सोमवार, १९ फेब्रुवारी, २०२४

काका मला वाचवा

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या स्मृती सोहळ्यात त्याच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आणि त्यात अनेक लोकांनी आपली आपली मनोगत व्यक्त केले पण आघाडीचा अभिनेता आणि मुख्यमंत्री विलासराव यांचा मुलगा रितेश देशमुख यांचे भावनिक होणे आणि भाषणात कुटुंबातील त्याचे काका दिलीप कसे वडील वारल्या नंतर पाठीशी उभे राहिले यावर वक्तव्य केले. त्याच वक्तव्याचा दाखला देत काही राजकारणी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडात अजित पवार यांनी घेतलेल्या भूमिकेवर बोट ठेवत राजकीय धुळवड उडवून दिली जात आहे. एक भूमिका घेऊन, विचार घेऊन अजित पवारांनी बंड केले त्या बंडाला पक्षातील अनेक नेत्यांनी पाठबळ दिले म्हणूनच ते बंड यशस्वी झाले नाही का? कोण योग्य कोण अयोग्य याचा निर्णय काळ ठरवेल पण राजकीय लोकांना राजकारण करण्याची एक संधी सोडायची नसती म्हणूनच की काय उरल्या सुरल्या हाताच्या बोटावर मोजता येईल अश्या शरद पवार गटाच्या नेता जयंत पाटील असेल की मनसे सारखा पक्ष त्यावर भाष्य करत आपली आपली भूमिका प्रसिद्ध करतो. काका पुतण्या संबंध चांगले होते असा दाखला देत अजित पवारांना चिमटा घेण्याचे काम जयंत पाटलाने तर मनसे ने बाळासाहेब ठाकरे वारले त्यावेळी भावुक झालेला, रडणारा पुतण्या त्याचे उदात्तीकरण केलेले काही बातम्या वाचण्यात आल्याने आजचा हा थ्रेड.
जे दिसत तस नसत आणि म्हणूनच जग फसत. आजचा हा विषय म्हणजे माझे व्यक्तिगत अजित पवारांना पाठिंबा किंवा त्याच्या विरोधकांना टोला नसून केवळ इतकंच सांगायचे आहे की एक सामान्य माणूस म्हणून बातम्या वाचत असताना त्या बातम्या , त्यामागची भूमिका हे त्या लोकांना अधिक माहिती असतात जे ते भोगत असतात पण आपण केवळ त्या बातम्यांच्या अनुषंगाने न्यायाधीश बनून कोण अपराधी कोण निरपराधी हे ठरवत असतो. वैयक्तिक स्वार्थ, राजकीय पद, अभिलाषा बाळगून शरद पवारांना चिकटून राहणारा जयंत असेल की काकाच्या स्वतःच्या मुलाला हातचे देताना होणाऱ्या कुचंबनेतुन स्वतःचा मार्ग वेगळा करत नवीन पक्ष उभारणाऱ्या मनसे असो त्याच्याही काही भूमिका असतील म्हणून ते आहे तिथं उभे नाही का? राजकारण म्हणूजे केवळ चिखलफेक आणि घटनांचा दाखल देत राजकीय फायदा, टीका करण्याचे काम राजकारणी लोकांनी टाळून खरे तर सामाजिक स्तरावर समाजासाठी काम करण्यापेक्षा आपआपली राजकीय स्वार्थ साधण्याचा भाग खूपच खालचा थराचा आहे असा माझा समज आहे. प्रत्येक गोष्टीत खर आणि खोट असत तसच प्रत्येक खऱ्या किंवा खोट्या भूमिकेला त्या व्यक्तीची एक वेगळीच स्वतःची खरी आणि खोटी भूमिका असते. नात कधीच खर आणि खोट ठेरवत नाही आणि ठरवत असत तर जगात वृद्धाश्रम असते का हो? अनाथालय असते का हो? ज्या नात्याला जगात सर्वोच्च स्थान आहे ते पाल्य आणि माता नात इतकं उच्च आहे तर कित्येक माता आपल्या जन्मलेल्या बाळाला फेकून देतात ते समाजाने कसे पहायचे? तीच बालक रस्त्यावर भीक मागताना, काही कुटंणखाण्यात जातात पोहचतात ते कसे पहायचे? त्यामुळे नात आणि घेतलेली भूमिका हा दोन्ही गोष्टीची तुलना करताना ती व्यक्ती त्या परिस्थितीत कोणती भूमिका का आणि कशामुळे घेतो ह्याचा विचार करणे गरजेचे नाही का? की केवळ घेतलेल्या भूमिकेवर बोट ठेवून राजकीय फायदा उडवत बसणाऱ्या ह्या बुळग्या राजकारणी लोकांना उडवून लावायचे हे प्रत्येकाच्या तर्कविवेक बुद्धीवर सोडून द्यावे लागेल पण ही राजकीय धुळवड पाहताना राजकीय लोकांच्या स्वार्थाची कीव करावीशीच वाटते. काका पुतण्या हा वाद नसून त्या वादाची किनार नक्की काय हे पहायला पाहिजे आणि तसे नसेल तर भूतकाळात देखील स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी पेशव्याच्या घरात पेशवेपदासाठी झालेला खुनी हल्ला करणारे आणि त्या हल्ल्यात स्वतःचा जीव वाचवण्यासाठी "काका मला वाचवा" आर्त किंकाळी देणारे तरी का घडले असते

सी ए टॉपर

स्वभावाला औषध नाही कारण प्रत्येक व्यक्तीच्या एक स्वभाव असतो.स्वभाव म्हणजे त्याची वागण्याची, बोलण्याची किंवा निर्णय घेण्याची प्रक्रिया. प्रत्...