सोशल मीडियात व्यक्त झालेल्या काही महत्वाच्या गोष्टी म्हणजे अनादी मी अनंत मी, अस्पृश्य समजले गेलेल्या समाजासाठी निर्माण केलेले पतीतपावन मंदिर, अटलजी नी सावरकर मतलब व्यक्त केलेले मत, ने मजसी ने परत मातृभूमीला, गांधी आणि सावरकर भेट तसेच सुभाषचंद्र बोस आणि सावरकर भेट, जयोस्तुते हे गीत, हिंदू म्हणून लोकांना एकत्र आणणारा नेता, अखंड भारत ही संकल्पना मांडणारे व्यतिमत्व, सामाजिक तसेच लेखक, कवी म्हणून आठवण याव्यतिरिक्त अजून खूप मोठे खूपच मोठे व्यक्तिमत्व म्हणजे सावरकर.
सावरकर कुटुंब त्याने भोगलेल्या अपार दुःख, कष्ट याबद्दल वाचले तरी डोळ्यात पाणी येईल. लहानपणी इंग्रजांविरुद्ध लढण्याचा प्रण केला, खेळण्या बागळण्याच्या दिवसात मुलांमध्ये देशप्रेम वृद्धिंगत करणारे हे बाळ,प्रत्येक सवंगड्याला घरातून एक तरी शस्त्र आणण्याचे आवाहन असेल की छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणे देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची बालवयात घेतलेली प्रतिज्ञा असेल वा वेळोवेळी मित्रमेळा, अभिनव भारत सोसायटी सारख्या संघटना करून देशप्रेमी व्यक्तींना पैलू पाडून देशभक्त बनवणारा हा काळाच्या पुढे विचार करणारा नेता. दारुगोळा, बंदुका, बॉम्ब बनवण्याचे आणि ती माहिती भारतात पाठवण्यासाठी केलेली मेहमत असेल की इंग्रजांच्या लिखापडीच अभ्यास करत १८५७ एक स्वातंत्र्यसमर नावाचा इतिहास पुढे करणारा लेखक, बुद्धीच नाही तर शरीर सामर्थ्य, वेळप्रसंगी अक्कलहुषारी वापरण्याचा आग्रह धरणारा नेता, कायद्याचा अभ्यासक म्हणून फ्रान्समध्ये राजकीय कैदी बनण्यासाठी समुद्रात मारलेली उडी, आरोपीच्या पिंजऱ्यात असतानाही कायद्याची समज दाखवताना खटला भारतात नाही तर लंडन मध्ये चालवला गेला पाहिजे असा आग्रह धरणारा धोरणी नेता, काळ्यापाण्याच्या शिक्षेत भोगलेली मरणप्राय यातना, त्यातूनही तिथे निरक्षर कैद्यांना शिक्षण देण्यासाठी केलेली धडपड, बेरी बरोबर खेळेलला मानसिक बुद्धिबळ, त्याच बरोबर तुरुंगातून सुटण्यासाठी केलेले अनेक अर्ज ज्याला आजकाल माफीनामा म्हणणाऱ्या बेअक्कल लोकांना खरंच सावरकर कळले आहेत का? हिंदूंचा खरा शत्रू कोणी इतर समाजातील लोक नसून हिंदूच आहे असं म्हणणारा खमक्या, आईसमान वहिनीच्या मृत्यू, आपल्या लहानग्या मुलाचा मृत झालेली बातमी, काळयापाण्याच्या शिक्षेत वडीलबंधू याच्या भेटीसाठी, एक नजर पाहण्यासाठी झालेली त्याची मनाची स्थिती कोणी समजली असेल का? अनेक प्रयत्नानंतर आणि अनेक अटी मान्य करत अंदमान मधून बाहेर पडल्यानंतर आरश्यातील प्रतिमेसारखे आभासी जीवन जगत असताना स्मरणशक्तीचा वापर करत कैदेत असताना रचलेल्या कविता पुन्हा लिहिणारा अजब व्यक्तिमत्व असणारे हे व्यक्तिमत्त्व कोणत्याही त्या काळातील नेत्याच्या दहा वीस पाऊले पुढे विचार करणारे व्यक्तिमत्व होते. सावरकरांनी मरेपर्यंत केलेला संघर्ष हा समजून घेण्यासाठी, त्याचे विचार वाचण्यासाठी, समजण्यासाठी थोडस आजच्या लोकांनी प्रयत्न केला तर कदाचित सावरकरांच्या मनातील भारत घडवला जाऊ शकतो.
माझ्यासारखा अज्ञानी, मूर्ख काय त्या धगधगत्या सूर्याचे वर्णन करणार तरीही माझ्या अक्कलहुशारीने जितकं आठवत तितकं लिहून सावरकर तुमच्यापुढे मांडण्याचा हा थोकटा प्रयत्न. चूक भूल माफी असावी पण मला फक्त व्यक्त व्हायचे होते, थोडं जे सावरकर कळले ते सांगायचे होते. सावरकर हे इतका मोठे आहे की अश्या कैक लेख मालिका लिहल्या तरी केवळ नखभर सावरकर लोकांसमोर उलगडता येतील.
अश्याच अनेक अन्य लेख वाचण्यासाठी follow करा dairynotes137.blogspot.com
पुढचा लेख सादर करेपर्यत माझा सर्वांना जय श्रीकृष्णा