा जिंकायची असेल तर जशी @BCCI ने निवड समिती बरखास्त करून कंबर कसली आहे तसच क्रिकेटवेड्या देशात आपल्यासारखे क्रिकेटरसिकांना पुढच्या विश्वचषक स्वप्न पडायला सुरुवात झाली असेल. पुढचा विश्वचषक येईपर्यटचे 25 सामने त्यात मिळणाऱ्या खेळाडूंना संधी यावरून कोणता अंतिम संघ निवडला जाऊ शकतो हे ठरणार असले तरी निवड समिती कोणते मोठे बदल करेल असे वाटत नाही आणि परत तेच खेळाडू खेळताना आपल्याला दिसतील. उदारणार्थ स्फोटक हिटमॅनला, रेकॉर्डस् उद्धवस्थ करणारा विराट, कोणत्याही चेंडूला कोणत्याही ठिकानवरून कुठेही फेकणारा सूर्या,ऑलराऊंडर म्हणून पंड्याला, यॉर्कर किंग बुमराह सारख्या खेळाडूंना कोणी खाली बसवले का? नाही ना मग जागा उरतात केवळ सहा आणि ह्या सहा जागांसाठी किमान 30 ते चाळीस लोकात स्पर्धा आहे. सहा जगासाठी काही खेळाडू ठरलेले आहेत जसे शिखर धवन याला केवळ एकदिवसीय संघात निवड आणि कर्णधार म्हणून केलेली निवड याआधी झाल्याने त्याला संधी मिळू शकते याची शक्यता आहे पण ज्या प्रकारे तो धावा करण्यासाठी झगडतोय ते पाहता त्याचा पत्ता कट देखील होऊ शकतो. क्रमांक पाचवर सोशल मीडियावर जादूचे प्रयोग करणारा जादूगार श्रेयस अय्यर आहे, विकेटच्या मागे पंतच्या नावाने विनाकारण पाय रोवलेले आहे.मागील आणि ह्या विश्वचषकात संधी न मिळालेल्या युझुवेंद्र भावनिक पाठिंबा मिळू शकतो, जडेजा सारखा चतुरस्त्र खेळाडू अश्यावेळी संघात रिकाम्या जागा हळू हळू कमी होत आहे.
रोहित
धवन
विराट
सूर्या
श्रेयस
हार्दिक
रिषभ
रवींद्र जडेजा
युझुवेंद्र
बुमराह
सिराज/शमी/भुवनेश्वर
सर्वसामान्यपणे हा संघ निवडला गेला तर विश्वचषक भारत जिंकेलच अस आहे का? ह्याच लोकांना निवडावे लागणार ही दगडावरची रेष आहे कारण ह्यांना दुर्लक्षित करून संघ उभारू शकतच नाही मग नवीन निवड समिती आणि @BCCI कोणते कठोर निर्णय घेऊ शकेल बर? केएल राहुल, दीपक हुड्डा, शार्दूल ठाकूर, कुलदीप, अक्षर, अर्षदीप, वॉशिंग्टन, हर्षल पटेल, पृथ्वी, गिल, संजू,किशन, उमरान, प्रसिद्ध कृष्णा, दीपक चहर,व्यंकटेश अय्यर, मयांक अग्रवाल, नटराजन, सैनी यातील काही खेळाडू राखीव खेळाडू म्हणून निवडले जातील (काही अपेक्षित नाव नमूद करणे राहू शकते) एकंदरीत भारतीय संघ हा कोणतेही कठोर भूमिका घेऊ शकत नाही कारण इथे खेळापेक्षा खेळाडू मोठे झाले आहे. खेळ जिंकण्यासाठी खेळाडूंना डावलण्याची शक्ती कोणत्याही निवड समितीत,बोर्डाच्या अधिकाऱ्यात येईल किंवा असेल असे वाटत नाही त्यामुळे तीच लोक, तोच विचार आणि तोच संघ याबरोबर त्याच निकालाची पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता. विश्वचषक जिंकणे भारतासाठी कठीण कारण इथे गर्दी जास्त आहे. आता वेळ आली आहे खेळाडूंचे मोठ्या स्पर्धेत अवलोकन, त्यांनी केलेली कामगिरी, भूतकाळातील यश विसरून केवळ आणि केवळ वर्ल्डकप जिंकण्याची मोहीम योग्य खेळाडूंना संधी देण्यापासून चालू करावी लागेल, जे होईल असं वाटत नाही त्यामुळे पुढच्या वेळीही निराशा पदरात पाडून घेण्यास क्रिकेटरसिकांनी तयार रहा. भारतीय संघाने जिंकावे हीच इच्छा असली तरी ती पूर्ण करणारा योग्य संघ निवडण्याची बुद्धी त्या लोकात येऊ दे हीच इच्छा. हा थ्रेड, लेख यावर लाईक, रेट्विट,शेयर काही करू नका, करायचे असेल तर बुकमार्क करून ठेवा आणि बरोबर भारतीय संघ निवडला गेला की हा लेखाशी तुलना करा. दोन नाहीतर तीन बदल सोडले तर हाच संघ खेळताना तुम्हाला दिसेल यात मला खात्री आहे. त्यावेळी मात्र लेखाला लाईक करण्याची कंजूषी सहन केली जाणार नाही. असो स्पर्धेला अजून एक वर्ष आहे, किमान 25 सामने भारत खेळणार आहे त्यातून योग्य खेळाडू भेटावे, संघ निवडीची समस्या सुटावी, मोठ्या नाव, भूतकाळातील कामगिरी पेक्षा योग्य खेळाडूंची निवड व्हावी अश्या वेळी प्रतिष्ठित खेळाडूला जरी खाली बसवावे लागले तेरी बसवले गेले पाहिजे.
पुढचा विश्वचषक भारतात होणार ही जमेची बाजू असली तरी आयपीएल खेळण्याच्या अनुभवाने परदेशी खेळाडू भारतीय वातावरण, मैदाने आणि पिचशी समरस झालेत. पन्नास ओव्हरच्या सामन्यात धावपट्टी चांगलीच असावी लागते जी वेगवान गोलंदाजाबरोबर फिरकीला साथ देणारी असली तरी चांगला खेळ दाखवणारे फलंदाज इथे धावांची शिखर निर्माण करू शकतील त्यामुळे येणारा हा विश्वचषक विस्फोटक असणार यात दुमत नाही. खेळ म्हंटल की कोणी जिंकणार, कोणी हरणार पण ज्या पद्धतीची कामगिरी संपूर्ण वर्ष भारतीय संघ करतो तशीच कामगिरी करून कपवर अजून एकदा आपले नाव लागावे यासाठी सुयोग्य संघ निवड करणे खूप गरेजेचे
येत्या वर्षभरात ठरलेले दौऱ्यात भारतीय संघ खेळत असणारे एकदिवसीय सामने खालील प्रकारे
न्यूझीलॅन्ड 3 सामने
बांगलादेश 3 सामने
श्रीलंका 3 सामने
न्यूझीलॅन्ड 3 सामने
ऑस्ट्रेलिया 3 सामने
उर्वरित दौरे ठरतील त्यात इंगल्ड बरोबर 5 तर दक्षिण आफ्रिका विरुद्ध 3 आणि इतर छोट्या मोठ्या संघाशी वेळेनुसार काही सामने खेळेल जातील. नंतर आयपीएल ही येणार आहे, त्यानंतर आशिया कप आणि नंतर 2023 चा एकदिवसीय विश्वचषक. सामने आणि वेळ कमी आणि प्रश्न अधिक असे असले तरी आपल्याकडे असणारे खेळाडूंची संख्या पाहता चांगले खेळाडूंची कमतरता नाही.
क्रमशः
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा