सोमवार, ११ सप्टेंबर, २०२३

शेयर मार्केट बेसिक

शेयर मार्केट बेसिक
स्टॉक मार्केट बेसिक म्हणजे काय हे न समजता केलेली गुंतवणूक हा एक जुगारच त्यामुळे शिक्षण महत्वाचे म्हणूनच हा थ्रेड
समाजात जसे श्रीमंत, मध्यमवर्गीय आणि गरीब अशी आर्थिक परिस्थिती असलेले लोक असतात तसेच स्टॉक मार्केट मध्ये लार्ज कॅप, मिडल कॅप आणि स्मॉल कॅप अशी विभागणी असते. ही विभागणी त्या प्रत्येक कंपनीची शेयरची किंमत x एकूण शेयर कंपनीचे कॅपिटल ठरवते. श्रीमंतात सगळ्यात श्रीमंत, गरीबतील सगळ्यात श्रीमंत कोणी ना कोणी असते तसेच स्मॉल,मिडल, लार्ज कॅप मध्ये देखील बेस्ट कंपनी असतेच त्यामुळे स्मॉल कॅप किंवा मिडल कॅप कंपन्या खराब असतात असे नाही. कंपनी खराब की चांगली हे पाहण्याचे, जोखण्याचे जो फंडा आहे त्यालाच फंडामेंटल वाचणे, शिकणे म्हणतात. स्टॉक मार्केट मध्ये किमान 4000पेक्षा अधिक कंपन्या आहेत पण सगळ्याच कंपन्या NSE मध्ये असतील असे नाही त्यामुळे गुंतवणूक करताना कंपनी दोन्ही BSE आणि NSE मध्ये असणारी कंपनी निवडणे गरजेचे असते. कष्टाने कमावलेल्या पैश्याला एखाद्या कंपनीत लावताना ती कंपनी किमान 10 ते 12 वर्ष शेयर मार्केट मध्ये आहे की नाही ते चेक केले पाहिजे कंपनीवर असलेले कर्ज हे ही चेक केले पाहिजे. कंपनीचा दरवर्षीचा ताळेबंद चढता आहे की उतरता की विस्कळीत आहे हे पाहणे देखील तितक्याच गरजेचे असते. फायदा कमवणारी कंपनी झालेल्या फायद्याचे करते काय ते पाहणे महत्वाचे असते. झालेला फायदा डिव्हिडंड रुपात देणारी किंवा झालेला फायदा कंपनीच्या प्रगतीसाठी पुन्हा गुंतवणूक करणे यासारख्या गोष्टी पडताळणे गुंतवणूकदाराचे काम असले पाहिजे. कंपनी करत असलेला व्यवसाय, टीक्त केलेली गुंतवणूक, मिळवणारा फायदा यानंतर त्या कंपनीच्या तिजोरीत स्वतःचे पैसे किती हा मुद्दा देखील त्या कंपनीची आर्थिक परिस्थिती दाखवते त्यामुळे हे मुद्दे पहाणे प्रत्येक गुंतवणूकदारांचे आद्यकर्तव्य असले पाहिजे. यानंतर येणारी महत्वाच्या गोष्टी म्हणजे गुंतवणूक करण्यासाठी निवडलेल्या कंपनीची ग्रोथ भविष्यकाळात कशी असेल याची पडताळणी करता येणे महत्वाचे असते. ROE रिटर्न्स ऑन इक्विटी , ROCE रिटर्न्स ऑन कॅपिटल एम्प्लॉय चेक करायला गुंतवणूकदाराचे काम असते. किमान 15% पेक्षा जास्त ROE, ROCE असणाऱ्या कंपनीत गुंतवणूक करणे फायद्याचे असते.
गुंतवणूक करताना कंपनीचा दरवर्षीचा सेल्स, एक्सपेन्स आणि मिळवत असलेला फायदा चढता, उतरता की विस्कळीत हे ही पाहिले पाहिजे. गुंतवणूक करताना कंपनीची सेक्टर मधील इतर कंपनीच्या तुलना करणे हे देखील तितकेच महत्वाचे असते. यानंतर येणारा महत्वाचा मुद्दा म्हणजे शेयर पॅटर्न मध्ये प्रोमोटर,FI, DII आणि सामान्य गुंतवणूकदारांची  हिस्सेदारी चेक केल्यास आपल्याला त्या कंपनीत कोण किती गुंतवणूक केली आहे याचा अंदाज येतो.

याव्यतिरिक्त अनेक गोष्टी गुंतवणूक करताना विचार करणे गरजेचे पण किमान वर उल्लेख केलेल्या गोष्टींची पडताळणी केल्यास चुकीच्या कंपनीत गुंतवून करणे नक्कीच टाळता येणे शक्य आहे.

थ्रेड आवडलाच तर लाईक आणि शेयर करायला विसरू नका आणि काही प्रश्न असतील तर नक्की विचारा म्हणजे त्याची उत्तरे देण्यासाठी मलाही थोडा अभ्यास करावा लागेल. पुढचा असाच नवीन थ्रेड घेऊन परत तुमच्यासमोर येईपर्यंत सर्वांना जय श्रीराम
🚩🚩🚩🚩

सी ए टॉपर

स्वभावाला औषध नाही कारण प्रत्येक व्यक्तीच्या एक स्वभाव असतो.स्वभाव म्हणजे त्याची वागण्याची, बोलण्याची किंवा निर्णय घेण्याची प्रक्रिया. प्रत्...