रविवार, २८ ऑगस्ट, २०२२

सुख महत्वाचे की दुःख?

युधिष्ठिराचा हस्तिनापूरचा राजा म्हणून राज्याभिषेक झाला तेव्हा भगवान कृष्णाने सांगितले की आता त्याला द्वारकेला जायचे आहे. 
कुंतीदेवी भगवंताच्या दर्शनास आली.भगवान श्रीकृष्ण म्हणाले, "मी तुझ्या भक्तीने खूप प्रसन्न झालो आहे, तुला काय हवे आहे ते विचारा?" 
 कुंतीदेवी म्हणाली, “हे भगवान! कृपया मला कष्ट, अडचणी, आव्हाने, गरिबी द्या. 
 भगवान श्रीकृष्ण म्हणाले, "लोक सुखसोयींनी भरलेले सोपे जीवन मागतात, तुम्ही कष्ट का मागता?" 
कुंतीदेवी म्हणाली, “महाराज! आपल्याकडे जितके विलासी आणि विपुलता आहे तितकेच आपण भौतिक क्षेत्राकडे वळतो आणि आपल्याबद्दल विसरून जातो. भौतिक सुखापेक्षा आध्यात्मिक उन्नती हे माझे अंतिम ध्येय आहे. म्हणून कृपया मला हे कष्ट आणि अडचणी द्या.” 
जर तुम्हाला सर्व काही मिळाले पण भगवान कृष्ण गमावला तर तुम्ही सर्व काही गमावले जर तुम्ही सर्व काही गमावले पण भगवान कृष्ण तुमच्या पाठीशी असेल तर तुम्ही सर्व काही मिळवले! त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने दिलेले दुःख हे त्यांच्या भक्तांच्या वाढीसाठी आहे. भौतिकवादी माणसाला हे दुःख वाटू शकते, परंतु आध्यात्मिक व्यक्तीसाठी ही परमेश्वराने दिलेली कृपा आहे की त्याला आसक्तीपासून मुक्त केले जाते. प्रल्हादाला त्रास सहन करावा लागला, परंतु त्याच्या भक्तीमुळे भगवान विष्णू अवतार घेऊ लागले. मीराबाईंना त्रास सहन करावा लागला आणि ती कृष्णाच्या देवतेत विलीन झाली. अर्जुनाला त्रास सहन करावा लागला पण कृष्णाला साथ दिली. सुदामाला त्रास झाला आणि भगवान श्रीकृष्ण रडत आपल्या भेटीसाठी धावले. शबरीला त्रास सहन करावा लागला आणि प्रभू रामाला तिच्या घरी बसवले. गोपिकांनी दु:ख सहन केले, आणि त्यांना शरणागती, प्रेम आणि देवाच्या भक्तीचे प्रतीक म्हणून मान्यता मिळाली. द्रौपदीला त्रास सहन करावा लागला आणि कृष्णाला तिचा मित्र मिळाला. संकटे आणि अडथळे ही विशेष भक्तांसाठी देवाची विशेष कृपा आहे.तुम्हाला माहित आहे की भगवान श्रीकृष्णाचा स्वभाव सांसारिक लोकांपेक्षा वेगळा आहे. जेव्हा तुम्ही आनंदी असता तेव्हा सांसारिक लोक तुमच्यासोबत असतात, जेव्हा तुम्ही दुःखी असता तेव्हा भगवान श्रीकृष्ण तुमच्यासोबत असतात. तुमचे प्रश्न अनुत्तरित आहेत, कारण तुम्ही त्याचा शोध घ्यावा अशी त्याची इच्छा होती.एक प्रसिद्ध कथन आहे:“मी एकदा शहाणपणासाठी देवाकडे प्रार्थना केली, त्याने मला समस्या सोडवायला दिल्या, जेणेकरून मी शहाणा होऊ शकेन मी धैर्यासाठी देवाला प्रार्थना केली, त्याने मला संकटांवर मात करण्यास सांगितले म्हणून मी धैर्यवान झालो मी शक्तीसाठी देवाकडे प्रार्थना केली, त्याने मला सोडवायला अडथळे दिले म्हणून मी बलवान झालो मी प्रेमासाठी देवाला प्रार्थना केली, त्याने मला तुडवलेल्या आणि गरीबांची सेवा करायला दिली, त्यामुळे मी त्यांच्याबद्दल प्रेम वाढवू शकेन आणि मी प्रेम विकसित करू शकेन.माझ्या प्रार्थनेचे उत्तर मला जे हवे होते ते मिळाले नाही तर मला हवे होते. - स्वामी विवेकानंद 


 स्रोत- स्वामी मुकुंदानंद 

 जय श्री कृष्णा!!

गुरुवार, २५ ऑगस्ट, २०२२

बाप्पाची आरती

समर्थ रामदास स्वामी यांच्याबद्दल काही दिवसांपूर्वी ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू नव्हते अशी वावडी उडवण्यात आली ती एका राजकीय पक्ष आणि व्यक्तीची विशिष्ट समाजाला निर्देश करून लोकांमध्ये फूट पाडून स्वतःचा राजकीय फायदा पाहणाऱ्याची आजच्या जगात कमी नाही. जी गोष्ट समर्थांबद्दल घडली तीच घटना काही वर्षांपूर्वी लाल महालात असणाऱ्या दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हलवून त्या लोकांनी साध्य केली. नाट्यकार गडकरी यांच्या पुतळ्याची विल्हेवाट लावणारे देखील तीच लोक होती जी हिंदू धर्माला जातीपातीत विभागण्याचे काम निष्ठने करत होती. आज हिंदू धर्म वाढवणे, जोडणे, संघटित करणे महत्वाचे असताना इतिहासातील व्यक्ती, त्यांचे संदर्भ, कामगिरी, व्यक्तिमत्त्व यात दोष दाखवून केवळ त्या व्यक्तीची नाही तर इतिहास आणि भविष्य दोन्ही गोष्टींची आबाळ होत आहे हे लोकांनी लक्षात घेतले पाहिजे. हिंदू स्वतःला हिंदू म्हणवून घेण्यापेक्षा आज स्वतःला अमुक तमुक जातीचा अस मानून, त्या व्यक्तींबरोबर राहून हिंदुत्वाची मोहीम कमजोर करत आहे. वर उल्लेख केलेल्या आणि न केलेल्या अनेक घटनांमुळे ब्राह्मण समाज हिंदू म्हणून एकत्र येईल का? तसही लोक धर्मापेक्षा जातीत अडकल्याने ब्राह्मण समाजातील लोक दुसरा ब्राह्मण भेटला की त्याला बंधू, कुटुंबातील एक यासारखे भेटतात,बोलतात, मदत करतात. काम करण्याच्या ठिकाणी तर त्याची युती पाहण्यासारखी असते असे का होत आहे? हे लक्षात घेणे गरजेचे आहे. हिंदूंनो जातीपातीचे पाश तोडा आणि हिंदू आणि हिंदुत्वाची कास धरा तरच आणि तरच आपण दहशतवादी लोकांच्या विरोधात एकत्र उभे राहू शकतो.थोडस विषयांतर झाले असले तरी एकाला एक असे विषय जोडून आल्याने लेखणीला आवर घालणे जमले  नाही पण मूळ विषयावर येत असताना मला हे सांगायचे आहे की काही दिवसात गणपती आपल्या प्रत्येकाच्या घरी विराजमान होणार आहेत, एक आनंदी उत्सव आपण सगळे जण अनुभवणार आहे अश्या वेळी आपण जी बाप्पाची आरती म्हणतो ती चुकीची म्हणणे गैर त्यामुळे ती योग्य पाठ करूनच म्हणयालाच पाहिजे.गणपती बाप्पाची ही आरती लिहली ती समर्थ रामदास स्वामी यांनीच. बाप्पा म्हणजे ज्ञान, बुद्धी, नावीन्य, नवीन गोष्टींच्या प्रारंभाची देवता. कोणत्याही शुभ प्रसंगी सर्व देवतांच्या आधी पूजण्याचे महत्व गणपती बाप्पाला मिळाले आहे असा हा बाप्पा संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर देशात आणि जगात हिंदू धर्मातील लोक पूजत असतात. महाराष्ट्रात अनेक भाविक अष्टविनायक यात्रा करून बाप्पाचा आशीर्वाद घेत असतात अश्याच पुण्यातील अष्टविनायकांमधील एक मयुरेश्वर या मोरगावतील गणपतीची मूर्ती पाहून ही आरती लिहिण्याची प्रेरणा समर्थ रामदास ह्यांना मिळाली असे मानले जाते. ही आरती जोगिया ह्या रागात रचली आहे.अन्य आरतींप्रमाणे हीसुद्धा, प्राचीन मंत्रांप्रमाणे संस्कृतमध्ये लिहिलेली नसून, तिची रचना देशी भाषेमध्ये केली गेली आहे. 

 बाप्पाची आरती 


सुखकर्ता दुखहर्ता, वार्ता विघ्नांची| 
नुरवी; पुरवी प्रेम, कृपा जयाची | 
सर्वांगी सुंदर, उटी शेंदुराची| 
कंठी झळके माळ मुक्ताफळांची॥१॥ 
जय देव, जय देव जय मंगलमूर्ती| 
दर्शनमात्रे मन कामना पूर्ती ॥धृ॥ 
रत्नखचित फरा, तुज गौरीकुमरा| 
चंदनाची उटी, कुमकुम केशरा| 
हिरेजडित मुकुट, शोभतो बरा | 
रुणझुणती नूपुरे, चरणी घागरिया| 
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ॥२॥ 
लंबोदर पीतांबर, फणिवरबंधना | 
सरळ सोंड, वक्रतुंड त्रिनयना| 
दास रामाचा, वाट पाहे सदना| 
संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे, सुरवरवंदना| 
जय देव जय देव, जय मंगलमूर्ती| 
दर्शनमात्रे मन कामना पूर्ती ॥३॥ 

बाप्पाची ही आरती इतकी प्रसिद्ध आहे की संस्कृत भाषेत असूनही आपल्या बोली भाषेतील मराठीत आहे असा भास होतो असे असले तरी यात आजही चुका करणारे, चुकीचा उच्चार करणाऱ्याची कमी नाही त्यामुळे ज्यांच्या ज्यांच्या आरती म्हणण्यात चूक होत असेल ती दुरुस्त करण्याची वेळ आली आहे. आरतीचा भावार्थ सुख देणारा, दुःखाचा नाश करणारा संकटाची बातमीही शिल्लक न ठेवणारा, प्रेमाचा निरंतर प्रवाह देणाऱ्यांची कृपा सतत राहणारा गणेश. सर्वांगाला शेंदुराची उटी लावणारा, चमकदार मोत्यांची माळ घालणाऱ्या आणि त्याच्या फक्त दर्शनाने मनातील इच्छा अपेक्षा पूर्ण होतात त्या गणेशाचा जयजयकार असो. पार्वतीचा मुलगा, रत्नांनी शोभीत केलेला, मोराचा तुराप्रमाणे डोलणारा, चंदनाची उटी, माथ्यावर केशर आणि हिऱ्यानी सुशोभित केलेला मुगुट, आवाज करणारी आभूषणे श्रीगणेश परिधान करतात. मोठे पोट, पिवळे वस्त्र परिधान केलेले, पोटावर पट्ट्यासारखे नागराज याना बांधून ठेवणाऱ्या गणेशाची सोंड सरळ तर चेहरा वाकडा आहे आणि आपल्या त्रि म्हणजे तीन डोळ्यांनी ते आपल्या भक्तांकडे पाहत आहे अश्या गणरायाचे घरी आगमन होण्याची वाट दास रामाचा म्हणजेच समर्थ रामदास पाहत आहे. सर्वांनाच पूजनीय असलेल्या संकटात पावावे, निर्वाणीच्या क्षणी रक्षण करावे अश्या देवाला देव देखील वंदन करतात. भावार्थ हा शब्दशः अर्थ नसला तरी एकंदरीत आरतीमध्ये आपण श्रीगणेशाची स्तुती करतो, त्याचे वर्णन करतो त्याचे आपल्या आयुष्यातील स्थान प्रगट करतो. आरतीमध्ये गजानन त्रिनेत्र आहेत असे म्हंटले आहे आणि शक्यतो आपण तीन डोळे असलेला गणपती कधी पाहिलेला आठवणार नाही पण रामदास स्वामी यांनी ज्या मयुरेश्वर गणेशाला पाहून ही आरती लिहली त्याला मात्र तीन डोळे आहेत हे आपला समाज विसरतो. गणपती बाप्पा आपल्या प्रत्येकाच्या घरी आनंद, सुख, समाधान, यश, प्रगती घेऊन येणार आहेत त्याच्या स्वागताची तयारी झाली की नाही? चला चला घाई करा आणि ही माहिती तुम्ही दुसऱ्यांना पाठवा, घरी लहान मुलांना सांगायला विसरू नका. 


ओम गं गणपताय नमः

मंगळवार, १६ ऑगस्ट, २०२२

धप्पागिरी मठ आणि रावसाहेब

सामान्य किंवा अतिसामान्य दिसणारा, कुरळ्या केसांचा,मोठ्या डोळ्यांचा, अडखळत बोलणारा रावसाहेब याच्या नामकरणासाठी त्याच्या पालकांनी इतकं भारदस्त नाव स्वीकारले हे निसर्गाशी केलेली एक क्रूर थट्टा आहे. जरी आवभाव,राहणीमान,रंग, रूप नसलेला थोडासा भोळसट व्यक्तीला जगाला रावसाहेब म्हणावं लागत यापेक्षा मोठी शिक्षा कोणती असेल बर? आपले हे रावसाहेब जोखिड गावाच्या वाडीवरच्या प्राथमिक शाळेचे शिक्षक. शिक्षकी पेशा असल्याने आणि त्याच्या नावामुळे त्या छोट्या वाडीवर रावसाहेबाची खाशी साहेबी थाट होता. रावसाहेब जरी छोट्या वाडीवरच्या दोन वर्गाच्या प्राथमिक शाळेत असले तरी आपल्या विद्यार्थीची गणना हुशार विद्यार्थी व्हावी यासाठी बरेच काबाडकष्ट घेत असत. गेल्या दोन वर्षात वाडीवरच्या शाळेची डागडुजी, झाडे लावणे, स्वच्छता यासर्वांमुळे वाडीवरच्या त्या शाळेने आपले रुपडे पालटले होते. दोन वर्षात सुट्टी विरहित केलेल्या काबाडकष्टाचे वाडीवरचे थोर मोठी लोक स्तुती करत होती अश्यातच रावसाहेबाच्या अभिनव डोक्यात मुलांना ध्यानसाधना (meditation) करण्यास शिकवून मन एकाग्र करून अभ्यासात आजच्या पेक्षा हुशार बनवण्याचे, अभ्यासात एकाग्रता आणण्याचे ध्येय बाळगले. मनात आलेला प्रकार वाडीवर आठवडी बाजारात थोरामोठ्या लोकांच्या पुढे ठेवला आणि दर वेळीप्रमाणे रावसाहेबाच्या मागणीला भरगोस पाठिंबा मिळाला, आणि शाळा सुरू होण्याआधी ध्यानसाधनेमध्ये पारंगत होण्याचे नवी ध्येय रावसाहेबाच्या डोळ्यासमोर फिरू लागले.

ध्यानाने चित्त शांत होते, एकाग्र होते आणि एकाग्र झालेले मन असाध्य साध्य करण्याची ताकद ठेवते अस अनेक पुस्तकात, थोरामोठ्या लोकांच्या तोंडातून ऐकलेले वाक्य सत्यात येणार ह्या विचाराने रावसाहेब जाम खुश होता. जोखिडसारख्या आदिवासी, शुष्क प्रदेशातून ध्यानसाधना शिकण्यासाठी हिरव्यागार, थंड, नयनरम्य कोकणातील धप्पागिरी मठात जाण्याचे रावसाहेबांनी पक्के केले होते. आजच्या आधुनिक काळात ध्यानासारखा अनुभवाने प्राप्त होणारा, सिद्ध होणारा प्रकार शिकण्यासाठी दहा दिवस लोकांनी काढणे हे विशेषच त्यापेक्षा जास्त विशेष जर कोणाला वाटले असेल तर ते जोखिड गावातील अबालवृद्ध लोकांना. रावसाहेब प्रवासाला निघण्याची तारीख पक्की झाल्यापासून गावातील लोक आपापल्या परिस्थितीनुसार खायचे प्यायचे पदार्थ, वर खर्चाला पैसे याचे नियोजन करत होते. जोखिड गावातून तालुक्याच्या गावापर्यत सायकलवर नंतर लाल डब्याच्या परीतून कोकण हा प्रवास ठरलेला. गावातील पैलवान गडी बलराम याची मास्तर रावसाहेबाला तालुक्याच्या गावाला पोहचते करण्याची जवाबदारी मिळाली होती.

धप्पागिरी जाण्याचा दिवस उजाडतो, रावसाहेब सगळी तयारी करून बलरामची वाट पाहत ओट्यावर बसलेले असतात. थोडयाच वेळात तिथं पैलवान बलराम आपल्या सायकलसोबत रावसाहेबांना हाक मारतो. बलराम गावातील एक प्रतिष्ठित पैलवान, गावागावात होणाऱ्या देवाच्या यात्रेत कुस्त्या करणारा रांगडा गडी. अंगाने धष्टपुष्ट, ओठांवर बहारदार मिशी, सकाळ संध्याकाळ कसरतीत घळवणारा, व्यायामाने दंड मांड्या कसलेला बलरामचाआवाज शरीराच्या मानाने खूपच पातळ होता. त्याने आणलेली सायकल त्याला मागच्या कुस्तीच्या स्पर्धेत बक्षीस मिळाली होती. बलरामाने सायकल बाजूला लावत मास्तर रावसाहेबांना रामराम घालत प्रवासाचे सामान खांद्यावर घेत उशीर तर झाला नाही ना अशी विचारणा केली. रावसाहेब देखील कोणताही बडेजाव न करता आपल्या भोळसट स्वभावाला धरून काही नाही काही नाही म्हणत उरलेले सामान उचलले. सायकलीच्या हँडलला सामान लावताना बलरामच्या बायकोने आणलेले दिलेले बेसनाच्या लाडूंचा डबा मास्तरांच्या हातात देऊन चालयचं का आता मास्तर म्हणत सायकलवर बलरामने टांग मारली थोडस पळत जाऊन मास्तर रावसाहेबाने सायकल वर उडी मारली.

बलराम सपासप सायकल मारत होता आणि एकसारखी बडबड देखील करत होता पण रावसाहेबाचे त्या बदबडीमागे काही लक्ष नव्हते. रावसाहेव मनाने कधीच कोकणात पोहचले होते. तस कोकणातल्या ह्या धप्पागिरी ध्यान केंद्राबद्दल केवळ ऐकीव माहिती त्याला होती. राहण्याची, खायची चांगली सोय शिवाय काही बंधन असतात तिथे अस ऐकले होते. दहा दिवसात केंद्रात ध्यान कसे करायचे हे शिकवणार होते. रावसाहेब ह्या नवीन प्रकार शिकण्यास खूपच इच्छुक होते. विचारांच्या तंद्रीत आणि बलरामाची तालमीतील कसरतीची करामत पण जोखिड गावातून तालुक्याच्या गावात पोहवहण्याचा हा प्रवास चुटकीसरशी संपवा इतका लवकर संपला असा भास रावसाहेबांना तेव्हा झाला जेव्हा आडदांड बलराम रावसाहेबाच्या खांद्याला धरून त्यांना हलवायला लागला. कोकणातून थेट एस टी स्टँड वर भानावर येत मास्तर सायकलवरून खाली उतरले. बालरामने झाडाला सायकल उभी करत एसटी लागली का ते पहायला गेला.

मास्तर रावसाहेब सायकलवरून आपल्या पिशव्या काढत, हातातील पिशवी सांभाळत बलरामच्या बायकोने दिलेला पितळी डबा सावरत झाडाच्या सावलीला उभे राहिले.

सनातन धर्मातील गोष्टी

दिनांक २६/८/२०२२



दिनांक २६/०८/२०२२

आजची गोष्ट: बलराम आणि श्रीकृष्ण याच्याआधी जन्मलेल्या सहा मुलांची कथा

सनातन धर्म इतका प्राचीन आहे की त्याचा अभ्यास करण्यासाठी आयुष्य थिटे पडेल पण ब्लॉग किंवा ट्विट यातून सनातन धर्माच्या काही ज्ञात अज्ञात गोष्टी तुमच्या पर्यत पोहचवण्याचे जो मनोमन संकल्प केला आहे त्यात आज एक नवीन गोष्ट सादर करत आहे, पण ही एक गोष्ट आहे की एका गोष्टीत अनेक गोष्टी हे समजून घेण्यासाठी नक्की वाचा आणि आवडली तर इतरांना फॉरवर्ड देखील करा ही माझी नम्र विनंती आणि तेवढं follow करायला विसरू नका कारण follow केलेत तरच अश्याच प्रकारचे अनेक लेख तुमच्यापर्यत पोहचणार ना

आपल्या सगळ्यांना कृष्ण जन्माची कथा माहीत असेलच पण ही कथा ऐकताना, मुलांना सांगताना मनात एक प्रश्न उत्पन्न झाला की कृष्णाचा जन्म आठवा होणार होता तर आधी जन्मणाऱ्या त्या सहा मुलांचा असा काय दोष होता की ते जन्मतःच मृत्यूला सामोरे गेले. आता इथे सहा असा उल्लेख केल्यामुळे वासुदेव आणि देवकी याच्या सात मुलांचा वध कंसाने केला अस सांगण्यात येते त्यामुळे नक्की सहा की सात याबद्दल शंका उपस्थित होणे साहजिक पण हीच तर गंमत आहे आपल्या सनातन धर्माची की इथे प्रत्येक गोष्टीला एक  बॅकअप असतो आणि तो सप्रमाण सिद्ध आजच्या गोष्टीने नक्की होईल. सहा मुलाचा वध केल्यावर देवी योगमायाने देवकीच्या पोटातील सातवा गर्भ वसुदेवाच्या अन्य पत्नी रोहिणीमध्ये हस्तांतरित केला ज्यामुळे बलरामचा जन्म झाला, रोहिणी कंसाने पती वासुदेव आणि देवकी यांना तुरुंगात टाकले असताना वासुदेवचा मित्र नंद याच्या घरी शरण आली होती. या गोष्टींमुळे हे सिद्ध होते की कंसाने देवकीच्या सहा मुलांना ठार मारले होते आणि सातव्या मुलाच्या जन्म होण्याआधी गर्भपात झाल्याची बातमी त्याच्यापर्यंत पोहचली होती त्यानंतरची कृष्ण जन्म, वासुदेव यामुनेतून नंदाकडे जाणे मुलांची अदलाबदल ही गोष्ट तर सर्वांना तोंडपाठ असेलच नाही का? पण सुरुवातीला म्हंटल्याप्रमाणे कृष्ण बलराम याच्या आधी जन्मलेल्या त्या सहा मुलांचा असा काय दोष असेल की जन्मतः त्यांना मृत्यूला आलिंगन द्यावे लागले?

गोष्ट समजून घेण्यासाठी अजून थोडे मागे जावे लागेल, कलानेमी नावाचा एक दैत्य होता त्याला सहा मुले आणि एक मुलगी जीचे नाव वृंदा होते तिचा विवाह जालंधरशी झालेला होता आणि कलानेमीला सहा मुलगे होते जे त्यांच्या पूर्वीच्या जन्मात ब्रह्मदेवाचा मानसपुत्र मरिचीचे पुत्र होते .धर्मग्रंथानुसार ब्रह्मलोकात स्मर, उद्रिथ, परिश्वंग, पतंग, क्षुद्रामृत आणि घ्रिणी नावाच्या 6 देवता होत्या. जे ब्रह्माजींचे आशीर्वाद होते. पौराणिक कथांनुसार ब्रह्माजींची कृपा आणि स्नेह त्यांच्यावर सदैव राहात होता. ब्रह्म त्याच्याकडून होणाऱ्या प्रत्येक छोट्या चुकीकडे दुर्लक्ष करायचे. त्यामुळे हळूहळू त्याला स्वतःचा अभिमान वाटू लागला. त्याला वाटले की समोर काहीच नाही. याच दरम्यान एके दिवशी त्यांनी ब्रह्माजींचाही अपमान केला. त्यामुळे ब्रह्माजींचा त्याच्यावर कोप झाला, या क्रोधाच्या भरात येऊन त्यांनी त्याला पृथ्वीवर राक्षसवंशात जन्म घेण्याचा शाप दिला. शाप मिळताच त्याची भ्रष्ट बुद्धी बरी झाली आणि तो ब्रह्माजींकडे क्षमा मागू लागला. ब्रह्माजींना त्यांची दया आली आणि त्यांनी शाप कमी करताना त्यांना सांगितले की आता तुला दैत्य वंशात जन्म घ्यावा लागेल पण तुझे पूर्वज्ञान कायम राहील.


त्यानंतर त्या सहा देवांनी कालानुसार राक्षस राजा हिरण्यकशिपूच्या घरी जन्म घेतला. या दरम्यान त्यांनी पूर्वजन्मीचे ज्ञान असल्याने कोणतेही चुकीचे काम केले नाही. ब्रह्माजींना प्रसन्न करण्यासाठी त्यांनी सर्व वेळ तपश्चर्या करण्यात व्यतीत केले. यावर प्रसन्न होऊन ब्रह्माजींनी त्याला वरदान मागायला सांगितले.


त्या सहा देवांनी, दानव योनीच्या प्रभावाखाली, त्यांनी एकच वरदान मागितले की आपण देवतांच्या, गंधर्वांच्या हातून मरू नये आणि रोगाने मरू नये. त्यांच्याकडून हे वरदान ऐकून ब्रह्माजींना अस्तु म्हणत कुतूहल वाटले. इकडे हिरण्यकशिपू देवांची पूजा केल्यामुळे आपल्या पुत्रांवर रागावला होता. त्यानंतर त्याने त्या सर्वांना शाप दिला की तुमचा मृत्यू देवता किंवा गंधर्वाच्या हातून नाही तर राक्षसाच्या हातून होईल.

या शापामुळे तो देवकीच्या पोटी जन्माला आला आणि कंसाच्या हातून मरण पावल्यानंतर त्याला सुतला लोकात स्थान मिळाले असे म्हणतात.

बहुतांश लोकांना ही गोष्ट माहीत असेलच असे नाही पण हिंदू धर्माच्या कर्म सिद्धांतानुसार, वाईट आणि चांगल्या कर्मांच्या एकत्रित कृतींचा परिणाम पुण्य/आशीर्वाद किंवा पाप/शिक्षामध्ये होतो. कर्म कसेही फिरून परत आपल्याला भेटणार हे निश्चित असते मग ते चांगले कर्म असो की वाईट. हिंदू सनातन धर्मात पुनर्जन्म हा सिद्धांत आहे त्यामुळे शरीर जीर्ण होऊन संपल्यानतरही आत्मा नवीन शरीराचा आसरा घेऊन पुन्हा जन्म घेतो आणि पूर्वी केलेल्या कर्माची फळे चाखतो. जिथे देव दानव याना हा फेरा सुटला नाही तिथे आपली काय बिषात त्यामुळे धार्मिक, पुराण गोष्टीतून शिक्षा घेऊन आपण आपले कर्म सत्कर्मात घालवण्याचा प्रण करून जिवंत असे पर्यत सर्वांना बरोबर घेऊन सुखाने संसार केला पाहिजे.

चला तर परत भेटू पुढच्या गोष्टीत, गोष्ट आवडली तर नक्की follow करा शेयर करा.

धन्यवाद

क्रमशः

२५ ऑगस्ट २०२२

नमस्कार,

आज तुम्हाला बलराम आणि श्रीकृष्ण यांचा देहत्यागाची गोष्ट सांगणार आहे.

महाभारताचा निकाल पांडवांच्या बाजूने लागला, पांडवांनी सुयोग्य राज्यकारभार चालू केला आणि ह्याच काळात यादवांचा प्रभाव वाढायला लागला होता. श्रीकृष्णाने ठरवले असते तर युद्ध झालेच नसते आणि कौरव कुळाचा नाश झाला नसता अशी धारणा कौरवाची आई गांधारीची होती म्हणूनच रागाच्या भरात तिने श्रीकृष्णाला यादव कुळाचा सर्वनाश होईल आणि कृष्ण तिच्यासारखा एकटा राहील असा शाप दिला होता. काही वर्षानंतर हा शाप पूर्ण होण्याची वेळ आली होती, श्रीकृष्णाचा अवतार कार्य संपले होते अश्यावेळी वायूदेवाने हा निरोप श्रीकृष्णापर्यत पोहचवला पण यादव कुळाचा अंत झाल्याशिवाय अवतार संपणे अशक्य होते त्यामुळे दुसऱ्याच दिवसापासून अशुभ, असंतोषाचे वारे गोकुळावर फिरू लागले, यादव महाभारतातील पराक्रम आणि सामर्थ्य यावरून भांडणे करू लागले, भांडणे इतकी वाढली की त्याचा कलह मारामारीत आणि नंतर युद्धात परावर्तित झाला. यादव एकमेकांशी युद्ध करत करत गांधारीच्या शापाप्रमाणे संपून गेले हे बलराम याना कळल्याने त्यांनी समुद्राच्या जवळ ध्यानस्थ बसून आपले प्राण सोडले. बलराम म्हणजे आदिशेषनाग, त्यांनी बलरामच्या देहातून आपला अवतार संपवून बाहेर पडले आणि समुद्राच्या तळाशी निघून गेले. ज्यावेळी यादवांचा संहार आणि बलराम यांचे देहत्याग माहिती श्रीकृष्णाना मिळाली त्यांनी आपला अवतार संपवण्याचा निर्णय घेऊन जंगलाच्या दिशेने प्रवास चालू केला, थोड्या वेळाने ते आपल्या चतुर्भुज अवतारात एका झाडाखाली विलाप आणि आराम करण्यासाठी बसले असताना एक विषारी बाण त्याच्या पायाच्या अंगठ्यात घुसला. बाण मारणारा आदीवासी जरा नामक व्यक्तीने ज्यावेळी श्रीकृष्ण याना बाण लागला हे पहिले त्यावेळी तो खूप घाबरला पण श्रीकृष्णाने त्याला शांत करून मागील अवतारात श्रीरामाने बालीला झाडामागे लपून बाण चालवला त्या कर्माचे फळ आपल्याला ह्या अवतारात मिळाले आणि त्या अवतारात बालीला दिलेले वचन पूर्ण केले असे आदिवासी जरा याला पूर्वजन्माचे रहस्य सांगून श्रीकृष्णाने आपला अवतार संपवला. त्याच दिवसापासून पृथ्वीवर कलियुगाची सुरुवात झाली.

१६ ऑगस्ट २०२२

नमस्कार,

दुष्टांच्या नाशासाठी, सज्जनांच्या रक्षणासाठी आणि धर्माचा रस्ता दाखवण्यासाठी देवांना भूलोकात जन्म/ अवतार घ्यावा लागत होता. सृष्टीचा तारणहार भगवान विष्णू यांनी कैक वेळा अवतार घेऊन मानवी जीवनाची घडी बसवली आणि प्रत्येक अवतारात त्याना सहकार्य करायला, भगवान विष्णू यांचा सहवास लाभावा म्हणून  शेषनाग देखील भगवान विष्णुबरोबर अवतार घ्यायचे अश्याच शेषनागाचे लक्ष्मण आणि बलराम हे दोन अवतार आपण आज चर्चा करणार आहोत. सेवा भावात कमी पडू नये म्हणून भगवान याच्याबरोबर जन्म घेणारा शेषनाग अवतार संपल्यावर सेवा करण्यात दिरंगाई नको म्हणून भगवान विष्णूच्या आधी अवतार देहत्याग करायचा. बलराम असो की लक्ष्मण दोन्ही अवतारात राम आणि कृष्ण याच्या आधी देहत्याग करणाऱ्या शेषणगाची ही गोष्ट.
एकदा श्रीरामाना भेटायला एक योगी येतो तो योगी एकांतात श्रीरामाशी चर्चा करायची आहे पण त्यासाठी एक अट ठेवतो ती म्हणजे जो कोणी त्याची चर्चा ऐकेल किंवा त्यांना चर्चा करताना पाहिलं त्याला श्रीराम मृत्यूदंड देतील. योगीची ती अट मान्य करून सावधनेतेचा इशारा लक्ष्मणाला देऊन द्वारपाल म्हणून काम करण्यास सांगितले जेणेकरून कोणीही आत येणार नाही आणि चर्चा ऐकणार नाही. श्रीरामाची आज्ञा पूर्ण करण्यासाठी लक्ष्मण दारावर द्वारपाल म्हणून पहारा देऊ लागला. श्रीरामांबरोबर असलेल्या योगी स्वतः यम होते जे मूळ रुपात येऊन ब्रम्हदेवाच्या सांगण्यावरून ते श्रीरामाना भेटायला आले आणि त्याचा अवतार संपवण्याची वेळ आली आहे हे सांगितले. यम आणि श्रीराम यांची चर्चा चालू असताना लक्ष्मण धावत आत आला ज्यामुळे यम चर्चा सोडून अंतर्धान पावले पण श्रीरामाना त्यांनी ठेवलेल्या अटींची आठवण केली. श्रीराम याना आज्ञा मोडून लक्ष्मण का आत आला याचा खूप राग आला पण लक्ष्मणाने माफी मागत श्रीरामाना सांगितले की बाहेर आपणास भेटायला ऋषी दुर्वासा आले आहे आणि तात्काळ त्यांना तुम्हाला भेटायचे होते. त्यांना थोडे थांबण्यास विनंती केल्यावर त्याचा रागाचा स्फोट झाला आणि संपूर्ण रघुकुल आणि प्रजा याना शापवाणी देऊन नष्ट होण्यापासून वाचवण्यासाठी मी आपली आज्ञा मोडली. जे झाले ते झाले म्हणून श्रीराम दुर्वासा ऋषींना भेटले पण ते गेल्यानंतर त्यांना अतीव दुःख चिंता वाटू लागली. चिंताचुर श्रीरामाना पाहून गुरू वसिष्ठ यांनी लक्ष्मणाचा वध करण्याऐवजी त्याचा त्याग करण्याचा सल्ला दिला कारण चांगल्या व्यक्तींचा त्याग हा वधापेक्षा कमी नसतो. श्रीरामांनी गुरूंचा सल्ला मानून लक्ष्मणाला राज्यातून हद्दपार केले ज्यामुळे लक्ष्मण शरयू नदीच्या काठावर येऊन श्वासोच्छ्वास प्रकिया बंद करून प्राण सोडले. ही बातमी मिळताच श्रीरामाना अतीव दुःख झाले आणि त्यांनी शरयू नदीकडे धाव घेतली. आपल्या भावाला मृत्युमुखी पाहून श्रीरामनी जलसमाधी घेण्याचे ठरवले आणि अश्या पद्धतीने राम आणि लक्ष्मण यांचा अवतार संपला

क्रमशः
कृष्ण बलराम यांचा देहत्यागाची गोष्ट पुढील भागात

१५ ऑगस्ट २०२२

नमस्कार,

#सनातन धर्म प्राचीन आहे आणि त्यातील एक ना एक घटना याला पुरावा असतो अश्या खूप #गोष्टी आहेत ज्या लोकांना माहीत असतात पण धावपळीच्या या युगात लक्षात राहत नाही अश्याच गोष्टी ह्या थ्रेड मध्ये गुंफायचे आणि हिंदू धर्म, गोष्टी, संस्कार वाढवायचे अस मनात आले आहे. वेळ मिळेल तस लिखाण करेल आणि तुमच्या पुढे सादर करेल अशी अपेक्षा आहे.

आजची गोष्ट 

द्वारपाल जय विजय

वैकुंठ निवासी भगवान विष्णू यांच्या निवासाच्या बाहेर द्वारपाल म्हणून जय आणि विजय हे दोघे बंधू काम करत असत. दोघे भगवान विष्णू यांचे खूप मोठे भक्त होते आणि द्वारपाल म्हणून सेवा करत असल्याने भगवान विष्णूच्या सर्वात जवळ असणारे भक्त म्हणून त्याच्या मनात अभिमान देखील होता. एक दिवस ब्रह्मपुत्र सनक,सनंदन, सनातन, सनत्कुमार भगवान विष्णूच्या दर्शनासाठी वैकुंठाला आले पण अभिमानाने गर्विष्ठ झालेल्या आणि द्वारपाल या नात्याने जय विजय यांनी चारही ब्रह्मपुत्रांना वेठीस धरले आणि राग अनावर झाल्यानंतर ब्रह्मपुत्रांनी जय विजय यांना पापयोनीत जन्म होण्याचा शाप दिला. पापयोनी म्हणजे पृथ्वीवर जन्म. शाप मिळाल्याने जय विजय याना अतीव दुःख झाले आणि ते दुःखाने आलाप करू लागले. द्वारपाल आणि आपले भक्त याच्या रडण्याच्या आवाजाने स्वतः भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी धावतच बाहेर आले.
बाहेर येताच राग अनावर झालेले चार ब्रम्हपुत्र आणि शोकाकुल जय विजय यामुळे काहीतरी विपरीत झाल्याचा संशय भगवान विष्णू यांच्या मनात चमकून गेला. भगवान विष्णू यांनी आपल्या मधाळ बोलण्याने परिस्थितीची माहिती घेऊन चारही कुमारांच्या राग शांत केला. जय विजय त्यांना दिलेले काम पूर्ण करत होते त्याचा दोष नाही अस समजण्यात भगवान विष्णू यशस्वी झाले यामुळे चारही कुमारांनी त्यांना माफ करण्याचे ठरवले पण भगवान विष्णूनी ब्राह्मण कुमारांनी बोललेले असत्य होऊ शकत नाही अस सांगून जय विजय यांना किमान 3 वेळा तरी भूलोकात विष्णू विरोधक म्हणून जन्म घ्यावा लागेल असे सांगितले म्हणूनच पुढे जाऊन द्वारपाल जय विजय याना भगवान विष्णू यांनी मनुष्य अवतार घेऊन शापातून मुक्त केले होते.
जय विजय यांचा पहिला जन्म हिरण्यकशिपू आणि हिरण्याक्ष या राक्षस योनीत जन्म झाला. भगवान विष्णूनी हिरण्याक्ष चा वध वराह अवतार घेऊन केला ज्यामुळे त्याचा बंधू हिरण्यकशिपू याने विष्णूंशी शत्रुत्व स्वीकारले पुढे जाऊन घोर तपश्चर्या करून ब्रह्माकडून वरदान मिळवले आणि वरदानाच्या अहंकाराचा तिन्ही लोकांत हाहाकार मांडला. स्वतःच्या राज्यात विष्णू भक्ती करण्यावर बंदी केली, तरीही बंदी झुगारून भक्ती करणाऱ्याना मारून टाकण्याची शिक्षा तो देऊ लागला.नियतीने मात्र त्याच्याच मुलाला विष्णू भक्त बनवले आणि पिता पुत्र विष्णू भक्तीमुळे एकमेकांचे वैरी बनले. अनेक अयशस्वी प्रयत्नानंतर हिरण्यकश्यपूने त्याच्या पुत्राला विष्णू कोठे आहे हे रागावून विचारत ह्या खांबात तुझा विष्णू आहे का असा प्रश्न केला त्यावर भक्त प्रल्हाद याने सृष्टीच्या चराचरात नारायण याचा वास आहे असे प्रत्युउत्तर दिल्याने हिरण्यकश्यपू ने रागाने खांबावर लाथ मारली आणि त्यातून सिहांचा चेहरा आणि मानवी धड असलेले भगवान विष्णू यांचा नरसिंह अवतार प्रगट झाला. ब्रह्मानी दिलेल्या वरदानाचा एक ना एक शब्द खरा ठरवत हिरण्यकश्यपूचा वध केला आणि जय विजय यांचा भूलोकतील पहिला जन्म संपवला.
पुढच्या जन्मात जय आणि विजय यांनी रावण आणि कुंभकर्ण याच्या रुपात जन्म घेतला ज्यांचा अंत भगवान विष्णूनी श्रीराम यांचा अवतार घेऊन केला.

शापाच्या शेवटच्या जन्मात जय आणि विजय यांनी शिशुपाल आणि दंतवक्र याच्या रुपात जन्म घेतला ज्यांचा अंत भगवान विष्णू यांनी द्वापारयुगामध्ये श्रीकृष्ण अवतार घेऊन केला. शिशुपाल हा पराक्रमी, शूर आणि खूप चांगला राजा होता, त्याच्या राज्यात सर्व लोक आनंदाने आयुष्य जगत होते, कोणीही खोट बोलत नसत, वर्ण व्यवस्था असूनही सामाजिक समानता होती पण रुक्मिणी विवाहामुळे शिशुपाल आणि श्रीकृष्ण यांच्यात वितुष्ट निर्माण झाले आणि त्या दिवसापासून शिशुपाल श्रीकृष्णाचा राग करू लागला. युधिष्ठिर याच्या राजसूय यद्याच्या वेळी शक्तिशाली राजा म्हणून श्रीकृष्णाला पूजने सहमतीने ठरल्यानंतर शिशुपाल याचा राग अनावर झाला आणि भरसभेत तो कृष्णाला शिव्या देऊ लागला. शिशुपालच्या आईला दिलेल्या शब्दानुसार त्याचे 100 पाप माफ करण्याच्या वचनामुळे श्रीकृष्ण शिशुपालकडे दुर्लक्ष करत होता यामुळे शिशुपाल अधिकच जोशात येऊन शिव्या देत राहिला. एक एक करत ज्यावेळी शिशुपालचे 100 अपराध पूर्ण होणार असतात त्यावेळी श्रीकृष्ण त्याला चेतावणी देतात ती झुगारून तो शिव्या देतच राहतो शेवटी श्रीकृष्ण आपल्या तेजस्वी सुदर्शन चक्राचे आव्हान करून शिशुपालाचे शीर धडापासून दूर करतात अश्याच प्रकारे दंतवक्र श्रीकृष्ण याच्या छातीवर गदा प्रहार करण्यासाठी धावत येत असताना श्रीकृष्ण दंतवक्र याचा वध करतात. अशापद्धतीने 

द्वारपाल जय विजय यांची 3 वेळा भगवान विष्णू याच्या विरोधात जन्म घेऊन मृत्यू मिळतो आणि त्याचा शाप पूर्ण होतो. शाप पूर्ण झाल्यावर ते परत आपल्या द्वारपाल ह्या कामात गुंतवून घेतात आणि अहंकाराला सोडून देतात

यापुढील भागात श्रीराम आणि लक्ष्मण यांच्या देहत्यागाची गोष्ट तुमच्या पुढ्यात सादर करणार आहे.


सी ए टॉपर

स्वभावाला औषध नाही कारण प्रत्येक व्यक्तीच्या एक स्वभाव असतो.स्वभाव म्हणजे त्याची वागण्याची, बोलण्याची किंवा निर्णय घेण्याची प्रक्रिया. प्रत्...