शनिवार, २६ नोव्हेंबर, २०२२

सव्वीस अकरा

सव्वीस अकरा हे दोन शब्द म्हणजे अनेक लोकांच्या जखमेवरची खपली. आतंकवादी हल्ल्यात मुंबई होरपळून गेली. कित्येक सामान्य जनतेच्या निर्घृण खून, कित्येक चांगले अधिकारी,पोलीस याचे हुतात्म्य आणि भारताच्या सार्वभौमतेवर केलेला हा हल्ला एक काळा दिवस. पोर्किस्तान हा एक नीच देश ह्या देशाला भारताने शिक्षा केली का? तर नाही. हा थ्रेड झालेला प्रसंग कसा झाला, काय झालं यासाठी नसून भारताने ह्या घटनेचा बदला इतक्या वर्षात बदला घेतला नाही ही खंत आहे. एखादे गटार तुंबले असेल तर त्यावर केवळ चर्चा, वृत्तात, निंदा, टीका करून तो स्वच्छ होणार नसतो त्यासाठी त्या गटारात उभं राहून घाण साफ करणे तितकेच गरजेचे असते. एकंदरीत भारताचा इतिहास आणि स्वतः युद्धाला सुरुवात न करण्याची सबब मध्ये येत असल्याने भारताने गनिमीकावा वापरून पोर्किस्तानला  त्या हल्ल्याचे उत्तर दिले असते तर? कदाचित अस करण्याची योजना चालूही असेल पण आजपर्यत ती योजना आपल्यासमोर न आल्याने नक्की भारतीय लोकांना ह्या घटनेचा बदला घ्यायचा आहे का हा प्रश्न मनात येतो. दुर्देवी मृत्यूला कवटाळलेल्या लोकांना त्या आतंकवादी लोकांचा एन्काऊंटर वा फाशी यापेक्षा प्रतिहल्ला सुखावून गेला असता, त्याच्या आत्म्यांना शांती लाभली असती शिवाय  आयुष्यात परत असे परत न करण्याची आयुष्यभराची शिकवण त्या आतंकवादी देशाला शिकवता आली असती. आजही त्या हल्ल्यात आपल्या आप्तांना, प्रेमाच्या माणसांना गमावणाऱ्याचे वेळेनुसार दुःख हलके झाले असेल पण संपले नसणार. जोपर्यत भारत कोणतेही ठोस उपाययोजना करणार नाही, प्रतिहल्ला करणार नाही तोपर्यत त्या लोकांचे मनोधैर्य तुटणार नाही. आजच्या दिवशी प्राणाची आहुती दिलेल्या त्या प्रत्येक मुंबईकर, भारतीय लोकांच्या आत्म्याला शांती मिळवून देण्यासाठी भारतीय सरकारने पावले उचलली पाहिजे. दिवस सरतात तसे लोक ही घटना विसरतील अशी नसली तरी काही विशिष्ट गट आजही दोन्ही देशाचे संबंध चांगले होण्यासाठी प्रयत्नशील दिसतात त्यासाठी कला, क्रीडा याचे दरवाजे उघडण्याचे आव्हान केले जातात जे मूलतः चुकीचे आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे.

आतंकवादाला उत्तर देणे अपेक्षित शब्दांनी नाही तर बंदुकीच्या गोळीने तरच भविष्यात असे हल्ले करण्याचे धाडस ती लोक करणार नाही...........

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सी ए टॉपर

स्वभावाला औषध नाही कारण प्रत्येक व्यक्तीच्या एक स्वभाव असतो.स्वभाव म्हणजे त्याची वागण्याची, बोलण्याची किंवा निर्णय घेण्याची प्रक्रिया. प्रत्...