शनिवार, ३ डिसेंबर, २०२२

विश्वचषक आणि भारतीय संघ निवड

उद्या म्हणजे ४ डिसेंबर पासून भारताची बांगलादेश विरुद्ध एकदिवसीय श्रुखला चालू होईल. बांगलादेश हा त्याच्या घरच्या मैदानावर धोकादायक संघ असला तरी भारतीय संघापेक्षा कधीही कमकुवतच त्यामुळे भारतीय संघाने त्याच्याविरुद्ध तगडा संघ निवडणे हास्यास्पद होईल कारण प्रतिष्ठित खेळाडूंना संधी देऊन त्याची जागा संघात मजबूत करून काही महिन्यांनी येणारा विश्वचषक तुम्ही जिंकू शकणार आहे का?

भारतीय संघ:
रोहित शर्मा (कप्तान), केएल राहुल (उपकप्तान), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), शाहबाज़ अहमद, अक्षर पटेल , वाशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, दीपक चाहर, कुलदीप सेन और उमरान मलिक

बांगलादेश विरुद्ध संघात असणारे राहुल त्रिपाठी, रजत पाटीदार आणि कुलदीप सेन यांना तिन्ही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली पाहिजे पण असे होताना आपल्याला दिसणार नाही. याचाच अर्थ नवखे खेळाडू याना केवळ राखीव खेळाडू म्हणून निवडणे त्यांना मोठ्या खेळाडूबरोबर ड्रेसिंग रूम शेयर करण्याचा, सराव करण्यासाठी आणि सामन्यात पाणी पोहचवण्याचे काम काढून घेणे बंद केले पाहिजे.

कर्णधार म्हणून रोहितने निवडलेला चुकीचा संघ यामुळे टी ट्वेन्टी विश्वचषक भारताच्या हातातुन निघून गेला असताना अनुभवी आणि त्याच त्या खेळाडूंना वेळोवेळी, सतत संधी देऊन नवख्या खेळाडूंवर अन्याय होतो. के एल राहुल उपकर्णधार असल्याने तो प्रत्येक सामना खेळणार त्यात फक्त एकदिवसीय सामने खेळणारा शिखर धवन संघात असताना सलामीला रोहित बरोबर नक्की कोण खेळणार हे पाहणे महत्वाचे. धवन धावा करत असला तरी त्याच्या खेळात जुना आत्मविश्वास कमी वाटतो अश्यावेळी धवन पुढच्या विश्वचषकात असेल की नाही यात संभ्रम आहे शिवाय केएल प्रत्येकवेळी मिळणारी संधीचे सोने करत आपली जागा पक्की करून महत्वाच्या सामन्यात, स्पर्धेत माती खातो हे विसरता येत नाही. सलामीसाठी शुभमन, पृथ्वी शॉ, ऋतुराज गायकवाड सारखे खेळाडू आपल्या संधीची वाट पाहत असताना धवन आणि केएल याच्यावर विश्वास ठेवत सतत त्यांना संधी देने म्हणजे इतरांवर अन्यायच. रोहित, केएल आणि धवन संघात असताना त्यातील सलामीला खेळणार नाही हे निश्चित आहे म्हणजेच केएल उपकर्णधार असल्याने संघात राहून मिडल ऑर्डरमध्ये खेळत नवख्या रजत आणि राहुल त्रिपाठी याच्या खेळण्याची संधी हुकवणार हे स्पष्ट आहे. डावखुरा पर्याय म्हणून धवनचा पर्याय इशान किशन देखील एखादा सामना खेळताना आपल्याला दिसेल असा माझा अंदाज आहे.

तिसरा क्रमांकावर खेळणारा खेळाडू हा जवळजवळ फिक्स आहे त्याला कोणीही किमान पुढच्या विश्वचषकापर्यत हात लावूच शकत नाही असा हा खेळाडू आहे, विराट कोहली.

चौथ्या क्रमांकावर सध्याच्या संघात जरी श्रेयस खेळणार असला तरी त्या जागेसाठी सुर्यकुमार यादवची दावेदारी तगडी आहे त्यामुळे श्रेयसला तिन्ही सामन्यात असामान्य खेळी करून आपली दावेदारी सिद्ध करावी लागणार आहे. पाचव्या आणि सहाव्या जागी फॉर्मात नसलेला ऋषभ पंत सध्या खेळेल किंवा केएल खेळेल म्हणजे रजत पाटीदार, राहुल त्रिपाठी केवळ प्रवासी खेळाडू म्हणूनच खेळले जाणार हे नक्की होते. महत्वाचे म्हणजे हे सहा खेळाडू किंवा त्याचे पर्याय असणारे शुभमन, पृथ्वी, ऋतुराज, सूर्या ह्यात केवळ श्रेयस हा एकमेव असा खेळाडू आहे जो कामचलावू गोलंदाजी करू शकतो असाच दुसरा खेळाडू म्हणजे दीपक हुड्डा. ज्यावेळी एखाद्या गोलंदाजाचा दिवस वाईट ठरतो अश्यावेळी त्याची षटके टाकणारा कामचलावू गोलंदाज भारतीय संघात नाही हे मोठे दुर्दैव. यापूर्वीच्या संघात सचिन, सेहवाग, युवराज, रैना सारखे हरहुन्नरी  एकापेक्षा एक वरचढ खेळाडूंची फळी सध्या भारतीय संघात दिसत नाही. यष्टीरक्षक धरून सहा फलंदाज, एक ऑलराउंडर आणि चार गोलंदाज याच्या जीवावर भारतीय संघ सामने जिंकू शकेल पण विश्वचषक जिंकेल अशी परिस्थिती वाटत नाही.

बांगलादेश दौऱ्यात असलेल्या गोलंदाजांची फळी पाहता शाहबाज आणि अक्षर जवळपास सारख्याच शैलीचे गोलंदाज आहेत ज्यात अक्षरला झुकते माप मिळण्याची शक्यता अधिक आहे. वॉशिंग्टन सुंदर याने ऑस्ट्रेलियामध्ये केलेली कमाल, सध्या न्यूझीलॅन्ड मध्ये केलेली कामगिरी पाहता अक्षर आणि शाहबाज पैकी एकाबरोबर संघात गोलंदाजी करताना आपल्याला दिसेल. ह्या तिन्ही खेळाडूंना खरी स्पर्धा असेल ती युझुवेंद्र चहल आणि रवींद्र जडेजा यांची. ऑलराउंडर म्हणून संघात वॉशिंग्टन, जडेजा, अक्षर, हार्दिक , शार्दूल, दीपक चहर, दीपक हुड्डा तसेच  वेंकटेश अय्यर अशी मोठी स्पर्धा असली तरी हार्दिक पंड्या त्यात विजयी होणार हे सर्वश्रुत आहे अश्या वेळी बांगलादेश दौऱ्यात शार्दूल तसच दीपक चहर याच्यावर कामगिरी करण्याचे अधिक दडपण असणार यात शंका नाही. मोहमद सिराज तिन्ही सामने खेळताना दिसेल तर त्याला उमरान मलिक जोडीदार असण्याची दाट शक्यता वाटते. वेगाच्या जोरावर बांगलादेश च्या फलंदाजाना उमरान नाचवेल अस वाटत असले तरी तिथल्या धावपट्या त्याला किती साथ देतील हे मोठं प्रश्नचिन्ह आहे. वेगाने चेंडू टाकणे हा फायदा असला तरी तोटा देखील असतो हे सुजाण क्रिकेट रसिक जाणतोच त्यामुळे उमरान मलिक ही दुधारी तलवार आहे कधी ती शत्रूची तर कधी भारतीय संघाची विकेट घेईल अस माझं मत आहे अश्या वेळी संघात असलेला कुलदीप सेन ज्याने मागील आयपीएल आणि स्थानिक सामन्यात चांगले प्रदर्शन करूनही राखीव खेळाडूत बसण्याचा बहुमान त्याला मिळेल अशी शक्यता आहे.

एकंदरीत बांगलादेश दौऱ्यात तीन सामन्यासाठी भारतीय थिंक टॅंक आणि कर्णधार कोणता संघ निवडणार हे निश्चित आहे आणि नवखे खेळाडू बेंच गरम करत राहून पुढच्या स्पर्धेच्या वेळी ही मंडळी संघात नसतील हे मी अनुभवाच्या जोरावर म्हणू शकतो. भारतीय संघ कोणता संघ उतरवेल याचा माझा अंदाज खालील प्रमाणे

रोहित
धवन
विराट
श्रेयस
के एल राहुल
पंत/ इशान
शार्दूल/ दीपक
शाहबाज/ अक्षर
वॉशिंग्टन सुंदर
सिराज
उमरान

बेंचवर रजत पाटीदार, राहुल त्रिपाठी आणि कुलदीप सेन

कोण खेळणार कोण नाही हे ओळखणे इतके सोप्प आहे. पंत कदाचित तिन्ही सामने खेळेल, धवन ला बसवून इशान खेळताना दिसेल पण के एल आणि श्रेयस याच्या बदल्यात रजत आणि त्रिपाठी याना संघ खेळवेल अस वाटत नाही.

जर भारताला आपल्या घरात होणारा विश्वचषक जिंकायचा असेल तर त्याच त्या खेळाडूंना अधिकाधिक संधी देऊन भरवश्याच्या म्हशीला टोनगा ह्या म्हणीप्रमाणे भारतीय संघ स्वतःच्या पायावर स्वतःच घाव करत आहे. विश्वचषक जिंकण्यासाठी काहीतरी नवे करावं लागणार आहे, अनपेक्षित बदल, कठोर निर्णय घ्यावे लागणार आहे पण ते भारतीय संघ घेणार का? हे बांगलादेश विरुद्धची ही श्रुखला आणि येत्या काळातील स्पर्धा निश्चित करतील. तस वैयक्तिक दृष्ट्या भारतीय संघात कोणते मोठे बदल पाहता येतील अशी शक्यता मला वाटत नसली तरी लेखाच्या माध्यमातून मी वेळोवेळी माझे मत तुमच्यापुढे आणत राहील.

बांगलादेश दौऱ्यात माझा अपेक्षित संघात केएल, श्रेयस, अक्षर, सिराज पंत याना कमीत कमी संधी देवुन नवीन खेळाडूंना संधी दिली पाहिजे असं माझं मत असलं तरी तस भारतीय संघ आणि थिंक टॅन्क करेल असे वाटत नाही.

पुढच्या वर्षी होणारा विश्वचषकात कोणत्या कोणत्या खेळाडूंची निवड होईल, खेळणारा संघ काय असेल हे जवळपास 90% ठरलेले आहे एखाद दुसरी जागा सोडली तर नवीन खेळाडूंना संधी मिळेल याबाबत दूरदुरपर्यत शक्यता नाही. 2023 च्या भारतीय संघात हेच खेळाडू खेळताना दिसतील ह्याची मला गॅरंटी आहे त्यामुळे भारतीय संघ परत विश्वचषक जिंकेल हे स्वप्न पूर्ण होणे अवघडच आहे. रोहित, विराट, सूर्या, हार्दिक, रवींद्र जडेजा, बुमराह, चहल, के एल, पंत हीच नाव पुढच्या वर्षीच्या विश्वचषकात दिसणार असल्याने त्याआधी होणाऱ्या द्विपक्षीय स्पर्धेत निवडले जाणारे खेळाडू हे केवळ बेंचवर बसणारे आणि प्रवासी खेळाडू म्हणूनच ओळखले जातील.

ज्याप्रकारे टी ट्वेन्टी विश्वचषक हरल्यानंतर निवड समिती बरखास्त झाली, टी ट्वेंटी संघात वरिष्ठ, नावाजलेल्या खेळाडूंना सुट्टी देण्याची भाषा येत आहे तसेच काही 2023 चा विश्वचषक झाल्यानंतर बहुतांश मोठे खेळाडू निवृत्त होतील, काहींना हुसकावले जाईल त्याखेरीज नवीन खेळाडूंना संधी मिळेल अशी सुतराम शक्यता दिसत नाही

क्रमशः

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सी ए टॉपर

स्वभावाला औषध नाही कारण प्रत्येक व्यक्तीच्या एक स्वभाव असतो.स्वभाव म्हणजे त्याची वागण्याची, बोलण्याची किंवा निर्णय घेण्याची प्रक्रिया. प्रत्...