कल्की पाहिला नाही तर काही नाही पाहिले. एक युनिव्हर्स म्हणून पहाल तर समजेलच पण हा चित्रपट गुंफलेला आहे सनातन धर्माच्या सिद्धांतांवर. थोडस सनातन धर्माचे ज्ञान असेल तर कथा लवकर समजेल हे नक्की. असे चित्रपट एक वेगळ्या प्रकारे सनातन धर्म लोकांना समजावेल. बच्चन इतका उंच का किंवा अश्या अनेक प्रश्नाचे उत्तर सनातन धर्म आहे. जस जसे विश्व कलियुगात प्रवेश करत आहे तस तसे माणसे, जनावरे आणि परिसरात बदल झाला आहे. पूर्वीची लोक अधिक उंच, शक्तिशाली, दीर्घकाळ जगणारे होते त्याच काळातील अश्वत्थामा म्हणून तो इतर पात्रांपेक्षा उंच, शक्तिशाली आहे असो हा केवळ एक प्रश्न उत्तर दिले ते संकल्पना स्पष्ट करायला पण हा चित्रपट अजून बरेच भव्य होऊ शकतो. भगवान विष्णूचा जन्म कल्की या शेवटच्या अवतारात जन्म, सात चिरंजीवीची त्यात असणारी भूमिका सगळं सगळं चित्रपटातून मांडले गेले तर अज्ञानी हिंदूंना थोडस अधिक जागृत करता येईल याच अपेक्षेचे ओझे निर्मात्या, दिग्दर्शक जोडीवर टाकूया. चित्रपट नक्की पहा. भगवद्गीतेतील प्रसिद्ध श्लोक
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥4.7
म्हणजे
धर्माचा ऱ्हास होतो, अधर्माचे पारडे जड होते, जेव्हा जेव्हा पापाचे वर्चस्व वाढते त्यावेळी दुर्जनांचा नाशासाठी आणि सज्जनांच्या रक्षणासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी मी प्रत्येक युगात जन्म घेतो.
माझा विषय चित्रपट त्यातील पात्र हा नाहीच तर आपल्या धर्माबद्दल सजग करणे, त्यानुसार वागणे, बदल घडवण्यासाठी उत्सुक करणे हा आहे आणि जर हा उद्देश हा चित्रपट निर्माण करणार असेल तर ते सोन्याहून पिवळे होणार नाही का? मारवल, डीसी युनिव्हर्स खूप पाहिले असतील पण आपल्या सनातन धर्म त्याचे युनिव्हर्स नक्कीच त्याहून खूप उच्च प्रतीचे आहे हे समजून घ्या. संसाराच्या जवाबदरीत, कष्टाचे फळ म्हणून मिळवणाऱ्या पैश्यातुन सुख खरेदी करणाऱ्या लोकहो सुख म्हणजे नक्की काय हे अजून तुम्हाला समजलेच नाही. स्वर्ग नरक ही प्रतीके पण आपले जीवन सत्याच्या, सनातन धर्माच्या मार्गावर चालले तर स्वर्ग तुमच्या पायाशी असल्याचा भास तुम्हाला होईल. असो आजच्या पुरते इतके बास पुढचा लेख सादर करेपर्यत जय श्रीकृष्णा......
।।ॐ नमोः नारायणाय नमः।।
।।ॐ नमोः भगवते वासुदेवाय नमः।।
।।ॐ नमः शिवाय।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा