https://diarynotes137.blogspot.com/2022/12/blog-post_3.html
मागील ह्या भागातून बांगलादेश दौरा त्यातील संघ निवड याबद्दल भाकीत केले होते. आज शालेय संघाने कॉलेजच्या संघाला हरवलं, बांगलादेश सारख्या बारक्या संघाने भारतासारख्या बलाढ्य संघाला एखाद्या सामन्यात हरवणे वेगळे पण एखादी श्रुखला जिंकणे हे एक क्रिकेट रसिक म्हणून पटतच नाही. ज्या पद्धतीने भारतीय संघाने टी ट्वेंटी विश्वचषक हातातून घालवला ते पाहून निराश असल्याने हे दोन्ही सामने मी पाहिले नाहीत पण धावफलक पाहत होतो.
पहिल्या सामन्यात थोडासा अवघड पण त्यातल्या त्यात सोप्पा असलेला झेल सोडून तर दुसऱ्या सामन्यात 100च्या आत 6 खेळाडू बाद झालेले असताना मोठी धावसंख्या बनण्यामागे के एल राहुलच्या चुका होत्या हे कोणीही बोलताना दिसत नाही. दुसऱ्या सामन्यात जर नवव्या स्थानी येऊन आतिषबाजी खेळी करण्याची शक्ती रोहितच्या अंगात होती तर त्याने आधीच मैदानात उतरून सामन्याचा निकाल निकाली लावण्याचे धाडस का केले नाही? ज्यावेळी एखाद्या मांजराला कोपऱ्यात मागे सरकवत सरकवत ढकलले तर मागे जाण्याचा मार्गच संपल्यामुळे पुढं कितीही मोठा धोका असला तरी त्यावर आक्रमण करण्याची शक्ती ते मांजर करते तसच काहीस रोहितची ती खेळी असावी का? मुळात बांगलादेश विरुद्ध पराभव हा खूप मोठा पराभव आहे पण रोहित शर्माची जिगरबाज खेळी किंवा निवडणूकाचे निकाल यामुळे त्याची हवा तसा धिंगाणा झालेला नाही.
बांग्लादेश एकदिवसीय शृंखला 2-0 असताना शेवटचा सामना जिंकून उरला सुरला आत्मसन्मान राखण्याचे मोठे आव्हान भारतीय संघासमोर आहे. त्यातच रोहित शर्माची दुखापत, तंदुरुस्त नसताना मैदानात उतरण्याची घाईमुळे मागील सामन्यात दीपक चहर तर वर्ल्डकप आधी जसप्रीत बुमराह जायबंदी झालेला. कुलदीप नवखा शिवाय त्याची पहिल्या सामन्यात कामगिरी इतकीही उत्तम नव्हती की याची अनुपस्थिती भारताला मारक ठरेल. उरलेल्या खेळाडूमधून संघ निवडणे इतकेही अवघड निश्चितच नाही अश्यावेळी पर्यायच नसल्याने केएल राहुल आणि धवन यांनी सलामीला खेळावे. यष्टीरक्षण करून दोन सामन्यात बळजबरीने खेळवला गेलेला केएल यानेच ह्या सामन्यात यष्टीरक्षक केले पाहिजे जर केवळ सलामीच्या जागी त्याला खेळवून इशान किशनला पाचव्या क्रमांकावर किंवा इशान सलामीला केएल मधल्या फळीत खेळताना दिसला तर संघ निवडण्यात राजकारण, काही खेळाडूंना झुकते माप दिले जाते हे सर्वश्रुत होणार आहे. त्यानंतर विराट आणि श्रेयस याची जागा जवळपास पक्कीच आहे. पाचव्या स्थानी रजत किंवा राहुल त्रिपाठी यांनाच घेऊन किमान वर्ल्डकपची तयारी त्याद्वारे नवीन खेळाडूंना संधी देण्याचे काम भारतीय संघ करतोय अस चित्र उभे करणे गरजेचे वाटते की नाही हे स्पष्ट होईल. राहुल त्रिपाठीपेक्षा रजत पाटीदार याने नुकतीच केलेली आयपीएल आणि देशांतर्गत सामन्यात केलेली कामगिरी फाटक रजतला पाचव्या स्थानी खेळण्याची संधी मिळाली पाहिजे. अक्षर, वॉशिंग्टन, शार्दूल, सिराज आणि उमरान याना खेळवल्यानंतरही एक जागा रिकामी राहते अश्या वेळी एक फलंदाज म्हणून इशान किशन की एक गोलंदाज म्हणून कुलदीप यादव याची संघात निवड करण्याची डोकेदुखी संघ व्यवस्थापनेवर असणारच आहे. कुलदीप यादवने भूतकाळात अनेक सामने गाजवले आहेत शिवाय येणारा वर्ल्डकप भारतातच होत असल्याने फलंदाजांना बुचकळ्यात टाकणारा चायनामन गोलंदाजाला थोड्याफार
संघ व्यवस्थापन संभावित संघ असा असू शकतो
इशान
धवन
विराट
श्रेयस
के एल राहुल
रजत पाटीदार
अक्षर
वॉशिंग्टन
शार्दूल
सिराज
उमरान
एकंदरीत उद्या उतरणार संघ यातून संघ व्यवपस्थापनाचा वर्ल्डकप च्या दृष्टीने करत असलेला विचार, खेळाडूंच्या निवडीबाबत ते किती निरपेक्षपणे काम करतात हे दिसणार आहे.
क्रमशः
लेख आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्या प्रतिक्रियाची अपेक्षा, असेच लेख वाचण्यासाठी follow करा.
ट्विटर @pincode410501
ब्लॉगर पोस्ट diarynotes137.blogpost.com
डेलीहंट @cm_newsinformation
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा