मंगळवार, ३१ जानेवारी, २०२३

गांधी गोडसे एक युद्ध रिव्ह्यू

गांधी गोडसे एक युद्ध चित्रपट पाहत होतो पण ह्या चित्रपटाची महत्वाची गोष्ट म्हणजे गोडसे गांधीला गोळ्या घालूनही तो मरत नाही असं दाखवलंय. कदाचित दोघात चर्चा, वाद विवाद दाखवून दोघांची बाजू काय हे दाखवण्याचा दिग्दर्शकाचा इरादा वाटतोय म्हणजेच सत्य गोष्टीचा काल्पनिक चित्रपट आहे हा.

कंटाळवाणा , वास्तवाशी फारकत घेतलेला, बेरंग, निरर्थक चित्रपट इच्छा नसतानाही पाहून संपवला. राज कुमार संतोषी याचे घातक, दामिनी, घायल, पुकार चित्रपट करणाऱ्या माणसाने हा नेभळट चित्रपट बनवलाच का हे मला कळत नाही. सत्य बोलण्यासाठी, दाखवण्यासाठी जी शक्ती दाखवायलाया हवी होती ती दाखवण्याची इच्छाही चित्रपट बनवणाऱ्यानी घेतलेली नाही. घोर निराशा देणारा हा चित्रपट पठाणच्या तडाख्यात पडला अशी बातमी काल वाचली होती त्यावेळी कोणी बिस्कीट कुत्रकार, अहो तेच ते एचएमव्ही वाला असेल असं वाटलं होत पण हा चित्रपट बनलाच होता पडण्यासाठी हे पाहिल्यावर कळते. पठाण पडलेला चित्रपट तर निमित्त मात्र ठरला असेल कारण पठाणची लोकांनी बरीच ठासली आहे म्हणूनच तो हकला सुट्टीवर गेला आहे म्हणे त्या लालसिंगच्या गरीब खान सारखा. 

असो तर गांधी गोडसे एक युद्ध हा चित्रपट खऱ्या घटनेवर आधारित असला तरी काल्पनिक बनवला आहे ज्यात गोडसेने गोळ्या घालून गांधी मरत नाही, गांधी मरत नाही म्हणून गोडसेला फाशी होत नाही. गांधी दवाखान्यात तर गोडसेची रवानगी तुरुंगात होते. 

गांधी नीट होतो त्याचा स्वराज्य संघटनेचा प्रयोग यशस्वी करण्यासाठी प्रयत्न चालू असतो. त्यात गावकरी लोकांच्या समस्या दूर करण्यात गांधी पुढे असतो. पोलीस चौकीला नकार देणे, जंगल तोडून रस्ता आणि पॉवरहाऊसला नकार घंटा, गावातील श्रीमंतांच्या दडपशाहीविरुद्ध उभं राहणं किंवा स्वातंत्र्यानंतर पदाचा दुरुपयोग करून राजविलासी बाबू लोकांना अहिंसेच्या ह्या पुजाऱ्याने शासन करत सरकारविरोधी भूमिका घेणे, प्रतिसरकार चालवणे राजकीय सत्तेत असलेल्या नेहरू आणि टीमला खटकतो त्यामुळे देशद्रोहाच्या आरोपाखाली गांधीला अटक होते. आहे की नाही हे सगळं मूर्खपणाचे? गांधीला मुलामुलींचे प्रेम, विवाह मान्य नव्हते असही दाखवण्यात आले आहे. 

देशद्रोहाचा आरोपामुळे तुरुंगात जाण्याची पाळी गांधींवर येते आणि गांधी इथेही आपली गांधीगिरी करत गोडसे ज्या तुरुंगात आहे तोच तुरुंग, तोच वार्ड आणि तीच खोली निवडतो ज्यात गोडसे कैद असतो आणि इथे चालू होते वाद विवाद स्पर्धा जी ठाकरे गट जितका किंचित उरला आहे तशी किंचित वाद विवाद स्पर्धा वाटते, बहुतांश भाग निरर्थकच आहे. एकदोन प्रसंग सांगायचे म्हंटल तर गोडसे गांधींवर आरोप करतो त्यावेळी गांधी ते आरोप कसे चुकीचे हे सांगतो, सांगता सांगता रडू लागतो आणि राजकीय पदावर बसलेले काँग्रेसी कसे राजकरण खेळतात हे सांगतो. गांधीला रडताना पाहून, वास्तविकता समजल्यावर गोडसे भावुक झालेला दिसतो तर दुसऱ्या एका प्रसंगात एक कैदी आणि गोडसे यांच्यातील चर्चेत देशावर राज्य करणाऱ्या इंग्रजांविरुद्ध हत्यार न उचलणारा गांधींवर मात्र गोळ्या झाडतो अस बोलतो. गोडसे हे ऐकून बुचकळ्यात पडलेला, निशब्द झालेला दिसतो. एकंदरीत निरस चित्रपटाच्या नावखेरीज चित्रपटात युध्द कुठंही दिसले नाही.

चित्रपटाचा ट्रेलरदेखील न पाहता केवळ गांधी आणि गोडसे यांच्यातील संघर्ष पाहायला मिळेल, काही ऐतिहासिक, माहिती नसलेली माहिती मिळेल अस वाटलेले. कोणा एकाची बाजू योग्य तर कोणाची बाजू चूक हे दिसेल अस वाटलं होतं पण चित्रपट पाहून घनघोर निराशा हाताला लागली. निराशा इथेच संपत नाही तर अडियल, निग्रही गांधी आपल्याला माहिती आहे तो आपल्या विचारांशी माघार घेत ज्या मुलीच्या लग्नाला विरोध करत असतो त्या मुलीचा विवाह करण्यास तयार होतो. आश्चर्य वाटतय ना? वाटलेच पाहिजे पण हे आश्चर्य इथेच संपत नाही. त्या लग्नात गांधीला मारायला एक व्यक्ती बंदूक चालवतो त्याला गोडसे दूर सारत गांधीला वाचवतो हा प्रसंग पाहून हसावं की रडावं तेच मला कळत नव्हते. कहर तर तिथे होतो की या दोघांना तुरुंगातून सोडून दिले जाते. दोघांचे समर्थक तुरुंगाबाहेर त्याच्या आदर्शच्या नावाने घोषणा देत असतात पण वैचारिक दृष्ट्या बदलले गांधी आणि गोडसे हा प्रकार पाहून अवाक झालेले असतात. आलेल्या पाठीराख्याकडे दुर्लक्ष करत गर्दीतून निघून जातात. 

मी हा चित्रपट पाहिला ही चूक केली पण तशी चूक तुम्ही करू नका आणि हा लेख वाचूनही चित्रपट पाहण्याची चूक केली तर आपलं नाव पत्ता कमेंटमध्ये टाका म्हणजे आपल्या पराक्रमाचे फळ म्हणून कौतुक, शाबासकी देण्याचा मी प्रयत्न करेल. 

हा चित्रपट पाहण्यापेक्षा शरद पोंक्षे याचे एखादे भाषण ऐकले तर गांधी आणि गोडसे यातील युद्ध कसे होते हे तरी कळेल पण हा चित्रपट पाहून काहीही मिळणार नाही. तसा मला गांधी आवडत नाही, बोगस बनावटी वाटतो तो. त्याची मुस्लिम लोकांसाठी घेतलेल्या भूमिका हिंदूंवर अन्याय करणाऱ्या होत्या. अहिंसा नावावर झालेल्या कित्येक आंदोलनात गांधींचे कैक पाठीराखे डोक्यावर काठीचा हल्ला घेत मरण पावले पण एखादी काठी गांधीला का लागली नाही याचे आश्चर्य लहानपणापासून वाटायचे. गांधींचे ब्रह्मचर्याचे प्रयोग यामुळे जी काही त्या माणसाबद्दल चांगल मत होते ते ही संपले. बायकोशी असलेले संबंध, शरीरसुखासाठी आसुसलेला व्यक्ती, काहीही झाले की आमरण उपोषणाला बसणारा हा व्यक्तीचे उपोषण मात्र शेवटपर्यत चालायचे नसतानाही लोक त्यावर विश्वास का ठेवत होती असे कैक प्रश्न काल आणि आजही मला पडतात.
गोडसेने हिंदू प्रेम, हिंदुराष्ट्र मागणी, गांधींचे दोष पाहत त्यांना मारून टाकण्याचा निर्णय याव्यतिरिक्त असले टोकाचे पाऊल उचलण्यामागे गोडसेची भूमिका, ठार मारल्यानंतरची भूमिका, एक व्यक्ती म्हणून गोडसे बरोबर की चूक अश्या गोष्टी कळाव्या म्हणून हा चित्रपट पाहणार असाल तर घोर निराशा पदरात पडेल. 
राजकीय पक्ष त्याचे अजेंडे, विचारधारा यामुळे गांधी एका पक्षाचा तर गोडसे दुसऱ्याचा अशी विभागणी आधीच झाली आहे त्यामुळे एकमेकांवर आरोप करत राजकीय पोळी भाजणाऱ्याची कमी नाही. काही गोडसेला हिंदू आतंकवादी म्हणतात चुकीचा किंवा बरोबर काही असला तरी गांधी हत्येत त्याची एक भूमिका होती, त्याने गर्दीत कोणा इतरला इजा होणार नाही याची काळजी घेत गांधींचा खून केला, पळून गेला नाही, कोर्टात आपली बाजू मांडली, हसत हसत मृत्यला कवटाळले याचा अर्थ तो काही मूर्ख नसेल नाही का?

असो 

असाच एकदा नवीन जुन्या चित्रपटाचा रिव्ह्यू घेऊन परत येतो तोपर्यत जय हिंद जय महाराष्ट्र

तळ टीप: कंजूषपणा सोडा, लाईक रिट्विट,, शेयर आणि फोल्लो करा की जरा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सी ए टॉपर

स्वभावाला औषध नाही कारण प्रत्येक व्यक्तीच्या एक स्वभाव असतो.स्वभाव म्हणजे त्याची वागण्याची, बोलण्याची किंवा निर्णय घेण्याची प्रक्रिया. प्रत्...