दिनांक: २२ फेब्रुवारी २०२२
नमस्कार,
आज पुन्हा एक नवीन चित्रपट पाहिला तेही त्याच नाव काय आहे हे न पाहता. हिंदी चित्रपटातील नागवपण, फक फक फकाक यापेक्षा कुटुंबाला केंद्रस्थानी ठेवून संस्कृतीला धरून जे साऊथ चे चित्रपट असतात ते पाहायला मज्जाच येते. काही वर्षांपूर्वी जे डब चित्रपट पहायचो ते जास्तीत जास्त हाणामारी, कॉमेडी किंवा लार्जर देन रियालटीच्या चित्रपटपेक्षा आज जो साऊथ चा सिनेमा असतो तो मनोरंजनाच्या सगळ्या कक्षा पूर्ण करत असतो त्यामुळेच की काय आता संपूर्ण देशात ते चित्रपट एकाचवेळी प्रादेशिक भाषेत डब करण्याचा नवीन ट्रेंड रुजायला सुरुवात झाली आहे.
वैंकुठंपुरम
नाव लिहण्यात चूक झाली असेल पण सल्ला द्यायला चुकणार नाही त्यामुळे चित्रपट नक्की पहा. हा चित्रपट पहायला घेतल्याबरोबर मला याच कथेचा दुसरा जुना हिंदी चित्रपट आठवला तो म्हणजे परवरिश. तोच तो ज्यात अमिताभ बच्चन, विनोद खन्ना आहे, मुलांची अदलाबदली त्यांचे मोठे होणे चोराचा पोर चोर पोलिसांचा पोर पोलीस, थोडासा मसाला आणि आनंदी आनंद होत शेवट. हा चित्रपट अगदी तसाच. थोडस अजून भूतकाळात गेल्यास राज कपूरचा एक चित्रपट याच कथेवर असल्याचे चांगल आठवतंय. तुम्हाला चित्रपटाची स्टोरी तर कळली पण जुन्या बाटलीत नवी दारू जरी असली तरी दारूची झिंग अनुभवण्यासाठी चित्रपट पहाच.
ब्लॉगला थोडे थोडे view मिळत असले तरी वाचणाऱ्यांनी त्यांना ते आवडतात का? नसलं आवडत तर का? या प्रश्नांची उत्तरं कंमेंट मध्ये द्यावी अस मनापासून वाटत त्यामुळे जी मेहनत घेत आहे ती कारणी लागते की नाही याचा मला अंदाज लागेल मग आता फक्त वाचून परत जाऊ नका, तुमचा अभिप्राय मला कळला तर लिखाणाची दिशा दशा ठरवायला आणि या क्षेत्रात थांबून आपले मनोरंजन करण्याच्या ध्येयाला पाठबळ मिळेल, त्यामुळे कृपया आपली मतं नोंदवा,शेयर आणि फॉलो ही करा
7
दिनांक:२१ फेब्रुवारी २०२२
नमस्कार
आज दीपिका पदुकोणचा नवीन चित्रपट पाहिला, कोणाला अडवायचे नाही, ज्यांना पहायचा आहे त्यांनी नक्की पहावा किंवा मी तसा आग्रह करेल कारण यातून बरच शिकण्यासारखं आहे.
