रविवार, २० फेब्रुवारी, २०२२

परिचय

 नमस्कार,


माणूस जन्माला आल्यापासून दरदिवशी काही ना काही शिकत असतो, कधी कधी तर आपण काय शिकलो हे आपल्याला सुद्धा लक्षात येत नाही. असो, मी एक तुमच्यातला व्यक्ती. दररोज धक्क्याबुक्यांच्या शर्यतीत धावणारा,सकाळी उठून कामाला जाणारा, कुटुंबाबरोबर वेळ घालवणारा एक सर्वसामान्य व्यक्ती. तुमच्यात आणि माझ्यात अशी कोणती समान गोष्ट असावी बर? होय कदाचित तुम्ही योग्य ओळखली आहे, जीवनातील चढ उतार,दुःख आनंद सगळं विसरून आपण काही ना काही रोज मनोरंजन शोधत असतो आणि मनोरंजन शोधण्याचा सर्वात सोप्पा मार्ग म्हणजे आपल्या घरातील एडियत बॉक्स. त्यावर येणाऱ्या फडतूस कार्यक्रम, चित्रपट, बातम्या कामावरून आल्यावत किंवा निवांत वेळात काहीही पाहून आपण आपले मनोरंजन करत असतो. आपण जे काही पाहतो त्यातून आपल्या मनात त्याबद्दल काही न काही विचार निर्माण होत असतात मग ते आपण आपल्या कुटुंबासोबत किंवा मित्रांबरोबर चर्चा करून विचारांचे आदान प्रदान करत असतो किंवा आजकाल उपलब्द असणाऱ्या अनेक सोशल मीडियावर आपले मत व्यक्त करत असतो. आजपासून दररोज एक छोटीशी पोस्ट करण्याचा मनसुबा आहे, तुम्हाला आवडेलच अशी आशा आहे कारण ट्विटर सारख्या सोशल मीडियात छोटस अकाउंट आणि त्यावर लिहण्याचा आणि अनुमोदन मिळत असल्याने मी ज्या गोष्टी तुमच्याशी बोलले त्या तुम्हाला आवडतीलच अशी आशा आहे. 

पोस्टचा विषय कोणताही असू शकतो, शक्यतो दिवसाला एक चित्रपट तरी पाहिला जातो मग त्यावर पोस्ट असू शकते, ब्रेकिंग बातमीवर पोस्ट असू शकते, सगळ्यांचा आवडता क्रिकेट असो को राजकारण यावर देखील पोस्ट असू शकते त्यामुळे आवडलं तर प्रतिक्रिया नक्की नोंदवा आणि नाही आवडले तर हक्काने मत व्यक्त करा. हे सगळं करताना माझ्या हातात असणारा मोबाईल आणि माझे विचार इतकंच भांडवल सध्यातरी माझ्याकडे आहे त्यामुळे ब्लॉग/ पोस्ट हे निव्वळ लिखाण करण्याचे साधन असणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती धुमधडाक्यात पार झाली आणि आज Daily notes नावाचे हे खात काढून मी तुमच्या समक्ष उभा आहे. माहीत नाही हा प्रवास किती दूरचा असेल, किती नवीन मित्र भेटतील पण आज लिखाणाच्या या अजब जगात उडी मारताना आनंद होत आहे आणि दररोज मनात येणाऱ्या कित्येक प्रश्नांना, उत्तरांना, विचाराना तुमच्या पुढ्यात टाकण्याचा संकल्प सिद्धीस लागावा हीच श्रींच्या चरणी इच्छा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सी ए टॉपर

स्वभावाला औषध नाही कारण प्रत्येक व्यक्तीच्या एक स्वभाव असतो.स्वभाव म्हणजे त्याची वागण्याची, बोलण्याची किंवा निर्णय घेण्याची प्रक्रिया. प्रत्...