लोकसभा निकाल २०२४ यात कोणताही निकाल उल्लेख केला नसला तरी निकालाच्या दिवशी निकालानंतर कोणत्या घडामोडींवर नजर ठेवली पाहिजे याचबरोबर आज मीडियात छोट्या मोठ्या पक्षाचे मोठे नेते काय बोलतात याकडे लक्ष देऊन त्याच्या बोलण्याचा निष्कर्ष काढला पाहिजे. मुळात काही पक्ष तर उरलेल्या दोन निवडणूक टप्पे होण्याआधीच आपली हार मान्य केली आहे. काही लोकांचे तर केवळ आपलं घराणे, माझा पोर, माझी पोरगी यात जीव अटकला आहे तर काहींचे आपल्या घराण्याच्या ऐतिहासिक नाव पुढे चालू राहण्यासाठी रडकुंडीला आले आहे असो इंडी आघाडी हे केवळ एक मृगजळ आहे तसे ते प्रत्येक पक्ष केवळ मी आणि माझा पक्ष इतकाच विचार करत असले तरी निकालानंतर आपण कापसाच्या ढिगाऱ्यात सुई शोधावी अशी गत होणार हे स्पष्ट असल्याने केवळ निडणुकीनंतर आपल्या पक्षाला जास्तीत जास्त फायदा होण्यासाठी ती लोक एकत्र आहे. निकालानंतर त्या इंडी आघाडीत होणाऱ्या कुस्त्या, भांडणे, वितुष्ट तर हास्यजत्रेला मागे पाडतील अशी आशा आहे. काही आप सारख्या पक्षाचे बरे आहे की ते पूर्णतः नामशेष होण्याच्या मार्गावर पळत आहे तर त्याचा नेता जून महिना उजाडला की परत अंधार कोठडीत जाणार आहे. नावात ममता असणारी ती पुढारी मतांसाठी पाय मोडून घेते, डोकं फोडून घेते ती निकालानंतर कोलांटी उडी मारताना दिसू शकते.कदाचित भाजपा पूर्ण बहुमत मिळवेल असे ही नाही त्यामुळे उद्या काय होणार ह्याची काहीच कल्पना नसताना नक्की एक व्यक्ती, एक भारतीय नागरिक, मतदार म्हणून पुढची पाच वर्षे ह्या पुढाऱ्यांचा मर्कटलीला पहाव्या लागणार असताना केवळ निवडणुकीत निकालानंतर ह्याच्या स्वार्थासाठी होणाऱ्या माकडचाळे कसे पहायचे, कासआनंद घ्यायचा यासाठी हा लेख. तुमचा आवडता नेता कोणताही असो, पक्ष कोणताही असो तो त्याचा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी कधी कोणत्या गटात जाईल याची शक्यता नाही अश्या वेळी कोणताही झेंडा खांद्यावर न घेता निवडणुकीचा आणि निकालांचा आनंद घ्या
आजचा विषय थोडा विचित्र आहे कारण मला भाजपा, मोदी, पुढचा पंतप्रधान, ४००+ जागा या गोष्टींवर न बोलता विरोधकांवर बोलायचे आहे. बोलायचे म्हणजे बोलक्या बहुल्यातील अर्धवटराव सारख्या शाब्दिक कोट्या करायच्या नाही की उद्धवराव सारख्या शाब्दिक टोमणे मारायचे नाही.
मोदींचे जर ४०० जागा निवडून येणारच असेल तर विचार करा विरोधकांना किती जागा मिळतील? नंबर दोन वर कोण राहील? विरोधी पक्ष नेता हे पद मिळण्याइतके तरी जागा एक पक्ष निवडुन आणेल का? नाही आणता आले तर प्रमुख विरोधी पक्ष आणि विरोधी पक्ष नेता हे पद मिळवण्यासाठी ते काय करतील? मोदी मोदी करत सगळे आनंदात उड्या हाणत असतील, जल्लोष करत असतील तिथे विरोधक मात्र विवंचनेत, आकडे मोडीत अडकलेले असतील. नाही म्हंटले तरी विरोधकात काँग्रेसला जास्तीत जास्त उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे अश्या वेळी मागच्या वेळी काँग्रेसला विरोधी पक्ष नेता, पक्ष म्हणून मान्यता मिळाली पण यावेळी मिळेलच असे नाही म्हणूनच इंडी आघाडीतील छोट्या छोट्या प्रादेशिक पक्षाचा भाव वाढणार आहे. प्रादेशिक पक्ष म्हणजे त्याची जास्त नाही पण थोडे फार उमेदवार निवडून आले आहे पण भविष्य अंधारमय दिसत आहे ती लोक आपला पक्ष विकायला मागे पुढे पाहणार नाही आणि असेच छोटे प्रादेशिक पक्ष विकत घेत काँग्रेस विरोधी पक्ष बनण्याचे आपले स्वप्न पूर्ण करेल.
काही पक्ष तर असे आहेत की ज्यांना उद्याचा निकाल काय येणार आहे ह्याचा अंदाज आल्याने ४ जून नंतर अनेक छोटे पक्ष काँग्रेस मध्ये समाविष्ट होतील असे भाकीत करणारे आधारवड शरद पवार हे आघाडीवर असणार आहे. एकंदरीत शरद पवार ४ जून नंतरच काँग्रेस मध्ये जायची भाषा का करत आहे ते हुशार वाचकांना समजले असेल त्यामुळे कोणतेही एक स्टेटमेंट असेल किंवा वर्तमानपत्रातील दोन ओळी यातील गांभीर्य, मतितार्थ काढणे सगळ्यांना समजत नाही त्यामुळे केवळ कोणता तरी एक झेंडा खांद्यावर घेत कोण्या नेत्याला अंध पाठींबा देण्याआधी आपल्याला राजकारण किती कळत याची स्वपरीक्षा करत जा. जरी तुम्ही या परीक्षेत अव्वल आलात तरी पुढारी, नेते आणि राजकारणी पुढच्या घडीला स्वार्थ साधण्यासाठी कोणता डाव खेळातील ह्याची हमी कोणीही देऊ शकणार नाही त्यामुळे जे घडतंय ते नीट पहा, वाहवत जाऊ नका, कोणता नेता काय बोलतोय, त्याची देह बोली काय आहे याकडे नक्की लक्ष द्या. मोदी सरकार ४०० पार जाऊ की न जाऊ यापेक्षा विरोधी पक्षाची निवडणूक निकालानंतर होणारी धावपळ पाहण्यासारखी असेल यात शंकाच नाही. केवळ मोदी जिंकला, ४०० पार गेला, तिसऱ्यांदा पंतप्रधान बनला ह्या आनंदात विरोधकांची अवस्था न पाहण्याची चूक तुम्ही करू नये म्हणून हा छोटासा लेख. आवडला तर लाईक करा, शेयर करा आणि आनंदी रहा
जय श्रीराम, जय श्रीकृष्णा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा