कंडोम ह्या विषयावर आज बोलायला घेतले ते सतत दोन तीन बातम्यामधून ऑलिम्पिकमधील खेळाडूंना दिलेल्या कंडोमच्या पाकिटे, संपूर्ण स्पर्धा संपेपर्यत कंडोमच्या वापरात होणारा प्रचंड खप ह्या बातम्या तुमच्या अंगावर येतील यात माझ्या मनात शंका नाही. स्त्री पुरुष एकमेकांकडे आकर्षले जाणे, त्याच्यात संभोग होणे स्वाभाविक असले तरी मानाच्या स्पर्धेत भाग घेणारे खेळाडूंना महिना अर्धा महिना संभोग न करता आपल्या पदकाच्या ध्येयाचा पाठलाग का करता येत नाही की केवळ पाश्चात्य पद्धती अनुसरून एकमेकांना भोगायचे, इंद्रिय सुख मिळवण्याचा हा सोप्पा प्रकार तर नाही ना? काही अभ्यास तर संभोग केल्याने तुमचे मन शांत होते, एकाग्र होते त्यामुळे खेळाच्या आधी संभोग केल्यास यश मिळवणारे अनेक खेळाडूची मनोगत,मुलाखती झालेल्या आहेत. जस शाळेतील तो एक द्वाड, उनाड मुलगा कंडोमचे पाकीट उकिरड्यावरून आणून इतरांना ज्ञान देत कंडोमची माहिती देत इतरांना द्वाड करत होता तसेच भ्रामक आणि संभोग केल्याने यश मिळते ही विचारसरणी प्रगल्भ होत इतरांनी ती अनुसरली नसेल का? संभोग केल्याने खेळाडूंची ताकद, एकाग्रता वाढत असेल तर ध्यान करणारे, ब्रम्हचर्याचे अधिष्ठान करणारे अनेक संत, मुनी आपली एकाग्रता कशी वाढवत होते बरं? स्पर्धेत मिळवलेले पदक त्यामुळे त्या खेळाडू आणि देशाची होणारी उंच प्रतिमा यासारखे ध्येय असताना स्वतःची ताकद, एकाग्रता वाढवण्यासाठी संभोग हे आत्मसुखाचे, स्वार्थी कारण पुढे करत शरीरसुखात लिप्त होणारे खरे तर खेळाडू आहेत का याबद्दल मनात प्रश्न येतात. कंडोम हा एकदाच वापरतात तस संभोग हे एकमेव ध्येय घेऊन हे खेळाडू खेळाच्या सगळ्यात मोठ्या जत्रेत नवनवीन जोडीदाराशी संभोग करण्यासाठी तर एकत्र जमत नाहीत ना?
एकवेळ होती की थोडं नागवेपण, कंडोमची जाहिरात, सॅनिटरी पॅड, चित्रपटातील नायक नायिकेचे एकमेकांजवळ येण्याचे प्रसंग आले की लाजेकाजे मोठी माणसे तरी नजर फिरवायचे किंवा लहान मंडळी उठून जायची पण आता कधी कोणत्या प्रसंगात कोण कोणाच्या तोंडात तोंड टाकून, बेड सिन टीव्हीवर चालू होईल सांगता येत नाही इतकं सहज आपले आयुष्य झाले आहे. त्यात सामाजिक परिस्थिती, अर्थकारण यामुळे झालेले बदल माणसाला नैतिकता, सुसंस्कृतपणा, संस्कार, नित्तीमत्ता सारख्या गुणापासून दूर तर नेत नाही आहे ना? विद्यार्थ्याने उद्या एकाग्रता येण्यासाठी संभोग गरजेचा असा अभ्यास उद्या प्रकाशित झाला तर आपल्या पाल्याना आपण मोकळे सोडणार का? प्रत्येक वयाची काही गरजा असतात हे जरी मान्य असले तरी कोणती गरज गरजेची, योग्य हे ऑलिम्पिक सारख्या मोठ्या स्पर्धेत खेळणाऱ्या खेळाडूंना का नसावी? कंडोम, शरीरसुख हेच खरे सुख असते हे भ्रामक स्वप्न दूर केले पाहिजे. पंधरा वीस दिवसाच्या या स्पर्धेत जर खेळाडू आपल्या देशाची मान उंच करण्याचे ध्येय, पदक लुटण्याची शक्यता यापेक्षा मोठं ध्येय कोणते असू शकते की जे तुमच्या मनाला एकाग्र बनवेल? जर संभोगाशिवय मन केंद्रित होत नसेल तर हा एक वैचारिक आजारच नव्हे का?
संभोग किती, कोणी, कसा करावा हा ह्या लेखाचा विषय नाही की कंडोम बद्दल माहिती नाही. विषय माणसाची मती माती होत आहे, अविचाराने चुकीच्या गोष्टींना पाठबळ मिळत आहे असं वाटल्याने हे चार शब्द लिहले आहे. ज्या ज्या वयात जे जे कार्य करायला हवे, ज्या कामासाठी नियुक्त केले आहे ते तडीस नेण्यासाठी सर्वस्व अर्पण करण्याची भावना, बुद्धी क्षीण होत आहे हे चित्र बदलायला हवे की नाही हे आता तुमच्यावर.......
पुढील लेख सादर करेपर्यत जय श्रीकृष्णा मित्रांनो......