लहानपणी आपण शाळेत ऐकले असेल की दुरून डोंगर साजरे म्हणजे आपण जे लांबून पाहत असतो, खोलात आपल्याला परिस्थितीची जाणीव नसते अशावेळी आपल्यापेक्षा इतरांचे सुख आपल्या सुखापेक्षा किती जास्त आहे असं वाटण स्वाभाविक असत पण ते लांबून पहात असलेले सुख नक्की सुख असेलच का हे मात्र त्या सुखाच्या जवळ गेल्यानंतरच आपल्याला जाणवू शकेल
मुळात हा चित्रपट पहायचा नव्हता कारण यात पैसे घेऊन JNU मध्ये चुकीच्या लोकांना पाठबळ देणारी दीपिका आहे, भारतात सुरक्षित वाटत नाही म्हणणारा मुस्लिम नसरुद्दीन आहे आणि याना कमी काय म्हणून ताजे ड्रग्ज प्रकरणात अडकलेल्या शाहरुख खानच्या पोराची जवळची मैत्रीण अनन्या पांडे देखील आहे. युट्यूब वर चाळत असताना गेहराईया किती खोलात पडलाय याचा अंदाजही आलेला. असो
चित्रपटाची कथा/ प्लॉट सांगणे हा मूळ उद्देश नसला तरी चित्रपटातील गोष्टींवर बोलणं महत्वाचं कारण इथ मी जर कथा सांगायला बसलो तर विकिपीडिया आणि हा ब्लॉग यात फरक करणं अवघड बनून जाईल. एकीकडे चित्रपट पहा अस आव्हान करणं, दुसरीकडे न पाहण्याची कारण सांगणे थोडं विचित्र वाटेल पण हा चित्रपट पाहिल्यानंतर इतर लोक किती टाकाऊ चित्रपट आहे म्हणत सोडून देतील पण यात शिकण्यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रत्येकाला लक्षात येतीलच असे नाही.
वयानुरूप निर्णय घेतले गेले पाहिजे, कपडे घातले पाहिजे. जग नागव हिंडतय म्हणून आपले कपडे काढायचे नसतात. जे झाकण्यासाठी कपड्यांचा आविष्कार झाला तेच कपडे घालून दाखवत असेल तर कपडे न घातलेले बरे नव्हे का? दीपिका म्हातारी वाटत होती बर का चित्रपटात. ती काही हा ब्लॉग वाचेल याची दुरपर्यत शक्यता नसली तरीही हे नमूद करताना मला आनंदच आहे.
मुळात लग्नाआधी जोड्या जोड्याने राहणे कायद्याने मान्य केले असले तरी संस्कृतीला धरून नाही त्यामुळे त्यापासून लांब राहील पाहिजे. लग्न झाल्यावर मतभिन्नता आली तर ब्रेक अप करून स्वतःचा रस्ता धरणे इतकेही सोप्प नसल्याने,पिढी दर पिढीचे संस्कार रितिभाती जोडीदाराशी संसार करण्यास हातभार लावतात ना की २ मिनिटं मॅगी सारखे निर्णय घेता येतात. सगळं व्यवस्थित चालू असताना धुपाटण्यात तेल आणि तूप एकत्र सांभाळायला गेल्यास हाती कोणीच लागत नाही.
चित्रपटाचा हिरो कर्जात अडकलाय पण शॉर्ट कट मारून धंदा चालवायला घाबरत नाही, नियम मोडून,कायदे तोडून डील करणं अंगलट आल्यावर स्वार्थी वृत्तीने कधी तळ्यात कधी मळ्यात करताना दिसतो.
प्रेम असो व्यवसाय यात वास्तवाला स्वीकारायचे असते. अंथरून पाहून पाय पसरले नाही तर काही ना काही उघड राहतच मुळात मोठ्या लोकांचे मोठे छंद आणि समाजात आपली श्रीमंतीची छाप राहण्यासाठी कर्जाचा भला मोठा विळखा अंगाभोवती लपेटून चालत असतात ज्यात माणुसकीचा खून करून स्वार्थ साधताना त्याचा आत्मा टीचभर लक्ष विचलित होत नाही.
चित्रपटात सगळ्यात मोठा विचार मांडला गेला आहे की move on करणं पण त्यासाठी काय पणाला लावले जात आहे ते लक्षात घेतले गेलेले नाही. संसार, लग्न म्हणजे फक्त सेक्स,पैसा आणि सुख असत का? संसारात एकमेकांना साथ द्यायची असते, चांगल्या वाईट वेळेत एकमेकांसाठी उभं राहिलं पाहिजे, दोन शरीर एक आत्मा प्रकाराने एकमेकांसाठी जगल पाहिजे निव्वळ लग्न म्हणून एकत्र राहणं आणि लग्नाची नीतिमत्ता वेशेवर टांगून शारीरिक संबंध परपुरुषांबरोबर करणे असल्या गोष्टींचा गवगवा करणं लोकांना योग्य वाटत कस? समाजाला घाबरायचं आणि समाजाच्या पाठीमागे व्यभिचार करायचा हे जर आजची पिढी शिकणार असेल तर विवाह बंधनात समाजाला दाखवण्यासाठी नाटक करण्यात अर्थ काय?
बडा घर पोकळ वासा या तत्वे भारतीय संस्कृतीचे लक्तरे वेशीवर टांगणारा हा चित्रपट नक्की आजच्या काळात कोणती शिकवण देत असावं?
चित्रपटाचे शीर्षक चित्रपटाला आणि हिंदू संस्कृती, भारतीय पारंपरिक तत्वांना गहराइयाँ म्हणजेच खोलात घेऊन जात आहे
दिनांक: २० फेब्रुवारी २०२२
नमस्कार,
माणूस सामाजिक प्राणी आहे कारण स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी किंवा एकट राहण्यात असणारे धोके लक्षात घेता संघटित राहणं माणूस निवडत असावा पण हाच माणूस आपल्या अंतरंगात एका पशूला जिवंत ठेवून असतो अश्याच एका पशुची आणि त्याच्या सावजाची आजची गोष्ट
डिस्ने हॉटस्टार वर काल एक चित्रपट पाहिला, नाव होतं थर्सडे. एक थरारक,रहस्यमय चित्रपट.
चित्रपट मनोरंजनाचे साधन पण त्यातून समाजप्रबोधन करण्याचे मनोधैर्य काहीच लोकांचे असते अन असच काहीसं हा चित्रपट पाहताना जाणवलं. चित्रपटाचा गाभा म्हणजे एक बलात्कार झालेली स्त्रीला ज्यावेळी समाजाने उभारलेली न्यायव्यवस्था न्याय देण्यास अयशस्वी ठरते त्यावेळी झालेला प्रसंग विसरून पुढं जाण्याच्या प्रयत्नात पुन्हा तो बलात्कारी पुन्हा एकदा सामोरा येतो त्यावेळी गुन्हा करणारा आरोपी मात्र स्वतःचे नाव बदलून आयुष्य जगत आहे हे पाहून तिला प्रचंड मनस्ताप होतो आणि स्वतःला आणि बलात्कार होणाऱ्या स्त्रियांसाठी ती जे पाऊल उचलले ते चित्रपट पाहण्यात एक थरार जाणवतो. गोष्टीचे एक एक पदर अलगद बाजूला होऊन सत्य नागव होणं पहायचे असेल तर हा चित्रपट नक्की पहा.
बलात्कार म्हणजे नक्की काय? एकमेकांची संमती नसताना,बळाचा वापर करून करण्यात येणारा पाशवी संभोग. काही मिनिटांचा अघोरी प्रकार आयुष्याची राखरांगोळी करतात. सहसा स्त्रियांवर होणारे अत्याचार यांचे प्रमाण सर्वाधिक आहे याचा अर्थ बलात्कार फक्त स्त्रियांवर होतात अस नाही काही वेळा पुरुषांवर देखील बलात्कार झाल्याच्या घटना आहे मात्र त्याचे प्रमाण अत्यल्प किंवा नाही म्हणावे असेच असते. एकतर्फी प्रेम, मानसिक विकलंगता, लैंगिक भूक यामुळे तर कधी कधी निव्वळ मौज म्हणून बलात्कार करणाऱ्यांची संख्या निरनिराळ्या बातम्यांमधून आपल्याला ऐकायला मिळते. बलात्कारी ज्यावेळी वासनेच्या आहारी जाऊन पाशवी बलात्कार काही महिन्याच्या बालकांवर किंवा वृद्ध महिलेवर करतात त्यावेळी त्याची बातमी ब्रेकिंग करून त्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी मोर्चे,आंदोलन, मेणबत्ती पेटवण्याव्यतिरिक्त आपला समाज कोणते काम करतो? न्यायव्यवस्था किती जलद पीडित व्यक्तीला न्याय देतो? न्यायव्यवस्थेतील पळवाटा शोधून कितीतरी आरोपी निसटून जातात काही वयाचा दाखला देऊन सुटतात तर काही राजकारणी किंवा पैश्याच्या जोरावर सुटतात. ज्या आरोपीला बळाने संभोग करता येतो तो व्यक्ती नाबालिक किंवा १८ वर्षाखालील म्हणून शिक्षेविना परत समाजात वावरत असेल, सरकारी यंत्रणा आर्थिक सहाय्य करून शिलाई मशीन देऊ करत असेल तर निर्भयाला न्याय कसा मिळणार? नुसतं निर्भया नाव देऊन बलात्काराचे भय गेले का? दिल्लीतील निर्भया असो की महाराष्ट्रातील कोपर्डी किंवा बंगलोर बलात्कार किंवा हथरस किंवा कोणताही अन्य बलात्कार याची बातमी होते, पंधरा वीस दिवस रान पेटवले जाते आणि नंतर स्मशान शांतता. पुढं काहीही होत नाही,झालं तर लोकांच्या पुढं येत नाही आणि आलं तरी रोज मरे त्याला कोण रडे या अनुषंगाने लोक दुर्लक्ष करतात. पीडित व्यक्ती,कुटुंबांना न्याय मिळणार कसा?
न्यायपालिका न्याय करण्यासाठी असते पण १०० दोषी सुटले तरी एका निरपराध व्यक्तीला शिक्षा होता कामा नये, आरोपीला देखील असणारे हक्क, खोट्याला खर आणि खऱ्याला खोट करणारी वकील, पैसे यामुळे कित्येकदा आरोपी सुटून जातो आणि समाज गृहीत धरतो की ह्या पाशवी कृतीनंतर देखील सहीसलामत सुटता येते आणि हाच विचार बदलण्यासाठी, दोषींना शासन, पीडित व्यक्तींना न्याय मिळण्याचा आग्रह हा चित्रपट लोकांसमोर मांडतो. सरकारने असे कायदे, शिक्षा केल्या पाहिजे की बलात्कारच काय तसा विचार करणाऱ्यांना भीती वाटली पाहिजे. बलात्कार सारख्या गुन्ह्याला मृत्यूदंडाखेरीज कोणतीही दुसरी शिक्षा छोटीच त्यामुळे सरकार आणि न्यायव्यवस्थेने बलात्कारासबंधी नव्याने कायदे करण्याची आणि राबवण्याची आज काळाची गरज आहे.
आजकाल बलात्कार होण्याचे प्रकार नवरा बायको यांच्या नातेसंबंधात देखील होत असतात, लग्न म्हणजे संभोग करण्याचा परवाना नसतो पण तसा परवाना समजणाऱ्या लोकांना कुटुंब,प्रेम याच्या व्याख्या नव्याने समाजाने शिकवले पाहिजे. इच्छा नसताना होत असलेला शारीरिक, लैंगिक छळ हा बलात्कारच त्यामुळे ह्या बलात्काराना थोपवणे हे केवळ न्यायव्यवस्थेची जवाबदारी अस समजून लोकांनी,समाजाने स्वतःची जवाबदारी झटकायची हे योग्य नाहीच. प्रत्येक व्यक्तीने आपल्या कुटुंबातील व्यक्तींना शाळेत शिकवले म्हणजे साक्षर केले अस न समजता स्वतःच्या घरात आपल्याला पाल्याला संस्कृती, धर्म, नीतिमत्ता शिकवण्याची गरज. मुलांना परस्त्री मातेसमान, बहिणीसमान असण्याची शिकवण, मुलींना स्वातंत्र्य आणि समंजसपणा, व्यावहारिक चातुर्य, जगाची ओळख करून देण्याची जवाबदारी कुटुंबाची. प्रत्येक कुटुंबाने जर आपल्या पाल्याना योग्य अयोग्य याची समज दिल्यास, मुलांचे स्वातंत्र्य अबाधित ठेवून त्याच्यावर लक्ष दिल्यास, वेळोवेळी चर्चा करणं आज गरजेचे आहे.
बलात्कार ही हीन कृती माफीच्या लायकीची नाही आणि बलात्कार आणि बलात्कारी रोखण्यासाठी समाजाला डोळे उघडे ठेवावे लागतील. आजच्या दरवाजे बंद संस्कृती, धावपळीच्या जगात इतरांवर लक्ष देणे अवघड असले तरी आपल्या कुटुंबाची सुरक्षा जरी प्रत्येकाने घेतली तरी बलात्कार रोखण्यास हातभार लागेल.